शहर विद्रूपीकरण पुरस्कार : भाऊ फ्लेक्स काढा मोहीम

Submitted by Madan Hunkare on 25 November, 2026 - 04:00

पुण्यात मनपातर्फे "भाऊ फ्लेक्स काढा" ही मोहीम सुरू झाली आहे. यासाठी एक पोर्टल बनवलं आहे. ज्यांचे अनधिकृत फ्लेक्स आहेत त्यांनी ते स्वतःहून काढावेत असे आवाहन मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी केले आहे. त्यानंतर या पोर्टलवर आलेल्या तक्रारीमधल्या बॅनरवर कारवाई होणार आहे. बुलडोझरच्या सहाय्याने बॅनर काढले जाणार आहेत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग लावणार्‍यांवर तर कारवाई होणारच आहे पण बॅनरवर फोटोत दिसणार्‍या चेहर्‍यांवर देखील गुन्हे नोंदवले जाणार आहेत. पाडापाडीचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल.

या बॅनर लावणार्‍यांची नावे प्रसिद्ध केली जाणार होती. इतकेच नाही तर त्यांना शहर विद्रूपीकरण पुरस्कार दिला जाणार आहे असे मनपा आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार भाजपच्या नगरसेवकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. सर्वात जास्त तक्रारी सत्ताधारी नगरसेवकांच्या विरोधातच आलेल्या आहेत.

मनपा आयुक्त एकदमच जोशात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांच्या विरोधात फर्गसन रस्त्यावरच्या function at() { [native code] }इक्रमणासंबंधात आंदोलन केले होते. मनपा भवनात भाजपचे नेते व कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले होते. या रस्त्यावर परप्रांतीय अल्पसंख्यांकांचे अनधिकृत स्टॉल्स आहेत आणि महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे होते.

मनपा आयुक्तांनी बुलडोझर घेऊन कारवाईला सुरूवात केल्यानंतर मात्र भाजपच्याच नगरसेवकांनी अधिकार्‍यांना जाब विचारायला सुरूवात केली. दमदाटी केली. तरी अधिकारी ऐकत नाहीत म्हटल्यावर उपायुक्तांना फोन करून कारवाई थांबवायला लावली. पण स्वत: आयुक्तच तिथे आले आणि त्यांनी कारवाई सुरू केली. सध्या शहरभर बुलडोझर कारवाई सुरू आहे. व्यापार्‍यांची function at() { [native code] }इक्रमणे हटवली जात आहेत. हे सर्व भाजपचे देणगीदार आहेत. व्यापारी संतप्त झाले आहेत. त्यांनी पुणे बंदचा इशारा दिला आहे. पण आयुक्त ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

दरम्यान भाजपच्या नेत्यांना उघडपणे कारवाईला विरोध करणे अशक्य झाले आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली आहे.
तुमचे काय मत आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुक्तांनी अतिक्रमणे काढली ते ठीक. त्यामुळे व्यापार्‍यांना नुकसान झाले, त्यांची मुजोरी मोडून निघाली तेही ठीक. पण...
इतकी अतिक्रमणे ज्यांच्या 'अर्थपूर्ण' देखरेखीखाली झाली त्या अतिक्रमण विभागातील अधिकारी, वॉर्ड ऑफिसर इ. महापालिकेच्या कर्मचार्‍यांवर का कारवाई होत नाही? त्यांच्या 'आशिर्वादा'शिवाय इतकी अतिक्रमणे शहरात होऊच शकत नाहीत. शेवटी आपल्या कराच्या पैशातून नेमलेले सरकारी नोकर कधीही स्वतःवर आंच येऊ देत नाहीत आणि हे दुर्दैवी आहे. खरे तर नागरिकांनी आयुक्तांना याचा जाब विचारायला पाहिजे पण ते 'साहेबांनी' फार चांगले केले म्हणून त्यांची आरती ओवाळत आहेत. एक नागरिक म्हणून आपली यत्ता लईच खालची आहे.