तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय - मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.

http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/19/तेलुगूमधील-सहीविणा-पगारव/

- अमृतयात्री

प्रकार: 

यात्री तुमच्या कोनत्याच लिंक्स ओपन होत नाहीत. वरचा मुद्दा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही. सिग्नेचरच्या व्याख्येत फक्त स्क्रिप्टच नाही तर चिन्हेही येऊ शकतात.

सप्रेम नमस्कार.

दुवे का बरे उघडत नाहीत? कोणी मदत करू शकेल का?

मायबोलीच्या प्रसासकांपैकीही कोणीतरी सल्ला द्यावा.

आभारी आहे.

- अमृतयात्री

विंग्रजी सोडून तुम्ही इतर भाषेत सही केल्यास तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागते की मला कागदपत्रातील मजकूर वाचून दाखविला गेला आहे व मला समजावून सांगीतला गेला आहे. (मी मराठी सही करतो म्हणून मला विंग्रजी कळत नाही असा अंदाज असावा बुवा बहुतेक !)

दुव्यामध्ये देवनागरी शब्द असल्याने आपोआप दुवा तयार होत नाही आहे. प्रतिसाद्/लेखनाच्या चौकटीवर असलेला Insert/Edit link दुवा वापरून योग्यप्रकारे तुम्हाला हवा तो दुवा (link) देऊ शकाल.

राज धर्म असे कुठे आहे? मी तर एवढ्या फर्ड्या मराठी सह्या हाणतो मला अजून तरी अशी पाळी आलेली नाही. काही इंग्रजी डॉक्युमेन्त मध्ये तरतूद असेल पन सरसकट असे कुठे नाही. उदाहरणे दिली तर बरे होईल... काही लीगल डॉक्युमेन्ट मध्ये लोक नन्तर कोर्टात असा बचाव करतात आम्हाला डॉक्युमेन्ट कळले नाही व अधिकार्‍यानी फसवून सह्या घेतल्य वगैरे. विशेष्तः कर्ज प्रकरणात . तिथे मात्र असे अन्डरटेकिन्ग घेतात.

tonaga | राज धर्म असे कुठे आहे?
बरोबर आहे तुमचे. सरसकट नाही. मला लीगल डॉक्युमेन्टमध्येच असा अनुभव आला आहे. होम लोन च्या वेळी.

काही लीगल डॉक्युमेन्ट मध्ये लोक नन्तर कोर्टात असा बचाव करतात आम्हाला डॉक्युमेन्ट कळले नाही व अधिकार्‍यानी फसवून सह्या घेतल्य वगैरे. विशेष्तः कर्ज प्रकरणात . तिथे मात्र असे अन्डरटेकिन्ग घेतात.
हे कदाचित बरोबर असू शकेल. मात्र जी व्यक्ती आपल्या पदव्यांच्या प्रती बरोबर जोडतेय, आय टी च्या क्षेत्रात काम करतेय, त्यांच्याकडून असे लिहून घेणे म्हणजे जरा अती होतेय.

पदव्या धारन करनारेच अशा बोम्बा मारतात कोर्टात . अर्थात कोर्ट त्याना त्यांच्या पदव्यांची आणि अकलेची जागा दाखवून देते बर्‍याचदा. पदव्या धारण करणे आणि आय टी क्षेत्रात काम करणे म्हणजे कोणत्याही जनरल प्रोसीजरमधून सुटका मिळण्याचा परवाना आहे हा तुमचा समज तुम्ही जेवढा लवकर काढाल तेवढे तुमचे जीवन सुसह्य होईल.

सप्रेम नमस्कार.

दुवे जोडणे जमले एकदाचे. सल्ल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो.

-------------

अनेक राज्यांत उच्च न्यायालयाखालील सर्व न्यायालयात स्थानिक भाषेतच व्यवहार चालतो. शिवाय अनेक दस्त (deeds) स्थानिक भाषेत बनवावे लागतात. महाराष्ट्रातही वसंतदादांनी आणलेल्या नियमाप्रमाणे भागीदारी करार मराठीत सादर करावा लागतो. असे झाले तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेक मराठी मंडळींना नोकरीत प्राधान्य मिळेल. अन्यथा आता कोणीही उठतो व आपल्या नोकर्‍यांवर घाला घालतो. भाषेची काहीच अडचण नाही. सर्व घरचाच मामला. जणू हिंदी हीच महाराष्ट्राने राज्यभाषा म्हणून मान्य केली आहे. त्यामुळे अनेक बाबतीत दोनचारशे रूपये कमी घेऊन ही स्वतःच्या राज्यात उपाशी राहणारी मंडळी इथे येतात व नोकर्‍या बळकावतात. मग काही काळाने संख्येच्या बळावर आमच्याच डोक्यावर मिरी वाटतात.

स्थानिक भाषेचे महत्त्व टिकवून ठेवल्यास असे झालेच नसते.

क०लो०अ०

- अमृतयात्री

मी पण मराठीत सही करतो.. वर tonagaने म्हटल्याप्रमाणे फक्त काही वेळाच (आयसीआयसीआय बँकेत खाते उघडताना, घरकर्जाच्या वेळी) अंडरटेकिंग लिहून द्यायला लागली.. बाकी कधिही काही समस्या उद्भवली नाही.

आणि सहीमध्ये अगदी चिन्हेसुद्धा देउ शकता किंवा सही ही कुठल्यातरी लिपीत वाचता/लिहिता आली पाहिजे असा काही नियम नाही..

प्रिय श्री० टण्या यांसी,

सप्रेम नमस्कार.

सही इंग्रजीत नसल्यास कागदपत्रातील मजकूर कळला म्हणून पत्कर (undertaking) लिहून द्यायलाच लाहिजे असा कायदा असेल असे वातत नाही. (कदाचित खासगी कंपन्या उगाच जोखीम नको म्हणून प्रघाताप्रमाणे तसे करीत असतील. कारण:

१. बर्‍याच वेळा सहीची नक्की भाषा कळत नाही. कधी कधी सही चित्रमयही वाटते.

२. ज्या न्यायालयात स्थानिक भाषेत काम चालते तिथे इंग्रजी सही केलेल्या माणसाकडून पत्कर लिहून घ्यायलाच पाहिजे असा नियम आहे का?

३. इंग्रजीत (घोटून) सही केली की इंग्रजी लिहितावाचता नीट येते असा निष्कर्ष काढणे कितपत योग्य ठरेल?

४. वरील मूळ लेखात ज्या व्यक्तीने केवळ पगारवाढीसाठी घोटून तेलुगूमध्ये सही केली त्याला तेलुगू नीट लिहिता वाचता येत आहे असे धरले जाईल का?

अर्थात असे असूनही आंध्रप्रदेशात तेलुगू सहीविना पगारवाढ रोखली हे सत्य आहे व इतरही राज्यांत शासकीय नोकरीत अधिकृत सही संबंधित राज्यभाषेत करावी लागते असे ऐकले आहे. आणि त्याविरुद्ध कोणी न्यायालयात गेलेले ऐकले नाही.

असो. एवढे सर्व करणे दूर राहिले. आपल्या राज्य शासनाला साध्या नावाच्या पाट्या मराठीत करणे, सर्व जनतेच्या माहितीचे फलक (रेलवे, टपाल, बॅंका, खासगी आस्थापनांतही) मराठीत असण्याचा आग्रह धरणे हेसुद्धा जमत नाही. आमच्या राज्यात आमच्या भाषेत आम्ही बरीचशी कामे करू शकत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट नव्हे काय?

म्या मालदीवला मराठीत सही करायचो... मला कोनी काय बी इचारले नव्हते... आता हायद्राबादेत पण मराठी सहीच करतो...

इतरही राज्यांत शासकीय नोकरीत अधिकृत सही संबंधित राज्यभाषेत करावी लागते असे ऐकले आहे. आणि त्याविरुद्ध कोणी न्यायालयात गेलेले ऐकले नाही.
>>>
असा नियम कोठेही नाही .असेल तर दाखवून द्यावा. असूच शकत नाही. ऐकीव गोष्टी कृपया पसरवू नका.