टोमॅटो चे विविध पदार्थ

Submitted by सुनिता on 31 March, 2010 - 23:10

टोमॅटोचे विविध प्रकार या धाग्यावर लिहावेत
जसे कोशिंबीरी, सॉस, कॅचअप, रस्सम वगैरे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) टोमॅटो धुवून स्वच्छ पुसून बारीक चौकोनी फोडी कराव्या. त्यात दही, साखर, मीठ टाकुन मिश्रण व्यवस्थित हलवावे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. वाटल्यास जिरे, हिरव्यामिरचीची फोडणी घालावी किंवा फोडणी नाही घातली तरी कोशिंबीर छान लागते.

२) टोमॅटो धुवून स्वच्छ पुसून बारीक चौकोनी फोडी कराव्या. कांदा व कोथिंबिर बारीक चिरून घ्यावी. चवी प्रमाणे मीठ घालून एकत्र करावे व त्याला लसूण, हिंग घालून खमंग फोडणी घालावी.

टोमटोचे सार्,बर्फी,लोणचे,भाजी.