अर्पण

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

चला, आता काहीतरी लिहायला घेऊ. मायबोलीचे अनेक धन्यवाद. आणि मायबोलिकराचे पण.
नवीन मायबोली मस्त आहे यात वादच नाही. पण काय मला सवय व्हायला थोडा वेळ लागेल. तशी पण मी पुराणमतवादी आहे. जुन्या गोष्टीचा सोस पटकन सुटत नाही माझ्याकडून. त्यातच ते वरती विषय आणि प्रकार नावाच्या लिस्टमधे इतके प्रकार आहेत की ते वाचता वाचता काय लिहिणार होते तेच विसरले.

मग विचार केला... काय लिहू या? देवाला अभिवादन केलेलंच आहे. त्याचा आशिर्वाद असल्यावर अजून काय हवं? तुमची प्रेमळ साथ आहेच.. ती पण अशीच राहू देत. पण तरीही काय लिहू मी?

काहीही... किंवा मग लोकाना आवडेल ते... किंवा खरंखुरं आतलं लोकप्रियतेच्या पलिकडचं.. किंवा स्वतःला जे पटेल ते.. किंवा मग जे आतापर्यंत कुणी लिहिलं नसेल ते..

किती तरी ऑप्शन्स.. एखाद्या मॉलमधल्या सामानासारखे. हवं ते घ्यायचं नको ते सोडून द्यायचं. सालं हल्ली जगणंच असं झालय. शॉपिंग केल्यासारखं. क्रेडिट कार्डाचं बिल आलं की पर्सनल लोन काढायचं आणी ते लोन फेडण्यासाठी मान मोडून काम करायचं. घेतलेल्या वस्तूचं सुख स्वतःलाच लाभू द्यायचं नाही.. हा तर मी कुठे होते. काय लिहू या प्रश्नावर.

एखादी कथा लिहू? त्यात मी ठरवेल कुणाचं काय होइल ते. इथे सातची लोकल मिळेल की नाही ते माहीत नाही आणि तिथे मात्र मी ठरवेल लोकल किती वाजता सुटेल. एकदम शहनशाह झाल्यासारखं वाटेल. पण नको.. कारण कुठेतरी सत्य आणि कल्पनेच्या रेषा धुसर होतात आणि मीच हरवते. परत ती हार नको. परत तो त्रास नको.

ललित लिहू? आयुष्याने खूप अनुभव दिलेत. त्यातले काही तुम्हाला सांगू? पण काय उपयोग मी तेच सांगणार जे तुम्हाला ऐकायचय. त्यामधे मला जे शेअर करायचय ते तसंच राहणार.

मग लिहू तरी काय? (ए कोण रे ते रेहान पूर्ण कर म्हणतय. सीरीयस मोड चालू आहे ना सध्या??)

हा... तर काय म्हणत होते.. काय लिहू मी?
बराच वेळ हाच प्रश्न विचारतेय ना.. कुणीतरी उत्तर दिलय.. हे "कुणीतरी" नक्की कोण आहे हे मलाही माहीत नाही. पण दरवेळेला जेव्हा मला असेच प्रश्न पडलेले असतात आणि बर्याचदा मी अशीच गुरफटलेली असते तेव्हा हेच कुणीतरी मला उत्तर देतं.

उत्तर खूप सरळ आहे. कशाला विचार करतेस काय लिहू म्हणून.. ते ठरवणं तुझ्या हातात आहे का? लिहत जा.. तुला वाटेल तू लिहतेयस. पण जिथे तुझ्या एका श्वासावरही तुझा हक्क नाही तिथे या शब्दावर तरी तुझा हक्क कुठून आला,,, लिहत जा.. "त्या" नियंत्याला जे वाटतं ते. शेवटी कर्ता करविता तोच. त्याच्याच हाती सर्व. म्हणून त्याच्याच चरणी सर्व अर्पण.. आपण फक्त एक निमित्तमात्र...

विषय: 
प्रकार: 

हं... खरय तू म्हणतेस ते, पण आता मग लिखाण कधी येतय म्हणे?? Happy कारण नांदी सुरेख झालेली आहे Happy