गैरसमज कि खरी ओळख..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझी एक चित्तरकथा.....

माझा एक जुन्या काळातील मित्र होता. त्याचे प्रेमलग्न झाले. त्याची बायको खुपच हुशार होती. आमच्या गृप मध्ये मिसळुन गेली. लग्नाला घरुन पाठिंबा नव्हता त्यामुळे आर्थिक बाजि मित्रांनीच साथ दिली. कधी हिशेब ठेवले नाही. मग लग्नानंतर त्या दोधांना चांगली संधी मिळाली... पैस अही खुप कमावला... पण मग ती बदलली..तो तर तिच्याच आहारी गेलेला... मग ७००, ९००, ५००० रुपये अश्या किरकोळ रकमांवरुन ती आमच्या गृप्मधील मित्रांना फोन करु लागली...मित्रांच्या बायकांना पैसे परत करा म्हणुन फोन करु लागली... अश्याने मित्र दुखावले... ज्याला कधी न मोजता पाकिटातुन पैसे दिले, त्याच्या बायकोने आपल्या बायकोला हजार पाचशे साठी फोन करावे हे पटले नाही.... मित्र दुखावले! अन दुरावले!

मला एकदा ती घाईत होती म्हणुन बॅन्केत ११, ५००/- डिपॉसिट कर म्हणाली. अन बॅन्क अकाउंट नंबर देण्यासाठी अगोदर च्या एटीएम ची स्लिप हाती देउ लागली. पण लगेच स्लिप मधुन बॅलन्स ची रक्कम असणारा भाग कापला अन नंबर माझ्या हाती दिला.... मल ऊगाच वाईट वाटले..... मी काही तिला पैसे मागणार नव्हतो! (माझ्या घरी कामावरचे लोक पण आमच्या पेटीत किती रक्कम आहे हे जाणुन असत- वडिल बॅन्केत कधी गेले, किती पैसे ठेवले हे ही काहींना माहिती असे पण- कधीच चोरी झाली नाही, त्यांना हवे असले अन वडिल घरी नसले, कि आईला सांगत कि पेटीत पैसे आहेत, मला द्या त्यातले, नंतर मालकाला सांगु... वडिल नोकरीला असताना, बॅन्केतुन पैसे आणायला बरेचदा शाळेचा शिपायी जाई, (बर्‍याच शिक्षकांचे पैसे एकदाच एकच शिपायी घेउन येत असे).... कुणाकडे किती पैसे शिल्लकीत आहेत हे पण त्याला माहिती होत असे..... )
मग मी तिचे पैसे बॅन्केत भ्रायला उशीरच केला..... तिने माझ्या बायकोला फोन केले.....दोन तीन फोन झाले..... मग मी पैसे बॅन्केत भरले..अन शेवटची मेल केली.......पैसे भरलेत, पुन्हा उत्तर नको आहे! मित्राने पण कधी संपर्क केला नाही........ ते खुप पैसेवाले झालेत. २० लाखाचा बंगला बांधलाय म्हणे..... बातम्या कळतात पण संपर्क नाही......

ह्याला आता दीड दोन वर्षे झाली! नो संपर्क! एखादा माणुस माझ्या डोक्यात गेला कि संपले, मी पुन्हा संपर्क करीत नाही! तो पंतप्रधान झाला तरी मला काही सुख दुख नाही!

******* ********** *********

प्रश्न एकच पडतो.... कि काही लोक खुप मनमिळावु असतात/वाटतात पण पैसे आले कि रांग बदलतात. असे अनेक किस्से घडत असतात.. पण साला मन मानत नाही..... लोकांवर विश्वास ठेवतच जाते अन ठेचा खातच राहते....... पार रक्त्बंबाळ झाले तरीही! Sad

विषय: 
प्रकार: 

निरुपनकार प्र!

तुमचे विचार छान आहेत. त्यापैकी बरेचशे मी आचरणात आणतो देखील.... पण कधी कधी मनातील सल बाहेर येउ द्यावीशी वाटतेच!

म्हणुनच, मी नर्मदेतला गोटा आहे ह्याचा मला अभिमान वाटतो! Happy

बरं प्रवचन ऐकणार्‍या भाविकांपैकी कुणी या पुराणिकाला जेवायला घालणार आहे का?
---- प्रवचन आवडले, पटले... पण जेवायला सास्कातुनालाच यावे लागेल.

गिरी,
ह्या लिखानावर तु प्रतिक्रिया देउन तु अजुनही (जिवंत)आहेस हे पाहुन मी भरुन पावलो!

पैश्याचे काय होते तुला माहिती नाही का? अरे पैसे पैसे काय करतोयस, पैश्याला कोंबडी खात नाही!!! Happy

Pages