सुरेशचं आपली पत्नी मीनावर प्रेम होतं. मीना अभ्यासात खूप हुषार होती. गरीब परिस्थितीमुळे तिचे वडील नरसिंह पद्यनाथ यांनी तिचं लग्न सुरेशशी लावून दिलं होतं.
सुरेशने बीकॉम एलएलबी, एमबीएचं शिक्षण घेतलं होतं आणि तो गावात शेतमजूर होता. तो गावात लोकांच्या शेतात राबायचा आणि जो रोज मिळेल त्यात दोघांचं पोट भरायचं. एक दिवस मीना त्याला म्हणाली, "आपण असं आयुष्य किती दिवस जगणार?"
हे बोलताना तिचे मोठे डोळे मोठे व्हायचे आणि ती मान खाली झुकवून डोकं उजवीडावीकडे हलवायची.
सुरेशच्या चेहहर्यावर शांत भाव होते. त्याने मीनाकडं प्रेमानं पाहिलं.
मीना म्हणाली, "आपल्याला मुलं होतील. त्यांचं भविष्य आपण घडवू शकणार नाही. म्हणून आपण "
असं म्हणून तिने आपला चेहरा सुरेशच्या चेहर्याजवळ आणला. दोघांनीही डोकं डावी उजवीकडे हलवलं. आता तिला जे बोलायचं होतं ते सुरेशनेच बाईचा काढून बोललं " म्हणून मी काय म्हणते कि मी एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करून परीक्षा देईन. जर मी पास झाले तर अधिकारी होईन."
इथपर्यंत सुरेशच मीनाचे डायलॉग्ज बोलला मग मीनाने आपले म्हणणे स्वतःच पूर्ण केले, " मग आपले दिवस पालटतील"
सुरेशने समजुतीच्या सुरात मान हलवली. त्याच्या नजरेत कौतुक होतं. मीनाच्या चेहर्यावर आनंद, डोळ्यात हसू होतं.
ती दररोज अभ्यास करू लागली. एक दिवस मीना म्हणाली "मला ही जागा कमी पडते आणि चांगल्या क्लासची गरज आहे" सुरेशने वाक्य पूर्ण केलं "आपण शहरात जाऊन राहू"
ते मग अहमदनगरला आले.
सकाळी मीनाने नाश्ता बनवला. एक ताट तिने स्वतः घेतलं आणि एक ताट सुरेशला दिलं. सुरेशचा हात ताटातून आरपार गेला. तो प्रेमाने हसला. " त्याने ताटाकडे पाहिलं. त्यात ब्रेड, मस्का, पोहे आणि रसमलाई होती. त्याने डोळे मिटले. आता त्याने चपातीचा तुकडा तोडून भाजीचा घास घेतला. भातावर वरण घातले आणि मिरचीचा स्वाद घेतला. ताटात आता भाकरी अर्धी शिल्लक होती. कांदा फोडलेला होता. "असंच गावचं जेवण चांगलं" असं तो म्हणाला. मग दोघांनी एकमेकांकडे बघत मान उजवी डावी कडे हलवली. सुरेशचा चेहरा शांत आणि निश्चयी होता. तर मीनाच्या चेहर्यावर आनंद आणि हसू होतं. हसल्यावर ती सुंदर दिसायची.
सुरेश म्हणाला "तू आता अभ्यास कर मी काम शोधतो"
तिने पुन्हा डावीउजवीकडे मान हलवली. तो दाराकडे पाठ करून खिडकीकडे गेला आणि पुन्हा उलटा चालत दरवाजातून बाहेर गेला. ती उठली. खिडकीकडे गेली. आता तिथे दरवाजा होता. तिने तो बंद केला. आता दरवाजा गायब होऊन पुन्हा खिडकी आली. तिने पुन्हा मान हलवली. तिथे एक टेबल होतं. त्याच्यावर पुस्तकं ठेवून ती पुस्तकात रेघा मारू लागली. रेघ मारली कि ती समजलं या अर्थाने मान हलवायची.
क्रमशः
हे जे काय आहे ते आवडले आहे.
हे जे काय आहे ते आवडले आहे.
अशी ही हलवाहलवी आवडली आहे.
अशी ही हलवाहलवी आवडली आहे.
बरं असतं असं काही व्हिज्युअलाईझ सुध्दा करायला
हाहा ए आइ स्टोरीज....
हाहा ए आइ स्टोरीज....