मी पाहीलेला अवतार!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या बर्‍याच मित्रांनी शिफारस केल्यावर व मिडियामधल्या या चित्रपटाच्या "महानतेच्या" वावड्या उठलेल्या ऐकुन मीही जगातल्या कोट्यावधी प्रेक्षकांसारखा "अवतार-३-डी" चित्रपट बघण्याच्या मोहात पडलो व प्रचंड करमणुक झाली!

हॉलिवुडच्या अश्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे नाव चक्क... अवतार.. असे अस्सल मराठमोळी असल्यामुळे खर म्हणजे या चित्रपटाबद्दल न बघताच आधीपासुनच आपुलकी निर्माण झाली होती व त्यात या चित्रपटाचा दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन हा असल्यामुळे हाही चित्रपट त्याच्या या आधिच्या.. मला प्रचंड आवडलेल्या.. टर्मिनेटर २ व टायटॅनिक... या २ चित्रपटांइतकाच चांगला असावा असा माझा होका होता.त्यात भर म्हणजे जाणकार समिक्षकांनी असे भाकीत वर्तवले होते की यापुढे हॉलिवुड फक्त ३-डी चित्रपटच काढतील व हा चित्रपट म्हणजे ३ डी- तंत्रज्ञानातला एक हिरा आहे हिरा!

पण कसचे काय आणी कसचे काय! चित्रपट पाहुन झाल्यावर १० डॉलर वाया गेल्याच्या दु:खापेक्षा जेम्स कॅमेरुन या माझ्या आवडत्या दिग्दर्शकाने या चित्रपटाची पटकथा नक्कीच काहीतरी स्मोक करत असताना लिहीली असावी या विचाराचे शल्य मनाला जास्त जाचत होते. खर म्हणजे मायबोलीवर फारेंड किंवा श्रद्धा के.. यांचे या चित्रपटाबद्दलचे विवेचन.. अचाट व अतर्क्य चित्रपट.. विभागात.. अजुन आले नाही याचे मला आश्चर्यच वाटते.

तर मंडळी.. तर आता या चित्रपटाबद्दल...

चित्रपटाची कथा इसविसन २१५० च्या आसपासची . कुठल्यातरी पँडोरा नावाच्या परग्रहावर न्हावि(का नाव्ही) नावाची जमात राहात असते. कसा कुणास ठाउक पण त्या ग्रहावर एक अतिशय मौल्यवान खनीज असल्याचा सुगावा अमेरिकेच्या एका लालची कॉर्पोरेशनला लागतो व त्या खनिज प्राप्तीसाठी ती कंपनी एका खाजगी मिलिटरी ब्रिगेडला त्या परग्रहावर अद्ययावत शस्त्र व विमाने घेउन पाठवते. पण हिंसेचा मार्ग अवलंबुन ते खनिज मिळवायच्या आधी सिगोर्नी विव्हरच्या हुशार (?) नेत्रुत्वाखाली एक शास्त्रज्ञांची तुकडी असा प्रयत्न करत असते की पृथ्विवरच्या काही मानवांना त्या पँडोरा ग्रहावरच्या न्हाव्यांसारख्या अवतारात रुपांतरीत करायचे व त्या अवतारात मग ते न्हावी-रुपी मानव त्या पँडोरा ग्रहावरच्या खर्‍या न्हाव्यांमधे मिसळुन त्यांच्याशी मैत्री करतील व त्यांचा संहार न करता त्यांच्या ग्रहावरचे ते मौल्यवान खनीज हासील करतील! म्हणजे प्लान अ- मैत्री प्लान! व तो असफल झाला तर प्लान ब.. मिलिटरी प्लान.! आल का लक्षात?

तर आता त्या पँडोरा ग्रहावरचे हे न्हावी कसे दिसतात? तर ते पार्ट चित्ता- पार्ट मांजर.. पार्ट मानव.. तर पार्ट स्टार ट्रेक मधल्या मि. स्पॉक सारखे लांब कान असलेले.. नऊ फुटी.. निळ्या रंगाचे व भली मोठी शेपटी असलेले व टारझन सारखे कपडे(?) घालत असलेले. बर ती त्यांची शेपटी काही साधीसुधी नसते.. त्या शेपटीच्या टोकाला असे वळवळणारे अतिशय संवेदनाक्षम केस असतात. त्या शेपटीच्या टोकावरच्या त्या वळवळणार्‍या केसांचे प्रयोजन आताच सांगत नाही.

बर ते दिसतात कसे ते तुम्हाला कळले. पण ते त्या ग्रहावर दिवसभर करतात तरी काय? त्याचे उत्तर थोडक्यात म्हणजे काहीही नाही! त्या ग्रहावर एक प्रचंड मोठे झाड असते( साधारणपणे मैल दोन मैल उंच व मैल दोन मैल रुंद) ज्याला असंख्य फांद्या असतात. हे सर्व न्हावी लोक त्या झाडावर व त्या झाडाच्या पायथ्याशी वस्ती करुन असतात. दिवसभर या झाडांच्या फांद्यांवरुन वर खाली व इकडुन तिकडे उगाचच विहार करत राहायचे हा यांचा उद्योग! बर मग झाडांच्या फांद्यांवर बागडायचा कंटाळा आला तर त्या ग्रहावर एकशिंगी व विचित्र दिसणारे अवाढव्य घोडे(?) असतात. त्या ग्रहावरच्या प्रत्येक न्हाव्याला एक एक घोडा असतो. बर घोड्यावर बसुन रपेट मारायची इच्छा झाली तर मग आपला आपला घोडा कसा ओळखायचा? तर मंड़ळी.. तिथे मग या न्हाव्यांच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस उपयोगी पडतात! कारण या घोडारुपी प्राण्याच्या शेपटीच्या टोकालाही तसेच वळवळणारे संवेदनाशील केस असतात. व मग प्रत्येक न्हाव्याने मग आपली शेपटी व घोडारुपी प्राण्याची शेपटी जवळ आणायची. जर तो घोडारुपी प्राणी त्या न्हाव्यासाठी राखुन ठेवला असेल तर त्याच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस व त्या न्हाव्याच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस....एकमेकात मिसळुन त्याची एक घट्ट गाठ तयार होते व तसे त्या घोडारुपी प्राण्याबरोबर बाँडींग झाले की मग तो घोडारुपी प्राणी खिदळत तुम्हाला त्या ग्रहावरची एक वाइल्ड राइड देतो.

बर कोणाला जर घोड्याची राइड आवडत नसेल तर तश्या न्हाव्यांसाठी मग त्या ग्रहावर डायनोसोअर्/गरूडरुपी पक्षीही विहार करत असतात. आता तुम्ही चतुर असाल तर ओळखल असेलच की त्या डायनोसोअर्/गरुडरुपी पक्ष्यावर राइड हवी असेल तर त्याच्याही शेपटीच्या टोकावर तेच वळव़ळवळणारे केस असतात व त्या ग्रहावरच्या प्रत्येक न्हाव्यासाठी एक गरुडरुपी डायनोसोअर राखुन ठेवला असतो की ज्याच्या शेपटीच्या टोकावरचे वळवळणारे केस त्या त्या न्हाव्याच्या शेपटीच्या टोकाला असलेल्या वळवळणार्‍या केसांशी घट्ट गाठ बांधतात. मग अशी घट्ट गाठ तयार झाल्यावर मग ते न्हावी सर्व ग्रहभर वाइल्ड राइड घेत विहार करतात. म्हणजे ती गाठ बहुतेक प्रुथ्वीवरच्या कारमधे असलेल्या सिट बेल्टचे काम करत असावी बहुतेक.. पडु बिडू नये म्हणुन! आणी एक... जर चुकुन एखादा न्हावी भलत्याच गरुडरुपी डायनोसोअरवर आरुढ व्हायला गेला तर तो गरुडरुपी डायनोसोअर.. त्या न्हाव्याचा जिव घ्यायलाच अंगावर येतो बर का... ते बघुन मला अशी कल्पना आली की प्रुथ्विवर सुद्धा आपल्या कार असे करु लागल्या तर? मालकाव्यतिरिक्त जर कोणी कारमधे बसायला गेले तर गाडी चवताळुन चालु होउन त्या चोराच्या अंगावर वेगात चालुन गेली तर कार थेफ्टचा प्रश्नच मिटेल!असो.

तर आता मुख्य प्रश्न असा की पृथ्वीवरच्या मानवाला त्या पँडोरा ग्रहावरच्या न्हाव्याचा अवतार कसा द्यायचा? इथे सिगोर्नी विव्हररुपी शास्त्रज्ञाची हुशारी दिसुन येते. तिने एक अद्ययावत शवपेटिका बनवली असते. त्या शवपेटीकेच्या आत असंख्य बटने,लाइट व वायर्स असतात. बाहेरही काही बटने असतात. पँडोरा ग्रहावर एका वातानुकुलीत व ऑक्सिजनयुक्त अश्या बंदिस्त लॅबमधे असलेल्या शवपेटीकेत मानवाने जाउन मग झोपायचे. मग बाहेरुन ती शवपेटीका बंद केली जाते व काही बटने दाबली व वरखाली केली की आतला मानव न्हावीरुपी अवतारात पँडोरा ग्रहावर.. त्या लॅबच्या बाहेर.. अवतिर्ण होतो! वाला! बर गंमत अशी की तिथल्या प्राणवायु नसलेल्या वातावरणात न्हाविरुपी मानवाच्या अवताराला प्राणवायुची जरुरी लागत नाही! पण जर का त्या शवपेटिकेच्या बाहेर असलेल्या बटनांची उघडझाप जर केलीत तर तात्काळ तो न्हावीरुपी मानव बाहेर त्या ग्रहावरच्या ऑक्सिजन विरहीत वातावरणात बेशुद्ध(का मरुन?
) होउन पडतो!

तर अश्या रितीने चित्रपटाचा नायक.. पॅंडोरा ग्रहावर.. न्हावीरुपी अवतार घेउन त्यांच्याशी मैत्री करायला जातो. पण तिथल्या एका न्हावी मुलीशी त्याची जरा जास्तच जवळची मैत्री होते व त्याचे ह्रुदयपालट होते. ज्या भाडोत्री मिलिटरीने त्याला त्या ग्रहावरच्या न्हाव्यांचे सिक्रेट काढायला पाठवले असते.. की बाबा ती लोक राहतात ते झाड कोती मोठे आहे त्याची पाळमुळ किती खोलवर आहेत.. ते खनीज त्या झाडाच्या किती खाली दडलेले आहे.. इत्यादी आवश्यक माहीती काढायच्या ऐवजी हा हिरो त्या न्हावी लोकांमधे एवढा मिसळुन जातो व त्या लोकांच्या घोडारुपी प्राण्याच्या राइडला व गरुडरुपी डायनोसोअरच्या वाइल्ड राइडवर व अर्थात सर्वात मुख्य म्हणजे त्या न्ह्वावीलोकातल्या एका सुंदरीवर तो इतका भाळतो की तो स्वतःला न्हावीच समजायला लागतो!

आणी मग सर्वात शेवटी कॅमेरुनच्या वाइल्ड इमॅजिनेशनचा कहर म्हणजे ह्रुदयपालट झालेला हा नायक.. त्या ग्रहावरच्या न्हावी लोकांना पृथ्वीवरुन आलेल्या भाडोत्री मिलिटरीशी लढाई करायला सज्ज करतो! त्या लढाइत मग २१५० मधल्या पृथ्विवरच्या मॉडर्न बॉन्बर्स व इतर अद्ययावत मिलिटरी शस्त्रास्त्रांचा मुकाबला मग तो नायक व न्हावी लोक त्या ग्रहावरच्या गरुडरुपी डायनोसोअरांची मदत घेउन करतात. त्या घनघोर युद्धात मग चक्क ते गरुडरुपी डायनोसोअर त्या मॉडर्न बॉन्बर्सना आपल्या पायात पकडुन.. हलवुन हलवुन.. त्यांचा बॅलंस बिघडवुन खाली पाडतात. अशी विजयश्री खेचुन आणल्यावर हा हिरो मग त्याचे स्पिरिट्(आत्मा?) त्याच्या अवताररुपी न्हाव्यामधे धारण करुन त्यांच्यातलाच एक न्हावी म्हणुन तिथे त्या ग्रहावरच त्यांच्यात विलीन होतो व त्याचा अवतार अवतार न राहता तो खराच न्हावीरुपी अवतार बनतो!

कसले जबरी व ग्रेट इमॅजिनेशन आहे जेम्स कॅमेरुनचे! मानल पाहीजे!( मला वाटते त्याने त्याच्या ४-५ वर्षाच्या नातवाला वगैरे हाताखाली घेउन ही कथा लिहीली असावी किंवा काहीतरी स्मोक करत असताना तरी ही महान कथा त्याने लिहीली असावी किंवा साठाव्याच वर्षात त्याचा बुद्धीभ्रंश झाला असावा अशी मला दाट शंका येते! )

( आता या वाइल्ड इमॅजिनरी कथेमधे अहिंसा, एकोपा,पिसफुल स्पिरिट,मानवाची ग्रिड्,हिंसा,प्रेम वगैरे वगैरे प्रतिकाम्त्मक रित्या दाखवण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केलेला आहे पण मला तर या चित्रपटात फक्त (तर्कशुन्य! माइंड यु!) वाइल्ड इमॅजिनेशनच दिसले Sad )

हे वाचल्यावरही जर का कोंणाला हा चित्रपट बघायचा असेल तर एक व्हिडिओ गेम बघायला जात आहोत असे समजुन फक्त ३-डि मुव्हीच बघा. तेवढेच स्पेशल इफेक्ट्स बघीतल्याचे समाधान तरी लाभेल. साध्या पडद्यावर बघण्याच्या लायकीचा हा चित्रपट नाही असे माझे मत आहे. या उप्पर तुमची मर्जी!

विषय: 
प्रकार: 

http://en.wikipedia.org/wiki/Science_fiction_film
Science fiction film is a film genre that uses science fiction: speculative, science-based depictions of phenomena that aren't necessarily accepted by mainstream science, such as extra-terrestrial life forms, alien worlds, esp, and time travel, often along with futuristic elements such as spacecraft, robots, or other technologies. Science fiction films have often been used to focus on political or social issues, and to explore philosophical issues like the human condition.

अजून काय लिहिणार...

आजही जगभर 'थर्ड वर्ल्ड कंट्रिज' कडे जी नैसर्गिक साधन सामुग्री आहे, जीचा विकसनशील देशांकरता प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्रास/गैरवापर होतोय..>> विकसित देशांकरता का? कारण तिसर्‍या जगातील देशच विकसन शील आहेत व जी एट देश विकसित आहेत. विषयांतरा बद्दल क्षमस्व.

म्हणजे कोणत्याही कलाकृतीकडे कलाकृती म्हणून निखळपणे पहायचे नाही काय ? कोणताही चित्रपट पहायला जाताना दिग्दर्शकाचे चरित्र , त्याची मानसिक बैठक , त्याची भूमिका, त्याने वापरलेले तंत्रज्ञान, त्याने केलेली तयारी 'मेकिंग ऑफ अमुक' ह्या फिल्म मधून सगळ्याचा अभ्यास करून , चांगले वाईट पूर्वग्रह घेऊन चित्रपट पहायला बसायचे म्हणता? स्वतः निखळपणे (अ‍ॅबसॉल्युटली)त्या अनुभवाला भिडायचे नाही म्हणता? बरं बरं.

आता कविता वाचायला सुद्धा, कविच्या बेचाळीस पिढ्यांचा अभ्यास करून, झालेली पूर्ण समीक्षा वाचून, कवीशी चर्चा करून , बसायला हवे असे वाटू लागले आहे, तरच ग्रेस वगैरे कवी आकळण्याची शक्यता. शिवाय छपाईचे तंत्रज्ञानही गटेन्बर्गपासून अभ्यासायला हवे

च्यायला तापच की सगळा. त्यापरीस अंताक्षरीच्या बीबी वर जावे हे बरे... Proud

राज, प्रयोग, नानबा, अरभट, मैत्रेयी,
सगळ्यांना अनुमोदन, मला पण अतिशय आवडला अवतार, अगदी visual treat !
तिथले छोटे छोटे जीव, प्राणी , पक्षी, झाडं सगळच detailing, concepts अतिशय सुंदर आणि दिलेला संदेश पण !
शेवटचं युध्द, त्या झाडाखाली सर्वांनी जमून प्रार्थने सारखं काही तरी गायन करणं, हिरो च 'मुखिया सरदार कि बेटी' से प्यार यात थोडा बॉलीवुड टच पण दिसला, मजा आली पहाताना :).

अरभाट....मानले...आणि पटले सुद्धा...छान explaination !! अवतार ची कथा एका वाक्यात सान्गायची झाली तर ती एका तामिळ movie ला परफेक्ट बसेल्...पन अवतार बघताना खूप भारी वाटते....सगळे नीळे-जाम्भळे..उडणारे...लटकणारे..लाम्बसडक्..वळवळणारे..तरन्गणारे...:अओ:....अवतार पाहाणे हा एक वेगळीच अनूभूती आहे....लय झ्याक !!

अरभाट, नानबा, प्रयोग यांच्याशी सहमत.
मला प्रचंड आवडला पण वेळ नसल्याने दोन वेळा पाहिला नाही.

नाहि हो टोणगाशेठ, तुम्ही वर मांडलेल्या गोष्टी चित्रपट पहाण्याआधी करायची काहीही आवश्यकता नाही. पण केल्यास चित्रपटाचा आनंद द्विगुणीत होतो यात शंका नाही. (मला सुद्धा क्वेंटीन टेरंटीनो, डेव्हीड फींचर या महानुभावांचे चित्रपट बर्‍याचदा झेपत नाहीत. डिव्हीडि विकत घेउन पारायणं करावी लागतात; पण प्रत्येक पारायण वेगळा अनुभव देऊन जातो. असो Happy )

विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट, मला अ‍ॅवटार न आवडलेल्यांना कोणती नेमकी गोष्ट आवडली नाही हे विचारावसं वाटतंय. मुकुंदला यातुन सूट आहे कारण त्याने ऑलरेडी त्याची मतं मांडली आहेत (होपफुली त्याला उत्तरं मिळाली असावीत; अर्थात, मुकुंद आणखी शंका मांडु शकतो. Happy ). कदाचीत आम्हा सगळ्यांच्या नजरेतुन ती गोष्ट निसटली असेल आणि काय सांगावं, तुमचा पॉइंट आम्हाला "इपीफनी" ची अनुभुती देऊ शकेल. अन्यथा तुम्हीही "वाहत्या गंगेत हाथ धूऊन घेतले" असं समजायला वाव आहे... wlae.gif

(As always, constructive criticism is anticipated.) Happy

अवतार पाहताना नानबाला जे वाटत होते तसेच काहीसे मलापण वाटले. कुठेतरी आपलेच reflection बघतोय असे वातत होते.एक जास्त शक्तीशाली गट एका कमकुवत गटाला बळाचा वापर करुन ओरबारडतोय.त्यांची साधनसंपत्ती लुटली जाणार आहे, त्या बिचार्‍यांच्या ते गावीही नाही.
धरणग्रस्त शेतकरी ,खाणीसाठी आपल्या हक्काच्या जंगलाला मुकलेले आदीवासी काय वेगले असते ह्या सिनेमापेक्षा?सगळे लुतले गेल्यानंतर पुनर्वसनासाथी लढे उभे रहातात.. वर्षानुवर्ष चालु रहातात्.इथे फक्त सिनेमा सल्यामुळे शेवट थोडा सकारात्मक.

अवतार पाहिला नाही.
चर्चा वाचली. अरभाट/प्रयोग/नानबा यांनी काही पैलु उलगडून दाखवले आहेत त्यामुळे पहावसा वाटतोय.
तरीही कुठल्याही देशाच्या कायद्यांतर्गत हा सिनेमा आवडलाच पाहीजे असा जो एक सूर येतोय तो खटकला. कधीकधी १०-१० वर्ष दिग्दर्शक मेहनत करतात म्हणुनच केवळ चित्रपट महान असे नसावे. :-)रुनीला ऑस्कर बद्दल अनुमोदन.

अरे किती भांडता रे या चित्रपटावरुन.. Happy

एक अरभाट सोडला तर हा चित्रपट आवडलेल्या प्रत्येकाने इथे हा चित्रपट न आवडलेल्यांना हा चित्रपट कसा समजलाच नाही हाच सुर त्यांच्या पोस्ट मधुन काढला आहे.

सर्वप्रथम मला हे स्पष्ट करायचे आहे की मीही जेम्स कॅमेरुनचा फॅन आहे. त्याचे अबीस पासुनचे चित्रपट मला आवडले आहेत. टर्मिनेटर टु व टायटॅनिक तर जबरदस्तच आवडले होते. म्हणजे मला साय फाय चित्रपटांबद्दल आकस आहे असे मुळीच नाही. (आता टायटॅनिक साय फाय नव्हता हे मलाही माहीत आहे.. नाहीतर परत वादळ उठेल की अरे मुकुंद... तुला टायटॅनिक सायफाय नव्हता हेही माहीत नाही काय रे?....:) ) आणी हा साय फाय फँटसीचा चित्रपट असल्यामुळे मला समजला नसावा हे काही जणांचे गॄहीतकही चुकीचे आहे.मान्य आहे की मायबोलिवर जे बहुसंख्य कंप्युटर फिल्ड मधले आहेत त्यांच्याइतके मला कंप्युटर जनरेटेड स्पेशल इफेक्ट्सबद्दल ज्ञान नाही पण म्हणुन सरसकट याला साय फाय चित्रपटच समजत नसावेत असा आरोप करणे म्हणजे फारच बालीश वाटते. चित्रपट न आवडणे म्हणजे न समजणे हे कसले समिकरण? आणि माझ्या समिक्षेत शेवटच्या पॅरॅग्राफमधे मी लिहीलेही आहे की दिग्दर्शकाने या चित्रपटात प्रतिकात्मक रित्या हिंसा,अहिंसा,मानवी ग्रिड,एकोपा,पिसफुल स्पिरिट वगैरे दाखवायचा प्रयत्न केला आहे त्यावरुन ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे की मला जेम्स कॅमेरुनला या चित्रपटातुन काय दाखवायचे आहे हेच समजले नाही.. त्यांना कळले पाहीजे की मी त्या मुद्द्यांचा जरुर विचार केला आहे तरी सुद्धा मला तो चित्रपट आवडला नाही.

मला सगळ्यात जास्त अरभाट याचे पोस्ट खुप आवडले. त्याने कुठलीही आकस बुद्धी न ठेवता.. गोइंग आउट ऑफ हिज वे.. प्रामाणि़क पणे..... या मुव्हीतले बरेचसे मुद्दे मला(व सगळ्यांना) समजवुन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या प्रयत्नाला मनापासुन दाद द्यावीशी वाटते.

बाकी वर ज्यांनी असा सुर काढला आहे की मला या चित्रपटातुन जो संदेश दिग्दर्शकाला द्यायचा आहे तोच समजला नाही त्यांच्यासाठी.... मला हा चित्रपट बघायच्या आधीपासुन माहीत होते की कॅमेरुनला या चित्रपटातुन काय संदेश द्यायचा हे. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर हा चित्रपट बघुन झाल्यावर मला असे वाटले की कॅमेरुनने कंप्युटर जनरेटेड टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन घेण्यासाठीच हा चित्रपट बनवला आहे. गरीब लोकांचे आपल्या स्वार्थासाठी शोषण, अहिंसा,निसर्ग शक्तीला योग्य तो मान न देउन नुसतेच निसर्गाला ओरबाडणे व त्याच्याशी एकरुप न होणे हे कसे वाइट.. वगैरे असले संदेश अगदीच ढोबळ व दर्शकवर्गाला अगदीच... म्हणजे काहीच त्यातले समजत नाही.. असे समजुन त्या संदेशाचे डोस पाजल्यासारखे वाटतात. अरे अहिंसेचे व प्रेमाचे व स्पिरिच्युअल हार्मोनीचे ,निसर्गाचे महत्व दाखवण्यासाठी केवढा तो हिंसाचार चित्रपटात! तसल्या संदेशासाठी एवढा ४०० मिलिअनचा चुराडा करायला पाहीजे होता का हा प्रश्न सुज्ञ प्रेक्षकांनी स्वतःला विचारला पाहीजे. अरे मुव्हीमेकिंग हा एक बिझनेस आहे व हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. त्यातुन दिग्दर्शकाला काही उदात्त मेसेज द्यायचा आहे व तो मला किंवा हा चित्रपट ज्यांना आवडला नाही.. त्यांना समजालच नाही असा जो सुर वर काही जणांनी काढला आहे त्याला माझा आक्षेप एवढेच.

आता.. अरभाट.. तुझ्या मुद्द्यांबद्दल...

तुही बहुतेक कंप्युटर फिल्ड मधला असावास असा माझा अंदाज आहे. आणी तुला त्यामुळे आर्टिफिशिअल इंटलीजंस किंवा काँप्ले़क्स डेटा ट्रान्सफर वगैरे याबद्दल अद्ययावत ज्ञान असेल असे मी गृहीत धरतो. मी वैद्यकिय क्षेत्रात असल्यामुळे तु जो ऑर्गॅनिक लेव्हल वर (या चित्रपटातला) डेटा ट्रान्सफर किंवा डिजीटायझेशन करणे हा जो मुद्दा मांडला आहेस त्यावर दोन शब्द लिहु शकतो. तसा डेटा ट्रान्सफर होउ शकतो.. ... जेव्हा फर्टिलायझेशन नंतर डि न ए रिप्लिकेशन होउन क्रोमोसोमच्या स्ट्रँडचे मिरर क्रोमोसोम स्ट्रँड तयार होणे हे म्हणजे ऑर्गॅनिक डेटा ट्रांसफरच आहे पण तसा ऑर्गॅनिक डेटा ट्रांसफर... आणि त्याहीपेक्षा फार फेच्ड... म्हणजे पर्सनॅलिटि ट्रांसफर....अजुन १५० वर्षात... मानवाने अद्ययावत शवपेटिकेत बसुन.. लांबवर.. टँकमधे असलेल्या न्हाविच्या बॉडिमधे करु शकणे हे मला नक्कीच तर्कशुन्य वाटले.

दुसरे म्हणजे शेपटीचे... त्या पँडोरावरचे प्राणी व न्हावी जर एवढे टेक्नॉलॉजिकली अ‍ॅडव्हांस असतील की ते त्यांची शेपटी डेटा ट्रांसफर किंवा आज्ञेसाठी वापरत असतील तर असे क्रॉस स्पिसिस मधे होणे शक्य आहे का? आणि आपण सध्या प्रुथ्विवर घोडागाडी किंवा बैलगाडी चालवताना वेसण वापरुन घोड्याला किंवा बैलाला कंट्रोल करु शकतोच की .. इतके पुढे १५० वर्षांनी..त्यासाठी तशी वळवळणारी शेपटी असायला पाहीजे असे दाखवणे मला खरच हास्यास्पद वाटले. आणी एवढे टेक्नॉलॉजिकली अ‍ॅड्व्हांस झालेले न्हावी दिवसभर फक्त झाडावर किंवा झाडाखाली बसुन राहतात किंवा गरुडरुपी डायनॅसोअरवर भरार्‍या मारत बसतात हेही मनाला पटत नाही.

तिसरे म्हणजे तु जे ओर्कुट्,फेसबुक यासारख्या सोशल नेटवर्कची व या चित्रपटातल्या झाडांच्या मुळांच्या नेटवर्कमधल्या ऑर्गॅनिक/स्पिरिच्युअल नेटवर्किंगशी जी तुलना केली आहेस ती जरा निट समजावुन सांगशील का? तु म्हणाला आहेस की कंप्युटर सायंटिस्ट ऑर्गॅनिक नेटवर्किंगवर अभ्यास करत आहेत.. म्हणजे नक्की काय?

टर्मिनेटर २ मधे जे काही चमत्कार दाखवले आहेत ते तो टर्मिनेटर सायबोर्ग असल्यामुळे ते सर्व शक्य असु शकतील असा बेनिफिट ऑफ डाउट त्या मुव्हीमधल्या सर्व स्पेशल इफेक्ट्सना देउ शकत होतो.. पण या चित्रपटातला मानव्-न्हावी हा तु म्हणतो तसा(किंवा कॅमेरुनला अभिप्रेत असलेला..) क्रॉस स्पिसिस ऑर्गॅनिक ट्रांसफर मला तरी वाइल्ड इमॅजिनेशनचाच प्रकार वाटला.

आणी राज हे खास तुझ्यासाठी... अरे मी इथे माझ्या सगळ्या अमेरिकन मित्र मैत्रीणींना आवर्जुन सांगतो की अवतार हा कसा मराठी शब्द आहे.. या चित्रपटाचे नाव अ‍ॅव्हॅटार नसुन अवतार आहे. आता त्यांना माहीत नसताना ते आपल्या मराठी शब्दाला अ‍ॅव्हॅटार म्हणाले तर त्यांना एक वेळ माफ आहे.. पण तू? तु तर अस्सल मराठमोळा ना? तु पण या चित्रपटाला अ‍ॅव्हॅटार म्हणावे? तेही मायबोलिवर? शो. ना. हो.!
Take it easy friend.... Happy

मूळ मराठी शब्द जसेच्या तसे उच्चारल्यावर लोक स. पे. नाही का म्हणणार? Proud

आपल्याला हा कोन क्यामेरून बाबा हय त्येबी म्हाईत नाय अन त्याचे जुने पिक्चरबी म्हाईत नाइ म्हंजी बगितलेले बी नाय. हितुन फुडं टिकीटबारीवं इच्यारीत जाईन डायरेक्तर मोठ्ठा हाय का म्हून्शान. त्याच्या मागच्या पिकचरनी किती गल्ला गोळा केलाय ब्वॉ. त्याच्यावर ठेरन ना मग पिकचर आवडायचा किंवा समजायचा त्ये?

२१५४ साली की बोर्डाचे ल्याप्टाप बगुन एकदाच हास्लो त्येवढं समाजलं....

प्रयोग.. अरे असा रागावु नकोस. मी माझ्या पोस्टातुन मुर्ख हा शब्द काढुन टाकला आहे. तो शब्द मी वापरायला नको होता. अरे मी माझ्या पहिल्याच ओळीत लिहीले आहे की भांडु नका रे.

तु ज्या क्षेत्रातला आहेस त्या क्षेत्राच्या दृष्टीकोनातुन या चित्रपटाकडे बघण्याच्या तुझ्या कलाला मी समजु शकतो व आदरही करु शकतो. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की चित्रपट न आवडणे म्हणजे न समजणे असा अंदाज सरधोपटपणे बांधणे हे चुकीचे आहे. चित्रपट आवडणे किंवा न आवडण्याची मोजमापे सगळ्यांचीच सारखी असतील असे नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे तु तुझी मते निर्भयपणे मांड. मायबोलि हे संकेतस्थान विचारांची व मुद्द्यांची देवाण घेवाण करण्यासाठी आहे...गुद्द्यांची देवाणघेवाण करण्यासाठी नव्हे Happy

मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की चित्रपट न आवडणे म्हणजे न समजणे असा अंदाज सरधोपटपणे बांधणे हे चुकीचे आहे. चित्रपट आवडणे किंवा न आवडण्याची मोजमापे सगळ्यांचीच सारखी असतील असे नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. >>> हे सगळ्यात पटलं.

कोणाला ह्याची स्टोरी खूप छान वाटली, कोणाला ती शेपूट प्लग इनची आयडिया भारी वाटली. मला ते नावींचं जग त्यातले कलर्स जास्त करून ते आवडलं. पण ह्याचं अ‍ॅनिमेशन इतकं प्रभावशाली नाही वाटलं. शेवटची मारामारी तर अगदी फिल्मी. बाकी वापरलं गेलेलं तंत्रज्ञान खूपच ताकदीचं होतं वगैरे सगळं मान्य. पण म्हणून ज्यांना आवडला नाही हा पिक्चर ते सगळे येडचॅप कसे होतात, हे नाही कळलं.

मुळात एखाद्या कलाकृतीच्या आकलनाला बाहेरच्या वेगळ्या इंटरप्रिटेशनची आवश्यकता असावी का हाही एक मुद्दा आहेच ना. नाहीतर प्रत्येक कलाकृतीला वेगळी अशी 'समजावून' सांगण्याची माध्यमे जोडावी लागतील. क्यामेरून बाबाचे पहिला अर्धा तास एक भाषण जोडावे लागेल. कविताना असंख्य तळटीपा जोडाव्या लागतील अन चित्रांशेजारी पुन्हा एक फ्लेक्स बोर्डलावा लागेल 'असे पहावे चित्र ' नावाने.

मित्रांनो, माझ्यापुरता मी या चर्चेतील सहभाग थांबवतो आहे. संवादात आकसबुद्धी, दुसर्‍याला मूर्ख समजण्याची (म्हणजेच स्वतःला शहाणे समजण्याची) वृत्ती, या असल्या गोष्टींची मी कल्पनाही केली नव्हती. तसा माझा हेतू नव्हता. खैर. चालू द्यात.
मी थांबतो असे म्हटले कारण मला आता या चर्चेचा सूर भलतीकडे वळताना दिसू लागलाय. म्हणजे आपण ज्याला माहितीची देवाणघेवाण समजतोय त्याला टीका, आक्षेप, वैयक्तिक स्वातंत्र्य, कलाकृतीचा निखळपणा, सूड, आकस, बोचरे शेरे याची संपुटे कशाला जोडायची? काय साधणार त्यातून? माबोवरच्या इतर चर्चांचा शेवट जसा होतो तसाच याचाही होणार.

>> अगदी अगदी! मलाही हा चित्रपट का आवडला त्याची कारणं मी दिली आणि जसा मुकुंदला चित्रपट बकवास आहे, कॅमेरूननं चार वर्षाच्या त्याच्या नातवाला हाताशी घेऊन पटकथा लिहिली असं जसं वाटलं.. तसंच मलाही त्याला ह्या चित्रपटाचं 'ट्रु स्पिरिट' कळलंच नाही असं अगदी प्रामाणिक पणे वाटतय..
त्याला तसं वाटायचा अधिकार आहे, पण मला असं वाटायचा अधिकार नाही? Sad

आरभाट आणि नानबाची पोस्ट्स आवडले.. (पटले असं म्हणत नाहिये Happy ) खूप व्यवस्थितपणे मुद्दे मांडले आहेत. Happy

सगळ्यांनाच हा चित्रपट महान वाटावा असा आग्रह मुळीच नाही. >>>> ह्याला अनुमोदन. Happy

खरं सांगायचं तर मला टोणगा ह्यांच्या पोष्टी खरेच पटल्या. Happy

अरभाटची पोस्ट खरंच चांगली आहे. ती आवडली. पण मुकुंदचे म्हणणे पण पटले. त्यातल्या बर्‍याचशा गोष्टी माहीतच नाहीत. त्या माहीत नसूनसुध्दा जर चित्रपट पाहून त्या कळल्या असत्या किंवा त्याचा फील आला असता तर चित्रपट नक्कीच जास्त आवडला असता. मला फक्त पर्सनॅलिटी ट्रान्स्फर एवढे एकच कळले चित्रपट पाहून.

नानबा ह्यांची पोस्ट अजिबात आवडली नाही. काहीच्या काही लिहीले आहे भावनेच्या भरात. तसेच बघायला गेले तर हिंदी सिनेमांमध्ये 'कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा' टाईप सिनेमांपासून ते 'मेरे पास मां है' टाईप सिनेमे हे सर्व saga of humanity च आहेत. अवतार सिनेमात सुंदर निसर्ग वगैरे दाखवण्याचे मला फक्त एकच कारण वाटले ते म्हणजे त्या ग्रहावरची जमात ही अप्रगत जमात आहे. भारतातही किंवा इतर कुठल्याही पुराणकालिन विषयांवर सिनेमे काढले तर तिथेही तितकाच सुंदर निसर्ग दाखवता येईल (जर ठरवले तर). लगेच त्याचा अर्थ 'निसर्ग वाचवा' असा संदेश चित्रपटातून दिलाय असं थोडीच म्हणता येईल? अर्थात अवतारमधील डिटेलिंगचे आणि टेक्नॉलॉजीचे कौतुक आहेच, पण त्याचा संबंध अमेझॉन रेनफॉरेस्टशी लावणे म्हणजे जरा अति झाले.

<<आणी एवढे टेक्नॉलॉजिकली अ‍ॅड्व्हांस झालेले न्हावी दिवसभर फक्त झाडावर किंवा झाडाखाली बसुन राहतात>>
मुकुंद, न्हावी अजिबात टेक्नॉलॉजिकली अ‍ॅड्व्हांस नाहीयेत. त्या शेपटी आणि त्यातून डेटा ट्रान्स्फर वगैरे गोष्टी त्या ग्रहावर तशाप्रकारे उत्क्रांत झालेल्या आहेत. मानव ही प्रगत जमात दाखवली आहे की जे परग्रहावरील लोकांचे देह बनविण्यापासून ते कंट्रोल करण्यापर्यंत सर्व काही करू शकतात.

'अवतार' हा मूळ संस्कृत शब्द आहे ना?

खालील प्रतिक्रिया सोमवारी सकाळीच लिहुन ठेवली होती परंतु पोस्ट करता आली नाही (सर्व्हर इश्यु?). हा आठवडा गांवी (मुंबई) आलो आहे, वेळेच्या बंधनामुळे रीपोस्ट करायला थोडा उशीर झाला...

>>आणी राज हे खास तुझ्यासाठी... <<

मला कल्पना होती की हा पॉईंट कोणितरी काढील... Happy

भले "अवतार" हा मुळचा मराठी (संस्क्रुत?) शब्द आहे, पण अरे बाबा "अ‍ॅवटार" हा हॉलीवुड्चा सिनेमा आहे आणि इकडे रुढार्थाने तसाच वापरला जातो. इंग्रजीत असे बरेच शब्द आहेत, जे लॅटीन, फ्रेंच वै. भाषांमधुन आले; स्वतःच वेगळं रुप घेऊन. दुरचं कशाला, भारतात दिल्लीचं डेल्ही, शिंदेचं सिंदीया म्हणतोच नां? अर्थात मी आपल्या कोकणातील दशावताराला "डॅशॅवटार" म्हणणार नाही, अनलेस एखादा डॅनी बॉयल त्याच नावाचा चित्रपट जोवर काढत नाही. Happy असो.

>> त्या पँडोरावरचे प्राणी व न्हावी जर एवढे टेक्नॉलॉजिकली अ‍ॅडव्हांस असतील की ते त्यांची शेपटी डेटा ट्रांसफर किंवा आज्ञेसाठी वापरत असतील तर असे क्रॉस स्पिसिस मधे होणे शक्य आहे का? <<

अरे तुझं ग्रहीतचं इथे चुकलं आहे. पँडोरावरचे प्राणी व नावी टेक्नॉलॉजिकली अ‍ॅडव्हांस नाही तर जेनेटिकली अ‍ॅड्व्हांस्ड आहेत. त्यांना निसर्गाने दिलेली ती देणगी आहे, असं समज. तुमच्यात जर ती शक्ती असेल तर एका विशिष्ठ फ्रिक्वेंसीवर तुम्ही वनस्पती, प्राणी यांच्याबरोबर संवाद साधु शकता; शास्त्राने हे सिद्ध केलं आहे. जेम्स कॅमरुनने हीच कल्पना विस्तारीत करुन अ‍ॅवटार मध्ये मांडली आहे.

शेवटी जाता जाता, इथे निर्माण झालेला समज खोडुन टाकायचा प्रयत्न करतो. अ‍ॅवटार एक सुंदर कलाकृती आहे यात अजिबात शंका नाही. त्याचबरोबर तो सरसकट सगळ्यांना आवडलाच पाहीजे, हा अट्टाहास करणं देखील हास्यास्पद आहे. आणि आवडलेल्यांपैकी कोणि तसं केलं आहे, हे मला तरी वाटत नाही. (दुर्दैवाने असं कोणाला वाटलंच, तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांना फक्त चष्मा बदला असं म्हणु शकेन. Happy )

या चर्चेद्वारा एक वेगळा द्रुष्टीकोन आणि अ‍ॅवटार ची विविध अंग सगळ्यांसमोर यावीत हाच एक प्रामाणिक हेतु. सकारात्मक चर्चा पुढेही चालु राहील ही अपेक्षा...

टिपीकल माबोस्टाईल घमासान चर्चा वाचून फार बरं वाटलं!
अवतार का अ‍ॅवटार पाहिला, आवड्ला पण अति टेक्नॉलॉजीमुळे मूळ संदेश बाजूला पडला असे वाटले.
एखादी कलाकृती आवडायला तिची पार्श्वभूमी माहिती हवी असे मला वाटत नाही. अर्थात अशा माहितीमुळे ती कला 'समजायला' मदत होते हे नक्कीच पण 'आवडायला' मात्र मदत होईल का याबद्दल मला शंका आहे.
उदा. 'मॅट्रिक्स' पाहिला तेंव्हा त्याच्याबद्द्ल काहीही माहिती नव्हती पण थेटरमधून बाहेर पडताना आपण एक अद्वितीय सिनेमा पाहिला याची खात्री झाली होती. त्यानंतर मी मॅट्रिक्सबद्द्ल माहिती वाचून मग तो पाहिला तेव्हा मात्र तो कितीतरी जास्त आवडला.

अनपेक्षितपणे एक रद्दड आणि गल्लाभरु पिक्चरही सुपरहीट झाला. त्याचे नाव होते 'जय संतोषी मॉं'.>> ज्या प्रेक्षक वर्गासाठी हा सिनेमा बनविला गेला त्यांना तो रद्द्ड वाट्ला नसेल. तो सिनेमा एका अर्थाने कल्ट क्लासिकच आहे. प्रॉड्क्षन व्हॅल्यूज कमी असतील कदाचित पण त्याने करमणूक केली व प्रेक्षकांची एक भावनिक गरज भागविली. घराघरांत कोंड्ल्या गेलेल्या गुजराती व इतर समाजातील स्त्रीयांच्या दु:खाला या सिनेमातून एक परिमाण दिले गेले. स्टायलिश - क्लासिक आजिबातच नाही पण बेसिक स्टोरीटेलिन्ग फार प्रभावी होते नाहीतर सिनेमा चालला नसता. मल्टिप्लेक्स सेन्सिबिलिटीज च्या बाहेर असणार्‍या प्रेक्षकांच्या धार्मिक चौकटीतील करमणुकीची सोय या सिनेमा ने केली.

अशा सिनेमांसाठी तुम्ही त्यांची बीलीफ सिस्टीम ३ तासांपुरती घेतलीत तर ते मनापासून एन्जॉय करता येतात. मॅट्रिक्स मध्ये जसे मशीन्स व माणसांचे युद्ध. मॅड मॅक्स, वॉटरवर्ल्ड मधील त्यांची रीअ‍ॅलिटी.
मार्स अ‍ॅटॅक्स मधील उपरोधिक भाष्ये. म्हणूनच दक्षिणेतील सिनेमे आपल्याला भड्क अतिरंजित वाट्तात पण त्या प्रेक्षक वर्गाला तेथील राहणीला धरून त्या गोष्टी लिहीलेल्या असतात. भोजपुरी सिनेमे तर आपण बघुच शकत नाही इत्का आचरट पणा अस्तो त्यात. कोरीअन चायनीज सिनेमातील विध्वंस, मुस्लीम सोशल मधील
बायकांची घुसमट आपल्याला नाही पट्त कारण त्यांचे टार्गेट ऑडियन्स वेगळे असते.

नानबा ह्यांची पोस्ट अजिबात आवडली नाही. काहीच्या काही लिहीले आहे भावनेच्या भरात.
>> फचिन तुला माझी पोस्ट आवडावी ह्याची काही जबरदस्ती नाही.. पण मी जे लिहिलय ते भावनेच्या भरात नाही लिहिलेलं.. माझ्या बुद्धीच्या भरात लिहिलय.
मला आयझॅक असिमोव्ह ची फाऊंडेशन सिरिज भयानक आवडली.. ह्याच कारण नुसतं सायन्स फिक्शन - कल्पनाविलास हे नसून, I could find the traces in our history हे होतं.. ह्याच कारणाकरता मला महाभारत आवडतं (अर्थात ह्यात इतरही कारणं आहेत)..
(पण, म्हणून मला K सिरियल्स,तुम्ही म्हणता तसले गल्लाभरू चित्रपट, कादंबर्‍या नाही आवडत -- ते गल्लाभरू चित्रपटांना सागा म्हणण" वरून मला 'अरसिकेषु कवित्व निवेदनम् - शिरसी मां लिख मा लिख..' आठवलं... Wink !!)

आणखीन एक.. मुळ पोस्ट पुन्हा वाचा.. रेनफॉरेस्ट चा उल्लेख अवतार मधल्या जंगलांशी तुलना असा येत नाही! तर तो येतो, उपभोगवादी वृत्तीतून निसर्गाला ओरबाडण्यासंदर्भात!

असो.. मला तरी त्यात काही भावनेच्या भरात दिसलं नाही/दिसत नाही... But like everyone else, including me - You are entitled to have your opinion.

आणि More than anything मला हा चित्रपट बेहद आवडलाय...बस्स! इतकच!!

जाऊ द्या हो एवढी चर्चा करण्याइतका काही अवतार चांगला चित्रपट नव्हता Proud

अरभाट, मला ऑक्सीजन व गुरुत्वाकर्षण चे मुद्दे पटले. पण तरिही मला हा सिनेमा आवडला नाही. कारण यापेक्षा सुंदर जलचर (पहा बी बी सी ची ब्ल्यू प्लॅनेट हि सिरिज ) आणि वनस्पती ( लाईफ, लिव्हिंग प्लॅनेट, प्रायव्हेट लाईफ ऑफ प्लान्ट्स वगैरे ) मी बघितल्या आहेत.
त्यापुढे अवतारचे, अवतार अगदीच बेसिक आहेत !!!
वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे, टिपिकल माबो स्टाईल झाले हे.
मला का आवडला वा आवडला नाही, यापेक्षा इतरांचे मत आवडले वा आवडले नाही, यावर भर दिला गेलाय.

Pages