सलाम अभिनव बिंद्राला!!!!

Submitted by गिरीराज on 11 August, 2008 - 02:05

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले
इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते. श्वास अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत टि.व्ही.चा आवाज वाढवून भारताचे नाव आणि ऐकण्यासाठी प्राण कानात गोळा करून ऐकत होतो. चीनच्या गतविजेत्या आणि यावेळेच्या रजतपदक विजेत्या झू किनान च्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. क्षण आला अभिनव बिंद्राच्या पदक प्रदानाचा! पण पठ्ठ्या अगदी शांत आणि संयमी निघाला. ज्या अविचलतेने त्याने शेवटचा शॉट घेतला त्याच शांतपणे त्याने पदकाचा स्वीकार केला. आता वेळ होती भारताच्या राष्ट्रगीताची! ’जन गण मन’ ची धून वाजवणे सुरू झाले आणि आपला तिरंगा चीन आणि फ़िनलंडच्या राष्ट्रध्वजाच्याही काही ईंच वर हळूहळू सरकू लागला. मन अगदी भरून आले. एक गौरवाचा क्षण मी अनुभवत होतो!

आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतिल.आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही! जो संयम आणि चिकाटी दाखवत अभिनव ने सुवर्णपदक मिळवले आहे त्याबद्दल एक अभिमान मनात राहील. आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते. आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील.
सलाम अभिनव बिंद्राला!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझापण बिंद्राला सलाम ! ग्रेट न्यूज Happy

वा आता घरी गेल्यावर बातम्यामधे बघता येइल तो अपुर्व क्षण

त्रिवार सलाम अभिनव बिंद्राला!!!
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

अंतिम फेरीत प्रवेश करताना अभिनव चौथ्या क्रमांकावर होता.... आणि चक्क त्याने सुवर्ण पदक जिंकले. मस्तच एकदम!! पदक प्रदान समारंभ बघताना माझ्या अंगावर नेहमीच रोमांच उभे राहते, इथे तर चक्क आपल्या देशाचे राष्ट्रगीत वाजले असेल.... ग्रेट!!
.
गिरी, तुझा शेवटचा परीच्छेद आवडला. परवा दूरदर्शन स्पोर्ट्सवर अंजली भागवतचा एक बाईट (२ मिनीटांची छोटीशी मुलाखत) दाखवला... त्यात तिचं एक वाक्य खुप काही सांगून गेलं... 'I am now preparing for my main game which is on 13th and for which I have really qualified.... " Happy

great ... मी miss केले. संध्याकाळी बघाय्ला हवे.

छान लिहीले आहेस गिरी.

गिरीराज.. मंजूप्रमाणे मीही तुझ्या दुसर्‍या परिच्छेदाशी सहमत...:)

भारताने बैजिंगला एकुण ९९ जणांचे पथक पाठवले आहे.. पण त्यात खेळाडु फक्त ५६च आहेत! उरलेले ४३ म्हणे ऑफीशियल्स आहेत...(आता अभिनव मधे व बाजुला ते ५६ पदाधिकारी.. असा फोटो लवकरच आपल्याला बघायला मिळेल...)

त्याचा हा पराक्रम कुठे बघायला मिळेल का?

मधे तरी नक्की असेल ना? की मागच्या रांगेत ???

माझापण बिंद्राला जोरदार सलाम
भर पावसांत दुष्काळ संपला ब्रेव्हो !!!!!!!!!!!!!!!!!!
गोदेय

सकाळी ९:३० च्या सुमारास दूरदर्शनची क्रीडा वाहिनी चालू केली.. तेव्हा एक शूटींगची स्पर्धा चालू होती.. लवकरच असे लक्षात आले की ह्याच्यात भारताचा अभिनव बिंद्राही आहे.. आणि हेही स्पष्ट झाले की ही स्पर्धा आहे ती पुरुषांची १० मी. एयर रायफल शूटींग अंतिम स्पर्धा...
ह्या वेळे पर्यंत सगळ्या स्पर्धकांच्या पहिल्या पाच गोळ्या मारुन झाल्या होत्या आणि बिंद्रा दुसर्‍या क्रमांकावर होता... तर फिनलंडचा हेन्री पहिल्या क्रमांकावर आणि यजमान चीनचा झू (गेल्या वेळचा ऑलिंपिक विजेता व ऑलिंपिक रेकॉर्ड होल्डर) तिसर्‍या क्रमांकावर होता
६वी गोळी मारुन झाली तेव्हा बिंद्रा आणि पहिल्या क्रमांकाचा फिनलंडचा स्पर्धक हेन्री ह्यांच्यात फक्त ०.४ गुणांचा फरक होता..
७वी गोळी मारुन झाल्यावर हाच फरक ०.२ गुणांचा झाला होता आणि आश्चर्य म्हणजे बिंद्रा आघाडीवर होता..
८वी गोळी मारली गेली तेव्हा हाच फरक ०.१ गुणांचाच राहिला होता आणि परत एकदा बिंद्राच पुढे होता...
९व्या गोळीच्या वेळेस मात्र हेन्री पुढे गेला कारण पात्रता फेरीत त्याला बिंद्रापेक्षा जास्त गुण होते... पण एकूण गुणसंख्या दोघांचीही सारखीच होती..
आणि आता एकच गोळी बाकी होती.. बिंद्रानी ही गोळी मारायच्या आधी कोणाला साकडे घातले काही माहित नाही पण पठ्ठ्यानी १०.८ गुणांचा वेध घेतला आणि ह्याच वेळेस हेन्री फक्त ९.७ गुणांचीच कमाई करु शकला.. आणि तेव्हाच झूने मात्र १०.५ गुणांचा वेध घेत दुसरा क्रमांक पटकावला...
अशा तर्‍हेने एका अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत चवथ्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर झेप घेत अभिनव बिंद्राने भारतासाठी ऑलिंपिक्स मधले पहिले वहिले वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवले.

    m_Air_Rifle_Mens_Event_Beijing_Olympics_2008.jpg

      ==================
      श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
      क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

      त्याचा फोटो टाका ना इथे...

      ==========०००००

      || हरिण ओम ||
      सर्व धर्मान परित्यज्य माम एकम हरणं व्रज |

      http://en.beijing2008.cn/news/sports/headlines/shooting/n214528389.shtml
      अभिनव बिंद्रा याचा फोटो
      -----------------------------------------------------------------------------------
      मी मराठी . मी मराठी .. मी मराठी

      मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
      नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे
      जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
      मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

      फोटो का टाकता येत नाहीये???

      जियो अभिनव... शांत आणि संयमी बिंद्रा. भारताचे राष्ट्रगीत !! अंगावर काटा आला. तो क्षण टीव्हीवर न बघताही... धन्स गिरि.. हो आता तु दुसर्‍या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे वाहिन्यांवरच्या दळणाची आणि पदाधिकार्‍यांबरोबरच्या फोटोची मानसिक तयारी करावी झालं...

      Img214528417_1_.jpg

      ==========================================

      || हरिण ओम ||
      सर्व धर्मान परित्यज्य माम एकम हरणं व्रज |

      अभिनंदन अभिनवचे !!!
      .
      कुणाला तु नळी वर चलतचित्र मिळाले तर इथे टाका ना. भारताचे राष्ट्रगीत..नुसते वाचुनच काटा आला अंगावर.
      .
      गिरी, मस्तच लिहीलेस.

      सलाम अभिनव बिंद्राला!
      खरचं खूप छान बातमी आहे....
      गिरीराज छान लिहीलं आहे... नुसते वाचूनचं अंगावर काटा आला.....

      माझाही मानाचा मुजरा.

      मुकुंद, ऐनबीसी वर आज दिवसा (अमेरिकन) परत ऐकदा दिसेल.

      सुवर्ण पदकाचा मानकरी अभिनव!!! Happy त्रिवार अभिनंदन!!!!!!

      जबरदस्त्.बिंद्राचे त्रिवार अभिनंदन!!!!!!

      अभिनदंन अभिनव....!!!

      भारीच ..अभिनदंन अभिनव....!!!

      शेवटी विश्लेषकांनी त्यांचे बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले
      इतपत मी हवेत तरंगायला लागलो. >>>>>
      अगदी अगदी... रात्री इथे माझा कॉल चालू असताना रेडिफ वर बातमी बघितली... आधी खरच वाटेना... नंतर ऑलिंपि़क च्या वेब साईट वर बघितलं तर डिटेल मधे नाही पण लेटेस्ट मेडल लिस्ट मधे नाव दिसलं... नंतर मला १/२ जणांचे फोन आले.. आणि मी सुमारे १० जणांना फोने करून उठवलं.... सगळे जणं एव्हडे excited होते.. की स्वत:च मेडल जिंकलेत.. Happy

      अंगावर काटा आला. तो क्षण टीव्हीवर न बघताही >>>>> same pinch.. !! मला जवळजवळ पहाटे पर्यंत झोपच नाही लागली.. मेडल जिंकलेल्यांची स्वत:ची अवस्था काय होत असेल कोण जाणे.. !

      अभिनव चा ब्लॉग बघा.. पाऊस पडतोय तिथे अभिनंदनाचा..

      शाब्बास अभिनव! You made the whole India Proud!

      Pages