झ्येंडा !!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गेल्या आठवड्यात झेंडा चित्रपट पाहिला..! एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्‍या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले. पण त्यात सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय...ती लाजवाब! प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने अगदी मनाला भिडले.

सगळे नेते सारखेच! कार्यकर्ते वापरुण घेणे अन सत्तेत सहभाग फक्त जवळच्या लोकांनाच देणे, हा एकजात धंदा! कार्यकर्त्यांना पण त्या वयात काही अक्कल नसते! नुसती मेंढरं, कुणी पण हाका.

शेवटी जेंव्हा नेत्याचे पण पाय मातीचेच आहेत, हे लक्षात येते, तोवर कार्यकर्त्याची माती झालेली असते!

बापाची संपती मुलालाच मिळते, अन गुणवत्ता ही अनुवंशिक नसते, हे साधे नियम २० वर्षे राजकारणात/ राजकारणी घरात राहुन न समजलेल्या नेत्यांला महाराष्ट्र काय डोंबले समजणार!

अज्या ला समजले ते राज्याला नाही समजले Happy अज्या तुपाशी अन राजा उपाशी!

विट्ठला... हे गाणे तर अगदी रात्रंदिवस कानात घुमतेय! .....नकळत डोळे पाणावतात!

प्रकार: 

मी पाहिला गेल्या आठवड्यात.. १ नंबर आहे हा चित्रपट..
अवधूत गुप्तेचा पहिला प्रयत्न खरच स्तुत्य आहे...

सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय...ती लाजवाब! > प्रचंड अनूमोदन
राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले >> मला वाटले नाही तसे.

झेंडा अजून बघायचाय. वादाच्या भोवर्‍यात तर आधीच सापडलाय तो.

महाराष्ट्रातील किंवा देशातील राजकारण्यांकरिता स्पेशल शो लावता येईल कां? जसं शाळेत नेतात ना एखादा चित्रपट दाखवायला.

मलाही खूप आवडला हा चित्रपट.
>>>अवधूत गुप्तेचा पहिला प्रयत्न खरच स्तुत्य आहे... अगदी अगदी.
चंपक,
पूर्ण पोस्ट पटली फक्त >>एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्‍या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले<< हे पटले नाही.
विट्ठला...मस्तच गाणं

<<< बापाची संपती मुलालाच मिळते, अन गुणवत्ता ही अनुवंशिक नसते, हे साधे नियम २० वर्षे राजकारणात/ राजकारणी घरात राहुन न समजलेल्या नेत्यांला महाराष्ट्र काय डोंबले समजणार! >>>
.
काही नविन सिद्धांत.(?)
- गुणवत्ता ही अनुवंशिक नसते, पण सत्तागुण अनुवंशिक असते.
- काही विशिष्ट जनुके सत्ताप्राप्तीची कौशल्ये अंगी बाणविण्यासाठी मदत करतात.
- आणि अशी जनुके रक्तात भिनली की मग अनुवंशिकतेने पुढे पिढ्यानपिढ्या कार्यरत राहातात.
.
पटणार...?

झेंडा पाहिला.मस्त सिनेमा आहे.अवधुतचा पहिला प्रयत्न वाटत नाहि.
राज ठाकरेला जरा जास्तच वाईट दाखवलय.किंवा फक्त त्यालाच जास्त वाईट दाखवलय.खरतर सगळेच तसले.
मनसेने संमती कशी काय दिली ,असं सारखं वाटत होतं.
पण एकुण्च छान सिनेमा आहे.

महाराष्ट्रातील किंवा देशातील राजकारण्यांकरिता स्पेशल शो लावता येईल कां?

काही उपयोग होणार नाही, असे माझे मत आहे.

पैसे देऊन बोलावले तरी सिनेमा कडे लक्ष न देता, इतर गोष्टी बोलत बसतील. त्यांना पक्के माहित आहे, की जनता आपले काहीहि वाकडे करू शकत नाही.

तसे शहाणे लोक खूप आहेत, त्यांना कित्येक वर्षांपासून राजकारण्यांची ओळख आहे, तरी तेच राजकारणी परत परत निवडून येतात. आताच काय फरक पडणार आहे?

नवतरुण म्हणाल, तर कदाचित् त्यांना जरा वेळ काहीतरी वाटेल, विचार करावा. पण भारतात लोकसंख्या प्रचंड. त्यामुळे असे शहाणे लोक नाही आले तरी इतर अनेSSक लोक आहेत, १०० रु. दिले की राजकारणी सांगतील तिथे जाऊन राडा करायला. की पुनः ये रे माझ्या मागल्या.

पूर्वी आँधी सिनेमा आला होता. त्यामुळे काय फरक पडला?

चंपक, मस्त आहे चित्रपट.
>अवधुतचा पहिला प्रयत्न वाटत नाही.
एकदम बरोबर! मस्त केल्या आहेत बर्‍याच गोष्टी.
सामान्य कार्यकर्ता म्हणुन आपला हिरो, संतोष जुवेकर!.. मस्त काम केलंय Happy
आणि तेजश्री प्रधान आणि सिद्धार्थ चांदेकर, यांचा प्रेमाचा स्वप्नप्रसंग(??) पण अत्युच्च! कडक Happy
पण हा सिद्धु तिला एकटी सोडुन कसा जातो? एडाच आहे...
*आजकाल तेजश्री प्रधान वर फिदा आपण Wink

कोल्हापुरचं चित्रीकरण(खासबाग वगैरे) मस्त घेतलं आहे एकदम.
ती मॉड हिरोईन पण.. मस्त काम केलंय तिनं... अजुन जरा कपडे घातले असते तरी चाललं असतं...
* पण दोन्ही वेळा ती असिस्टंटच कशी राहते असा प्रश्न पडला बाबा Happy
कोल्हापुरच्या त्या "झेड पी. तिकीट" वाला तिला ज्युनिअर ना??

"राज ठाकरे"ची प्रतिमा उगाचच जास्ती बिघडवली आहे असे वाटते.
तो "चहा पी..." वगैरे फार्सच..
"मालवणकर" साहेबांबद्दल पण...
*आपल्याला कुठे काही माहित आहे म्हणा खरं खरं.... असलं बघायची सवय नाही म्हणुन वाटलं असावं... एनीवे..

पण... एकूण बघता, नक्कीच मस्त चित्रपट.
गाणी पण छान! सगळीच!
"पाटील आला" ट्युन कॅची आहे, पण अख्खं गाणं मात्र....

तर अवधुत भावा....
एखादा रोमँटीक चित्रपट काढलास, तर मस्त चालेल बघ. येकदम कडक. जिओ.

केदार अन रेशीम..... रोहीणी अन रुयाम ने स्पष्ट केले आहेच! मलाही ते प्रसंग अगदीच पटले नाहीत! अन फक्त एकाच नेत्यावर फोकस केल्यामुळे दुसर्‍या नेत्याचे डावे-उजवे कळुच दिले नाहीत.

गंगाधरजी... पटंतय!:)

बाकी.... 'झेड. पी.' वाला मस्तच!:) चित्रपटात नट्या पण होत्या हे रुयाम च्या पोस्त ने समजले:)

>>चित्रपटात नट्या पण होत्या हे रुयाम च्या पोस्त ने समजले:)
चंपकराव,
आपण नट्या बघायलाच जातो असा आरोप आहे का हा? Angry

मान्य आहे असला तरी.. Lol

अरे हो. झेडपी साहेब पण मस्त होते हा!

चंपक, 'झ्येंडा' असं का लिहिलं आहे?

चि.क.वा. वर झेंड्याबद्दल पोस्ट टाकली होती, तीच इथे पेस्ट करतो..

--
'झेंडा' मागल्या आठवड्यात पाहिला. ती राजकीय कात्री लागलीय ते बरेच झाले. कार्यकर्त्यांचा सिनेमा आहे हा. त्यात ते उद्धव आणि राजसदृष पात्रे उगीचच आहेत. उद्धव आणि राज सारखे दिसण्या-बोलण्या-वागण्यातच त्यांचा सारा वेळ जातो. (पुष्कर श्रोत्री आणि राजेश शृंगारपूरे). एवढे करून ते फारसे जमलेले नाहीत, ते वेगळेच. (लोक मात्र नेमके तेच पाहायला आले आहेत, हे लगेच लक्षात येते. राजच्या काही संवादांना नेहेमीप्रमाणेच शिट्या अन टाळ्या पडतात.)

कार्यकत्यांची घुसमट संतोष जुवेकर, सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकर यांनी समर्थपणे दाखवली आहे. सचित पाटीलचा कॉर्पोरेट वर्ल्डचा हस्तक मात्र पटत नाही. (हे मिलिंद नार्वेकर (उद्धव चा पीए) सदृष पात्र आहे बहुतेक, पण चित्रपटात राजला मॅनेज करताना दिसतं. यावरून मनसेने गोंधळ घातला होता वाटतं.)

दांडगाई कुणासाठी करायची, जीव कुणावर ओवाळून टाकायचा या चक्रव्युहात फसलेले कार्यकर्ते काठ्यालाठ्या बाजूला ठेवतात. आणि शेवटी परत उचलतात, ते एखाद्या नेत्यासाठी नाही, तर आपल्यातल्याच कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी- हा शेवटही आवडला.

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती.. हे गाणं आधीच सुपरहिट झालंय. सिनेमात त्याचा मस्त वापरही करून घेतला आहे.
--

एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्‍या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले. >> मलाही असेच वाटले. जर राज - उद्धव असा विषय होता तर चित्रपट एकदम एकांगी वाटतो.

सत्तेत सहभाग फक्त जवळच्या लोकांनाच देणे, >> किंवा त्या त्या वेळेच्या गणीतांवर अवलंबुन. जसे झेंडा मधे मजबुत 'finance' देणा‍र्‍याला तिकीट मिळते.

तो "चहा पी..." वगैरे फार्सच.. >> सहमत.
ती मुस्लीम माणसाची पिंक पण अगदीच अनावश्यक.

झेंडा पाहिला आणि खरच फार आवडला. मराठीत राजकारणावर इतका बॅलन्स्ड चित्रपट फार दिवसांनी आला. अवधूतचा पहिला प्रयत्न असून फारच छान ! इतक्या व्यक्तिरेखा असून प्रत्येक व्यक्तिरेखा छान डेव्हलप ( मराठी शब्द ???) केलीय अन प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी शेवट पर्यंत छान नेलीय. अन शेवटी जे चार पर्याय दाखवलेत तेही अत्यंत खरे, शक्यतेतले वाटतात, त्यातही शेवटचा पर्याय काहींना जरा जास्तच आशादायी वाटेल, पण असा आशावाद असावा असं मला वाटतं . अशा आदर्शवादानीच जग चालू रहातं , असो.
>>>एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्‍या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले. <<<
मला नाही असं वाटलं. मुळात अवधूतने अगदी पहिल्यापासून ही कार्यकर्त्यांची गोष्ट आहे असंच सांगितलं. त्याची मागच्या आठवड्यात आय बी एन मराठी वर मुलाखत झाली होती त्यातही त्याने याचा अगदी स्पष्ट उच्चार केला होता. अन मुळात ही कोणा एका नेत्यावरची प्रतिक्रिया - कॉमेंट नाही तर एकूणच सर्वच नेत्यांवर आहे, अगदी चित्रपटातही असे एक वाक्य आहे.
एकदा अवर्जून अनुभवावा असा चित्रपट ! माझ्याकडून अवधूतला "नी" ! Happy

गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता, अवधुत चा प्रयत्न वाया गेल्यातच जमा आहे.
चित्रपटातुन दाखवलेले वास्तव अन दिलेला संदेश जनतेपर्यंत पोहचत नाही असेच दिसते.

पब्लिक मेमरी इज टु शॉर्ट! Happy

>>गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता, अवधुत चा प्रयत्न वाया गेल्यातच जमा आहे.
चित्रपटातुन दाखवलेले वास्तव अन दिलेला संदेश जनतेपर्यंत पोहचत नाही असेच दिसते>>
अगदी अगदी. कधी कधी वाट्ते की लोकान्ना राडे करण्यातच धन्यता वाटते.

झेंडा पाहिला आज. सिनेमा आवडला. वरती सगळ्यांनी लिहिलेच आहे. आता पटलेल्या गोष्टींना अनुमोदनं देतो.

एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्‍या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले.
>>

वरकरणी तसे वाटते. पण 'संतोष' हा 'जनसेना' पक्षाचा कार्यकर्ता असतो. त्यामुळे त्याची होणारी परवड ही त्या पक्षाच्या नेत्यांमुळे झाली आहे. फक्त फरक एवढाच आहे की उद्धवसदृश जो नेता आहे, त्याचा संतोषशी डायरेक्ट संबंध दाखवलेला नाही. इतर दोन कार्यकर्त्यांच्या घुसमटीशी मात्र राजसदृश नेत्याशी डायरेक्ट संबंध दाखवला आहे.
त्यामुळे छबी का़ळी केली असे वाटणे साहजिक आहे. मलाही आधी तसेच वाटले. तसेच मनसेने मान्यता दिली ह्याचे थोडे आश्चर्य मलाही वाटले.

पण त्यात सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय...ती लाजवाब!
>>
अगदी खरे! त्याबाबतीत चित्रपटाला १०० पैकी शंभर मार्क..

उद्धव आणि राज सारखे दिसण्या-बोलण्या-वागण्यातच त्यांचा सारा वेळ जातो. (पुष्कर श्रोत्री आणि राजेश शृंगारपूरे). एवढे करून ते फारसे जमलेले नाहीत, ते वेगळेच.
>>
अनुमोदन. विशेषतः राजेश शृंगारपुरे जरा अति करतो. पुष्कर श्रोत्रीतर सिनेमात मोजून ५ मिनिटे वगैरे दिसला असेल. त्याला काही कामच नाहीये.

<<
दांडगाई कुणासाठी करायची, जीव कुणावर ओवाळून टाकायचा या चक्रव्युहात फसलेले कार्यकर्ते काठ्यालाठ्या बाजूला ठेवतात. आणि शेवटी परत उचलतात, ते एखाद्या नेत्यासाठी नाही, तर आपल्यातल्याच कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी- हा शेवटही आवडला.
>>
पूर्ण अनुमोदन. साजिर्‍या, शेवटाचं वर्णन मस्त केलं आहेस. शेवट मलाही खूप आवडला. ते 'विठ्ठला..' गाणं सुद्धा आवडलं.

चित्रपटात नट्या पण होत्या हे रुयाम च्या पोस्ट ने समजले
>>
Lol मलापण... चित्रपटातील एकाही नटीकडे लक्ष गेले नाही.

अवधूतचा पहिला प्रयत्न स्तुत्य आहे. एकदा नक्की बघण्यासारखा आहे हा चित्रपट.

मुळात राज ठाकरे आणि नारायण राणे यांची बदनामी करने हा हेतू ठेवून सगळी कथा लिहिली आहे असे वाटते. त्यातला बराच भाग नितेश राणेने कापून टाकायला लावला, त्यामुळे राजची जास्त बदनामी शिल्लक उरली आहे चित्रपटात.

अर्थात नारायण राणेची काही वेगळी बदनामी करण्याची आवश्यकता आहे अशातला भाग नाही Happy

राजच्या बाबतीतही त्याने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला ही वस्तुस्थिती बरोबर समोर आणली आहे. पण व्यक्ती म्हणून त्याची प्रतिमा काळी करण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रसंगात जाणवतो.

>>>दांडगाई कुणासाठी करायची, जीव कुणावर ओवाळून टाकायचा या चक्रव्युहात फसलेले कार्यकर्ते काठ्यालाठ्या बाजूला ठेवतात. आणि शेवटी परत उचलतात, ते एखाद्या नेत्यासाठी नाही, तर आपल्यातल्याच कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी- हा शेवटही आवडला.
>>विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती..

अनुमोदन.

राजची जास्त बदनामी शिल्लक उरली आहे चित्रपटात>>> लोकांमध्ये सहानुभुती तयार व्हावी म्हणुन दिली असेल परवाणगी, कदाचित! शेवटी, गुड ऑर बॅड, पब्लीसिटी इज पब्लिसिटी!

ज्या छत्रपतींच्या नावाने हे लोक दुकाने चालवतात, त्यांनी सिंधु नदीच्या उगमापासुन कावेरी च्या दक्षिणे पर्यंत राज्य करण्याचे योजिले होते, (संदर्भ- श्री बाबासाहेब पुरंदरे. कालनिर्णय लेख) अन हे मात्र मुंबई अन बांद्र्या च्या पलिकडे जायला तयार नाही. म्हणे मुंबई कुणाची? अरे सगळ्या देशात नेतृत्वाचा दुष्काळ पडलेला असताना, देशावर कब्जा करायचे सोडुन गल्लीत गोंधळ घालुन राहिलेत लेकाचे.

किमान राघोबांनी अटक तरी मिळवले... हे लोक जामीन मिळवण्यातच धन्यता मानत आहेत!

राणें ची बातच ऑर होती..... सामान्य शिवसैनिकांवरचे खटले ते मुख्यमंत्री असताना काढले गेले. पंत तर नुसते हसतच बसले होते!

या चित्रपटाचे, पत्रास कारण कि.. बोलायची हिंमत नाही... हे गाणे आज ऐकायला मिळाले. Sad

बारोमास नुकतीच वाचली होती. ती पुर्ण कादांबरी अक्षरशः नजरेसमोर येते ७ मिनिटात!

जबरदस्त प्रभावी गीत....

राज ठाकरेंनी झेंडा ला विरोध केला नाही कारण माझ्यामते , शिवसेनेला तेच हवे होते( म्हणजे हे बघा राजचा मराठी चित्रपटालाच विरोध अशी बोंब मारायला मोकळॅ) ,मात्र राज ठाकरे समोरच्याला जे हवे आहे ते कधीच देत नाही. तसेच हा प्रश्न खुद्द राजलाही पत्रकारांनाही विचारला होता तेंव्हा राजनी ऊत्तर दिले कि ' एखादा मराठी माणुस जर का माझी बदनामी करुन पैसा मिळवत असेल तर त्याने तो जरुर मिळवावा'. आणी राज ठाकरेंची प्रतिमा एखाद्या चित्रपटात खलनायक दाखवला म्हणुन खराब होईल एवढी नक्किच छोटी नाही.
बाकि चिन्मय मांडलेकर व सचित पाटील यांच्या भुमिकाच फक्त आवडल्या.
चित्रपट पाहत असताना हा चित्रपट ऊद्धवनेच दिग्दर्शित केलाय असेच वाटत होते( किंवा तसेच असावे)

झेंडा पुन्हा पाहिला. त्यातले 'राज'चे पात्र आधी वाटले होते त्यापेक्षा टुकार वाटले. न शोभणार्‍या दरडावणार्‍या आवाजात बोलणे काय, हिरवे शर्ट घालणे काय, नोकराला चहा प्यायला लावणे काय, दोन मिनिटांत पक्षाच्या झेंड्याचे डिझाईन निश्चित करणे काय, मुस्लिम माणसासोबत पार्टी अन ते पिंक वगैरे.. किती भडकपणा. आपल्यासारखे दिसणारे ते बालिश पात्र बघूनच राज ठाकरेने त्याकडे लक्ष दिले नसेल.

म्हणून नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न वगैरे काही नाही, हा कार्यकर्त्यांचाच सिनेमा आहे, हे पुन्हा मनाशीच नक्की केले. रस्तोरस्ती दांडगाई करून आपली शक्ती चुकीच्या ठिकाणी वापरणार्‍या कार्यकर्त्यांचे थोडेफार डोळे उघडले, तर ते या सिनेम्याचे यश आहे. Happy

रस्तोरस्ती दांडगाई करून आपली शक्ती चुकीच्या ठिकाणी वापरणार्‍या कार्यकर्त्यांचे

असले कार्यकर्ते, सिनेमा पाहून, पुस्तके वाचून, उपदेश ऐकून सुधारत नाहीत. दुर्दैवाने लोकसंख्या प्रचंड असल्याने असली माणसे पुष्कळ आहेत. राज च्या नावाखाली राडा करायला कदाचित् यू पी वाले नि बिहारी सुद्धा लुटालूट करायला पुढे येतील. (आणि हिंदीतून घोषणा देतील, नि कुणालाहि, अगदी राज ठकरेंना सुद्धा या प्रकरणाची चौकशी करायची इच्छा होणार नाही).

झेंडा पुन्हा पाहिला. >>> मला वाटले कि मी एकटाच हे एकच पिच्चर पुन्हा पुन्हा पाहणारा!

पण झेंडा वर्थ हे पुन्हा पुन्हा बघायला..... मस्तच!

आताच एका माजी आमदारांच्या भावाशी बोलत होतो. महाराष्ट्र विधानसभेतील एक अभ्यासु व्यक्तीमत्व अन आदर्श विधीमंडळपटुचा पुरस्कार मिळालेले नेते! नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभुत झाले.

लोकांना सार्वजनिक कामाची जाण राहत नाही, गावाला रस्ता दिला, पाणी योजना दिली तरी शेवटी वैयक्तीक मला काय दिले ह्या प्रश्नाचे उत्तरच मतदाराचे मत कुणाला ते ठरवते. सभागृहात अभ्यासपुर्ण भाषणे करायला अभ्यासाला बसावे तर लोक म्हणतात कि आम्हाला भेटतच नाही! अन लग्न, मुंजी, बारसे, दहावे तेरावे करावे तर लोक म्हणतात नुसता इथेच हिंडतो, कामे करत नाही!

सब झोल है!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5644704.cms

नेते'स्टाईल' आंदोलन!

आंदोलनांत केलेल्या तोडफोडीची आथिर्क भरपाई करून देण्याची वेळ आली की कार्यर्कत्यांना वाऱ्यावर सोडून नेते-मंडळी दसऱ्याकडे बोट दाखवीत पळ कसा काढतात, याचे दर्शन मुंबईचे माजी पोलिस आयुक्त जे. एफ. रिबेरो यांच्या याचिकेच्या मुंबई हायकोर्टात चालू असलेल्या सुनावणीत घडत आहे. नेतेमंडळी चिथावणीखोर भाषणे करून सर्वसामान्य कार्यर्कत्यांना हिंसक आंदोलने करायला प्रवृत्त करतात. हिंसाचारामुळे संघटनेच्या नेत्याचा 'वचक' निर्माण व्हायला मदत होते. राडेबाजीतील कर्तृत्व 'साहेबां'पर्यंत पोचले, तर संघटनेतील पदांसाठी विचार होऊ शकेल या आशेने कार्यकतेर्ही टीव्ही चॅनलच्या साक्षीने तोडफोड मोठ्या उत्साहाने करतात. परंतु त्याचे कायदेशीर परिणाम भोगायची वेळ येते, तेव्हा चिथावणीखोर भाषणे करणाऱ्या नेत्यांना, प्रत्यक्ष हिंसाचाराशी त्यांचा काही संबंध नसल्याची प्रशस्तिपत्रे पोलिसांकडून मिळतात! त्याचवेळी टीव्हीवर तोडफोड करताना चमकणारे कार्यकतेर् मात्र पुराव्यासह गजाआड होतात! केलेल्या लक्षावधी रुपयांच्या नुकसानीची वसुली करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध पोलिसी कारवाईही सुरू होते. अशावेळी या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून, त्याचे कायदेशीर परिणाम भोगण्यास कोणताही शूरवीर नेता पुढे येताना दिसत नाही

अरे वा! आजच्या नेतेमंडळींनी बरीच प्रगती केली आहे;

"तुम लढो हम कपडा संभालताय" ते "तुम लढो हम नामानिराळा रहताय" पर्यंत... Happy