सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 30 March, 2010 - 10:22

सोलापुरातील अत्रे दांपत्य दोन महिन्याच्या कालावधीत या ना त्या आजाराने परलोकवासी झाले त्या आधी शैलेशचे लग्न नुकतेच झाले होते. नव्या सुनेचे घरात दोन महिने प्रसन्न वास्तव्य बघून सासरे गेले अन त्यांच्यापाठॊपाठ सासूबाईही! शैलेशचा धाकटा भाऊ योगेशला पोरकेपणाची तीव्रपणे जाणीव व्हायची. दादा नव्या नवरीबरोबर निदान रमायचा तरी. योगेश अजून अठराच वर्षांचा होता अन सतत कुढायचा. रात्रभर आई बाबांच्या आठवणींनी व्याकुळ व्हायचा. वहिनी प्रेमळ होती. सासू सासरे गेल्याचे शल्य तिला फ़ार बोचत असे. आपले लग्न अपशकुनी समजले जाईल याची तिला धास्ती होती. पण सुदैवाने शैलेशचे सर्व नातेवाईक सोलापुराच्या बाहेर होते अन तिचे स्वत:चे माहेरच मुळी बीडचे होते. शैलेश मनाने दिलदार स्वभावाचा असल्याने तो उगीचच तिला घालून पाडून बोलायचा नाही. उलट तिच्या सौंदर्यावर मोहीत होऊन तो जमेल तितके प्रेम करायचा. जाण्या-येण्याला लागणारा वेळ धरून सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे सात अशी त्याची नोकरी होती. कधी एकदा घरी पोचतोय अन बायकोला मिठीत घेतोय या आठवणींमधेच त्याचे दिवस पसार व्हायचे. ऒफ़ीसमधले सगळे लोक सतत चेष्टा करायचे. आई बाबांचे निधन या दु:खद आठवणी सोडल्या तर संसार मस्त चालला होता.

योगेश परीक्षेनिमित्त घरी असल्याने वहिनी सतत त्याला काय हवे नको ते बघायची. योगेश सुरुवातीला जरा परकेपणानेच वागत होता. पण वहिनीच्या वात्सल्याने हळूहळू तो बदलला. काही दिवसातच अशी परिस्थिती आली की तो हक्काने तिला ’चहा हवा आहे’ वगैरे सांगू लागला. वहिनीपण आनंदाने त्याचे कौतूक करायची.

दादाचे लग्न झाल्यापासून योगेशचे दादाच्या खोलीत जाणे कमीच झाले होते. एक बेडरूम, जिथे आधी आई बाबा असायचे, शैलेशच्या लग्नानंतर ती बेडरूम त्यांना मिळाली होती. योगेश व बाबा बाहेरच्या खोलीत तर आई स्वयंपाकघरात झोपायची. तेव्हापासून त्यांच्या खोलीत जाणे योगेशने फ़ार कमी केलेले होते.
वहिनी अगदी सुगरण नसली तरी योगेशच्या आवडीनिवडी सांभाळायची. सुरुवातीला बुजून बोलणारी वहिनी आता हळूहळू योगेशची थट्टामस्करी करू लागली होती. तोही तिच्याशी हसून खेळून वागू लागला होता. एकाच पुस्तकावरून लटके वाद झाले की मग दोघे मिळून एकत्र ते पुस्तक वाचायचे.
वाढणाया संबंधांमुळे निर्माण झालेली जवळीक आता वेगळे रंग दाखवू लागली. वहिनीच्या स्पर्शांमधे आधी काहीच वाटत नसलेला योगेश हळूहळू त्या स्पर्शांकडे आकर्षित होऊ लागला. स्वयंपाकघरात ती असली की मुद्दाम तिला स्पर्श करता येतील अशी निमित्ते काढून काहीतरी प्रसंग निर्माण करू लागला. दादाला आपल्या भावना समजल्या तर काय याची काळजी हळूहळू पुसट होऊ लागली होती. वहिनीला काय वाटत असेल याचा त्याला नेमका अंदाज नव्हता. पण ती स्पर्श झाल्यावर अंग चोरून वगैरे घेत नव्हती व ज्या विषयावर बोलणे चालू असेल त्यावर बोलत होती यावरून त्याला रिसपॊन्स पॊझिटिव्ह असावा असा अंदाज वाटत होता.

हे बरे की वाईट या संदिग्ध मनस्थितीत दिवस चाललेले असतानाच एक दिवस योगेश अचानक बेडरूममधे गेला तर वहिनीचे रूप पाहून क्षणभर थिजल्यासारखा उभा राहून पटकन मागे वळाला. वहिनी गालातल्या गालात हसलेली त्याने पाहिली असती तर त्याच क्षणी काहीही झाले असते.

हे सर्व प्रसंग वहिनी स्वत:च निर्माण करत असल्याचे त्या भाबड्याला कधीच कळले नाही.
महिन्याभरानंतर तो पूर्ण जाळ्यात आल्याचे पाहून वहिनीने एक दिवस त्याला फ़ारच मोहवले व त्या दिवशी योगेशने शरीरसुख म्हणजे काय ते स्वत: अनुभवले. मात्र, ते त्याच्याच इच्छेने झाल्यासारखे मात्र त्याला वाटत होते.

हा प्रसंग अचानक, नकळत झाला असल्याचे वहिनी दाखवत होती. तिने त्याच्याशी बोलणेच सोडले होते. दादासमोर मात्र ती त्याच्याशी जुजबी बोलत होती.
आणि इकडे योगेश प्रचंड घाबरला होता. वहिनीने दादाला सांगीतल्यास आपले काही खरे नाही हे त्याला कळून चुकले होते. तिसयाच दिवशी तो वहिनीसमोर दुपारी अत्यंत खजील चेहरा करून उभा राहिला व ’सॊरी’ म्हणाला. वहिनी रडू लागली. योगेश तिचे सांत्वन करू लागला. आणि वहिनीने वेगळाच धक्का दिला. कोवळ्या वयातील योगेशला तिने सांगीतले की दादाने तिला फ़सवले आहे. दादा तिला पत्नीप्रमाणे वागवत नाही. वागवू शकत नाही. योगेश खिळल्यासारखा उभा राहिला. वहिनीने पुढे सांगीतले की मोह झाल्याने नकळत योगेशबरोबर तो प्रसंग घडून गेला. मात्र आता आयुष्याचा नाश झालेला आहे. या गोष्टीचा योगेशला धक्का बसला.

दोन, तीन दिवस याच मनस्थितीत गेले. खरे तर योगेश तो प्रसंग विसरूच शकत नव्हता. त्याला त्या सुखाची खरे तर चटक लागली होती. त्याला आपल्याला या गोष्टीची चटक लावायला वहिनीनेच प्रवृत्त केले असावे याचा संशयही नव्हता. आठवड्याभराने पुन्हा दुपारी योगेश मोह अनावर होऊन वहिनीला स्पर्श करू लागला. आणि त्या वेळेस वहिनीने तिच्या योजनेचा शेवटचा घाव घातला. तिने जणू मोह आवरणे अशक्य असल्याप्रमाणे योगेशला मिठी मारली. वहिनीला हेच हवे आहे हे ज्याक्षणी त्याला समजले त्याक्षणी योगेश बेभान झाला.

दीर व वहिनीचे संबंध आता रोजचेच चालू झाले. घरात आनंदीआनंद पसरला. त्यातील अपराधी भावना केव्हाच गेली होती. फ़क्त दादापासून लपवले की झाले.
पण तब्बल महिन्यानंतर दादाला संशय येऊ लागला व आणखीन एका आठवड्यातच त्याच्या डोळ्यांसमोरच सगळे चालू असलेले त्याला दिसले. त्या दिवशी तो लवकर घरी आला तेव्हा लॆचने कुलूप उघडून आत आला. लॆचचा आवाज योगेशला व त्याच्या वहिनीला व्यवस्थित परिचीत होता. तो आवाज ऐकताच योगेश हडबडून बेडरूमच्या बाहेर आला तेव्हा त्याच्या अंगावर फ़क्त टॊवेल होता. शैलेशला ते पाहून आश्चर्य करावे की साधी बाब मानावी हे ठरवता येत नसतानाच शैलेश स्वत:च्या बेडरूमकडे पोचला तेव्हा योगेश डोळे फ़ाडून त्याच्याकडे बघत होता. शैलेशला दिसले की त्याची बायको घाईघाईत कपडे घालत आहे. शैलेश ओरडला....

शैलेश - शर्मिला.......
शर्मिला हमसून हमसून रडू लागली.
शैलेश - हे काय चालले आहे घरात?
शर्मिला आणखीच जोरात रडू लागली.

शैलेशने आत येऊन तिला धरून तिच्या थोबाडीत मारली. त्याबरोबर शर्मिला उशीत तोंड खुपसून गदगदू लागली.

शैलेश अवाक झाला होता. आता त्याने योगेशकडे मोर्चा वळवला. योगेशला चार, पाच फ़टके लगावले.
खूप आदळ आपट झाली. तिरिमिरीत शैलेशने योगेशला हाकलून दिले. तो मित्राकडे खासगी हॊस्टेलवर राहायला गेला. घरातील वातावरण अत्यंत दुषित झाले. शैलेशला आता काहीही सुचत नव्हते. त्याचे योगेशवर प्रेम होते. आई बाबा नसल्यामुळे तर आणखीनच सहानुभुती वाटत होती. पण योगेशने आपल्याच बायकोवर हात टाकावा अन बायकोने ते मान्य करावे या अनुभवामुळे तो मनातून उद्ध्वस्त झाला होता.
याच मनस्थितीत पंधरवडा गेला. घरात बोलणे नव्हते. योगेश मधे एकदा संध्याकाळचा येऊन सगळे कपडे अन वस्तू घेऊन गेला होता. शैलेश त्याच्याशी बोललाही नव्हता. शर्मिलाही बोलली नव्हती. योगेशने एकदा ’मी चुकलो’ असे म्हणून पाहिले. पण दादा त्याच्याकडे लक्षच देत नव्हता.

आणखीन जवळपास आठवड्याने शैलेशने शांतपणे एका रात्री तिच्याशी विषय काढला.

शैलेश - शर्मिला... हे जे झाले ते अजिबात चांगले झाले नाही. तू अशी कशी वागलीस?
शर्मिला - माझे चुकले हो. खरच चुकले माझे.
शैलेश - शर्मिला... असे करावेसे वाटले कसे पण तुला?
शर्मिला - काही समजले नाही हो... धाकट्या भावासारखी वागवायचे त्याला मी...
शैलेश - म्हणजे? योगेशने ... काही जबरदस्ती वगैरे....???
शर्मिला - ते वयच तसे असते. आता बोलून काय उपयोग?
शैलेश - मला समजायलाच हवे. काय केले योगेशने?
शर्मिला - त्याच्या वागण्यात मला कधी तसे जाणवायचे नाही हो. पण सारखा मागे मागे असायचा. काही ना काही बोलत असायचा. जोक सांगायचा. हसायचा. टाळ्या द्यायचा. त्या दिवशी खरे रूप कळले मला.. पण त्याला सोडून द्या. लहान आहे तो. त्याला अजून कळत नाही.
शैलेश - योगेशने स्वत: असे...??
शर्मिला - अहो तुम्ही रागवू नका ना.... (शर्मिला रडत होती तर शैलेश प्रचंड भडकला होता.)
शैलेश - तू ... तू ... विरोध केला नाहीस?
शर्मिला - माझा विरोध कसा पुरा पडेल? (शर्मिला जास्तच रडू लागली.)
शैलेश - शर्मिला.. मला ... मला माफ़ कर... माझ्या भावामुळे तुला...
शर्मिला - असे नका हो म्हणू! असे नका म्हणू! तुम्हाला किती त्रास झाला.. माझ्यामुळे
शैलेश - झाले ते विसरून जाऊ आपण... माझ्याकडे बघ... नवी सुरुवात करू आपण...

शर्मिलाला कुशीत घेताना शैलेश विचार करत होता. योगेशला एकदाच अर्धा वाटा काय असेल तो देऊन टाकावा. त्याला दुसरीकडे कुठेतरी ठेवावे. अजून तो लहान आहे. कसाही वागला तरी भाऊ आपलाच आहे. आई बाबांसाठी तरी त्याचे काही दिवस बघायलाच हवे. लग्न वगैरे झाले की सुधारेल. पण इथे त्याला नको ठेवायला. पुन्हा असले काही झाले तर आपल्याला सहन व्हायचे नाही.

शर्मिला त्याचवेळी त्याच्या कुशीत डोके खुपसून मनात विचार करत होती की बाई रडली की भले भले पुरुष द्रवतात. हे अस्त्र व्यवस्थित वापरायला पाहिजे.

शैलेशचा भ्रमनिरास व्हायला पंधरा दिवस पुरले. ऒफ़ीसमधून एक दिवस फ़िल्ड ड्युटीसाठी एका ठिकाणी जाताना वाहतूक किंचित मंद झाली होती. चौकातील एका कोपयात शैलेशला शेजारच्या दामल्यांची गाडी रस्त्यात थांबलेली दिसली. शैलेश रिक्षेत होता. गाडीत बसलेले दामले शर्मिलाच्या अंगावरून हात फ़िरवत होते अन दोघेही हसत होते.

त्याचदिवशी रात्री शैलेशने शर्मिलाला घटस्फ़ोट देणार असल्याचे सांगीतले अन एका वकील मित्राने प्रयत्न केल्याने केवळ सहा महिन्यात त्यांच्या घटस्फ़ोटावर कोर्टाचे शिक्कामोर्तब झाले. हे सहा महिने शर्मिला व शैलेश एकाच घरात राहूनही बोलत नव्हते. शर्मिलाला घटस्फ़ोटानंतर पंधरा हजार मिळाले. ती घरातून बाहेर राहायला निघाली. योगेश पुन्हा घरात आला.

एका कामपिपासू व पैशाची अती हाव असलेल्या मेनकेला आता सोलापूरचे अख्खे रान मोकळे मिळाले होते.
पंधरापैकी चक्क नऊ हजार पुढील सहा महिन्यांचे भाडे आगावू या रुपाने देऊन शर्मिलाने एका भेंडे नावाच्या कुटुंबवत्सल सद्गृहस्थाचा एक जुना दोन खोल्यांचा फ़्लॆट भाड्याने घेतला तेव्हा भेंडेला आपण कोणती ब्याद आणली हे माहीत नव्हते.

ते सहा महिने संपायला आले तेव्हा पुढील भाडे देण्याचा प्रश्नच उरलेला नव्हता, उलट भेंडेनेच आत्तापर्यंत तिच्यावर दागिने, भेटी स्वरुपात वीस एक हजार उधळले होते. स्वयंपाकघरातील लिकेज दुरुस्त करायच्या निमित्ताने शर्मिलाने भेंडेला घरी बोलवले असताना भेंडे आल्यावर तिने आपली करूण कहाणी त्याला सांगीतली. भेंडे बिचारा एकाचवेळी चुकचुक करत होता व शर्मिलाच्या शरीरावरून हळूच डोळे फ़िरवत होता. मधेच ’आपल्या मनात हे कसले विचार’ असा विचार करून लाजत होता. शर्मिलाने दिसायला सभ्य दिसतील असे पण वारंवार नजर वळेल असे कपडे घातले होते. तिच्या परिस्थितीबाबत कीव आल्याने की सौंदर्याची जादू पडल्याने माहीत नाही, पण भेंडे स्वयंपाकघराच्या कामानिमित्त चार दिवसांनी पुन्हा आला. महिन्याभरात झालेल्या चार भेटींनंतर ’भेंडे आता कधीही शर्मिलाच्या घरी येऊ शकतो’ अशी परिस्थिती निर्माण झाली.

भेंडेला दोन कॊलेजला जाणाया मुली होत्या. बायको एका महिलामंडळाची उपाध्यक्षा होती. शहराबाहेर त्याचा बंगला होता. दोन गाड्या होत्या. शर्मिलाने ही दौलत पहिल्या भेटीतच भाडे भरायला जाताना निरखून ठेवली होती. असा हा रोज पूजा करणारा भेंडे आता शर्मिलाच्या जाळ्यात आत आत शिरू लागला होता.

स्त्रीला मोहीत करण्यात एखाद्या पुरुषाचा अख्खा जन्म जाईल. पण पुरुषाला मोहीत करणे स्त्रीला क्षणात जमू शकते.

या डार्विनच्या तत्वाचे प्रत्यंतर दुसया महिन्यातच आले. मुद्दाम निर्माण केलेल्या प्रसंगातून किंचित शारिरीक जवळीक आल्यावर शर्मिलाने अर्धा डाव जिंकला होता. उरलेला अर्धा डाव भेंडे स्वत:हून हारला.
त्यानंतर आठवड्यातून किमान तीन वेळा भेंडे शर्मिलाकडे जाऊन आपले चोचले पुरवून यायला लागला. शर्मिला मात्र एखाद्या घरंदाज स्त्रीप्रमाणे त्याच्यावर प्रेम वगैरे असल्याचे दाखवत होती. आपल्याला दोन मुली असूनही आपण असे का वागतो अन शर्मिला आपल्यावर का भाळते याचा विचार कामातुर भेंडेला करायची इच्छाच होत नव्हती.

कोणत्या क्षणी काय बोलावे याची स्त्रीला नैसर्गीक जाणीव असावी.

पाचव्याच महिन्यात शर्मिलाने ’मला जागा सोडावी लागणार आहे’ असे सुतोवाच केले. कारण विचारल्यावर ती म्हणाली की एक हजार भाड्यातच एक जागा मिळत आहे, थोडी लांब आहे पण चालू शकेल. एखादा जॊबही बघावा लागेल. हे बोलण्यासाठी तिने वेळ निवडली. ती, ज्या वेळेला भेंडे त्याला हव्या असलेल्या सुखासाठी वाट्टेल ती कमिंटमेंट द्यायच्या तयारीत आला होता.
’आता आपण कोणी वेगळे आहोत का की तुला येथे राहण्याचे भाडे द्यावे लागेल’ हा भेंडेचा अत्यंत अपेक्षित प्रश्न कानावर येताक्षणी शर्मिलाने जे आधीपासून ठरवले होते तेच केले. तिने भेंडेला दूर सारले व ती मुसमुसून रडायला लागली. भेंडेला हा अचानक उद्भवलेला प्रश्न कसा उपटला व कसा सोडवावा हे कळेना. तो नुसताच ’काय झाले, का रडतीयस’ असे विचारत बसला. शेवटी शर्मिला म्हणाली:

शर्मिला - तुम्ही श्रीमंत आहात, तुम्हाला काय वाटणार त्याचे?
भेंडे - काय झाले काय पण?
शर्मिला - इथे कुणाला कळलं की तुम्ही नेहमी येता तर माझी काय अवस्था होईल..
भेंडे - अगं पण ते कशाला कुणाला कळेल?
शर्मिला - भाडे दिले नाहीतर मला तुमची रखेली समजतील लोक... (ती आणखीनच जोरात रडू लागली.)
भेंडे - छे छे! असले काही म्हणणार नाहीत कुणी! अन आपल्याला लोकांशी काय आहे?
शर्मिला - काय आहे म्हणजे? मी एकटी बाई आहे. तुमचा संसार आहे.
भेंडेला पाच महिन्यात प्रथमच खरीखुरी जाणीव झाली की तो आत्तापर्यंत काय करत होता. तो एकदम गंभीर झाला.
शर्मिला - उद्या ताईंना कळले म्हणजे?
या विधानावर तर भेंडे दचकलाच.
शर्मिला - आपले जन्मजन्मांतरीचे प्रेम आहे... पण समाजात या प्रेमाची किंमत काय आहे?

भेंडेला आता ’आपले खरच हिच्यावर प्रेम आहे का’ हे मनातल्या मनात तपासावेसे वाटले. तो हतबुद्ध झालेला होता.

शर्मिला हमसून हमसून रडायला लागली.

भेंडे - हे बघ... हे असले काहीही होणार नाही.
शर्मिला - होणार नाहीच. अन झाले तर मी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर मूक प्रेम करत एकटी जगेन अन मरेन.
भेंडे - असे का बोलतेस? तू माझी नाहीयेस का?
शर्मिला - मला खूप भीती वाटते.
भेंडे - पण आजच का हा विषय काढतीयस?
शर्मिला - आता एक महिनाच इथे राहू शकेन. तुमचा सहवास आता बंद होणार...
भेंडे - का पण? मी भाडे मागेन का तुझ्याकडे कधीतरी?
शर्मिला - यावेळेस मागायचा नाहीत. पण पुरूष कसे असतात ते मला माहितीय.
भेंडे - आता काय झालं?
शर्मिला - माझा कंटाळा आला की येणं बंद होईल तुमचं! मग मी कुढत बसणार. शेवटी ताई भाड्याचीही चौकशी करतीलच कधीतरी...
भेंडे - ती काही चौकशी करत नाही.
शर्मिला - त्यांनी नाही केली तरी मला अपराधी वाटेलच ना? मला जगात कुणीच नाहीये...
भेंडे - शर्मिला, पुन्हा हे वाक्य बोलू नकोस...
शर्मिला - जागेसाठी आयुष्यभर वणवण करणे हेच दैव आहे माझे...
भेंडे - शर्मिला.. तू कायमची इथे राहू शकतेस...
शर्मिला - नाही राहू शकणार. मला नोकरी नाही. तुमची कुणी म्हणून मला काहीही स्थान नाही. मी इथे नाही राहू शकणार.
भेंडे - मी सांगतोय ना? माझा फ़्लॆट आहे हा. तू इथे कायम राहू शकतेस.
शर्मिला - नका हो छळू मला. माझ्याकडे दमडा नाही. नोकरी असती तर मी लोन काढून एखादा फ़्लॆट घेतला तरी असता.
भेंडे - मग हाच फ़्लॆट का घेत नाहीस?
शर्मिला - करा थट्टा!
भेंडे - ही थट्टा नाही शर्मिला. आपण ट्रॆन्झॆक्शन झाले असे दाखवू.
शर्मिला - म्हणजे?
भेंडे - या भागातील रेटप्रमाणे हा फ़्लॆट साधारण नऊ लाखांचा आहे. तो मी तुला साडे सात लाखांना विकल्याचे दाखवतो.
शर्मिला - दाखवतो म्हणजे?
भेंडे - मीच तुला आधी पेमेंट करतो. ते तू मला फ़्लॆटसाठी परत केलेस असे दाखवू.
शर्मिला - अन इतके पैसे माझ्याकडे कुठून आले हे टॆक्सवाल्यांनी विचारले की जाते जेलमधे
भेंडे - वेड्यासारखी बोलू नकोस.
शर्मिला - वेडीच आहे मी. तुमच्यासारख्या बायकामुले असलेल्या माणसावर मन जडले माझे...
भेंडे - माळवदकर आहे त्या डिपार्ट्मेंटला. तुला काहीही त्रास होणार नाही.
शर्मिला - मला हे असले दान नको आहे हो.. माझ्यात काहीच कर्तृत्व नाही... उगाच तुम्हाला फ़सवल्यासारखे वाटेल जन्मभर..
भेंडे - हेच बोलायचे होते ना? आत्ताच म्हणालीस ना मन जडलंय म्हणून?

यानंतर पाच मिनिटात सारे ठरले. शर्मिलाने कळी खुलल्याचे तोंडावर दाखवले नाही. मात्र भेंडेंना आजवर केले नव्हते इतके खुष करून पाठवले.

महिन्याभरात, ज्या फ़्लॆट्चे भाडे देण्याचेही तिच्याकडे पैसेही उरलेले नव्हते तो फ़्लॆट तिच्या नावावर झाला होता. दारावर तिच्या नावाची पाटी लागली. तिने घरात फ़ंक्शन केले त्याला शेजारची दोन कुटुंबे अन भेंडे कुटुंबीय आले होते. मिसेस भेंडे तिचे कौतूक करत होत्या. एक स्त्री एकटी स्वत:च्या पायावर उभी राहात आहे याचे उदाहरण त्या उद्या मंडळात देणार होत्या. भेंडे मनात खजील झाले होते. पण आता शर्मिलावरचे त्यांचे प्रेम सिद्ध झालेले असल्याने तिच्याकडे येणे सुलभ होणार होते. शेजारपाजारच्यांना फ़ंक्शनला बोलवण्यात शर्मिलाला इतकेच सिद्ध करायचे होते की भेंडे कुटुंबियांशी तिचे सलोख्याचे संबंध आहेत.
या मेनकेने घटस्फ़ोटाचे पंधरा हजार कमवल्यानंतर केवळ सहा महिन्यात नऊ लाखाचा फ़्लॆटही कमवला होता. आता पुढची शिकार कोणती असावी याचा विचार करणारी शर्मिला त्यावेळेस फ़क्त तेवीस वर्षांची होती.

आणखीन केवळ सहाच महिन्यात भेंडेला हृदयविकार जडला. त्याला कारणही सबळ होते. शर्मिलाने तो फ़्लॆट एका मारवाड्याला बारा लाखाला विकला व त्यातून दहा लाखाचा एक शहराबाहेरचा पण कमी रेट असल्यामुळे मिळालेला आलिशान फ़्लॆट घेतला. तेथे भेंडेला प्रवेश मिळणे शक्यच नव्हते. दोन तीनदा जाऊन आल्यानंतर शर्मिला हातही लावू देत नाही हे त्याला समजले तेव्हा त्याला पहिला माईल्ड ऎटॆक आला. भेंडे हे पान शर्मिलाने केव्हाच उलटले होते. मेनकेचा पुढचा अध्यायही सुरू झालेला होता.
पंधरा वर्षे! पंधरा वर्षे हा कालावधी प्रचंड आहे. जन्मठेपही चौदा वर्षांची असते कारण चौदा वर्षांसारख्या कालावधीत माणसात आमुलाग्र बदल होतो असे म्हणतात. पंधरा वर्षांमधे शैलेश दुसरे लग्न करून परदेशात कायमचा निघून गेला होता. योगेश मुंबईला स्थायिक झालेला होता.

पंधरा वर्षात शर्मिलातही आमुलाग्र बदल झाले. सोलापुरातील किमान पाच धनिक या काळात गंडले होते. आपल्याजवळची माया त्यांनी तिच्यावर उधळत उधळत तिला गब्बर करून ठेवले होते. तिचे ते कोवळेपण जाऊन अनुभवी स्त्रीची नजर आली. शिकार हेरण्यात आत्तापर्यंत ती पूर्ण तरबेज झाली होती. किरकोळ फ़ायद्यासाठी आता काहीही करावे लागत नव्हते. एक प्रशस्त बंगला, एक गाडी, दोन नोकर अन बॆन्क बॆलन्स या जीवावर निदान पन्नाशी येईपर्यंत तरी काळजी नव्हती. मात्र काहीतरी मोठ डल्ला मारावा लागणारच होता. आणि.. लोक भुलावेत असे तारुण्य राहण्याचा काळ फ़ार कमी राहिला होता.
दोनच वर्षांपुर्वी तिला तशी संधी प्राप्त झाली होती. एका कार्यक्रमात नगरसेवक भाऊसाहेब बनसोडे यांच्याशी झालेली ओळख सर्वार्थाने फ़ायद्याची ठरली. तेव्हा ते नगरसेवक नव्हते. पण सोलापुरात त्या पक्षाचे महत्वाचे कार्यकर्ते म्हणून सर्वांना माहीत होते.

भाऊंच्या नजरेतील वासना तिला क्षणात जाणवली हो्ती. पण आता किरकोळ गोष्टींसाठी तिला काही करावे लागत नव्हते. ती भाऊंना नजरेनेच खेळवत होती. तो कार्यक्रम संपताना भाऊंनी तिला घरी सोडायचा प्रस्ताव मांडला. तिची गाडी असूनही तिने ती तिथेच ठेवली व भाऊंबरोबर स्वत:च्या घरी आली. अर्थातच भाऊ कॊफ़ी घ्यायला आत यायला तयार झाले. ती एकटीच असते वगैरे माहिती त्यांना गाडीतच झालेली होती. तिने त्यांना नवरा गेल्याचे व जाताना हा बंगला अन चांगल्यापैकी रक्कम ठेवून गेल्याचे सांगीतले होते.

कॊफ़ी घेताना गप्पा सुरू झाल्या. आयुष्यभर पुरुषांना खेळवल्यामुळे शर्मिलाला त्या खेळाच्या सर्व खाचाखोचा माहीत होत्या. भाऊंसमोर कुठे बसायचे, काय म्हणायचे, काय पोषाख करायचा, कशा हालचाली करायच्या हे ठरवायला तिला काहीच वेळ लागला नाही. पण तिला आपल्यापेक्षा भाऊ मुरलेले असतील याची कल्पना नव्हती. भाऊ मिश्कीलपणे बोलत तिच्या हालचालींचे अर्थ समजून घेत बिनधास्तपणे नजर फ़िरवत होते.

पंधरा मिनिटांतच शर्मिलाच्या लक्षात आले की राजकारणातील एखादे पद मिळवण्याच्या दृष्टीने भाऊंबरोबर काढलेल्या गप्पा भलत्याच दिशेला जात आहेत. भाऊंच्या दृष्टीने आपण नगण्य आहोत मात्र तरीही ते गप्पा लांबवत आहेत.

हा खेळ शर्मिलाला नवीन होता. हा माणूस आपल्याला टक लावून बघत असला तरी याच्या मनात काहीतरी वेगळेच असावे याची तिला जाणीव होत होती. आत्तापर्यंत तिच्या अनुभवात अशा परिस्थितीत असताना पुरुष लाळघोटेपणा वाटेल असे बोलणे सुरूही करायचे. पण आज ते घडत नव्हते.
अर्ध्या तासाने भाऊ उठले तेव्हा शेकहॆन्ड करायला शर्मिलाने हात पुढे केला. भाऊंनी हातात हात घेतला व ते म्हणाले:

भाऊ - आयुष्यात खूप वरच्या उड्या मारता येतात. माणसे स्वप्ने बघत नाहीत त्यामुळे तिथेच राहतात.
शर्मिलाने हात सोडवून घेतला व हसली अन त्यांच्या डोळ्यात डोळे मिसळत शेवटचा प्रयत्न करत म्हणाली:
शर्मिला - माणसे स्वप्ने दाखवत नाहीत... त्यामुळे इतर माणसे ती बघत नाहीत
भाऊ - हा हा! मला तुम्हाला ’मला कॊफ़ी पाजायचे स्वप्न दाखवायचे होते... ते पूर्णही झाले बघा’
शर्मिला - (हसत) खरे आहे, पण इतके साधे स्वप्न मला बघायला आवडत नाही.
भाऊ - तुम्हाला जी स्वप्ने स्वप्नातही पडत नसतील ती दाखवायला आलो होतो... पण...
शर्मिला - मग म्हणाला नाहीत...
भाऊ - बाईला सगळे डोळ्यातूनच कळते असे ऐकले होते
शर्मिला - तुमच्या डोळ्यांकडे पाहात बसले तर गैरसमज झाला असता...
भाऊ - गैर काय अन बरे काय याच्या आपल्या दोघांच्या व्याख्या जुळत असतील तरच ती स्वप्ने....
शर्मिला - बोलण्यात तुमच्यासमोर टिकणार नाही मी...
भाऊ - या स्तुतीने हुरळून जायला मी बच्चा नाही...
शर्मिला - लगेच राग येतो?
भाऊ - माहिती दिली फ़क्त..
शर्मिला - ते स्वप्नांचे काय म्हणत होतात?
भाऊ - खूप उशीर झाला शर्मिलाबाई आता...
शर्मिला - स्वप्ने रात्री उशीराच पाहतात असे ऐकले होते
भाऊ - तुमच्याकडून इतक्या उशीरा आम्ही निघालेलॊ कुणी पाहिले तर...
शर्मिला - साधा उपाय आहे
भाऊ - काय?
शर्मिला - ’इतक्या उशीरा’ निघायचेच नाही
भाऊ - मग?
शर्मिला - चांगले उजाडले की जायचे
भाऊ - अन रात्रभर समोरासमोर बसून बोलत राहायचे?
शर्मिला - मग?
भाऊ - मग दिवसाच बोललेले काय वाईट?
शर्मिला - बोलण्यासाठी समोरासमोरच बसायला हवे असे काही नाही
भाऊंनी शर्मिलाला आपल्याकडे ओढले. जणू केव्हाची पुरुष सहवासाची कामना होती पण एकटीच तडफ़डत होते असे आविर्भाव तोंडावर दाखवत शर्मिलाही त्यांना बिलगली.
प्रेमाचा पहिला जोर ओसरल्यानंतर बीअरचे घुटके घेताना भाऊंनी विषय काढला.
भाऊ - तुझ्यात वेगळीच जादू आहे
शर्मिला - हो?
भाऊ - असे आधी वाटत होते.

या थट्टेवर ती फ़ुरंगटून बसली. मग पुन्हा भाऊंनी तिला बाहूपाशात घेतले. आता भाऊंनी मुख्य विषय काढला.

भाऊ - स्वप्नं बघायचंय?
शर्मिला - हं!
भाऊ - लक्षाधीश होण्याचे स्वप्न आहे
शर्मिला - सत्य होणारे आहे ना?
भाऊ - फ़क्त तूच मनावर घेतलंस तर होईल
शर्मिला - हो? असे काय करू शकते मी?
भाऊ - माझी साथ देऊ शकतेस
शर्मिला - आत्ता दिली तशी? (दोघेही हासले.)
भाऊ - अंहं!
शर्मिला - मग?
भाऊ - निसर्गाप्रमाणे मनात विचार येतात हे सत्य आहे.
शर्मिला - म्हणजे?
भाऊ - पण माणूस समाज बनवतो अन समाज कायदे बनवतो.
शर्मिला - म्हणजे काय?
भाऊ - पण नैसर्गीक प्रवृत्ती त्या कायद्यांना कशा जुमानणार? नाही का?
शर्मिला - नीट बोललात तर समजेल.
भाऊ - शारिरीक सुखांच्या मागे आजची पिढी धावत आहे.
शर्मिला - सगळ्याच पिढ्या धावतात त्या सुखाच्या मागे
भाऊ - आजचे युवक युवती बेभानपणे वागात आहेत, बेकायदेशीर...
शर्मिला - मग?
भाऊ - जागोजागी असे वागणारे लोक आहेत, त्यांचा सुळसुळाट झाला आहे.
शर्मिला - नीट बोला ना... काय म्हणायचंय तुम्हाला?
भाऊ - ऐक! या लोकांनी त्यांचे ग्रूप्स बनवलेले असतात. त्यांना पकडणे शक्य होत नाही.
शर्मिला - का?
भाऊ - कारण ते एकमेकांवर प्रेम आहे असे दाखवत व लग्न करणार आहोत असे दाखवत बिनधास्तपणे वागतात.
शर्मिला - मग?
भाऊ - या लोकांमुळे समाजाच्या नीतीमत्तेवर गंभीर परिणाम होतात.
शर्मिला - सरका तिकडे.. मला काही समजत नाहीये.
भाऊ - नीट ऐक. अशा लोकांची पाळेमुळे खणून काढण्याचे काम महाराष्ट्र शासनाने एका फ़्रेंच एजन्सीला दिले आहे.
शर्मिला - कशाला?
भाऊ - कारण या लोकांना पकडून स्वैराचाराला आळा घालता येईल म्हणून...
शर्मिला - काय बोलताय? आपण तरी कुठे वागलो तसे आत्ता?
भाऊ - आपली गोष्ट वेगळी आहे.
शर्मिला - कशी काय?
भाऊ - आपण समाजातील जबाबदार नागरीक आहोत. आपण आपले संबंध दोघांमधेच ठेवणार आहोत. हे लोक तसे नसतात.
शर्मिला - मग ते काय करतात?
भाऊ - ते रॆकेट्स बनवतात. आणखीन लोकांना जाळ्यात ओढतात. यातून गुन्हेगारी वाढते.।
शर्मिला - मग?
भाऊ - अशा लोकांवर ती एजन्सी पाळत ठेवते.
शर्मिला - पण परदेशातील लोकांना का हे काम दिले?
भाऊ - त्याचे कारण गुप्तता! या लोकांची रॆकेट्स खूप मोठी आहेत. फ़्रेंच लोकांच्या अस्तित्वाचा त्यांना संशय येणार नाही.
शर्मिला - म्हणजे ते गोरे लोक इकडे येतात?
भाऊ - नाही. अजिबात नाही. स्थानिक कामे स्थानिक लोकांनीच करायची असतात.
शर्मिला - तुम्ही मला असले काम देणार आहात?
भाऊ -तू एकटी आहेस, तुझ्याकडे पैसा आहे, बुद्धी आहे, जबाबदारी नाही. मग समाजाला शुद्ध करण्यास तुला काय अडचण आहे?
शर्मिला - पण मला काय करावे लागेल?
भाऊ - फ़क्त असे लोक हेरायचे. ते सुरुवातीला तयार होत नाहीत. पण त्यांना मोहवून इतरांशी भेटवायचे. ज्यांच्याशी भेटवायचे ते आपलेच लोक असतात. समजा माझ्याकडे या कामासाठी एक मुलगा आहे. तर तू जिच्यावर संशय आहे अशा मुलीला त्याच्याकडे पाठवायचेस...

शर्मिला ताडकन उभी राहिली.

शर्मिला - भाऊ.. वाट्टेल ती स्वप्ने दाखवू नका. मी असली बाई नाही.
भाऊ - वाटलेच. तुझ्यासारखी स्त्री हे कधीच करणार नाही.
शर्मिला - एवढे समजते तर बोललात कशाला?
भाऊ - त्याचे कारण आहे.
शर्मिला - कसले कारण?
भाऊ - एका कॊन्टेक्टचे चौसष्ट हजार म्हणजे कमी नाही म्हणता येणार

शर्मिला वेड्यासारखी भाऊंकडे पाहात होती. भाऊ मिश्कीलपणे बीअर पीत होते. चौसष्ट हजार? उभ्या उभ्याच शर्मिला अत्यंत वेगात विचार करत होती. आजवर आपण अनेक पुरुषांना नादी लावले अन उभे राहिलो. बायकांना इतरांच्या नादी लावणे अन आपण केले ते करणे यात तसा फ़रक काय आहे? म्हणजे फ़रक भरपूर आहे. पण त्याचे कॊम्पेन्सेशन तर अफ़ाट आहे. समजा वर्षात फ़क्त दोनच मुली आपल्या जाळ्यात अडकल्या, तरी सव्वा लाखाची कमाई! अन काही मिळाले नाही, भाऊंनी फ़सवले किंवा अगदीच नगण्य रक्कम मिळाली तर भाऊंचे भांडाफ़ोड करता येईलच. हा माणूस स्वत:ला समजतो तितका हुषार नाही.

एका क्षणात शर्मिलाने प्रकाशवेगाने विचार केला. एका कॊन्टॆक्टचे इतके पैसे कशासाठी? असे कसे होईल? यात काहीतरी गोलमाल आहे. असे असते तर हा भाऊ आपल्यासारखीकडे कशाला आला असता रात्र घालवायला? यात आपल्याला फ़सवण्याचा प्लॆन आहे.

तिचा हा विचार निश्चीत झाल्यावर ती शांत झाली.

शर्मिला - सॊरी! तुम्ही आता निघा. मी हे करणार नाही.
भाऊ - माझा माणूस उद्या वीस हजाराचा ऎड्व्हान्स घेऊन येईल आठ वाजता. त्याच्याकडे निरोप दिलास तरी चालेल.
शर्मिला - पुन्हा हा विषय काढू नका. निघा
भाऊ - रागवलेली दिसतेस! बोललो असतो, पण आणखीन राग येईल तुला.. म्हणून गप्प बसतो.
शर्मिला - काय?
भाऊ - तू विचारतेस म्हणून सांगतो. एकटी तरुण बाई परक्या पुरुषाच्या घरी सोडण्याच्या प्रस्तावाला मान्यता देते, त्याला घरात घेते, कॊफ़ी पाजते, शेकहॆन्ड करते, रात्र अकरा वाजता मिठी मारते अन नंतरचा तासभर त्याच्या सहवासात राहते अन बीअरही पाजते.
शर्मिला - काय म्हणायचंय तुम्हाला?
भाऊ - ही काही मोठी सभ्यपणाची लक्षणे वाटत नाहीत नाही?
शर्मिला - बनसोडे... (तिचा स्वर आता तीक्ष्ण झाला होता.)
भाऊ - ओरडू नकोस. मी गेल्यावर विचार कर. हे काम बेकायदेशीर असले तरीही कधीच कुणाला कळणारे नाही. कारण हे काम काय आहे ते मी तुला सांगतो. सामान्य कुटुंबातील मुलींना यात ओढले जाते. त्यांच्यावर प्रेमाची भुरळ पाडली जाते. त्यांचे शरीरसंबंध येतात तेव्हा त्याचे शूटिंग घेतले जाते. त्याची सी.डी. बनवली जाते. ती फ़्रान्समधील एका एजन्सीला विकली जाते. त्याचे खूप पैसे मिळतात. त्याचे पैसे यासाठी मिळतात की जगभरातील ब्ल्यु फ़िल्म रसिकांमधे घरगुती स्वरुपाच्या सेक्सचे रसिक असणारे संख्येने सर्वात जास्त लोक आहेत. त्यातही देसी मुलींना बघायला ते आसूसलेले असतात. प्रत्यक्ष शरीरसुख घेण्याहूनही जास्त आनंद फ़क्त पाहण्यात लुटणारे करोडो लोक या जगात आहेत. या सी.डी.चे वितरण करण्याची एक बेकायदेशीर मात्र अत्यंत प्रभावी यंत्रणा त्या एजन्सीकडे असते. सी.डी.च्या हजारो प्रती विविध देशांमधून विकल्या जातात. तीच एजन्सी एक इंटरनेट साईटही चालवते. इतर अनेक साईट्सशी त्यांचे संबंधही असतात. या मुलींच्या व्हिडिओचे भाग व फ़ोटो ते त्या साईटवर जाहिरात म्हणून लावतात. त्यातच क्रेडिट कार्डाने सी.डी. मागवणारे लोक असतात. त्यांची क्रेडिट कार्ड अकाउंट्स या एजन्सीला समजतात. त्यात अफ़रातफ़र करण्यासाठी त्यांची एक वेगळी यंत्रणा असते. त्यातून त्यांना सी.डी पेक्षा थोडा कमी पण प्रचंड फ़ायदा मिळतो. देसी मुली अर्थातच भारतातच सर्वात जास्त असतात. त्यामुळे सप्लाय करणारा देश म्हणून भारत त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरतो. तसेच ग्राहक म्हणूनही हा देश मोठा ठरतो ते लोकसंख्येमुळे! हे आंतरराष्ट्रीय कायद्याला माहीत नसते असे नाही. पण यावर मधे मधे नियंत्रण आणल्यासारखे भासवून ते दिखावा करतात.

शर्मिला सुन्न होऊन ऐकत होती.

भाऊ - आता पुढे ऐक! यात नुकसान कुणाचे होते? तर त्या मुलींच्या आयुष्याचे! किती मुलींच्या आयुष्याचे नुकसान होते? तर सोलापुरात दोन वर्षात जेमतेम एखादी! भारतभरात मिळून होत असेल तीस एक मुलींचे! भारताची लोकसंख्या किती? शंभर कोटी! त्यात जबरदस्तीने वेश्या व्यवसायाला लावल्या गेलेल्या मुली दर वर्षी दहा हजार समज! बलात्कार झालेल्या दर वर्षी तितक्याच समज! लैंगीक शोषण होणायाही तितक्याच समज! या गुन्ह्यांपेक्षा हे काम कमी बेकायदेशीर असूनही यात गुन्हेगारीचा रेट इतका कमी! कारण एका नवीन मुलीच्या सी.डी. जवळपास दोन दोन वर्षे हैदोस माजवतात. आणि या मुलींना माहीतही नसते की असे काही झाले. त्यांना फ़क्त इतकेच वाटते की त्यांना लग्नाचे आमिष दाखवून एका मुलाने फ़सवले. त्या पोलिसात जरूर जाऊ शकतात. पण आरोप करणार काय तर या माणसाने माझ्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. हे सांगणाया मुलींचे प्रमाण मुळात नगण्य! त्यात त्यांचा आरोप अगदीच किरकोळ! त्या आरोपातून आरोपीची सुटका करून पैसे खाण्यासाठी डिपार्टमेंटही तयार असतेच! कधीकाळी एखादी ओळखीतली मुलगी कुणाला नेटवर दिसलीच तर ती बदनाम होते, पण हे होण्याची शक्यता आणखीनच नगण्य! कारण दोन वर्षात एखादी मुलगी फ़सणार! त्यांना ओळखणायांपैकी क्वचित कुणीतरी पोर्नोग्राफ़िक साईट बघणार. अशा साईट्स अनंत असतात. नेमकी तीच साईट, तीच मुलगी बघणे जवळपास अशक्य! बघितलेच तरी तो त्यांना कुणाचातरी सायबरगुन्हा स्वरुपाचा खोडसाळपणा वाटणार! त्यात त्यांचा अन त्या मुलीचा समोरासमोर संबंध पुन्हा येण्याची शक्यता फ़ार कमी असणार. आणि तसे काही झालेच तरी फ़्रान्सच्या एजन्सीचा या मुलीशी संबंध कसा आला ते समजणारच नाही. समजा अगदी त्या मुलीला विचारले तरी ती म्हणेल की मला पुर्वी फ़सवण्यात आले. आता ती दुर्घटना मला विसरायची आहे. त्यातूनही तिने समजा तसा आरोप केलाच तर इतके पैसे देऊन सगळी तोंडे बंद केली जातात की कुणाला त्याची कल्पनाच येणार नाही. आता मला सांग! या सगळ्यात, एक दोन मुलींची आयुष्य बरबाद होण्याने, जर जगभरच्या रसिकांना हवे ते मिळत असेल. सर्व संबंधितांना खोयाने पैसा मिळत असेल, सर्व काळजी घेतली जात असेल अन एवढे होऊनही त्या मुलींना जीवाची भीती नसेल अन त्यांचे पुढील आयुष्य बहुतांशी वेळा मार्गाला लागत असेल तर प्रॊब्लेम काय आहे?

मध्यरात्री दिड ते पहाटे तीन! शर्मिला बीअर वर बीअर पीत खिळल्यासारखी बसून विचार करत होती. भाऊ दुसरीकडे तोंड करून बीअर पीत विचार करत होते. तीन वाजता शर्मिला उठून भाऊंपाशी गेली व त्यांच्या गळ्यात हात टाकत म्हणाली:

शर्मिला - उरलेली रात्र अशीच घालवायची आहे का?

भाऊंच्या वक्तृत्वामुळे त्यांना एक अत्यंत महत्वाचा साथीदार मिळाला होता. बाई असल्यामुळे शर्मिलावर मुली विश्वास ठेवंणे हे नंदनवर विश्वास ठेवण्यापेक्षा जास्त सुलभ होते. पहाटेचे साडे पाच वाजले तेव्हा भाऊ शर्मिलाची मिठी सोडवून घरी निघाले.

दोन वर्षात शर्मिलाने फ़्रान्सच्या एजन्सीत आजवर नोंद असलेले भारताचे रेकॊर्ड ब्रेक केले होते. एकट्या सोलापुरातून तिने पाच मध्यम रुपाच्या मुली इंटरनेटवर झळकवून दाखवल्या होत्या. मोबदला व बक्षीस दोन्ही मिळून तिला तीन लाख वीस हजार अधिक दिड लाख असे चार लाख सत्तर हजार मिळाले होते. महिन्यातून पाच सहा वेळा भाऊंना शरीर सोपवण्याचे काम करावे लागणे ही बाब सोडली तर शर्मिला आपल्या बंगल्यात सुखात होती.

मात्र हल्ली हल्ली तिच्या मनात वेगळे विचार यायला लागले होते. भाऊंची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होण्यात व सी.डी. प्रकरणात पोलिसांना खुष ठेवण्यात शर्मिलाचा वापर भाऊ करायला लागले होते. कधी आमदारसाहेबांकडे जा, कधी वाघमारेकडे जा! एकदाच का होईना, पण भाऊंनी आपल्याला वाघमारेकडे जायला सांगावे याची तिच्या मनात तीव्र चीड होती. पण भाऊंनी प्रकरण फ़ुटले तर सगळेच आत होऊ ही भीती दाखवल्यामुळे तिने फ़क्त एकदाच त्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

पण आता ती या रॆकेटवर वेगळा विचार करायला लागली होती.

मूळ प्रॊडक्टचा सप्लाय निदान सोलापुरात तरी केवळ शर्मिलामुळेच होत होता. नंदन फ़क्त एखाद्या मशीनप्रमाणे प्रेमाचा अभिनय करणारा किरकोळ मोहरा होता. एक दिवस भाऊंच्या बंगल्यावर तिघे गप्पा मारत बसले असताना अचानक भाऊंच्या तोंडातून त्यांना सव्वीस टक्के मिळतात त्यातील तीन टक्के शर्मिलाला व दिड टक्का नंदनला मिळतो हे वाक्य निसटून गेले होते. हे वाक्य शर्मिलासारखी स्त्री लाईटली घेणे शक्यच नव्हते. फ़्रान्स मधील एजन्सीशी भाऊंचे प्रत्यक्ष संबंध काहीच नव्हते हे तिला माहीत होते. कुणीतरी भारतीय एजंट चंदीगढला होता व त्याच्यातर्फ़े सगळे व्यवहार चालायचे हे ती जाणून होती.
केवळ चंदीगढचा माणूस फ़क्त भाऊंनाच माहीत आहे या एकाच कारणासाठी त्यांना साडे एकवीस टक्के मिळावेत, आपल्याला त्यांनी वापरावे अन कुणी अडकण्याची शक्यता निर्माण झाली तर मात्र आपण पहिल्या, हे विचार तिला अजिबात स्वस्थ बसू देत नव्हते.

भाऊंशी या विषयावर बोलल्यावर ते पैसे वाढवण्यास इच्छुक नसतात हे तिने आजवर तीन वेळा अनुभवलेले होते. काहीतरी कारणाने चंदीगढला जाऊन त्या माणसाची भेट घेऊन केवळ वीस टक्यात काम करायचा प्रस्ताव मांडून होकार खिशात घालता येईल का यावर आता तिचे विचार चालले होते.
त्यात आणखीन भाऊंनी परवा स्वत:च रॆकेटचा कायदा मोडला होता. हे नंदनने शर्मिलाला बोलता बोलता सांगीतले. कोणत्याही मुलीला तिची सी.डी. बनवली आहे हे रॆकेटच्या माणसाकडून कळू न देण्याचा अलिखित कायदा होता. भाऊंनी ताळतंत्र सोडून सरळ एका नुकत्याच जाळ्यात ओढलेल्या मुलीवर बलात्कार केला होता. पुन्हा ती सी.डी. तिलाच दाखवली होती. ती मुलगी नंतर हॊस्पीटलात गेल्याचेही नंदन शर्मिलाला म्हणाला होता. तेव्हापासून शर्मिला घाबरून घरातच बसली होती. जर त्या मुलीने पोलिसात तक्रार केली तर आजवर कमवलेले सगळेच जाणार तर होतेच, वर हातकड्या पडण्याची वेळ आली असती. असे काही होणार याची कुणकुण लागलीच तर ताबडतोब खूप लांब कुठेतरी निघून जायचे असा तिने विचार केला होता. मागे एका मारवाड्याबरोबर ती राजस्थानमधील अल्वर या गावी गेलेली होती. ते गाव ती जवळपास निश्चीत करत शांतपणे बीअर पीत असतानाच फ़ोनची रिंग वाजली. साडे अकराला फ़ोन? काय झालं काय?

शर्मिला - हॆलो..
भाऊ - शर्मिला.....????

भाऊंचा आवाज ऐकून ती नखशिखांत हादरली. बहुधा नव्या मुलीने काहीतरी घोळ केलेला दिसत होता.

शर्मिला - काय झालं...
भाऊ - गाडी पाठवतोय...
शर्मिला - कशाला?
भाऊ - महत्वाचे बोलायचंय
शर्मिला - सकाळी येईन
भाऊ - सकाळपर्यंत या गोष्टीवर वेगात निर्णय घ्यावा लागणार आहे.
शर्मिला - कुठली गोष्ट?
भाऊ - मीना कातगडे
शर्मिला - काय केलं तिने?
भाऊ - प्रत्यक्ष बोलू.
भाऊंनी फ़ोन ठेवल्यावर ती तयार होते तोवरच गाडी आल्याचे नोकराने सांगीतले.
शर्मिला भाऊंकडे पोचली.
शर्मिला - काय झालं? काय केलं तिने?
भाऊ - साहेबांना भेटली.
शर्मिला - आमदारांना? (शर्मिलाला भयंकर धक्का बसला होता.)
भाऊ - हं!
शर्मिला - कशी काय?
भाऊ - तेच शोधायचं आहे.
शर्मिला - पण भेटीत काय झालं? (पोलिसांचं लफ़डं नाही हे पाहून शर्मिला जरा शांत झाली होती.)
भाऊ - भेटली म्हणजे स्टेजवर हार घालायला आली अन त्यांच्याशी एक दोन वाक्यं बोलली. तेही बोलले.

शर्मिला हसायला लागली. तिचा सगळा ताण एकदम गेला होता.

भाऊ - हसतेस काय?
शर्मिला - मग काय करू? आमदारांशी दोन शब्द बोलली अन नगरसेवक गळाठले.
भाऊ - नीट बोलत जा.
शर्मिला अजून हसत होती. भाऊंच्या मेंदूवर अल्कोहोलचा परिणाम झालेला होता. शर्मिला हसते पाहून त्यांनाही ते प्रकरण अगदीच क्षुल्लक वाटू लागले व तेही हसू लागले.
भाऊ - तसं नाही. ती कॊलेजची मुलगी नाही. डायरेक्ट साहेबांशी बोलते कशी? स्टेजवर आलीच कशी?
शर्मिला - दिड टक्का वाढवा माझा.
भाऊ - म्हणजे?
शर्मिला - नंदनने करायची कामे मला सांगताय तुम्ही.

आता भाऊ पुन्हा हसायला लागले.

भाऊ - तो यडाय!
शर्मिला - हो? तो म्हणाला की तुम्ही काल म्हणालात शर्मिला यडीय!
भाऊ - असं म्हणाला नंदन? बोलव त्याला आत्ताच्या आत्ता इथे.
शर्मिला - असूदे असूदे! काय करायचंय सांगा!
भाऊ - आमदारसाहेब उद्यापण इथेच आहेत. संध्याकाळी पार्टीची मीटिंग आहे. त्यात ते जिल्हा उपप्रमुखांचं नाव जाहीर करण्याची शक्यता आहे.
शर्मिला - मी काय करायचंय ते सांगा ना!
भाऊ - उघड आहे. दुपारी साहेबांचे मन रिझवायचे अन मीना ओळखीची आहे का हे काढून घ्यायचे. माझी स्तुती करायची.
शर्मिला - जमणार नाही.
भाऊ - काय?
शर्मिला - मी अशा व्हिजिट्स आता करणार नाही.
भाऊ - शर्मिला... यावेळेस माझी रिक्वेस्ट ऐक! प्लीज...
शर्मिला - सॊरी!
भाऊ - मी तुला एक टक्का वाढवून देतो... प्लीज.. माझ्या करीअरचा प्रश्न आहे.
शर्मिला - भाऊ, आपल्या सी.डी.च्या ऎग्रीमेंटमधे ही असली कामं नाहीयेत.
भाऊ - यावेळेस माझं ऐक! पुन्हा म्हणणार नाही मी.
शर्मिला - या कामासाठी कुणीही मिळेल की तुम्हाला
भाऊ - शर्मिला, साहेबांचं मन कुणीही रिझवेल, पण बाकी कामे कुणी करू शकणार नाही
शर्मिला - धिस इज लास्ट टाईम?
भाऊ - अगदी शेवटचं काम समज असलं!
शर्मिला - ओके, एक टक्याप्रमाणे पाच केसेसचे एक लाख ऐशी हजार होतात
भाऊ - शर्मिला, अडवणुक करतीयस तू.. माझ्यावर विश्वास नाही?
शर्मिला - खूप विश्वास आहे. पण मला मागचेही सगळे पैसे हवे आहेत.
भाऊ - सॊरी! इतकं महत्वाचं काम नाहीये ते...
शर्मिला - राहुदेत! मला काय?
भाऊ - पन्नास हजार देईन..
शर्मिला - एक लाख! शेवटचं!
भाऊ - डन!
भाऊंनी कपाटातून नोटा काढल्या. शर्मिलाने अंदाजे मोजून पर्समधे टाकल्या अन उठली.
भाऊ - हे काय? निघालीस?
शर्मिला - म्हणजे?
भाऊ - पहाटे जा नेहमीसारखी
शर्मिला - कशाला?
भाऊ - रात्र मजेत घालवू?
शर्मिला - मजेत? भाऊ, हल्ली तुम्हाला मी झेपते तरी का?...

शर्मिलाचा हा प्रश्न कानांवर आदळून त्याचा अर्थ भाऊंना समजेपर्यंत शर्मिला बंगल्याबाहेर पडली होती. रागाने मुठी आवळून भाऊ लाल डोळ्यांनी खिडकीतून तिला घेऊन जाणाया गाडीकडे पाहात होते.
आणि इकडे मीना झोपताना फ़क्त ’ती सी.डी. आता लवकरच मिळवून नष्ट करता येईल का या एकाच विचाराने तळमळत होती’.

सोलापूर सेक्स स्कॆंडलचा सर्वात महत्वाचा अध्याय घेऊन उद्याचा सूर्य उगवणार होता.

गुलमोहर: 

मी दोन चार वेळा प्रयत्न केला. पण कादंबरीचा भाग दिसत नाही आहे. मला उपाय माहीत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

हा विषय धीट असल्याने जर प्रकाशकांनी ही कादंबरी प्रकाशित न करू देण्याचे ठरवले असले तर कृपया मला ते समजावे.

धन्यवाद!

हा विषय धीट असल्याने जर प्रकाशकांनी ही कादंबरी प्रकाशित न करू देण्याचे ठरवले असले तर कृपया मला ते समजावे.
--- विषय धिट म्हणण्यापेक्षा ते जळजळीत वास्तव्याच्या जवळ जाणारे आहे असे मला वाटते...

पुढचे भाग वाचण्यासाठी अधीर असताना अन ते बेफीकिर ने टायपले असताना इथे न दिसणे म्हणजे अन्याय आहे :रागः

माफ करा. बहुधा माझ्या चुकीमुळेच हा भाग दिसत नव्हता. सर्वांच्या प्रेमळ प्रतिसादांचे आभार!

तुम्हि आता सर्व भाग एकत्र करुन म्हणजे.
भाग १ २ ३ ४ आणि शेवट असे सर्व एकत्र कोपी करुन नविन लेखन करा मध्ये जा.
त्यातील गुलमोहर मधील कादंबरी ह्यात जाउन. पेस्ट करा आणी शिर्षक देद्या.
आणि योग्य तसे व्यवस्थित टाइप करा.
धन्स.

बेफिकिर लवकर पुर्ण करा कादंबरी. उद्या एकच दिवस मिळेल वाचायला. पुढे ३ दिवस सुट्टी आहे.

पुढचा भाग लवकर येऊ देत..
आधीच्या तीन भागाची ( म्हणजे जेवढे असतील तेवढे ) लिंक द्या म्हणजे आधीचे भाग वाचायला पण मिळतील Happy