मायबोली टी शर्ट २००९ -देणगी प्रदान समारंभ

Submitted by टीशर्ट_समिती on 4 November, 2009 - 22:37

(खालील लेख मुंबईकर मायबोलीकर `कुलदीप १३१२ ' यांनी लिहिलेला आहे.)

नमस्कार.
या वर्षी टीशर्ट विक्रीमधून जमा झालेली देणगीची (चॅरिटीची) रक्कम (रु.१३,५०१) ठाणे जिल्ह्यातील मनोहर मानवता सामाजिक न्यास - कळवे ठाणे ['डॉ. हेडगेवार जनजागृती प्रतिष्ठान, खर्डी, ता. शहापूर] ह्या संस्थेला दिनांक २५ ऑक्टोबर २००९ रोजी भोसपाडा, खर्डी (शहापूर) येथे भाऊबीज कार्यक्रमात देण्यात आली.

मनोहर मानवता सामाजिक न्यास ही संस्था गेल्या बारा वर्षांपासून वनवासी व ग्रामीण समाजाच्या उन्नती साठी झटत आहे. न्यासाच्या सेवा प्रकल्पातील बालवाडी हा एक महत्वाचा टप्पा आहे. यासाठी हे प्रतिष्ठान वनवासी पाड्यांवर (विनामूल्य) बालवाड्या सुरू करण्याचे काम करते.

वनवासी महिला व त्यांच्या कुटुंबियांना दिपावली सणाचा आनंद लाभावा यासाठी दिपावली नंतर येणार्‍या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. ह्या कार्यक्रमात मायबोलीचे प्रतिनिधित्व घारुअण्णांनी [संदीप खांबेटे] केले. त्यांच्याबरोबर ह्या वेळी मायबोलीचे इंद्रधनुष्य, चेतना, किशोर मुंडे, अश्विनी के, कुलदीप १३१२ हे सदस्य ह्या कार्यक्रमात उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात बालवाडी शिक्षिकांच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री. अनिल कुंटे यांनी संस्थेचे कार्य व कार्यामागची भुमिका विशद केली. मायबोलीतर्फे श्री. संदीप खांबेटे यांनी मायबोलीची ह्या देणगीकार्यामागची भुमिका स्पष्ट केली. ह्यानंतर भाऊबीजभेट आदिवासी भगिनींना व मुलांना देण्यात आली. अतिशय योजनाबद्ध रित्या आखलेल्या ह्या कार्यक्रमाचा समारोप अत्यंत छान अश्या भोजनाने झाला.

**********
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)

IMG_2094.jpgIMG_2101.jpgIMG_2104.jpgIMG_2107.jpgIMG_2108.jpgIMG_2112.jpgIMG_2114.jpg

विषय: 

"भाऊबिज भेट" या कार्यक्रमात तेथिल रहिवासीयांनी त्यांचा पारंपारिक "तारफा" नृत्य प्रकास सादर केला त्याची ही झलक

भोपळ्या पासून बनविलेले वाद्य वाजविण्याचे कसब काही औरच...

अभिनंदन! आणि ज्या माबोकरांनी हे सर्व काम करण्यासाठी आपला वेळ दिला त्यांचे मनापासून कौतुक! Happy
असेच उपक्रम मायबोलीवरुन राबवले जावेत, अनेक शुभेच्छा. काही मदत करु शकत असेन, तर सहभागी व्हयलाही आवडेल. Happy

अभिनंदन,
खुप चांगला सामाजिक उपक्रम!
पुढच्यावेळी टी शर्ट आणि रकमेचे टार्गेट वाढवु या. मी ही सहभागी होण्यास उत्सुक आहे. Happy

Pages