आह .. साझ !
Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली!
आत्ता तेच वाजतंय - क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या!
किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात! हा पिक्चर - १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय थिंक तो थिएटर्स मध्ये प्रदर्शित झालाच नाही की काय कोणास ठाऊक! खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती म्हणूनच असेल. असो. तर तो पिक्चर किती कैक कारणांनी बघावासा वाटत होता.
- तथाकथित लता मंगेशकर व आशा भोसलेच्या नात्यातील गुंतागुंत त्यात दाखवल्यामुळे.
- शबाना आझमी व अरूणा इराणी लीड रोल मध्ये.
- झाकीर हुसेनचे संगीत !!!!
- झाकीर हुसेन ऍक्टर म्हणून!
एकदाचा तो टीव्ही वर दाखवला. आणि मी तेव्हा लगेचच व्हीसीआर सरसावून बसले होते, व आख्खा मुव्ही मी रेकॉर्ड केला होता.
व नंतर अगणित वेळा पाहिला.
कथा खूपच कॉम्प्लेक्स. मान्सी वृंदावन व बन्सी वृंदावन या दोघी बहिणी. त्यांचे वडिल नाव विसरले, वृंदावन (रघुविर यादव) अतिशय उत्तम गाणारे, परंतू दारूच्या व्यसनाने वाट लागलेली. लोकांकडे पैसे मागून मागून दारू पिणे इथपर्यंत व्यसन गेले. एका श्रोत्याने दारूसाठी भिक काय मागतोस म्हटल्यावर त्याने चिंब पावसात दारूच्याच नशेत पण त्वेषात म्हटलेले "बादल घुमड बढ आये’ हे सुरेश वाडकरांच्या आवाजातले मेघमल्हारातले गाणे. अक्षरश: काटे येतात ते पाहताना. (मी ९८ साली हार्डली १५-१६ वर्षांची असेन. संगीतातले काहीही न कळता इतकं कळलं .. संगीत अफाट आहे या पिक्चरचे.) हातासारशी गाणे ऐकाच!
http://www.youtube.com/v/vji36gxM9-g
मुली लहान असताना मोठीने दिदिगिरी करून पुढे पुढे केल्याचे प्रसंग आहेतच. पण मोठं झाल्यावर सुद्धा मान्सी बन्सीचे घाईघाईने लग्न लावून देते. तिला गाणं म्हणू देत नाही तसं बन्सीबरोबरच आपल्यालाही संताप येतो. बन्सी शेवटी लग्न मोडून गाण्यात करिअर करायला येते. आणि सुरू होते दोघींची स्पर्धा. रायव्हल्री. मान्सीचा इतका राग येतो ना. (अरूणा इराणी फार्र फिट्ट आहे या रोल मध्ये. अजुनही तिचा चेहरा आठवून राग येतोय मला. मस्त काम!)
शेवटी ती वेळ येतेच. जेव्हा बन्सीला मिळालेले गाणं मान्सी चोरते. (म्हणजे तिच्याऐवजी गाते) . [ असं म्हणतात ते प्रत्यक्षातले गाणं म्हणजे : ए मेरे वतन के लोगो.] तेव्हा मात्र बन्सीच्याही सहनशक्तीचा कडेलोट होतो. व एक नाते नाहीसे होते.
पुढे बन्सी संगीतकाराच्या प्रेमात पडते. [ हा आपला आर्डी असावा. ] या दोघांचे एक गाणे मला अतिशयच आवडते!! हेच ते क्या तुमने है केहे दिया.
http://www.youtube.com/v/y5z8liQ6RDw
पण इथे अजुन एक नात्यांची वीण येते. बन्सीची मुलगी कुहू(आयेशा धारकर) ही झाकीर हुसेनच्याच प्रेमात पडलेली असते. हे जेव्हा बन्सीला समजते तेव्हा ती स्वत:हून ब्रेक अप करते नाते. परंतू हा धक्का सहन न होऊन झाकीर हुसेनचा अपघात होतो. (की आत्महत्या. आठवत नाही. ) या धक्क्यातून बन्सी गाणं सोडते.
पुढे बरेच वळणं आहेत. मला नीट्शी आठवत नाहीत. पिक्चरची सीडी पण दिसली नव्हती कुठे.
मला काही फार कळत नाही. किंवा मी पिक्चर पाहीला तेव्हा तर काहीच कळत नव्हतं. पण असा काही सुंदर घेतलाय ना हा पिक्चर. साधा सुधा, पण तितकाच वेगळा. मला अजुनही शबानाचे सर्व कपडे देखील आठवतात.
जाऊदे.. सद्ध्या तरी ही काही गाणी ऐका अजुन.
http://www.youtube.com/v/UdTHIPFW3sA
http://www.youtube.com/v/WyyauAr50pM
हे श्रेय घोषालच्या आवाजतले सापडले आहे. पण देवकी पंडीतचे अर्थात सुंदर आहे!
http://www.youtube.com/v/nj9iozaBB9M
असे हे साझ पुराण. काय बोलू अजुन. मी फार खुष आहे आज ! नुसती हीच गाणी वाजणार आता. याहू !!!!!!
अपडेट : बिगफ़्लिक्स वर आहे हा मुव्ही !! धान्ताडान.. http://broadband.bigflix.com/home/Movie/1357/Saaz
फारच आवडलेला चित्रपट.. अमिता
फारच आवडलेला चित्रपट..
अमिता म्हणतेय त्या द्वंद्व गीतात अरुणा शबानाला तिच्या ओळी गाण्याची संधीच देत नाही आणि सुरवातीला उत्साहात गाणारी शबाना शेवटी हिरमुसली होऊन गाते हे शबानाने प्रचंड सुंदररीत्या दाखवलयं..
>>>तुमसे मिली जो
>>>तुमसे मिली जो जिंदगी...सीली हवा.... हे गाणे ह्याच चित्रपटातले आहे ना ?
सिंडरेला, स्वातीने सिली हवा बद्दल सांगितले आहेच.
तुमसे मिली जो जिंदगी तुम्हाला 'तुम जो मिले तो लगा है जैसी मिली जिंदगी' अपेक्षित आहे का? हे पण आर्डी चे आहे पण द्रोही चित्रपटातले ...
>>अमित म्हणतोय त्या द्वंद्व
>>अमित म्हणतोय त्या द्वंद्व गीतात अरुणा शबानाला तिच्या ओळी गाण्याची संधीच देत नाह>><<
चिंगे, अगं मी अमित नाही "अमिता "आहे.
sorry ग. केलाय आता बदल!
sorry ग. केलाय आता बदल!
भाग्यश्री मी पण हा पिक्चर
भाग्यश्री
मी पण हा पिक्चर पाहून भारावून गेले होते. गाणी अप्रतीम आहेत. आणि एकूणातच खूप आवडला होता.
थांकू !
सुंदर सिनेमा. सिनेमाची आठवण
सुंदर सिनेमा. सिनेमाची आठवण आणि विशेषतः link दिल्याबद्दल धन्यवाद.
बस्के, मस्त गाणी होती सगळी.
बस्के, मस्त गाणी होती सगळी. साधनाने म्हटल्याप्रमाणे थोरलीचा रोल जरा जास्तच व्हीलनीश दाखवलाय.
सई परांजप्यांनी एका मुलाखतीत हा चित्रपट लता आणि आशा यांच्या जीवनावर आधारीत नसल्याचे सांगितले होते. अर्थात ते वाद टाळण्याकरता होते हे त्याच मुलाखतीतल्या एका उत्तरावरून जाणवले. (शब्द वेगळे होते पण अर्थ असा होता....)
प्रश्णः यातल्या दोन्ही बहिणींच्या पात्रांचे लता आणि आशा यांच्याशी साम्य नाही वाटत का?
उत्तर: तसे प्रत्येक पात्र उभे करताना आजूबाजूला वावरणार्या माणसांचा आधार घेतला जातोच.
तो गाऊ न देण्याचा प्रसंग राजू भारतनने एका लेखात लिहिलेला आहे (जो सिनेमा आधीच मी वाचला होता), म्हणजे खरा असू शकतो. यात सी.रामचंद्रांवर बेतलेले पण एक पात्र आहे ना?
चिनूक्स, "गोनिदांची चिंधी म्हणजे आशाताई" हे नाही कळले. योग्य जागी सविस्तर लिही ना. पण स्मिता असती शबानाच्या जागी तर? .... आयला मग सिनेमा कुठल्याकुठे गेला असता!
वर्षा भोसलेचा पण आवाज मस्त आहे. जैत रे जैत मध्ये तिने आशाताईंबरोबर 'कोण्या राजानं राजानं..' मस्तच गायलय आणि ती आशाताईंसमोर (आई का असेना) जराही कमी नाही पडली. तिने पुढे गाणे करीअर म्हणून करायला हवे होते.
सरदारी बेगम - चिनूक्स , दिपूर्झा आता आता जखमेवरची खपली काढलीच आहे तर जरा सांगा आता की कुठे मिळतील ती गाणी आता? माझ्याकडे कॅसेट होती पण ऐकून ऐकून खराब झाली.
माधव, सरदारी बेगमची जवळजवळ
माधव,
सरदारी बेगमची जवळजवळ सर्व गाणी यु ट्युबवर आहेत.
बस्के ,धन्यवाद .चित्रपट ,गाणी
बस्के ,धन्यवाद .चित्रपट ,गाणी आवडली .मस्त .
एक माहिती. योग्य कमान्ड
एक माहिती. योग्य कमान्ड दिल्यास यू ट्युबची गाणे रीअल प्लेयर मध्ये डाऊनलोड होतात आणि एम पी ३ सह ऑडिओ व्हिडिओ फॉर्मॅतमध्ये कन्वर्टही होतात.....
वाह! क्या तुमने है... ऑलटाईम
वाह! क्या तुमने है... ऑलटाईम फेवरिट गाणं... सिनेमा पहिला नाही अजून.. आता नक्की पाहणार! धन्स बस्के!
भाग्यश्री.......कसली आठवण
भाग्यश्री.......कसली आठवण करुन दिलीस गं......!!

मी किती दिवसांपासून शोधत होते........तहे दिल से शुक्रिया
आत्ताच बघितला पूर्ण सिनेमा....... संपल्यावर तसंचं संमोहन होतं....!!
माझ्या ब्लॉगवर पण त्याबद्दल लिहिलंय.......तुझ्या ह्या लेखामुळे
बस्के मीपण पाहिला हा आज परत!
बस्के मीपण पाहिला हा आज परत! मजा आली.
१० सेकंद विनी परांजपेचं पण दर्शन आहे. इतके मजेशीर आहेत तिचे हावभाव.
सई परांजपेचे चित्रपट आवडतात मला. बर्याच वर्षांपूर्वी पपिहा म्हणून चित्रपट पाहिला होता त्यांचा, मिलिंद गुणाजी आणि विनी परांजपे तोही तेव्हा आवडल्याचं आठवतय.
सुंदर चित्रपट.. आताच पाहिला
सुंदर चित्रपट.. आताच पाहिला परत.. बस्के तुझे आभार ह्याची आठवण करुन दिल्याबद्दल....
काय योगायोग आहे..माझ्याकडे
काय योगायोग आहे..माझ्याकडे प्लस मुझिकने काढलेली साझ आणि सरदारी बेगमची एकत्रित कॅसेट आहे.(हो कॅसेट) सुरेश वाडकरांचे सुनने वाले सुन लेते है आणि देवकी पंडितचे फिर भोर भयी... सरदारी बेगम मधले आरती अंकलीकरचे हुजूर इतना अगर हम पर सितम आणि त्यांचेच शुभा जोशींबरोबरचे राह में बिछी हैं नजरें...आहाहा.
लता आणि आशा यांना न शोधता हा साझ पाहिला तर जास्त चांगला वाटतो.
त्यांच्या संबधांबद्दलच्या एखाद्या आख्यायिकेलाच चित्रपटासंबंधाने जास्त प्रसिद्धी मिळाली..पक्षी..ऐ मेरे वतन के लोगो...
त्या दोघींचा एकत्र गातानाचा एक फोटो आहे त्यात दोघी एकमेकींकडे जवळ जवळ पाठ करून गाताहेत्..का ते आशाताईंनी सांगितले..एकीला डाव्या हातात तर दुसरीला उजव्या हातात कागद धरून गायची सवय. एकमेकींकडे न पाहता इतकी छान गाणी होत असतील तर काय हवे...शारदा मधले...ऐ चांद जहां वो जाए, जहांआरा - जब जब तुम्हे भुलाया, मेरे मेहबूब- मेरे मेहबूम मे क्या नही...
अरे वा.. धन्यवाद
अरे वा.. धन्यवाद सगळ्यांना!
जयश्री वाचते ब्लॉग..
टोणगा- तसे नको आहे मला.
लता आणि आशा यांना न शोधता हा
लता आणि आशा यांना न शोधता हा साझ पाहिला तर जास्त चांगला वाटतो.
...भरत, अनुमोदन!
आमच्याकडे पण होती ती कॅसेट ..
आमच्याकडे पण होती ती कॅसेट .. आता CD मिळेल की नाही काय माहीत .. झाकीर हुसेन आणि शबाना मस्तच .. तिच्या मुलीचा 'कुहू' चा रोल आयेशा धारकर ने केला होता ना?
सरदारी बेगम मधल्या गाण्यात काय आवाज लागलेत आरती आंकलीकर आणि शुभा जोशींचे
बस्के मस्तच लिहीलयस.
बस्के मस्तच लिहीलयस. माझ्याकडे साझ ची कॅसेट आहे. घरी जाऊन शोधुन ऐकायलाच हवीत गाणी. ट्युबवर ही घरी जाउन पाहेन.
मलाही हा पिक्चर लहानपणी पाहिलेला तेव्हा इतका आवडला नव्हता किंवा समजला नव्हता बहुदा. मी केवळ झाकिर साठी पाहिला होता कारण तेव्हा मी ही तबला वाजवायला शिकत होते. आता पुन्हा बघायला हवा... आता समजेल अशी अपेक्षा करते
शबानाचा 'मॉर्निंग रागा' ही चांगला आहे, जरा वेगळा आहे.... काही गाणी अप्रतिम आहेत... 'महा गणपती' 'थये यशोदा' चांगली आहेत... फ्युजन चांगल आहे पण जास्त फेमस नाही झाली गाणी...
'सरदारी बेगम' के तो क्या कहने?????
बस्के.... सही..... 'साझ..''
बस्के.... सही..... 'साझ..'' मी हा चित्रपट कित्त्त्त्ती तरी वर्शांपासून शोध्त होते..
मी हल्लीच हा सिनेमा पाहिला.
मी हल्लीच हा सिनेमा पाहिला. अगदी युट्युबची ३०-३५ पानं चाळून शोधून काढून बघितला. आशासारखं कॅरॅक्टर आहे एवढी एक गोष्ट मला पुरेशी होती. मला ती भयंकर म्हणजे भयंकरच आवडते.
त्यामुळे अर्थातच सिनेमा आवडला.
Pages