गैरसमज कि खरी ओळख..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझी एक चित्तरकथा.....

माझा एक जुन्या काळातील मित्र होता. त्याचे प्रेमलग्न झाले. त्याची बायको खुपच हुशार होती. आमच्या गृप मध्ये मिसळुन गेली. लग्नाला घरुन पाठिंबा नव्हता त्यामुळे आर्थिक बाजि मित्रांनीच साथ दिली. कधी हिशेब ठेवले नाही. मग लग्नानंतर त्या दोधांना चांगली संधी मिळाली... पैस अही खुप कमावला... पण मग ती बदलली..तो तर तिच्याच आहारी गेलेला... मग ७००, ९००, ५००० रुपये अश्या किरकोळ रकमांवरुन ती आमच्या गृप्मधील मित्रांना फोन करु लागली...मित्रांच्या बायकांना पैसे परत करा म्हणुन फोन करु लागली... अश्याने मित्र दुखावले... ज्याला कधी न मोजता पाकिटातुन पैसे दिले, त्याच्या बायकोने आपल्या बायकोला हजार पाचशे साठी फोन करावे हे पटले नाही.... मित्र दुखावले! अन दुरावले!

मला एकदा ती घाईत होती म्हणुन बॅन्केत ११, ५००/- डिपॉसिट कर म्हणाली. अन बॅन्क अकाउंट नंबर देण्यासाठी अगोदर च्या एटीएम ची स्लिप हाती देउ लागली. पण लगेच स्लिप मधुन बॅलन्स ची रक्कम असणारा भाग कापला अन नंबर माझ्या हाती दिला.... मल ऊगाच वाईट वाटले..... मी काही तिला पैसे मागणार नव्हतो! (माझ्या घरी कामावरचे लोक पण आमच्या पेटीत किती रक्कम आहे हे जाणुन असत- वडिल बॅन्केत कधी गेले, किती पैसे ठेवले हे ही काहींना माहिती असे पण- कधीच चोरी झाली नाही, त्यांना हवे असले अन वडिल घरी नसले, कि आईला सांगत कि पेटीत पैसे आहेत, मला द्या त्यातले, नंतर मालकाला सांगु... वडिल नोकरीला असताना, बॅन्केतुन पैसे आणायला बरेचदा शाळेचा शिपायी जाई, (बर्‍याच शिक्षकांचे पैसे एकदाच एकच शिपायी घेउन येत असे).... कुणाकडे किती पैसे शिल्लकीत आहेत हे पण त्याला माहिती होत असे..... )
मग मी तिचे पैसे बॅन्केत भ्रायला उशीरच केला..... तिने माझ्या बायकोला फोन केले.....दोन तीन फोन झाले..... मग मी पैसे बॅन्केत भरले..अन शेवटची मेल केली.......पैसे भरलेत, पुन्हा उत्तर नको आहे! मित्राने पण कधी संपर्क केला नाही........ ते खुप पैसेवाले झालेत. २० लाखाचा बंगला बांधलाय म्हणे..... बातम्या कळतात पण संपर्क नाही......

ह्याला आता दीड दोन वर्षे झाली! नो संपर्क! एखादा माणुस माझ्या डोक्यात गेला कि संपले, मी पुन्हा संपर्क करीत नाही! तो पंतप्रधान झाला तरी मला काही सुख दुख नाही!

******* ********** *********

प्रश्न एकच पडतो.... कि काही लोक खुप मनमिळावु असतात/वाटतात पण पैसे आले कि रांग बदलतात. असे अनेक किस्से घडत असतात.. पण साला मन मानत नाही..... लोकांवर विश्वास ठेवतच जाते अन ठेचा खातच राहते....... पार रक्त्बंबाळ झाले तरीही! Sad

विषय: 
प्रकार: 

चंपक असं काही घडलं की खुप वाईट वाटतं , पण आपण ह्यातनं एकच समाधान मानायचं की त्या माणसाची खरी नियत कळली . गेलास उडत म्हणायचं अन पुढे जायचं.

पण साला मन मानत नाही..... लोकांवर विश्वास ठेवतच जाते अन ठेचा खातच राहते....... पार रक्त्बंबाळ झाले तरीही! >>>>

आपण आपलं चांगलं कामही सोडू नये आणि ठेच लागेल इतका विश्वासही ठेवू नये.
http://www.maayboli.com/node/3639
इथला आम्हाला आलेला भन्नाट अनुभव वाचलास का?

पट्लं. ज्या लोकांना आम्ही घर बांधताना मदत केली ते आता तोंडदेखलं पण विचारत नाहीत. पैसे आले कि नियत बदलते आणि मुळातले दुर्गुण अधिक ठळक होतात.

चंपक, तुम्ही एकटे नाहीत Happy

मी लोकांवर विश्वास ठेवायचा मुर्खपणा हजारदा केलाय. दरवेळी फटका बसला की ठरवते, बस आता शहाणी होईन.. पण नाही, मी शहाणे व्हायचे मनावर घेत नाही आणि लोक मला शहाणे करायचा वसा सोडत नाहीत. Sad

आतापर्यंत फार थोडे भेटलेत ज्यांनी केलेल्याची आठवण ठेवलीय. मामींचे खरे आहे, मुळातच दुर्गुण असतात ते फक्त अजुन ठळक होतात...

पण जाऊदे, आपण शहाणे व्हायचे ठरवले आणि नेमके तेव्हाच हातुन एखाद्या खरोखरीच्या सज्जन माणसाला दुखावले तर ते आयुष्यभर सलत राहिल त्यापेक्षा आपण मुर्खच असलेले बरे...

पण साला मन मानत नाही..... लोकांवर विश्वास ठेवतच जाते अन ठेचा खातच राहते....... पार रक्त्बंबाळ झाले तरीही! >>>> अगदी अगदी चंपक.. माझ्याबाबतीत ही अस घडलय. फक्त ती गोष्ट पैशाच्या बाबतीत नव्हती. पण अनुभव असाच कि मित्र-मैत्रिणी बदलतात. Sad

पण साला मन मानत नाही..... लोकांवर विश्वास ठेवतच जाते अन ठेचा खातच राहते....... पार रक्त्बंबाळ झाले तरीही! >>>> होतं असं बरेच वेळा. पण जसं बाग खूप छान असते, आपल्याला मस्त विरंगुळा होतो, खेळता येतं म्हणून आपण तिथे मुक्तपणे फिरत असतो आणि मधेच लाल मुंग्या डंख मारतात आणि पायांची आग आग होते. परत परत असं झालं की आपल्यात डोळसपणा येतोच आणि आपण त्या बागेमधे सावधपणेच फिरतो, जिथे मुंग्या असण्याची शक्यता आहे तिथे फिरकतच नाही. कारण मुंग्या अशा ध्यानीमनी नसतानाच हल्ला करतात. बरं आपण माणंसं असल्याने त्या मुंग्यांना धडा शिकवण्यात वेळ फुकट घालवत नाही कारण प्रत्येक प्राण्याचा आपला स्वभाव असतो आणि तो त्याप्रमाणे वागणारच हे आपण अ‍ॅक्सेप्ट केलेले असते.

तसंच आपण माणूसकीने वागतच रहायचं फक्त आंधळा विश्वास टाकायचा नाही. काही माणसं त्या मुंग्यांसारखी असतात असं धरुन चालायचं. २-३ दा दगा होईल पण नंतर तर आपण ह्यापासून स्वतःला दूर ठेऊ शकू ना?

चम्प्या, हे अस होतच, पण जशी ही अशी लोक भेटतात, तशीच चान्गली माणसेही भेटतातच! Happy
अन म्हणूनच आपल्यातल्या चान्गुलपणा सोडून देऊ नये!
माझ्याकडे एकेक भन्नाट किस्से आहेत या वागण्याचे, लिहायला लागलो तर एकेका किश्श्यावर कथा होईल!
पण मग हे रडगाणे जगाला का ऐकवा? हे तर नित्याचेच आहे असे म्हणतो अन बर्‍याच गोष्टी मनातच ठेवतो.
याक्षणी देखिल मी भयानक अनुभव घेतोय, सान्गायलाही जीभ रेटत नाही पण कुर्‍हाडीचा दान्डा गोतास काळ ही म्हण कशी काय आली असेल ते समजतय!!! या परिस्थितीतून पूर्ण बाहेर पडलो की जरुर लिहीन!
एक नक्की, की आर्थिक स्तर बदलले की कित्येकजणान्ना आपण पूर्वी ज्या स्तरातुन आलो, तेथिल परिचितान्शी सम्पर्क ठेवण्यास "लाज" वाटू लागते, असे अनुभव चिक्कार आहेत.
अन म्हणूनच नेहेमीच, चान्गले जीवश्च कण्ठश्च मित्र हे बहुधा एका हाताच्या बोटान्वर मोजुनच सम्पतात!
त्याबद्दल दु:ख करु नये.

एक नक्की, की आर्थिक स्तर बदलले की कित्येकजणान्ना आपण पूर्वी ज्या स्तरातुन आलो, तेथिल परिचितान्शी सम्पर्क ठेवण्यास "लाज" वाटू लागते>> अनुमोदन. अगदी संताप होतो जिवाचा. एक चांगले प्रेमळ जिवंत माणूस म्हणून आपली काहीच किंमत नाही का असे वाटू लागते. माझी आइ सुद्धा माझ्या बहिणीला चांगला पगार आहे हे
सारखे सांगते. व तुझे निभते का असे न चुकता विचारते. का रे हे असं ?

अमा, अगं आईविषयी असं मनात नको आणूस काही झालं तरी. ती तुझ्या काळजीने असं विचारत असेल गं. बाकीचं जग आणि आपली आई यांत जमीन अस्मानाचा फरत असतो. चु.भु.दे.घे.

चंपक ..हे आजकाल सगळीकडेच दिसतयं ..
काही लोकानां, पैशाशिवाय काही नाती महत्वाची असतात,हे खूप उशिरा कळतं ,पण त्यावेळी वेळ गेलेली असते ..याच कारण माणसाची जडणघडण,संस्कार तसेच मिळालेले असतात !
लोक, मित्र, मैत्रिणीच काय अगदी घरच्यांच्याबाबती पण असे अनुभव येतात
हे ही खरंच आहे ...

अमा, अगं आईविषयी असं मनात नको आणूस काही झालं तरी. ती तुझ्या काळजीने असं विचारत असेल गं. बाकीचं जग आणि आपली आई यांत जमीन अस्मानाचा फरत असतो. चु.भु.दे.घे.>> अगं आपण चांगल्या मनानेच राहतो ग.

चंपक , अरे तूच एकटा नाहीयेस असले अनुभव आलेला. एक मित्र त्याच्या लग्नाआधी तीन वर्षे रोज संध्याकाळी माझ्याकडे नियमित जेवायला असायचा. वरुन गोड गोड बोलून वहीनीला (माझ्या बायकोला) फर्मायशी असायच्या. तोच मित्र त्याच्या लग्नानंतर अगदी ओळख दाखवेनासा झाला, केलेल्याची जाणिव तर दूरच. मग खरच आपण मित्र 'ओळखू' शकलो नाहीत म्हणावे का अशा केसेस मधे ?

बर्‍याचदा असेही होते की, आपण त्यांना आधी बरीच मदत केल्याने नंतर पैसे जास्त येवु लागल्यावर अथवा परिस्थिती बदल्यावर आपणही त्यांच्याकडे मदत मागु अशी सुप्त भिती निर्माण झाल्याने अथवा कोणी त्यांचा गैरफायदा घेइल ह्या भितीने ते ओळख दाखवत नसावेत.. Sad

मित्र त्याच्या लग्नानंतर अगदी ओळख दाखवेनासा झाला>>>>>>> लग्न ठरल्यावर्/झाल्यावर लोक खरचं खूपच बदलतात.. कधी कधी हा बदल चांगला असतो कधी कधी आपणांस न पटनारा

होत रे अस!!
नाइलाज असतो आपलाही.
एखादा बाहेरचा फॅक्टर असतो जो त्याच्या त्या बेसिक स्वभावाला जरा जाग्रुत करतो आणि मग मित्र मग मित्र राहत नाही.
असे अनुभव माझेही आहेतच की.

चंपक , अरे तूच एकटा नाहीयेस असले अनुभव आलेला. एक मित्र त्याच्या लग्नाआधी तीन वर्षे रोज संध्याकाळी माझ्याकडे नियमित जेवायला असायचा. वरुन गोड गोड बोलून वहीनीला (माझ्या बायकोला) फर्मायशी असायच्या.
>> हा अनुभव अगदी बर्‍याच जणांना दिसतोय (अगदी सा.बा, सासर्‍यांनाही अगदी हाच अनुभव आहे!).

चंपक , अरे तूच एकटा नाहीयेस असले अनुभव आलेला>>> अर्थात! अन हा माझा एकमेव अनुभव नाही. इथे मांडावासा वाटला म्हणुन हा एक लिहिला...!

असे काही 'नमुने' अभ्यासायला मिळाले म्हणुन वाईट वाटु न देता अभ्यास कायम चालु ठेवणे हेच योग्य!

नर्मदेतले गोटे जसे कधीही बदलत नाही, तसा मीही माझा गुणधर्म सोडणार नाही! Happy

धन्यवाद!

>>>> वाईट वाटु न देता अभ्यास कायम चालु ठेवणे हेच योग्य! Lol
हो हो, अभ्यास चालूच ठेव बर, लौकरच तुला या विषयातली देखिल पीयचडी मिळेल हे निश्चित Lol

मित्रांच्या बाबतीत मलाही हाच अनुभव आला.पण नातेवाईकांच्याबाबतीत मात्र उलटा अनुभव आला.जेव्हा पैसे नव्हते तेव्हा सगळे हाडहाड करायचे.पण आता पैसे आल्यावर वागण्याबोलण्यात फरक पडला.कार घेतल्यावर तर कधीही न बोलणारी माणसेही चांगली बोलायला लागली.

आमच्या बाबतीत पैशांचा मुद्दा नव्हता. पण एक दक्षिण भारतीय कुटुंब, ज्याना आम्ही अमेरिकेत नवीन आले, म्हणुन settle व्हायला मदत केली ( अगदी गाडी खरेदी पासून, आजारपणात डबे देण्यापर्यंत), आम्ही जेव्हा कायमचे भारतात परत आलो, तेव्हा अच्छा करायलासुद्धा आले नाही. एका complex मधे रहात असून. ( नवरा येऊन, आमची rocking chair तेवढी घेऊन गेला....आहे की नाही गम्मत!) Happy

माझे सासरे वारल्यावर आम्हाला त्यांचे थोडे पैसे मिळाले होते त्यातील काही नवर्‍याने मित्राला दिले होते. मित्राची परिस्थिती खरेच वाईट होती. काही वरशांनीही पैसे मिळाले नाहीत म्हणून मी त्याला म्हणले विचारू का परत ?
अरे आपले पैसे आहेत मागितले नाहीत तर तो विसरेल. तेव्हा नवर्‍याने स्ट्रिक्ट्ली मना केले होते. व मैत्रीत बाधा येइल म्हणून गप्प बस असे मला सांगितले होते. त्या मित्राने एक अतिशय चांगले दिलगिरीचे पत्र देउन खूप दिवसांनी ते पैसे परत केले. आता ते खूप चांगल्या परिस्थीतीत आहेत. पण पैसे मागून माझ्या हातून जे संबंध दुखावले गेले असते ते संयम पाळल्याने झाले नाही. मैत्री कायम आहे.

१. नातेवाईक म्हणून विश्वास ठेवला, चांगुलपणा दाखवला आणि पैशाला फसलो. पैसा उचलून दिला नव्हता एका joint venture मधून आलेला होता. पैसा आम्हाला कधी दिसलाच नाही. परत भरपूर मनस्ताप झाला तो वेगळाच आणि त्याकाळात पैशाची अती गरज होती. आता नातेवाईकच असल्याने लग्नाकार्यात दिसल्यावर नवरा हाय-हॅलो पुरतं बोलतो. मी तेवढेही कष्ट घेत नाही.

२. ज्या काळात नवर्‍याचे आणि नंतर आमचे हलाखीचे दिवस होते. त्या काळात अनेकजण रस्त्यात दिसल्यावर ओळख द्यायला पण काचकूच करायचे. तेच सगळे यश मिळाल्यावर 'तो'(नवरा) आपला अगदी जवळचा मित्र आहे अश्या कहाण्या सांगू लागले.

Pages