सलाम अभिनव बिंद्राला!!!!

Submitted by गिरीराज on 11 August, 2008 - 02:05

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले
इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते. श्वास अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत टि.व्ही.चा आवाज वाढवून भारताचे नाव आणि ऐकण्यासाठी प्राण कानात गोळा करून ऐकत होतो. चीनच्या गतविजेत्या आणि यावेळेच्या रजतपदक विजेत्या झू किनान च्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. क्षण आला अभिनव बिंद्राच्या पदक प्रदानाचा! पण पठ्ठ्या अगदी शांत आणि संयमी निघाला. ज्या अविचलतेने त्याने शेवटचा शॉट घेतला त्याच शांतपणे त्याने पदकाचा स्वीकार केला. आता वेळ होती भारताच्या राष्ट्रगीताची! ’जन गण मन’ ची धून वाजवणे सुरू झाले आणि आपला तिरंगा चीन आणि फ़िनलंडच्या राष्ट्रध्वजाच्याही काही ईंच वर हळूहळू सरकू लागला. मन अगदी भरून आले. एक गौरवाचा क्षण मी अनुभवत होतो!

आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतिल.आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही! जो संयम आणि चिकाटी दाखवत अभिनव ने सुवर्णपदक मिळवले आहे त्याबद्दल एक अभिमान मनात राहील. आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते. आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील.
सलाम अभिनव बिंद्राला!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या वेळा ऑलिपिक बघून वैताग आला होता की अनेक छोटे देश कितीतरी पदके मिळवतात आणि भारतासारख्या प्रच.न्ड देशाला खातेही उघडता येत नाही.
अभिनव बिन्द्राने ही ख.न्त दूर केली. खूप आन.न्द झाला. भारतात परत गेल्यावर ह्या वीरावर पैशाचा नि पुरस्कर्त्या.न्चा वर्षाव होवो म्हणजे असे अनेक तरूण ह्याच्याकडून स्फुर्ती घेतील आणि अजून पदके मिळवतील.

अभिमानानी कसल भरुन आलं अभिनव ची बातमी वाचतांना.
तो पदक स्विकारत असतांना राष्ट्रगीत ऐकतांनाच्या भावना तर शब्दात व्यक्त सुद्धा करता येत नाहियेत.
अभिनंदन अभिनव!!!

अभिनवने खर्‍या अर्थाने देशाला मानाचा मुजरा केलाय त्याच्या कामगिरीने.. टीव्हीवर पदक स्विकारताना शांत आणि संयमाने उभ्या असलेल्या अभिनवला पाहुन अंगावर रोमांच उभे राहिले... आणि त्याचा अभिमानही वाटला.. कुठेही फारसा चर्चेत नसताना ,इतरांनी पदकाची अपेक्षा केलेली नसताना ,अनेक अड्चणींना तोंड देत पण स्वतःवर विश्वास ठेवत ज्या धीरोदात्तपणे वाटचाल करत ध्येय गाठण्याची जी अतुलनीय कामगिरी त्याने केली आहे तिला तोड नाही... `हॅट्स ऑफ टू यू अभिनव... ती खरा देशप्रेमी आहेस..'
त्याने जिंकलेले सुवर्णपदक ही भारतीय क्रिडा क्षेत्राच्या दृष्टीने एक प्रेरणा आणि चांगली सुरूवात ठरावी आणि यापुढे एकदाच नव्हे तर वारंवार भारताचा तिरंगा वर फड्कताना ऑलिंपिकमध्ये दिसावा ही सदिच्छा.....

रात्री टीव्हीवर पाहिला तो सोहळा.. राष्ट्रगीत ऐकताना काय वाटलं खरचं शब्दांत सांगू शकत नाही... hats off अभिनव !!!!

हिम्या, टेबल (गुणतालिके) बद्दल धन्यवाद!
काल दुपारी ऑफिसमधे कोणतरी बोलले की बिन्द्राला सुवर्णपदक मिळाले!
अन्गावर मुठभर मांस चढले! Happy
सन्ध्याकाळी घरी गेल्यावर सुवर्णपदक घेतानाचा व राष्ट्रगीताचा शॉट बघितला टीव्हीवर! Happy
अन्गावर रोमांच उठले! Happy
आम्हा सामान्य माणसान्ना आमची कॉलर ताठ करायची सन्धी मिळवून दिल्याबद्दल बिन्द्राला धन्यवाद!
.
आता वर अनेकान्नी म्हणल्याप्रमाणे देशात मिडीया, पुढारी वगैरेन्चा धुमाकुळ सुरू होईल!
काल, टीव्ही बघताना मात्र राहून राहून वाटत होते, की बिन्द्राच्या वैयक्तिक कामगिरीमधे माझ्या देशातील "क्रिडाविषयक परिस्थितीचे" कितीसे सहाय्य झाले असेल?
.
एखाद दुसराच अपवाद बिन्द्रासारख्याचा, इच्छाशक्तिच्या जोरावर, परिस्थितीवर मात करीत यश खेचून आणणारा.....!
हा अपवाद, "अपवादच" रहाणार का???
पुढील पिढीकरता काही आशादायक स्थिती आहे का???
कॅच देम यन्ग वगैरे गोष्टी निव्वळ बाष्कळ बाता म्हणूनच रहाणार का???
.
बिन्द्राचे किन्वा त्याच्या सारख्यान्चे यश आदरणीय, अतुलनीय आहे कारण मला तरी माहीती हे, की किती प्रतिकूल परिस्थितीशी सामना देत देत त्यान्नी यश मिळवले आहे.
आणि म्हणुनच ते, आदरास तसेच जास्तीच्या अभिनन्दनास पात्र आहेत! Happy

...;
आपला, लिम्बुटिम्बु

आता बिंद्रा वरती जो बक्षीसांचा वर्षाव होत आहे तो जर आधीच वेगवेगळ्या क्रिडा प्रकाराला मिळाला असता तर कदाचीत आपण सराव जास्त चांगल्या रीतीने पुर्ण केला असता. कदाचीत जास्त पदके पण मिळाली असती.

अगदी भरुन आले बातम्या पाहताना, खुप मनःपुर्वक अभिननंदन अभिनवचे. आणि चेहर्यावर संयम किती? मी कल्पना करत होते इथे हिमेश रेशमिया असता तर? लल्लु लल्लु गोष्टींनाहि केवढा नाचत असतो.

खूपच अभिमान वाटतो आहे.

अभिनव बिंद्रासाठी राष्ट्रगीत गायला गेलं/धून वाजवल्या गेली, ते सर्व कुठे पहायला मिळेल?

तब्बल सहा डावांत मिळुन आपल्या सचिनला १७६ धावा काढणे जमले नाही. त्यामुळे निराश असताना (मी निराश असताना, सचिन नव्हे) अभिनव बिंद्राचे सुवर्ण पदक सुखावुन गेले. आजच मी New Year's Resolution ठरवीले (१ जानेवारीशी काहिहि देणे घेणे नसताना आपण ती आणि गुढिपाडवा एकाच उत्साहाने साजरा करतो, मग पतेति का नको ?). यापुढे क्रिकेटला जास्त वेळ न देता, इतर सर्व खेळ त्याच उत्सुकतेने पाहणार. ते खेळ व त्यांचे नियम माहीत असो वा नसो. अगदि विभागातील खो खो आणि कबड्डीच्या सामन्यांना देखील हजेरी लावणार.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी मराठी .. मी मराठी ... मी मराठी ....

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

खरचं अभिनव ला मनापासून सलाम !!!

काल ट्रॅफीक जाम मध्ये अडकलो होतो..पीएमपीएमएलला नेहेमीप्रमाणे @# देणे चालू होते..
आणि रेडीओ मिरची वरून ती बातमी कानावर पडली..आणि ईतका खूश झालो की बसल्या जागेवरचं मोठ्ठ्याने हुर्रे$$$$$$ केले..जागेअभावी नाचता आले नाही याचे वाईट वाटतेयं..(काही सभ्य पुणेकरांना माझ्या वागण्याचा झालेला त्रास चेहेर्‍यावर दिसला पण हॅट त्यांची पर्वा अशा वेळेस कोण करतयं..)
आता साईना च्या नेत्रदीपक वाटचालीला शुभेच्छा आणि बाकीच्या टेनिस टीम लाही आणि बॉक्सर लाही...

अगदी भरुन आले बातम्या पाहताना, खुप मनःपुर्वक अभिननंदन अभिनवचे. आणि चेहर्यावर संयम किती? मी कल्पना करत होते इथे हिमेश रेशमिया असता तर? लल्लु लल्लु गोष्टींनाहि केवढा नाचत असतो.


<<<< आशु,
हिमेश तर इथे इमॅजिन करने शक्य नाही पण, आपला हरभजन सिंग असता तर ???:))

खरच कित्ती cool होता अभिनव !

Kumar claims 66kg bronze
Updated: 2008-08-20 17:34:42
(BEIJING, August 20) -- India's Sushil Kumar claimed bronze in the Men's Freestyle Wrestling 66 kilogram class on Wednesday, August 20.

Kumar took three periods to beat Leonid Spiridonov of Kazakhstan 2-1, 0-1 and 1-0.

Spiridonov finished fourth in the 66kg weight class in Athens, while Kumar took 14th place.

वाह! आजही नेमके सुशीलकुमारच्या दोन लढति पहायला मिळाल्या! अमेरिकन पैलवानाला त्याने तसे सहज हरवले.
पण बेलरुसच्या पैलवानाने बाजी मारली होती. शेवटच्या बाऊटमध्ह्ये अचानक सुशीलकउमारने असे काही डाव खेळले की त्याला सलग ४ चार गुण मिळाले.

अभिनंदन!!!!!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

ब्रॉन्झ पदक मिळाल्यावर अभिनन्दन करण्याची प्रथा मायबोलीवर नाही का? दोनच पोस्ट...? बिच्चारा....

जागो मोहन प्यारे, कृपया 'बैजिंग ऑलिंपिक्स २००८' हा बा.फ. पहा.. तिकडे सुशिल कुमार आणि विजेंदर कुमार ह्यांच्यासाठी अभिनंदनपर संदेश आहेत....

तुम्ही पोस्ट टाकूनही अभिनंदन न केल्यामुळे कांस्य पदक विजेते अजूनच बिच्चारे झालेत त्याचं काय?? Happy

Happy

अभिनव, सुशिल, आणि विजेन्दर या तिन्ही वाघान्चे अभिनन्दन.

विरु, अखिल, जितेन्दर, सायना लगे रहो.

Pages