शहर विद्रूपीकरण पुरस्कार : भाऊ फ्लेक्स काढा मोहीम
Submitted by Madan Hunkare on 25 November, 2026 - 04:00
पुण्यात मनपातर्फे "भाऊ फ्लेक्स काढा" ही मोहीम सुरू झाली आहे. यासाठी एक पोर्टल बनवलं आहे. ज्यांचे अनधिकृत फ्लेक्स आहेत त्यांनी ते स्वतःहून काढावेत असे आवाहन मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी केले आहे. त्यानंतर या पोर्टलवर आलेल्या तक्रारीमधल्या बॅनरवर कारवाई होणार आहे. बुलडोझरच्या सहाय्याने बॅनर काढले जाणार आहेत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग लावणार्यांवर तर कारवाई होणारच आहे पण बॅनरवर फोटोत दिसणार्या चेहर्यांवर देखील गुन्हे नोंदवले जाणार आहेत. पाडापाडीचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल.
विषय:
शब्दखुणा: