हिंदी चित्रपटांमध्ये पूर्वापार काळापासून सरसकटपणे वापरल्या गेलेली काही प्रमेय मला फार बालिश वाटत आलेली आहेत . तुमचं त्यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी काही प्राथमिक स्वरूपातली दोन-तीन उदाहरणे इथे देतो
१. चित्रपटातील नायिका ही बालिकावस्थेतून तारुण्यात पदार्पण करत असताना देहाने यौनात पोचली तरी मनाने ते अजून बालिकेसारखी अल्लड आणि निष्पाप आहे हे दाखवण्याची हौस हिंदी दिग्दर्शकांमधे पूर्वापार चालत आलेली आहे आणि हे दाखवण्यासाठी ( खरंतर पंधरा सोळा वर्षाची नटी मला आजवर कधीच दिसलेली नाही . तिच्या भूमिकेत ३५~४० वर्षाची प्रगल्भ नटी आपण प्रेक्षकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यांवर सतत मारली गेलेलीआहे आणि ती ते सहनही करत आलेले आहेत) पण त्यातूनही ते अल्लड दाखवण्यासाठी; साधारण आठ नऊ वर्षांच्या मुलांबरोबर लगोरी विटी दांडू सारखे खेळ खेळताना दाखवलेली कित्येक चित्रपटात पाहत आलेलो आहोत.. त्यावेळेला मला ती निश्पाप बालिका वगैरे न वाटता मंदबुद्धीची किंवा स्लो लर्नर वगैरे असावी असेच वाटत आले आहे..
२. बऱ्याच वेळेला चित्रपटातले पात्र तीन-चार दिवस उपाशी राहून अचानक त्याच्यासमोर पक्वानांचं भरलेलं ताट आल्यावर तो ज्या पद्धतीने ते खाताना दाखवतात... म्हणजे हात कोपरापर्यंत बरबटलेले आणि चेहरा कापाळापासून गळ्यापर्यंत बरंबटलेला.. आणि पाहणार्याला अतिशय किळस वाटेल अशा पद्धतीने तो खाताना दाखवतात ते बघून मला त्या व्यक्तिरेखा बद्दल आपुलकी किंवा दया न वाटता किळसच वाटते. सर्व आति सुशिक्षित व्यक्तिरेखा अचानक इतक्या गलिच्छ पद्धतीने कशा काय वावरू शकतात आणि तिथे दिग्दर्शकाला तसे ते अपेक्षित का असते आणि ती प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारावे असे का वाटते हे मला खरंच कळत नाही
अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे.. वाचकांना असेच वाटते का? त्यांचे या संदर्भात काय मत आहे हे निश्चित समजून घ्यायला आवडेल.
अशाच प्रकारचे इतर काही प्रसंग कोणाला खुपत आलेले असतील तर त्याही बद्दल प्रतिसादामध्ये लिहायला हरकत नाही !
पहिल्या पॉईंटबद्दल १००% सहमत.
पहिल्या पॉईंटबद्दल १००% सहमत.
मराठी सीरिअलमधली हिरॉईन असेल तर तिने मोठी ओढणी फलकावत, गिरकी मारत झाडाला बांधलेला झोका/नसल्यास घरातला पडदा हलवणे, धाकट्या भावा-बहिणीला उगीचच टीझ करणे, म्हाताऱ्या आजी-आजोबांना पाठीमागून येत खांद्याला पकडणे मस्ट असते.
चांगल्या तिशीतल्या माधुरीला चॉकलेट लाईम ज्यूस गाण्यात आचरटपणा करताना दाखवले आहे.
त्यामानाने जंगलीमध्ये सायरा बानो वाटली होती तारुण्यात पदार्पण करणारी आणि तिने वेडे चाळे केले नव्हते.
हिरॉइन आणि २ प्रेमी असा तिढा
हिरॉइन आणि २ प्रेमी असा तिढा असेल तर तिचे मत लक्षात न घेता तिची एकमेकांकडे टोलवाटोलव आणि त्याग वगैरेची जी चढाओढ लागते ती हास्यास्पद असते. महामूर्खपणा.
वरच्या लेखात आणि
वरच्या लेखात आणि प्रतिक्रियांत आलेल्या सगळ्याच पॉइंट्स शी सहमत. तो लडिवाळपणा खऱ्या बाली उमर वाल्यांना थोडा तरी शोभेल. पण इतर वेळी डोक्यात जाईल. खूप जुन्या मुव्हीज मधे माला सिन्हा हा प्रकार अतिशय वाईट करायची. काय तो बावनकशी बावळट्टपणा! यक्क!
शिवाय
नणंद किंवा आत्या अतिशय पाताळयंत्री दाखवतात ते पण मला फारसे आवडत नाही. बहुसंख्य स्त्रिया या कुणाची तरी आत्या किंवा नणंद असतातच. ही नाती काय परग्रहावरून येतात का काय!
दुसरं म्हणजे मोठी सून अतिशय डोक्यात जाणारी त्यागी असते. अगदी संधी असून पण आपली बाजू न मांडता सहन करत राहणे. मग शेवटी अचानक दुसऱ्या सोर्सेस कडून उलगडा होऊन घरच्यांना पश्चात्ताप होणे वगैरे. पण ही बाई तोंड उघडणार नाही.
संस्कार असतात.
संस्कार असतात.
लहानपणी आई वडील सांगतात चोरी करू नये, खोटं बोलू नये. जे जे नये ते सगळं खरं तर किती नैसर्गिक आहे, पण संस्कारांमुळं हे नये, ते नये अंगवळणी पडतं. तसंच आहे चित्रपटांचं. त्याने प्रेक्षकांना वळण लावलं. आता आपण बायको सोबत गाणं म्हणत रस्त्याने जातो का? पण ते दाखवतात तसं. लेखकाला पण गाणं खटकलं नाही. संस्कार.
<<मोठी ओढणी फलकावत, गिरकी
<<मोठी ओढणी फलकावत, गिरकी मारत झाडाला बांधलेला झोका/नसल्यास घरातला पडदा हलवणे, धाकट्या भावा-बहिणीला उगीचच टीझ करणे, म्हाताऱ्या आजी-आजोबांना पाठीमागून येत खांद्याला पकडणे मस्ट असते.>>
माझे मन अगदी बरोबर!
सामो ; एके काळी अशा कथांचा
सामो ; एके काळी अशा कथांचा सुकाळ होता !
पारिजाता ;
पारिजाता ;
<<दुसरं म्हणजे मोठी सून अतिशय डोक्यात जाणारी त्यागी असते. अगदी संधी असून पण आपली बाजू न मांडता सहन करत राहणे>>
माझं तर असे प्रसंग पाहताना " अगं बोलना बये !!" अशी स्थिती होते !
मदन ;
मदन ;
बरोबर आहे.
आपले वैचारिक कंडिशनिंग झाले आहे.
जुन्या हिंदी सिनेमात पावसात
जुन्या हिंदी सिनेमात पावसात भिजून मग आडवाटेच्या पडक्या घरात एखादी(च) “तूफ़ानी रात” घालवल्यानंतर लग्गेच पुढच्या सीन मधे “मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ “ … अरे काय? Such Fertile Myrtle babe and such virile dude.
Ultra fecund !!!
जरा मेहनत करायला नको यांना, एकजात सगळे कपल्स first time lucky.
अत्यंत नावडते आणि बालिश portrayal.
त्याहीपेक्षा वाईट म्हणजे पडकी
त्याहीपेक्षा वाईट म्हणजे पडकी घरं एकदम वेल मेंटेन.कोणीही नायक नायिकेला डोक्याला फडकं बांधून त्या घरातली जळमटं काढताना, बेडूक साप पाली मांजरं कुत्रे हाकलताना,धूळ साचलेलं निसरडं बाथरूम घासून काढताना दाखवत नाही.अश्या जुन्या पडक्या घरात नीट अंघोळ करून कपडे धुवायला रनिंग पाणी पुरवठा असतो.कपडे धुवून टांगायला दोरी असते.शेकोटी पेटवायला न सादळलेलं जळण आणि काडेपेटी असते.
एकजात सगळे कपल्स first time
एकजात सगळे कपल्स first time lucky >>>
यांचा एक उपप्रकार म्हणजे लग्न होऊन फक्त सुहागरात साजरी करणारी जोडपी. त्यांनाही एका फटक्यात लॉटरी लागते. अश्या कामसू जोडीतला पुरुष यानंतर लगेचच परागंदा होतो किंवा गचकतो. लग्न न झालेलं जोडपं असल्यास त्याचं लगेचच दुसरीशी लग्न किंवा मंगनी होते.
या लोकांना भिजल्यामुळे सर्दी-खोकला, भुकेमुळे ऍसिडिटी-डोकेदुखी होत नाही. गवताच्या भाऱ्यावर झोपले तरी शिंका येत नाहीत. भूताखेतांचीही भीती वाटत नाही. धो धो कोसळणाऱ्या पावसात एकवेळ हिरॉईन वाहून जाईल पण तिचा मेकअप मात्र तस्साच राहतो.
त्याहीपेक्षा वाईट म्हणजे पडकी घरं एकदम वेल मेंटेन >>>>
तर काय? त्या पडक्या घरात एक उंदीर, घूस किमानपक्षी पाल किंवा झुरळ नसते. इथे आपलं राहतं घर १० दिवस बंद असेल तर आधी झाडून काढावं लागतं आणि बाल्कनीत कबुतरं त्यांचा पाळणा हलवून मोकळी होतात.
ही यादी न संपणारी होणार १००%.
ही यादी न संपणारी होणार १००%. कुठेतरी वाचलेलं आठवतंय की हिंदी सिनेमा हा प्रेक्षकाचे वय ८ आहे असे समजून बनवला जातो. ते अगदी तंतोतंत खरं आहे. करोडोंचे बजेट असलेले मोठ मोठे बॅनर देखील प्रेक्षकांच्या आकलनशक्तीचा असा घोर अपमान का करतात हे समजत नाही.
- ४५शीचा नायक कॉलेज डे ला, टी शर्टच्या वर बटने न लावलेला शर्ट घालून बोटावर वही फिरवत मित्रांच्या कोंडाळ्यात दाखवणे. हे दाखवले की नंतरच्या ५ मिनीटात जर गाणे, तेही हिरॉईनला उद्देशून नाही दाखवले तर पैसे परत!
- नटाच्या बरोबर एक स्टेपनी सारखा एखादा सह अभिनेता (सहसा जाड, गुबगुबीत, मुलींना अजिबात आवडणार नाही असा) दाखवून काँट्रस्ट वाढवणे. शिवाय हा मध्ये मध्ये विनोद पेरणे, निरोप पोहोचवणे इ. कामाला तत्पर.
- कोणीही मृत्यू पावले तर असलेल्या प्रत्येक पात्राचे रडणे शोक इ. दाखवून प्रत्येकाला 'अभिनय' करण्याची संधी दिलीच पाहिजे. बायको वगैरे असेल तर बांगड्या फुटणे, कुंकू पुसणे इ. साग्रसंगीत दाखवलेच पाहिजे. अरे मेला ते समजलं ना, का उगीच अत्याचार?
इतर देशांतील सिनेमात जी सटॅलिटी असते त्याचा मागमूसही नाही. त्यामुळे हिंदी सिनेमा पाहण्याचे धाडस क्वचितच होते.
मनोरंजक धागा.
मनोरंजक धागा.
कणेकरांनी आधीच पुंगी वाजवलेली असल्याने नव्याने काय लिहायचं हा प्रश्न पडला. प्रतिसाद पण मस्त आहेत.
>> . अरे मेला ते समजलं ना, का
>> . अरे मेला ते समजलं ना, का उगीच अत्याचार?
अक्षरशः. केवढं एलबोरेट. अगदी नाकात कापूस वगैरे. तिरडीचे पॅनोरमा शॉट्स, टॉप view, साईड view.
डेड बॉडीचे काय ऑब्सेशन यांच्या कॅमेराला काय माहित.
चित्रपट किंवा मालिकांमध्ये
चित्रपट किंवा मालिकांमध्ये कुणी महत्त्वाची व्यक्तिरेखा सैपाक करताना दाखवली असेल तर ती हमखास ज्या पळी किंवा डावाने पदार्थ ढवळत असेल त्यालाच सरळ तोंड लावून चव घेते व पुन्हा तीच पळी/डाव पदार्थात बुचकळते. अरे वेगळा चमचा वापर ना! ही कुठली शबरीची पाककृती?
ही कुठली शबरीची पाककृती? >>
ही कुठली शबरीची पाककृती? >>
सग सगळ्यांची निरीक्षणे आणि
सग सगळ्यांची निरीक्षणे आणि प्रतिसाद भन्नाट!
हा धागा मजेदार आहे
हा धागा मजेदार आहे
साऊथ च्या सिनेमाबद्दल तर बोलायलाच नको.. सगळंच अचाट
लेख आणि सगळेच प्रतिसाद भारी
लेख आणि सगळेच प्रतिसाद भारी
बहुतांश निरीक्षणे चपखल आणि मजेशीर आहेत.
मजेदार धागा.. शबरीची पाककृती
मजेदार धागा..
शबरीची पाककृती
हिंदी सिनेमा हा प्रेक्षकाचे
हिंदी सिनेमा हा प्रेक्षकाचे वय ८ आहे असे समजून बनवला जातो. ते अगदी तंतोतंत खरं आहे. >>>हे कोण्या तरी खूप मोठ्या प्रथितयश बॉलिवूड डायरेक्टरने म्हटलेलं आहे, मी कुणातरी ऍक्टर टर्न डायरेक्टर चा पॉडकास्ट पाहत होतो तेंव्हा त्याने त्या लिजंड डायरेक्टर ने त्या नवीन नवीन डायरेक्टर झालेल्या ऍक्टर ची भीती मिटवायला दिलेल्या सल्ल्यात असं एक वाक्य होत अशी आठवण सांगितलेली अस मला आठवतंय, पण तो पॉडकास्ट कोणाचा होता तेच मी विसरलो
सगळे गरीब हिरो बी ए मध्ये
सगळे गरीब हिरो बी ए मध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट असतात आणि पहिल्या पगारात सुती साडीच आणतात - आई किंवा बहिणीसाठी--- बाप नेहमीच दारुड्या वा स्वर्ग किंवा नरकात असतो.
- कॉलेजमधे जाताना फक्त हातात
- कॉलेजमधे जाताना फक्त हातात १ किंवा २ वह्या. बाकी काही सामग्री, backpack वगैरे काही नाही!
- कॉलेजमधे डान्स आणि स्पोर्ट्स याव्यतिरिक्त बाकी काही उद्योग न करणे.
- रात्री झोपताना साडी, दागिने आणि पूर्ण मेकपमधे झोपणे, सकाळी उठल्यावरही तो अजिबात बदललेला न दिसणे.
- बर्फाळी वातावरणात हिरो पूर्ण गरम वुलन कपड्यात आणि हिरॉईन स्लीवलेस ब्लाऊज आणि तलम शिफॉनच्या साडीत.
हिरो हिरॉइन खासगी क्षण साजरे
हिरो हिरॉइन खासगी क्षण साजरे करत असताना गाणं म्हणतात, त्या वेळी हाय हुकू हाय हुकू हाय हाय म्हणत कसरती करत दीडशे जण आनंद व्यक्त करत असतात. नशीब हनीमूनला कोरस नसतो.
ही कुठली शबरीची पाककृती?
ही कुठली शबरीची पाककृती?
<<<<<<
नशीब हनीमूनला कोरस नसतो.
<<<<<
रोजा मधले रुक्मिणी रुक्मिणी
बॉम्बे मधले हम्मा हम्मा
रोजा मधले रुक्मिणी रुक्मिणी
रोजा मधले रुक्मिणी रुक्मिणी
ते लोक बाहेर नाच करत होते.
बॉम्बे मधले हम्मा हम्मा>>
हो पण तो खोलीबाहेरचा कोरस होता
हो पण तो खोलीबाहेरचा कोरस
हो पण तो खोलीबाहेरचा कोरस होता >> मॅनर्स !
शबरीची पाककृती हनीमून कोरस
शबरीची पाककृती 😁
हनीमून कोरस 😁
दुसरे एक म्हणजे चित्रपटाची
दुसरे एक म्हणजे चित्रपटाची कथा कुठेही घडत असली, पात्रे कोणत्याही जाती-धर्माची, कोणतीही भाषा बोलणारी असली तरी गाणी मात्र पंजाबीच गातात … सोणा सोणा, शावा शावा, सोणिया माहिया …
महाबोअर
आणि असंच अगदी नॉर्मल देवभोळं
आणि असंच अगदी नॉर्मल देवभोळं घर असलं तरी संगीतकाराची 'गुडलक' श्रद्धा असेल तर चित्रपटात घाऊक प्रमाणात सजदे,मौला, इंशाहल्ला, माशाल्ला आणि अल्ला असतात.म्हणजे आपल्या अजय अतुल च्या पिक्चर मध्ये एखादं देवाचं गाणं असतं तसं.
करवा चौथ तर कोणीही करतं.ऐश्वर्या चं कुटुंब एकदम सर्टीफाईड सेल्फ प्रोक्लेम(म्हणजे ती सलमान खान बरोबर गाण्यात भवाई वगैरे सांगते) गुजराती राजस्थानी असलं तरी लग्न झाल्यावर करवा चौथ करतात.(कोणीही भोचक शेजारच्या मावशी काकू येऊन तिला 'अगं आपल्या घरी नाही ही रीत' म्हणून झापत नाही.)
Pages