शिक्षकदिनानिमित्त

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

शिक्षकदिनानिमित्त माझी एक फारावडती कविता -

    'अनंता'चा साक्षात्कार

      एखादा मास्तर असा भेटतो -
      शाळेची जाम भीती घालतो
      उठता बसता मारतो छडी
      थरथर कापतात चिमणे गडी
      विद्यार्थी ? छे, गोगलगाय
      जीवनभर पोटात पाय !
      सदा न् कदा छडी हाती
      शाळेची, जीवनाची भीतीच भीती

        एखादा मास्तर असा भेटतो -
        उस्ताद नसला तरी वस्ताद असतो
        प्रत्येक चोरवाटेची चावी
        या पठ्ठ्याला अचूक ठावी
        कुणापुढे वाकावं, कुणा लाथ मारावी
        पैसे कसे पचवावे, कॉपी कशी करावी
        सार्‍या विद्यांचे शिक्षण
        सोदा देतो सोदाहरण

          एखादा मास्तर असा भेटतो -
          जो ज्ञानाचे पंख देतो
          सात स्वर्गांचे दार उघडतो
          घरटं बांधायला तोच शिकवतो
          घरटं उबदार पिलं शानदार
          आभाळातून सारं सांभाळते घार
          आभाळाचं मन काही
          पिलांना ती देत नाही
          नजर तीक्ष्ण एकच लक्ष्य
          भक्ष्य भक्ष्य आणखी भक्ष्य !

            एखादाच मास्तर असा भेटतो -
            डोक्यात घट्ट रुतवून ठेवतो,
            भव्य स्वप्नाचा दिव्य बाण !
            अंतर्वेधी दृष्टी त्याची
            पंखात घालते पंचप्राण !
            पंख देतो, देतो शक्ती
            नाही देत थिजली शांती
            आकाशातून हिंडत असता
            भूमीवर खिळवी दृष्टी
            नजर नेहमी असतेच त्याची
            खुरडणार्‍या पायांवर
            दिगंतातून हिंडता हिंडता
            दाखवीत असता विश्वाकार
            एखादाच गुरू घडवी
            अनंताचा साक्षात्कार

              - कुसुमावती ('साधना'च्या १२ मार्च १९९४ च्या अंकाच्या मुखपृष्ठावरून)

                काय विचार करावा यापेक्षाही विचार कसा करावा हे शिकवणार्‍या सर्व मास्तरांना विनम्र अभिवादन.

                प्रकार: 

                स्लार्टी ही कविता वाचुन मला आवडणारे एक वाक्य इथे द्यावेसे वाटले ते देतेय.
                (quote ला मराठीत काय म्हणायच?)
                The mediocre teacher tells. The good teacher explains. The superior teacher demonstrates. The great teacher inspires - William Arthur Ward

                स्लार्टी, छान आहे ही तुझ्याकडची संग्रही कविता. रुनी Quote ला सुविचार म्हणता येईल ना..