मुलांसाठी नोकरी/व्यवसायात केलेला बदल

Submitted by me_surabhee on 11 August, 2008 - 00:30

मी सुरभी. व्यवस्थापन शास्त्रातली मास्टर्स पदवी घेतलीये. एका MNC मध्ये उच्च पदावर २/३ वर्षे नोकरी केली. नवरा software engi तो ही एका MNC मध्ये आहे. कामाच्या निमीत्तानी दोघेही १२/१३ तास घराबाहेर असायचो. मुलाकडे ( आता वय ४ वर्षे ) लक्ष देता यावे म्हणून मी नोकरी सोडली ( घरी सांभाळायला कोणी नाही ) आधी खुप बर वाटल पण आता अस्वस्थ पणा येतो. इतक शिकुन सुद्धा घरी बसलीये असे टोमणे ऐकावे लागतात. घरी कंटाळा येतो मुलगा शाळेत जातो तेव्हा. पुढल्या वर्षी त्याची पुर्ण वेळ शाळा सुरु होईल. तेव्हा आणखीन कंटाळा येईल अस वाटत.
कोणतीही कला नाही की ज्यात मन रमवावे. काही सुचत नाही. पुन्हा नोकरी करायची तर मुलाकडे दुर्लक्ष होईल अस guilty feeling येत. पण मी घरी असल्यापासुन तो जाम खुष असतो. एवढच काय ती जमेची बाजु.
नोकरी करणे किंवा सोडणे निर्णय माझा आहे. नवरा पुर्ण पणे मदत करायला तयार असतो, पण मुलासाठी नोकरी नको वाटते करायला आणि घरी पण बसायला नको वाटत. नशिब नोकरी करायची गरज नाहीये, नाही म्हणटल तरी तो factor पण विचारात घ्यावा लागतो.
मी काय करु? म्हण्जे काय करता येईल की ज्यानी माझा वेळ सार्थकी लागेल ? ( माझ्या आईच्या म्हणण्या प्रमाणे बहुदा सुख मला बोचतय, हेच खर असाव!!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरभी, तुम्हाला मायबोलीत 'विचारपूस' मधे लिहिलंय.

Mrinmayee,
kahi suchavala asel tar ithehi suchavu shakaal kaa?haa prashna khoop jaNinnaa aahe,aaNi kuthalyaahi prakaaracha suggestion nakkich bahumol Tharel.dhanyavaad

वृषाली, तसं खास काही लिहिलं नव्हतं. सुरभीसाठी विचारपूस मधे ठेवलेला निरोप :

सुरभी, तुमची समस्या (?) ही आजकाल बर्‍याच आयांची समस्या आहे. नवरा-बायको दोघेही उच्चशिक्षीत असतात. नोकरीत असतात. आई झालं की बायको बाळासाठी आपलं करियर सोडून घरी बसते. एकीकडे आपण आपल्या पिल्लासाठी घरी आहोत, त्याच्या मोठं होण्याची प्रत्येक पायरी खूप जवळून बघतो आहोत म्हणून खूप आनंद असतो. आणि दुसरीकडे घरी बसल्याचं दु:ख पण असतं. पण एक विचारात घ्या, मुल मोठं होणार. त्याच्यासाठी तुम्हाला जन्मभर घरी बसायचं नाहीये. आणखी वर्शभरात तुमचं बाळ शाळेत जायला लागेल. तुम्हाला पार्ट टाइम जॉब करता येऊ शकेल. हा हा म्हणता मुलं मोठी होतात. तुम्हाला आणखी थोड्याच वर्शात अगदी पूर्ण वेळ काम करता येईल. तेव्हा कधी घरी बसल्याचं डिप्रेशन आलं तर एकंच लक्षात ठेवा, 'बर्‍याच आयांना त्यांचं बाळ पालथं पडलं, रांगलं,पहिला शब्द बोललं हे सगळं त्याची काळजी घेणार्‍या दुसर्‍या कुणा व्यक्तीकडून ऐकावं लागतं.' तेव्हा फक्त थोडा आणाखी धीर धरा.
हा निव्वळ शहाणपणाचा सल्ला म्हणून सांगत नाही. मी स्वतः दोन्ही फेजेसमधून गेलेय. मुलासाठी घरी राहण्याच्या आणि इलाज नाही म्हणुन काम करण्याच्या!
आई म्हणते 'सुख बोचतं'. असेलही असं काही अंशी खरं, पण काही वेळा सख्ख्या आईपर्यंत सुध्दा आपण आपली तडफड नीट पोचवू शकत नाही.
तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

मृण, एकदम परफेक्ट... एवढे छान तूच समजावु शकतेस Happy
.
सुरभि, माझं बाळ अवघे सहा महिन्याचे असतांना ,पैशाची खुप गरज नसतांना, केवळ लोकांचे टोमणे ऐकुन मी जॉब सुरु केला... आण नंतर ३ महिन्यात सोडला. बाळाची आबाळ होऊ न देण्यासाठी टोमणे ऐकुन घेण्यास काहीच हरकत नसते, हा स्वानुभव आहे.
.
बाळ २ वर्षाचे झाल्यावर मी पुन्हा आनांदाने जॉब सुरु केला. (आणि सध्या पुन्हा देशाबाहेर आल्यामुळे फुल टाईम मॉम आहे ... पण एवढ्या सगळ्यातुन गेल्यमुळे आता तरी दिप्रेशन वगैरे येत नाही)
म्हणुन बाळासाठी जॉब सोडलाय हा एक विचार फक्त मनात ठेवा... आणि पुन्हा तुम्ही नव्याने सुरु करु शकाल हे ही लक्षात ठेवा.

-प्रिन्सेस...

>>मृण, एकदम परफेक्ट

खरच, अगदी छान!

सुरभी, मी ही ह्यातून गेलेय.
एक गोष्टं मला नक्की पटलीये की, आपल्या प्रायॉरिटीज आपल्याशी पक्क्या असल्या की, घेतलेल निर्णय पार पाडण्याची शक्ती येतेच येते. स्वतःला सारखं बजावत रहायचं... आपल्या निर्णयासाठी आपण केलेलं ऍनालिसिस, आपल्या निर्णयासाठी आपण ठरवलेल्या कसोट्या... ते महत्वाचं.
टोमणे, कोपरखळ्या, अनाहूत सल्ले (ह्यात हा माझाही आलाच) हे सगळं त्या कसोट्यांवर पारखलं की आपोआप काय ऐकायचं आणि काय नाही हे ठरवायचं बळ येतं.
टोमणे, सल्ले, हे सारे तुझ्या कोणत्याही... अगदी कोणत्याही निर्णयाचे 'बाय्-प्रॉडक्ट्स' आहेत. त्यावर निर्णय अवलंबून असू नये.

मी माझा मुलगा पाच वर्षांचा होऊन पूर्ण वेळ शाळेत जाईपर्यंत नोकरी केली नाही. त्यावरून माझ्या बरोबर ऑस्ट्रेलियात आलेल्या अनेकांचे अनेक टोमणे आणि सल्ले ऐकून घेतले, भारतातल्या नातेवाईकांचेही. पण तो वेळ सत्कारणी लागला असं न म्हणता, तो वेळ तसा वापरणं हेच योग्य होतं हे मी ठामपणे सांगू शकेन.

त्या वाढत्या वयात तुझ्या पिल्लाला तू जे देऊ शकशील ते दुसरं कुणीही देऊ शकणार नाही. क्वॉलिटी टाईम v/s क्वांटिटी टाईम! हे गणित वाटतं तितकं सोप्पं नाही. संध्याकाळी मिळतिल ते चार तास अत्त्युच्च क्वालिटीचे करून उरलेल्या चौदा तासांच्या क्वांटिटीचं निरसन करता येत नाही हे माझं निरिक्षण आणि किंचित अनुभवही.
मॄ म्हणतेय ते अगदी खरं. काही इतर आयांसारखी नोकरी करायलाच हवी अशी तुझी अवस्था नाही. हे किती चांगलं!

आणि शेवटी ही एक फेज आहे, तुझ्या आयुष्यातली. अगदी थोड्याच अवधीत पुन्हा नव्या जोमाने आणि कोणतही गिल्टी फीलिंग मनात नसलेल्या मोकळ्या मनाने नोकरीच्या क्षेत्रात भरारी घेशील. (माझ्या अनेकानेक शुभेच्छा.)

सुरभी, तुझ्या एका प्रश्नाला उत्तर मात्रं द्यायचं राहिलं.
*******मी काय करु? म्हण्जे काय करता येईल की ज्यानी माझा वेळ सार्थकी लागेल ?******
त्याच्या बरोबरचा वेळ खूप असल्याने तुला अनेक ऍक्टिव्हिटीज शोधून काढाव्या लागतील. ह्याच वेळात त्याला वाचनाची, लिहायची, वेगवेगळ्या खेळांची आवड निर्माण करायला लाग.
वाचनालयात त्याच्याबरोबर जाऊन, त्यालाच पुस्तकं घेऊ द्यावीत. रोज आपण काहीतरी वाचून दाखवावं. आपोआप त्यांना मग वाचायची गोडी लागते.
काही छोटी तालवाद्य घे- बोंगो, कब्बास, घुंगरू, झांज. त्याला संगीताची आवड निर्माण करायचं हेच वय. पियानो सारखं वाद्य जे दोन्ही हातांनी वाजवावं लागतं, त्यामुळे मुलांच्या ऍनालिटिकल आणि क्रिएटीव्ह अशा दोन्ही बाजूंचा विकास होतो असं मी ऐकलय.
काही बोर्ड गेम्स त्याच्याबरोबर खेळायला सुरूवात कर. मोनोपॉली सारख्या गेममधून बेसिक गणित शिकतात मुलं.
ह्या वयाला खेळातून शिकण्यासारखं जे काही आहे ते सगळं करता येईल.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू जे करते आहेस, ते सुद्धा एक अतिशय महत्वाचं काम आहे हे ध्यानी घे. हाती दिल्या एका मातीच्या गोळ्यातून समर्थ माणूस घडवणं ह्यासारखं सुंदर दुसरं काम नाही... तेव्हा खूप एंजॉय कर त्याच्याबरोबरचा वेळ.

वा! दाद , hats off ! खूपच छान सल्ला दिला आहेस. सगळ्यांचेच सल्ले उपयोगी आहेत.
माझेही २ शब्द, (मी पण या सगळ्यातून गेली असल्यामुळे). मुलगी १ वर्षाची होईपर्यंत रजा घेतली (नशिबाने आणि आधी केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर मिळाली). जेव्हा आणखी रजा मिळणे अशक्य झाले तेव्हा नोकरी सुरु केली. आई-वडील, सासूबाई कोणीच पूर्णवेळ यायला तयार नव्हते, मग नोकरी मधे शक्य तितके कमी तास थांबून काम पूर्ण करणे असे करत आणखी एक वर्ष काढले. त्यामुळे प्रमोशन, पगारवाढ या सर्वांवर पाणी सोडले. केवळ नोकरी टिकून रहावी हाच १ उद्देश होता. यात टोमणे सर्व बाजूंनी ऐकायला मिळाले - नोकरीमध्ये सहकारी 'जसे काही हिलाच एकटीला लहान बाळ आहे', 'तूच ना ती १ वर्षाची रजा घेतलेली' व इतर अनेक. नातेवाईक व इतर - 'कसं बाई बाळाला डे-केअर मधे सोडून जाववतं', 'असा किती पगार मिळतो बाळाला सोडून जाण्याइतका'.. शिवाय मुलीचे आजारपण, लसीकरण यावेळी मी सुट्टी घेऊन घरी. या सर्व तारेवरच्या कसरतीत शारिरीक हाल, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष हे ही होते. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी नोकरी सोडायची मनाची तयारी आहे.

तर सांगायचा उद्देश हा की काहीही केले तरी टोमणे ऐकावे लागतातच, शिवाय अमूक एका गोष्टीत पूर्ण मानसिक समाधान मिळते असे काही नाही, ते फक्त आपल्या मनामधे असते. त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे, एकदा घेतेलेल्या निर्णयाशी ठाम रहावे, आपण आनंदी राहून घरात आनंदाचे वातावरण ठेवावे. आपल्या दृश्टीने जी माणसे सगळ्यात महत्वाची आहेत त्यांचे हित पाहावे, अ इतर सर्व जगाकडे 'संपूर्ण दुर्लक्ष' करावे.

सुरभी, मला माझ्या तीन महिन्याच्या मुलीला घरी ठेऊन कामावर जावे लागले, केवळ नाईलाज म्हणुन. सुदैवाने आईचे घर जवळ होते तोपर्यंत तिने सांभाळले, पण मग लांब गेल्यावर अडीज वर्षांपासुन मुलीला पाळणाघरात ठेवावे लागले.

मुलीला खुप मानसिक त्रास झाला ह्या सगळया गोष्टींचा. पण आईजवळ राहायचे तर पाळणाघराशिवाय पर्याय नाही हे ओळखुन ती न रडता राहायची. आजही डोळे पाणावतात ते दिवस आठवले की. दिवसाचे कमीत कमी १२ तास मी घराबाहेर असायचे. आधीच तिला द्यायला वेळ नसायचा. त्यात अजुन एक मुल आणुन तिचा वेळ कमी कशाला करा म्हणुन मी इच्छा असुनही दुसरे मुल होऊ दिले नाही.

त्यामानाने तु खुप नशिबवान की मुलासाठी नोकरी सोडणे तुला परवडले. शिक्षणाची परिणिती नोकरीच आहे का? इतरही ब-याच गोष्टी आहेत करण्यासारख्या त्यातल्या ब-याच वर लिहिल्यातही इतरांनी. तुझे छंद, आवडीनिवडी आहेतच, तो मोठा झाल्यावर हळुहळू बाहेरच्या इतर गोष्टीही करता येतील.

फक्त एक कर, मुलासाठी तु नोकरी सोडलीस याचं ओझं त्याच्यावर लादु नकोस. तो मोठा झाल्यावर त्याला येताजाता तु किती त्याग केलायस हे ऐकवु नकोस. तु हे सर्व तुझ्या समाधानासाठी केलस हे लक्षात ठेव. हळुहळू त्याचे बाहेरचे जग विस्तारेल तेव्हा तो दुर जातोय म्हणुन खंतावू नकोस. तुझे छंद, आवडीनिवडी तेव्हा कामाला येतील तुला.

हाती दिल्या एका मातीच्या गोळ्यातून समर्थ माणूस घडवणं ह्यासारखं सुंदर दुसरं काम नाही... तेव्हा खूप एंजॉय कर त्याच्याबरोबरचा वेळ.

खरंच तुला खुप सुंदर जॉब मिळालाय, तो अगदी मनापासुन कर. बाकी लोकांचं काय, नोकरी करणा-यांनाही टोमणे ऐकावेच लागतात...

कुछ तो लोग कहेंगे,
लोगोंका काम है कहना,
छोडो,
बेकार की बातोंमे कही बीत न जाये रैना..........

साधना

मुलासाठी तु नोकरी सोडलीस याचं ओझं त्याच्यावर लादु नकोस. तो मोठा झाल्यावर त्याला येताजाता तु किती त्याग केलायस हे ऐकवु नकोस.>> हे खुप पटलं अन ते महत्वाच पण आहे . तुम्ही जो काही निर्णय घेणार आहात तो सर्वेस्वी तुमचा असणार आहे, तुमच्या समाधानासाठी तुम्ही हे करताय हे लक्षात ठेवुन केल तर त्याच तुम्हाला काही वाटणार नाही नंतर , वर बर्‍याच लोकांनी वेळ सार्थकी कसा लावायचा हे ही सांगितल आहे .

****************************
जसे वाजती नुपुर सुखाचे ...

या फेजमधुन अक्षरशः कित्तेक स्त्रिया जातायत, सोफ्टवेअर मधे नवरा असल्याने त्याची कामाची जागा जर परदेशात असेल तर आणि मुल लहान असेल तर हि तड्जोड कराविच लागते. यातुन तू नेटवर कामं घ्यायला सुरुवात करु शकतेस. मी हि अजुन याच सिचुएशन मधे आहे आणि माझ्या जॉबशि संबंधित कोर्स करायच्या विचारात आहे. म्हणजे वेळ सत्कारणि पण लागेल आणि पिल्लाला वेळहि देता येईल.
आपल्या बरोबरिच्या मैत्रिणी छानपैकि नोकर्या करत असताना आपल्या नशिबि हे टक्केटोणपे का?हा विचार नक्किच मनात येणार त्यावर मग तुझ्या बाळाचं छान स्मित नेमका इलाज करिल.
तुला या फेजसाठि बेस्ट लक.

पार्ट टाईम करता येईल असं काम बघ. तुला कंटाळा येतो हे स्वाभाविकही आहे आणि तेवढंच महत्वाचं आहे. बाकी टोमणे वगैरे सोडून दे. ते काहीही केलं तरी ऐकावे लागतातच. Happy
मी ही ५ वर्षं घरी होते मुलगा झाल्यावर. मग त्याची पूर्णवेळ शाळा सुरू व्हायच्या वेळेला मी ही पुन्हा काम करायला लागले.
बाकी सगळ्या गोष्टी आयुष्यात कधीही करता येतात, पण आपल्या मुलाचं बालपण पुन्हा कधीही कश्यानेही परत मिळवता येत नाही. ते असं enjoy करायला मिळणं आणि त्याला आत्ता या वयात तुझा पूर्णवेळ सहवास मिळणं ही privilege आहे हे लक्षात घे. दाद ने सुचवलेले मुद्दे विचारात घे.

दाद !!
म. वा. आषा .. दीप..
खरय. सुरभी मी सुद्धा ह्या फेज मधून गेली आहे जात आहे. माझ मुलगा तिन वर्षांचा आहे. सहा सात वर्षे नोकरी केल्यावर मला सुद्ध सुरुवातिला खूप जड गेलं नोकरी सोडली तेव्हा. नोकरी करायची नाही हा सर्वस्वी माझा निर्णय होता. त्याच्यासोबत त्याचं बालपण मला सुद्धा अनुभवायच होतं जगायचं होतं. जसं तुला आता वाटतंय मुलगा शाळेत गेला की करमत नाही .. काही विचार येतात मनात. पण त्याला किती छान वाटत असेल आईला घरी आपल्यासोबत बघून.
खरच मुल भरभर मोठी होतात. इथे वर बरेच जणांनी सांगितलच आहे काय कर काय करु नकोस ते. अजिबात लक्ष देउ नकोस टोमणे देणार्‍यांकडे.

त्या वाढत्या वयात तुझ्या पिल्लाला तू जे देऊ शकशील ते दुसरं कुणीही देऊ शकणार नाही. क्वॉलिटी टाईम v/s क्वांटिटी टाईम! हे गणित वाटतं तितकं सोप्पं नाही.>>>
दाद... शंभर टक्के !
अगदी !!!!

आणि तो शाळेत गेल्यावर जर तुला बोर होत असेल तर ... बर्‍याच गोष्टी आहेत करण्यासारख्या..
पुर्वी वेळेअभावी न करता आलेल्या सगळ्या गोष्टी आठव आणि कर. बघ तुल खूप आनंद मिळेल.
आवडीची मस्त मस्त गाणी ऐक. पुस्तके वाच.. आवड्त असेल तर मुव्हीज बघ. काहीतरी छंद जोपास. तुला मनापासून आनंद मिळेल.

मागे एकदा कधितरी मलाही असच वाटलं होतं नोकरी सोडून बसलोय वगैरे. पण आपल्या सारख्या बरेच जणी आहेत .. MNC .. चांगल्या पगाराची नोकरी सोडलेल्या.. कुणई नवर्‍या सोबत पर्देशात आहेत म्हणून मुलांकडे थांबलेल्या आई..

पार्ट टाईम काही सुरु कर. नाहीतर आणखी एक दोन वर्षात.. मुलगा दुपार पर्यंत शाळेत जाउ लागला की तु पुर्ण वेळ पण काम करू शकशिल .. . पाच सहा वर्षांची झाल्यावर मुलं एकटी खेळू शकतात.. एखादी मुलगी ठेउ शकशिल थोडावेळ सांभाळायला.

सध्या ही फेज एन्जॉय कर... :)B POSITIVE Happy

हे जीवन सुंदर आहे......

all the best. happy parenting !! Happy

ह्या विषयावर जाणकार व्यक्तिंनी मते मांडलेलीच आहेत.. मी ह्या बाबतीत अजून काय बोलणार.. फक्त एक सुचवू शकतो..
एखादा घरी बसल्या बसल्या करता येईल असा व्यवसाय का शोधत नाही.. म्हणजे सध्या मिळणारा वेळ कसा घालवायचा तोही प्रश्न सुटेल आणि पिल्लू मोठे झाल्यावर हाच व्यवसाय वाढवून मोठा करता येईल..
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

सर्वांना मोदक! Happy
सुरभी तुला सल्ला देण्याइतकी मोठी नाही, तरीही..
सुख बोचत नाहीये, मनातले विचार बोचत आहेत. तुझ्या मनातले feeling काढून टाक. जे तू करत आहेस त्यात तू देखील आनंदी व्हावीस असा प्रयत्न करायला लाग. स्वतःला विचारून पहा, तुला काय आवडते ते. एकदा गृहस्वामिनी प्रसन्न झाली की बाकी सर्व गोष्टी सुरळीत होतील.
माझ्या मैत्रिणींना मी मुलांचा बहाणा करून घरात राहील्याचे पाहते, तेव्हा वाईट वाटते. एक phase येते जेव्हा त्यांना लग्गेच्च्च नोकरी मिळवून करावीशी वाटते आणि पाहता पाहता त्यांचा आवेश थंड होतो. मनाला आणि दुसर्‍यांना मुलांमुळे मला नोकरी करणे जमत नाही हे अधोरेखित करून सांगत असतात. कुठलाही बहाण्याची कुबडी करायची गरज तुला पडू देऊ नकोस. फार thin line असते ती. त्रास बराच होतो.
तुला पुन्हा नोकरी करायची तर त्या दृष्टीने प्रयत्न सुरु कर. वेळ लागेलही. तू काम कर अथवा नको करूस, पण ह्या सर्वात तू enjoy करणे महत्वाचे.

तुम्हा सगळ्यांना खुप खुप खुप धन्यवाद..... खुप छान सांगीतलत, समजावलत...

मला आजकाल बरेच वेळा खरच वाटत, मुलाची ढाल बनवुन मी नोकरी न करण्याच समर्थन करतीय का?

पुढे जॉब करण्याच म्हणाल तर मी ते ही ट्राय केलय पण खुप प्रोब्लेम्स आहेत. जसे की माझ शिक्षण finanace मध्ये झालय आणि सध्या job market मध्ये sales n IT शिवाय कशालाही किंमत नाहीये ( भारतात ) finanace च म्हणाल तर त्या साठी experience लागतो, जो मी ब्रेक घेतल्याने कामाचा नाहीये आणि सगळे रीलेटेड जॉब्स साउथ बॉम्बे त आहेत जे की माझ्या पासून लांब आहे.
व्यवसाय वगैरे बहुदा मला जमणार नाही.
वाचन तर चालूच असत.....

तरीही तुम्ही दिलेला मानसिक आधार खुप सुखावणारा वाटला.... बर वाटल.

माझ्या मते तरी मला आता जॉब मिळण कठीण आहे. आय टी त ट्राय केल तर कदाचित entry level मिळेल पण त्या साठी शिकाव लागेल....

हा माझा कधिच न संपणारा लढा आहे, स्वतःशीच........

बर्‍याच दिवसा पसुन लिहायच मनात होत पण टाळल, आज मात्र लिहायलाच पाहिजे अस झाल.

मला Daycare, Extended Care, Preschool मध्ये आपल्या मुला-मुलींना पाठविणार्‍या पालकांना काही सांगावस वाटतय

१. पालकांनी आपल्या मुला बरोबर घरचा खाऊ (Snack) द्यायला हवा (शाळेत, डे.के. मध्ये खाऊ देत असले तरी). जमल तर पौष्टीक (फळ वै.) खाऊ द्यावा; महत्वाच म्हणजे पाण्याची बाटली द्यावी (Water-Bag filled with water)

२. तुमच मुल जर DC or Preschool मधुन जेवण घेत असेल तर पालकांनी मुलांना "बाळा आज तु पोट भर जेवलास का? जेवतांना तुला जर आणखी हव असेल तर तु Teacher ला सांगतो/मांगतो का?" अशी चैकशी मुला सोबत रोज वा अधुन मधुन करायला हवी. (काही मुल भुक असुन आणखि हवय अस teacher ला सांगत नाहित वा काही teachers जास्त वा परत वाढत नाहीत.)

३. मुला/मुलीला DC, PS मध्ये टाकतांना तिथल्या Teachers ला Hearing Problem नाही ना हे पडताळुन घ्याव, वयस्क Teacher असेल तर असे problem असु शकतात. लहान मुलांचा आवाज मोठा नसतो, Hearing Problem असलेली Teacher बर्‍याचदा समजु शकत नाही मुल काय बोलतय/मागतय/सांगतय.

४. पालकांनी DC, PS मधले नळ विशेषता पाणी पिण्याचे किती उंचीवर आहेत हे ही पहाण गरजेच असत. तहानलेली मुल पाय उचकवुन वा सिंकला लटकुन पाणी पितांना तहानलीच रहातात, बर्‍याचदा Fountain Tap दाबुन ठेवुन वा पकडुन ठेवुन पाणी पिण मुलांना कठीण जात (So they dont drink enough water or dont drink at all) (It is not possible for teachers to help every kid to drink water)

५. DC, PS मधल्या Doll Area त मुलांना खेळतांना घालता यावे असे कपडे असतात जे नियमित धुतलेले नसतात,बर्‍याच मोठ्या मापाचे असतात व लोकांनी वापरुन मग शाळेला दान केलेले असतात, मुलांनी खेळतांना असे कपडे न घालण हे जास्त चांगल.

६. काही पालक बरेचदा मुलांना अंघोळ न घालता, शिळ्या कपड्यातच मुलांना घेवुन येतात it is not good for kids health.

७. Potty केल्यावर मुलाने हात स्वच्छ धुतले का नाही हे पाहिल नाही तर बरेच दा मुलांच्या बोटाला घाण तशिच असते अश्यात मुल शाळेत आल्यावर ती बोट तोंडात घालु शकतात वा इतरांना लावु शकतात. मुलांना Potty करुन आल्यावर हात धुण्याची सवय असायला हवी.

आपल्या मायबोली वरचे सारे सुजाण पालक वरिल सर्व बाबतित चोख असतिलच . माझ्या मनात मी ज्या PS n DC मध्ये काम करते तिथल्या काही पालकांना हे सांगाव अस बर्‍याच दिवसा पासुन आहे पण मी ते करु शकत नाही म्हणुन मन इथे मोकळ केल.

कुणालाही दुखविण्याचा माझा हेतु नाही. चु. भु. माफ करणे.

सुरभी

मुला साठी नोकरी सोडुन तुम्ही एकदम सही केल, Daycare or Preschool life of more than 3-4 hours a day, is really not good for small kids.

तुम्ही कोण्त्या daycare मध्ये असता?.
कृपया,निदान शहराचं नाव सांगा.

तुम्ही कुठल्या डे केअर मधे काम करता/ वा मुलांना पाठवता हे मला माहित नाही. पण माझ्या डे केअरच्या अनुभवात तरी असं मी कुठेही पाहिलेलं नाही.

पॉटी करून आल्यानंतर मुलांना साबण लावून हात धुवायला लावतात. साधारण तीन- साडेतीन वर्षापर्यंतचं मुल असेल तर तिथले शिक्षक हात नीट धुतलेत की नाहीत हे जातीने बघतात. कधी कधी मुलांना साबणाचा डिस्पेंसर वापरता येत नाही तिथे स्वत: हातावर साबण घालून देतात.

मुलांना पाणी घेण्यासाठी त्यांच्याच उंचीचे नळ/ सिंक असतात. त्याच्या बाजूलाच त्यांच्याकरता डिस्पोसेबल कप असतात. नळाला तोंड लावून पाणी पिण्याचा प्रश्नच येत नाही.
शाळेत काय जेवण अन स्नॅक्स देतात याचा महिनाभराचा तक्ता महिना सुरू व्हायच्या आधीच मिळतो. तीन वर्षेपर्यंत मुलाने रोज किती जेवण / स्नॅक्स खाल्ले याचा लेखी रिपोर्ट मिळतो.

मुलांना ड्रेस अप करताना घालायचे कपडे दर आठवड्याला धुतले जातात. फाटके, जुने झालेले कपडे वरचे वर टाकले जातात. १०% क्लोरॉक्स , ९०% पाणी याच्या स्प्रे ने सगळी खेळणी वगैरे साफ केली जातात. तीन महिन्यातून एकदा कार्पेट शँपू व फ्लोअर पॉलिश केले जाते. वर्षातून एकदा ए सी डक्ट्स क्लीन करतात. ( घरी पाच ते दहा वर्षात करावे अशी गाइड लाइन आहे आमच्या राज्यात )

मुलाला डेकेअर मधे ठेवायच्या अगोदरच या सर्व गोष्टींची चौकशी, पहाणी करणं सहज शक्य आहे. जिथे स्वच्छतेच्या, सुरक्षेच्या बाबतीत तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत असल्या डे केअर मधे मुलं घालायची सक्ती कुठे आहे ?

शोनु, Bright Horizons बद्दल बोलतेस का ? मला सध्यातरी तो एकच अनुभव आहे आणि तेथे तु वर उल्लेखल्याप्रमाणेच सर्व सोयी-सुविधा आहेत.

सिंड्रेला
ब्राइट होरायझन, मॅलव्हर्न स्कूल, चेस्टरब्रूक अकॅडमी, गोडार्ड, किंडर केअर, मल्बेरी हे सगळे साधारण याच कॅटगरीत येतात.

मी पण हेच लिहिणार होते. माझी मुलगी गोडार्ड ला जाते. अतिशय उत्तम स्कूल आहे. वर लिहिलेले वाईट अनुभव एखाद्या ठिकाणी आले तर सगळयाच डेकेयर ना त्याच काट्यावर तोलणे बरोबर नाही. किंवा मुलांना डेकेअर ला पाठवू नये हेही त्यावर सोल्यूशन नाही.

मला डेकेअर च्या बाबतीत अजिबात वाईट अनुभव नाहीये. माझा मुलगा सोळा महिन्यांचा असल्यापासून डेकेअर ला जातोय. माझ्या मुलाच्या डेकेअर मध्ये सकाळच्या ब्रेकफास्ट पासुन ते ४ वाजताच्या खाऊ पर्यन्त सगळे तेच द्यायचे. आणि त्यांचा आठवड्याचा मेनु डाएटिशिअन च्या सल्ल्याने ठरवलेला होता. खरतर त्यांचा तो मेनु पाहुन मला वाटायचं की मी सुद्धा इतकं व्यवस्थित देऊ शकेन की नाही रोज.
बाकी स्वछता , पाणी, कपडे याबाबतीत शोनू ने लिहिलेच आहेत सगळे मुद्दे. स्टाफ सुद्धा सर्टीफाइड असतो.

डेकेअर ला मुलाना ठेवण न ठेवण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण म्हणुन डेकेअर ला पाठवणं म्हण्जे काहीतरी वाइट आहे असं कसं म्हणता येईल. सगळ्यानाच नोकरी सोडुन घरी राहणं शक्य असतचं असं नाही.

सास, तुमचा अनुभव अगदी क्वचित घडणारा एक प्रसंग असु शकतो पण रोजच डे केअर मधे असे होत असेल असे वाटत नाही. माझा मुलगा भारतातल्या डेकेअर मध्ये जात असे आणि मला तिथेही असा अनुभव आला नाही. हं, एक आहे की भारतात , लहानांच्या उंचीचा फारसा विचार केलेला नसतो पण त्यासाठी वेगळा उपाय मुलाच्या डेकेअर मध्ये केलेला होता. अगदी छोटु छोटु बादली भरुन पाणी बाथरुम मध्ये ठेवलेले असायचे जेणेकरुन बच्चु लोकांना हात पाय धुण्यासाठी त्रास होऊ नये.
तसेच मुलं बाथरुम मध्ये जातांना प्रत्येक वेळी आया त्यांच्या बरोबरच असे.

खाण्यापिण्याचे घरुनच द्यावे लागत असे पण तिथे अधुन मधुन मिळणारा खाऊ सुद्धा पौष्टिक असायचा.

अमेरिकेत असे होत असेल असे नक्कीच वाटत नाही. आणि असे जर तुम्ही काम करतात अशा ठिकाणी होत असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या हेडशी बोलुन काही करता येणार नाही का?

-प्रिन्सेस...

ह्या विषयावर जाणकार व्यक्तिंनी मते मांडलेलीच आहेत.. मी ह्या बाबतीत अजून काय बोलणार.. फक्त एक सुचवू शकतो..
एखादा घरी बसल्या बसल्या करता येईल असा व्यवसाय का शोधत नाही.. म्हणजे सध्या मिळणारा वेळ कसा घालवायचा तोही प्रश्न सुटेल

इ थिन्क थिस इस ओक

मी Bay area CA USA च्या DC n PS मध्ये ८+ महिन्यांन पासुन काम करत आहे.

Shonoo, मी पालकांनी घरुन पाठवितांना मुलांचे हात स्वच्छ आहेत का नाही ते पहाव, मुलांना अंघोळ न घालता, शिळ्या कपड्यात DC or PS मध्ये पाठनु नये अस लिहल आहे.

मी कार्यरत असलेल्या DC मध्ये तुम्ही जस लिहलय तस हात धुवायला लावतात. पण पिण्याच्या पाण्याच्या बाबतित मात्र सोय व्यवस्थीत नाही. मुलांसाठी छोटा 'स्टेपींग स्टुल' ठेवला असला तरी तो बहुदा जागेवर नसतो आणी काही मुलांना तो वापरुनही सिंक वर लटकावच लागत आणी तो नळ पकडुन ठेवुन पाणी पिण म्हणजे महा कठीण पडत.

मी कुठल्या ही DC ला काट्यावर घरत नाही आहे, माझा अनुभव मी लिहला आहे आणी मी आधिच लिहल आहे >>>>>
माझ्या मनात मी ज्या PS n DC मध्ये काम करते तिथल्या काही पालकांना हे सांगाव अस बर्‍याच दिवसा पासुन आहे पण मी ते करु शकत नाही म्हणुन मन इथे मोकळ केल.

ह्या DC. madhye ECE UNITS असलेले employeess कमी आहेत जे ECE UNIT असलेल्या Teacher च्या हुद्द्या वर आहेत.

Hearing Problem असलेलि Teacher मुलान बरोबर ६-८ तास असते (Teacher मनाने चांगली आहे पण २-२ वर्षांपासुन काही मुल ह्या class मध्ये असुन त्यांना A-Z, Name, Words etc येत नाही) पालक "दोन वर्षा पासुन मुल इथ येतय तरी त्याला काही येत नाही" म्हणतात (पालक काय बोलताय ते ही Teacher ला बरेचदा एकु येत नाही, काही तरी guess करुन त्या reply करतात) पण पालकांना त्या मागची करण माहित नाहीत. ही American Teacher १० वर्षांपासुन employee आहे पण वयो माना नुसार मुलांना शिकविण्यात उतारपणा आलाय. शिवाय Hearing Problem Sad

ह्याच Teacher च्या Pre-K ची मागच्या वर्षी Public School मध्ये गेलेली ३-४ मुल/मुली After School DC त येतात ज्यांना मी Homework Assistance देते, ह्या मुलांना Reading/writting Skill मध्ये (खुप) problems आहेत.

Luch Menu च Schedule ही आहे पण, एक Teacher 2 serving पेक्षा जास्त वाढत नाही, त्या Table वरची मुल काही वेळा अर्ध पोटी रहातात.

ह्या शाळेत AC नाही ह्या भयंकर उकाड्यात फक्त Fan वापरतात (दुपारी मुल झोपतात तेव्हा आणी शाळेच्या काही भागात मुलांसाठी AC खरच गरजेचा आहे)

....असो. कधि कधी आपल्याला ह्या बाबतित काहीच करता येत नाही ह्याची खुप खंत होते... पण आपल्या मायबोलीवर
कुणाला असे अनुभव नाहीत हे वाचुन खुप आनंद झाला Happy

मी School age मुलांबरोबर काम करते, ह्या वर्षीच्या Summer Camp ची मी त्यांची Teacher आहे, जी मुल गेल्या ४-६ वर्षांपासुन ह्या DC मध्ये येत आहेत, ज्यांनी इथे आधिचे २-४ Summer Camp केलेत ती मला म्हणतात "This is our Best Summer in ..."

माझ्या वर्गातही मुलांना खेळायला Board Games like, Monopoly, Bingo, Snake & Ladder etc नाहीत, फक्त Puzzles, Blocks आणी लेगोस आहेत. Computer Game ही २-३ च चालतात. पण Dance, Drama, Presentations ह्या activities मी घेते (ज्या त्यांनी प्रथमच ह्या DC त केल्या) ज्यात मुल जाम रमतात. मुलांना मी विष-आम्रुत (Duck Duck Goose) शिकवल, मी स्व:ता त्यांच्या बरोबर खेळते आणी आमचे डाव छान रमतात.

मुलांबरोबर मुल होवुन राहिल तर मुला खुष असतात पण सार्‍याच Teachers ला हे जमत नाही आणी काहिंना आवडत नाही. (बरेच पालक मुल दिवस भर इथे काय करतात हे सुद्धा बघत/विचारत नाहीत, मी रोज मुल जे काही करतात ते त्यांच्या Folder मध्ये ठेवते पण बरेच पालक ते बघतही नाहीत Sad )

>>>>ह्या शाळेत AC नाही ह्या भयंकर उकाड्यात फक्त Fan वापरतात (दुपारी मुल झोपतात तेव्हा आणी शाळेच्या काही भागात मुलांसाठी AC खरच गरजेचा आहे)

माझ्या मुलीच्या शाळेतही AC नाहीये. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा धक्काच बसला.मध्ये दोन दिवस heat wave आली होती तेव्हा शाळेला सुट्टी दिली. निदान सिलींग फॅन तरी असावा पण तो ही नाही. २५ मुलांमधे एक टेबल फॅन आहे वर्गात.

सॉरी, ह्या बीबीचं विषयांतर केलं. पण सास चं वाचून अजिबात रहावलं नाही.

बे एरिया मधे ए सी नाही याचं फारसं आश्चर्य वाटत नाही पण न्यू जर्सी भागात सुद्धा ए सी नसेल याची कल्पना नव्हती. असो.

इथल्या बर्‍याच डे केअर मधे एक दिवस बूक डे, एक दिवस शो ऍंड टेल, समर कॅम्प प्रोग्रॅम मधे असलेल्या मुलांना बोर्ड गेम डे असे असतात. मुलं आपापल्य घरनं पुस्तकं, खेळणी , बोर्ड गेम घेऊन जातात. सगळ्या मुलांना ती पुस्तकं वाचून दाखवली जातात.

Pages