क्लोजेस्ट रेस फॉर द ग्रेटेस्ट स्विमर.... गो... मायकेल गो!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बैजिंग ऑलिंपिक्समधील "वॉटर क्युब" मधील ओमेगा रुम... ऑलिंपिक्सचे टायमिंग ऑफिशियल्स... अमेरिकन व सर्बियन स्विमिंग ऑफिशियल्ससोबत... जगातल्या कुठल्याही हाय डेफिनेशन स्क्रिनला लाजवेल अश्या ओमेगा वॉच कंपनीच्या अद्ययावत स्क्रिनकडे.. शर्यतीचा शेवट.. स्लो मोशनमधे... परत परत .. डोळे विस्फारुन... पाहत होते... आणि त्यांच्या डोळ्याला त्या स्क्रिनवर जे दिसले ते.. बैजिंगच्या वॉटर क्युबमधे हजर असणार्‍या २०,००० दर्शकांना व जगभर टिव्हिवर पाहणार्‍या.. कोट्यावधी दर्शकांना.. टिव्हिवर तितकेसे स्पष्ट दिसले नव्हते... व ते पाहुन सर्बियन ऑफिशियल्सनी आपली प्रोटेस्ट.. मागे घेतली.... आणि जगातल्या ग्रेटेस्ट स्विमरच्या आयुष्यातल्या क्लोजेस्ट शर्यतीचा विजेता म्हणुन... मायकेल फेल्प्सच्या नावावर शिक्कामोर्तब झाले....

या बैजिंग ऑलिंपिक्समधे... चार दिवसांपुर्वी जेसन लिझॅकच्या ४ बाय १०० मिटर्स रिले शर्यतिनंतर... त्यापेक्षा अटितटीची व क्लोजेस्ट शर्यत.. याच ऑलिंपिक्समधे... परत एकदा जलतरण प्रेमींना बघायला मिळेल.. असे कोणालाच स्वप्नातही वाटले नव्हते... पण नेमके तेच आज जगातल्या कोट्यावधी लोकांना... मायकेल फेल्प्सच्या आजच्या १०० मिटर्स बटरफ्लाय शर्यतीत बघण्याचे भाग्य लाभले... या शर्यतीतल्या अटितटीला शब्दात पकडण्याचा पयत्न करणे म्हणजे... डोळ्याचे पाते लवायला लागणारा वेळ हातातल्या साध्या घड्याळाने मोजण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.. (स्लार्टी.. आजच्या शर्यतीचा शेवट... माझ्या मनातल्या एज्युकेटेड गेसच्या फुटपट्टीच्याही आवाक्याबाहेरचा.. इतका क्लोज आहे..:)) त्यामुळे आजच्या शर्यतीमधल्या.. पहिल्या व दुसर्‍या नंबरमधला..१/१०० सेकंदांच्या फरकाचा... मी मिटर.. फुट्.. इंच.. असे म्हणुन...अपमान करणार नाही... आजच्या शर्यतिचा क्लोजपणा.. हा.. ती शर्यत बघीतली त्यांनाच समजण्यासारखा होता...

आजच्या १०० मिटर्स बटरफ्लाय फायनलमधे मायकेल फेल्प्सने जेव्हा पाण्यात उडी मारली.. ती त्याची या बैजिंग ऑलिंपिक्समधल्या जलतरण तलावात.. गेल्या ८ दिवसात मारलेली.. १६ वी उडी होती.... गेल्या ८ दिवसात तो या बैजिंगमधल्या "वॉटर क्युब" मधला सगळ्यात बिझी जलतरणपटु होता... तरीही.. त्याच्या आजच्या आधीच्या ६ फायनल्समधे.. तो जिंकला होता.. नुसता जिंकला नव्हता तर ... त्या सर्व शर्यतीत विश्वविक्रम करुन्...जिंकला होता. त्यामुळे आज जेव्हा त्याने पाण्यात या शर्यतीसाठी उडी मारली तेव्हा... गेल्या ३६ वर्षापासुन अबाधित असलेला.. एकाच ऑलिंपिक्समधे ७ सुवर्णपदके मिळवायच्या... मार्क स्पिट्झच्या विक्रमाची तो बरोबरी करतो का.. याकडे प्रचंड औत्स्युकाने सर्व जग बघत होते...

शर्यत सुरु झाली.. सर्व स्पर्धकांनी पाण्यात उडी घेतली...व सुरुवातीपासुनच.. सर्बियाच्या मिलरेड कॅव्हिकने या फ्रँटी़क वेगाच्या शर्यतीत.. लिड घेतला... पहिले ५० मिटर्स संपले तेव्हा तो जवळ जवळ एका बॉडी लेंग्थने मायकेल फेल्प्सपेक्षा पुढे होता.. व पहिल्या ५० मिटर्सच्या वळणावर मायकेल चक्क सातवा होता... तिकडे स्टँडमधे मायकेलची आई... व टिव्हिवरचे कोट्यावधी मायकेल फेल्प्सप्रेमी.. त्याचे हितचंतक...त्याचा कोच... हे सगळे हातांच्या मुठी घट्ट दाबुन.. तोंडाजवळ नेत... उभे राहुन.. या शर्यतीचे शेवटचे ५० मिटर्स पाहात होते.... पण जसजशी शर्यत संपायच्या जवळ येत चालली तसतसे... सगळ्यांना दिसुन येत होते... ही शर्यत सर्बियाचा मिलरेड कॅव्हिकच जिंकणार...सगळे.. अगदी मायकेलची स्टाँच सपोर्टर... त्याची आई देखिल हाच विचार करत होती की....देअर इज नो वे इन द वर्ल्ड.. मायकेल फेल्प्स वॉज इन अ पोझिशन टु विन धिस रेस! सगळ्यांच्या छातीची धडधड प्रचंड वाढली होती.. त्यांच्या डोळ्यासमोर.. मायकेल फेल्प्सचे एकाच ऑलिंपिक्समधे सात सुवर्णपदके मिळवायचे स्वप्न उध्वस्त होत होते... आपल्याला हा विक्रम बघायला मिळणार नाही म्हणुन... का मायकेलचे स्वप्न उध्वस्त होत आहे या विचाराने म्हणुन... माझ्यासारख्या जलतरणप्रेमींना खचितच वाइट वाटत होते... डोके सुन्न होउन.. सगळे एखादा चमत्कार होण्याची वाट बघत होते...

आणी झाला.. तो चमत्कार झाला... किंबहुना तो चमत्कार मायकेल फेल्प्सने घडवुन आणला.... शेवटचे २-३ मीटर्स उरले असताना
मायकेल.. स्पष्टपणे मिलरेड कॅव्हिकच्या मागे असताना.. मिलरेड कॅव्हिकचे डोके पाण्याखाली दिसेनासे झाले.. सगळ्यांना वाटले त्याने पाण्याखालुन.. तलावाच्या भिंतीला हात लावला आहे... व सगळ्यांच्या डोळ्यांना हे दिसत होते की मायकेल अजुन एक शेवटचा बटरफ्लाय स्ट्रोक घेत आहे व त्याचे डोके व हात सगळ्यांना पाण्याच्या वर दिसत होते... व सगळ्यांना त्याचे हात भिंतीला टेकताना दिसले... सगळ्यांनी.. अगदी मायकेलच्या आइने सुद्धा हाताची दोन बोटे वर करुन हताशपणे या विचाराला स्वाधीन केले की मायकेल फेल्प्स दुसरा आला...

पण तिकडे पाण्याच्या खाली काय झाले ते फक्त ऑफिशियल इलेक्ट्रॉनिक ओमेगा क्लॉकलाच समजले व मायकेल फेल्प्स.. मिलरेड कॅव्हिक व जगातले कोट्यावधी दर्शक... त्या क्लॉककडे.. या अपेक्षेने बघु लागले की त्यावर आता मिलरेड कॅव्हिकचे नाव विजेता म्हणुन पहिल्या नंबरवर येईल.. पण सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्का देत.. त्या क्लॉकवर.. मायकेल फेल्प्सचे नाव पहिल्या नंबरवर झळकले... व बैजिंगमधल्या त्या "वॉटर क्युब" जलतरण तलावातले २०.००० प्रेक्षक... व जगभरचे कोट्यावधी दर्शक... उत्स्फुर्तपणे.... जल्लोश करुन मायकेलच्या अभिनंदनास त्यांच्या पायावर उभे राहीले.... पण त्या २०,००० प्रेक्षकातली एक व्यक्ति मात्र.. इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्डवरचा तो रिझल्ट बघुन...विस्मयकारक अतिआनंदाने.. आनंदाश्रु ढाळत... मटकन.. खालीच बसली.. ती होती मायकेल फेल्प्सची आई... आणि मायकेल फेल्प्सचा कोच?त्या रिझल्टने तो वेडा व्हायचाच बाकी होता.. व डोक्यावर हात ठेवुन त्याच्या तोंडातुन तो फक्त.... ओ माय गॉड.... ओ माय गॉड.. एवढेच उच्चार काढत होता...

टिव्हिवर सतत दाखवत असलेल्या स्लो मोशन ऍक्शन रिप्ले मधे.. पाण्याखालचा हाय डेफ कॅमेरा परत परत दर्शकांना हे दाखवत होता की सर्बियाचा मिलरेड कॅव्हिक.. शर्यत संपायला ३ मिटर असताना पाण्याखाली गायब झाला खरा.. पण तो तलावाच्या भिंतिला.. पाण्याखाली.. ग्लाइड होउन.. आपले हात लांब स्ट्रेच करुन...हात लावायचा प्रयत्न करत होता.. पण तो हात पेनफुली हळु हळु तलावाच्या भिंतीकडे सरकत होत होता... दरम्यान पाण्याच्या वर मायकेल फेल्प्स.. शेवटचा अर्धा बटरफ्लाय स्ट्रोक मारुन..तलावाच्या भिंतिवर.. आपल्या त्या शेवटच्या स्ट्रोकचा संवेग्(मोमेंटम) वापरुन्...वेगाने भिंतिकडे आपले हात झेपावत होता... आणि तो वेग.. मिलरेड कॅव्हिकच्या पाण्याखालच्या कंपॅरिटिव्हली हळु सरकणार्‍या(ग्लाइड) होणार्‍या हाताच्या वेगापेक्षा १/१०० सेकंदाने जास्त ठरला व 'ओमेगा" इलेक्ट्रॉ़निक घड्याळ्याप्रमाणे... जगातला ग्रेटेस्ट स्विमर...मायकेल फेल्प्स हा... या जगातल्या क्लोजेस्ट शर्यतिचा... राइटफुल विजेता ठरला...

आणी.. अश्या रितीने आज जगातल्या सगळ्यांना... गेली ३६ वर्षे अबाधित असलेल्या.. मार्क स्पिट्झच्या विक्रमाची बरोबरी ...मायकेल फेल्प्सने केल्याचे बघण्याचे सौभाग्य लाभले... आता रविवारी आपल्या शेवटच्या ४ बाय१०० मिटर्स टिम मेडले शर्यतीत तो व त्याची टिम.. विजयी ठरली तर.... आपल्या हयातीत एकाच ऑलिंपिक्समधे आठ सुवर्णपदके मिळवण्याचा.. न भुतो.. न भविष्यती.. असा विक्रम आपल्याला बघायला मिळेल... त्यासाठी.. गो... मायकेल गो!

प्रकार: 

अप्रतिम मुकुंद.. फेल्प्स च्या या विक्रमा इतकाच किंवा काकणभर जास्त त्यानंतरच्या या तुमच्या पोस्टसाठी मी आतुर होतो.. आणि तुम्ही दोघांनीही निराश न करता अवर्णनीय आनंद दिलात त्याबद्दल धन्यवाद!!

*******************
सोनसळी श्रावणात
पानोपानी बहरले
कसे बाई सांभाळावे?
झाड वयात आलेले...

धन्यवाद मुकुंद..स्ट्रोकचा संवेग् वगैरे तांत्रिक गोष्टी तुम्ही छानच सांगितल्यात. मला वाटले की फेल्प्स ने शेवटी एकदम झेप घेउन भिंतीला आधी हात लावला (थोडक्यात रडीचा डाव ;)). फेल्प्स साठी आनंद झाला पण कॅव्हिकसाठी वाईटही वाटले.

मुकुंद, तुमचं लिखाण वाचून अटीतटीचा सामना पुन्हा एकदा टीव्ही वर बघतेय असंच वाटलं. मलाही वाटलं की फेल्प्सला बहुतेक सिल्वरवर समाधान मानायला लागलं असावं इतके क्लोज होते तो आणि कॅव्हिक.फेल्प्स करता आनंद आणि कॅव्हिककरता तेवढंच वाईट वाटलं.

मुकुंद, तुमचं लिखाण वाचून अटीतटीचा सामना पुन्हा एकदा टीव्ही वर बघतेय असंच वाटलं.<<<<अगदी अगदी. मुकुंद, फारच छान लिहिलंय.
फेल्प्स्ला सुवर्ण पदक मीळावं असं वाटंत होतं तरी कॅव्हिकसाठी खरंच वाईट वाटलं.त्याचा आईचे, डेबी फेल्प्स्चे भाव मात्र पुन्हा पुन्हा बघण्यासारखे होते.

फेल्प्स ने आठवे सुवर्णपदक जिंकले...

मुकुंद, प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडतेय असे वाटते वाचताना! सुरेखच लिहिलेय!

मुकुंद,
मायकेल फेल्प्स च्या सगळ्या शर्यती (तोंडात बोट घालतच) बघितल्या. अमेझिंग .... दुसरे शब्दच नाहीत.
तुमच लिखाण वाचुन परत एकदा स्पर्धा बघत आहोत असेच वाटत रहातं इतक्या छान पद्धतीने दरवेळी लिहीता.

मुकुंद ...
नेमकी ही रेस मी पहायची मिसलो होतो... तुमच्या लेखाने जणू काही ती रेस पाहिली Happy
आता 'तू नळी'वर बघतो ती रेस !

मुकुंद, छानच लिहिलयत. अगदी अप्रतिम रेस झाली ती. hats of to him. Happy

अतिशय उत्कंठावर्धक लेखन !

मुकुंद, नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण ..

तुझा पंखा