मी अर्थातच सह्याद्रीच्या बाजूने आहे. आरे वृक्षतोडी वेळा सुद्धा माझी अशीच पर्यावरणवादी भूमिका होती. सरकार कुठलेही असो याने मला फरक पडत नाही. तरीही या सरकारचे यात आर्थिक हितसंबंध गुंतले असणार याची मला वैयक्तिकरीत्या पुरेपूर खात्री आहे.
पण धाग्यावर चर्चा एकाच बाजूने किंवा माझ्या वैयक्तिक मताच्या अनुषंगाने व्हायला नको म्हणून मी AI च्या मदतीने खालची पोस्ट लिहिली आहे.
तरी त्यातील एखादे तपशील चुकीचे असल्यास सांगा. सुधारणा करू. चर्चा दोन्ही बाजूने होऊ द्या.
-----------------
कर्जतमधील टोरेंट पॉवर प्रकल्प आणि सह्याद्रीतील वृक्षतोडीचा वाद : नेमके सत्य काय?
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत ऊर्जा-साठवण प्रकल्पामुळे सध्या मोठा पर्यावरणीय आणि राजकीय वाद निर्माण झाला आहे.
गुजरातस्थित टोरेंट पॉवरच्या माध्यमातून सुमारे ₹१३,५०५ कोटींचा Saidongar-I Karjat Off-Stream Open Loop Pumped Storage Project उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सायडोंगर, पाली, कोतवाल खलाटी आणि धाक परिसरातील सुमारे २३३ हेक्टर वनजमीन वळवण्याची आवश्यकता आहे.
१. वादाचे मुख्य कारण : ३२,४९० झाडांची वृक्षतोड
वन विभागाच्या १४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, प्रकल्पासाठी ३२,४९० झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आल्याचे वृत्त आहे. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात प्रत्यक्ष वृक्षतोड सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध सुरू केला.
या वृक्षतोडीमुळे सह्याद्रीच्या वनसंपत्तीचे नुकसान होईल, वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास प्रभावित होतील आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर दोन लाखांहून अधिक झाडे धोक्यात असल्याचे दावेही केले जात आहेत. मात्र, या संख्येला अधिकृत पुष्टी उपलब्ध नसल्याने ती सिद्ध झालेली वस्तुस्थिती म्हणून मांडणे योग्य ठरणार नाही.
२. स्थानिकांचा विरोध आणि राजकीय प्रतिक्रिया
प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबरोबरच स्थानिकांचा सहभाग, जमिनीचे प्रश्न आणि निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता यांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि पर्यावरणाच्या प्रश्नांवर भूमिका मांडणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रकरणात चिंता व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.
वाढत्या विरोधानंतर २६–२७ ऑक्टोबरच्या वृत्तांनुसार वन विभागाने वृक्षतोड थांबवली आहे. मात्र, प्रकल्प रद्द झालेला नाही आणि वृक्षतोड कायमस्वरूपी बंद राहणार आहे, अशी अधिकृत घोषणा झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.
३. सरकार आणि कंपनीची बाजू काय आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टोरेंट पॉवर कंपनीच्या मते, वाढत्या सौर व पवनऊर्जेमुळे निर्माण होणारी विजेची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी पंप्ड-स्टोरेज प्रकल्प महत्त्वाचा आहे.
या तंत्रज्ञानात विजेची उपलब्धता जास्त असताना पाणी उंच जलाशयात पंप केले जाते आणि गरजेनुसार ते खाली सोडून वीज निर्माण केली जाते. त्यामुळे ऊर्जा साठवण आणि वीजपुरवठ्याची स्थिरता सुधारण्यास मदत होते.
सरकार आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे १६ किलोमीटर आणि भीमाशंकर मंदिरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. प्रकल्पाचे घटक अभयारण्याच्या आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्राच्या बाहेर असल्याचा त्यांचा दावा आहे.
W
मात्र, अभयारण्याच्या सीमांबाहेर प्रकल्प असणे म्हणजे आसपासच्या जंगलांवर, पाण्याच्या प्रवाहावर किंवा वन्यजीवांच्या अधिवासावर कोणताही परिणाम होणार नाही, याची आपोआप हमी मिळत नाही.
४. भरपाई म्हणून ९०,००० झाडे लावण्याची योजना
कंपनीच्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या परिसरात आणि हरित पट्ट्यात सुमारे ६०,००० झाडे लावली जाणार आहेत. तसेच सुमारे २५३ हेक्टर बिगर-वन जमीन भरपाई वनीकरणासाठी वन विभागाकडे देण्यात आली असून, त्या जमिनीवर आणखी ३०,००० झाडे लावण्याची योजना आहे.
अशा प्रकारे एकूण ९०,००० झाडे लावण्याचे नियोजन आहे.
परंतु, नवीन रोपे लावणे आणि अनेक वर्षे वाढलेले नैसर्गिक जंगल जतन करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नव्या वृक्षारोपणाचे अस्तित्व, झाडांची जगण्याची टक्केवारी, स्थानिक प्रजातींची निवड आणि जैवविविधतेचे संवर्धन यांची प्रत्यक्ष देखरेख होणे आवश्यक आहे.
५. खरा प्रश्न : विकास की पर्यावरण?
या वादाकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहण्याऐवजी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत.
• प्रकल्पासाठी पर्यायी जागांचा आणि कमी पर्यावरणीय हानी करणाऱ्या पर्यायांचा पुरेसा अभ्यास झाला आहे का?
• वनजमीन वळवण्याच्या आणि वृक्षतोडीच्या सर्व अटींचे पालन होत आहे का?
• स्थानिक ग्रामस्थांच्या हरकती, हक्क आणि उपजीविकेच्या प्रश्नांचा योग्य विचार झाला आहे का?
• भरपाई वनीकरणातील झाडे प्रत्यक्ष लावली जातील, जगतील आणि त्यांची पारदर्शक देखरेख होईल, याची खात्री कोण देणार?
• प्रकल्पाच्या दीर्घकालीन ऊर्जा फायद्यांची तुलना जंगल, पाणी, माती आणि जैवविविधतेवरील संभाव्य परिणामांशी स्वतंत्रपणे करण्यात आली आहे का?
निष्कर्ष
ऊर्जा सुरक्षा आणि नवीकरणीय ऊर्जेची साठवण ही महाराष्ट्राची गरज आहे. परंतु, त्यासाठी नैसर्गिक जंगलांचे नुकसान किती अपरिहार्य आहे, पर्यायी मार्ग कोणते आहेत आणि पर्यावरणीय अटींची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याची वस्तुनिष्ठ तपासणी होणेही तितकेच आवश्यक आहे.
विकासाला विरोध करणे हा एकमेव पर्याय नाही; परंतु विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नुकसान दुर्लक्षित करणेही योग्य नाही.
सह्याद्रीचे संरक्षण, स्थानिकांचे हक्क आणि राज्याची ऊर्जा सुरक्षा यांचा समतोल साधणारा पारदर्शक निर्णय हीच काळाची गरज आहे.
https://www.instagram.com
आज या विषयावर महाराजांचा हा AI व्हिडिओ पाहिला आणि अंगावर काटा आला.
https://www.instagram.com/reel/De6uSDuRFfr/?vrfl=MTJyOG1vNWczaHB4aQ==
कोणाला कुठलाही राजकीय उल्लेख टाळून केवळ पर्यावरणप्रेमी म्हणून सह्याद्री वाचवा असे आवाहन करायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्या स्टेटसवर जरूर शेअर करा.
एकीकडे विकास हवा / केला/ करतो
एकीकडे विकास हवा / केला/ करतो सांगायचे पण दुसरीकडे पर्यावरणाचा आणि मध्ये कोणी आले, तर सर्रास दिवसाढवळ्या खून पाडायचा. यापूर्वीचे सरकार पर्यावरणावर हल्ला म्हणून इतकी दिरंगाई करायचे की उद्योजक प्रकल्प बस्त्यात गुंडाळायचा, किंवा देणगी देऊन परवानगी मिळवत असे. एकंदरीत सध्या पाऊस आणि पर्यावरणाची जी काही वाट लावली आहे, त्यावरून येणारी अनेक वर्षे आणि पिढ्या याचे दुष्परिणाम भोगणार आहेत. बाकी विरोधात असताना विरोध होणारच पण कशाकरता विरोध आहे हे जर सत्ताधारी पक्षाला कळत नसेल आणि पाशवी बहुमताच्या बळावर प्रकल्प रेटून नेणार असतील तर पुढील निवडणुक या आणि इतर अनेक मुद्द्यांवर होऊ शकते.
शाहरूख खानचा किंग रिलीज होणार
शाहरूख खानचा किंग रिलीज होणार आहे, त्याच्या प्रमोशनवरून लक्ष हटवायला ही भानगड उकरून काढली.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/De9LxpJlQ2x/?dlrf=aTFhNG5ydDZvbnNm
हा प्रोजेक्ट पोस्टपोन का नाही करत.
सध्याचे दुष्काळ परिस्थिती पाहता विनाकारण हे कन्स्ट्रक्शन , destruction चे काम.
गो फॉर किल. चढाई करा
गो फॉर किल. चढाई करा एकमेकांवर.
कुठेही इतकी जुनी झाडे तोडायला
कुठेही इतकी जुनी झाडे तोडायला माझा विरोधच राहील.
मला तरी ते ३०,००० झाडे तोडून ९०,००० लावणार या दाव्यात तथ्य वाटत नाही. आधी सुद्धा असे बरेच दावे केले गेले आणि बहुतांश फोल गेले. त्यात जी झाडे तिथे आहेत तशीच लावणार की मागे पुण्यात केले तसे फक्त शोभेची पाम वगैरे की ज्यांचा सह्याद्रीला आणि तिथल्या प्राण्यांना काही उपयोग नाही अशी लावणार? आणि आता इतकी झाडे तोडली तर त्यांच्या आडोशाला राहणाऱ्या प्राणी पक्ष्यांचे काय? ते बिबटे असे बाहेर फिरायला लागतात मग.
पुण्यात अशीच बेसुमार झाडेतोड झालेली आहे. आरे मध्ये पण मध्यरात्री सगळे झोपले असताना झाडे तोडली. विकासाच्या नावाखाली फक्त झाडेतोडीला प्रोत्साहन असल्यासारखे वागतात.
हवामान बदलाचे दृश्य परिणाम
हवामान बदलाचे दृश्य परिणाम समोर दिसत असताना अजूनही विकास की पर्यावरण हा प्रश्न मानवाला पडत असेल तर विनाश हा अटळ आहे.
हा प्रकल्प म्हणजे उद्योजक आणि त्यांच्या मदतीने निवडून आलेले सत्ताधीश यांच्या पडद्यामागील भागीदारीचा एक भाग आहे.
खालील मजकूर हा गूगल सर्च करून इथे दिलेला आहे-
टोरेंट पॉवर लिमिटेड (Torrent Power Limited) आणि टोरेंट समूहाने (Torrent Group) निवडणूक रोख्यांच्या (Electoral Bonds) माध्यमातून विविध राजकीय पक्षांना एकूण कोटींच्या निधीचे वाटप केले आहे.
टोरेंट पॉवर लिमिटेडने निवडणूक रोख्यांद्वारे खालील पक्षांना निधी दिला आहे:
• भारतीय जनता पक्ष (BJP): ₹५८ कोटी
• भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (AICC): ₹१७ कोटी
• आम आदमी पार्टी (AAP): ₹५ कोटी
• राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP - महाराष्ट्र): ₹३.५० कोटी
• शिवसेना (Shiv Sena): ₹३ कोटी
• एकूण निधी: ₹८६.५० कोटी (समूहाच्या इतर कंपन्यांसह हा आकडा ₹१८५ कोटींपर्यंत पोहोचतो)
कुणाला मात द्यायचं?
कुणाला मात द्यायचं?
मनसेला एकही पैसा दिलेला दिसत
मनसेला एकही पैसा दिलेला दिसत नाही.
काल राज ठाकरे कर्जतला गेले होते
ते टोल नाक्यावर पण गेले होते.
ते टोल नाक्यावर पण गेले होते.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे
मुंबई पुणे एक्सप्रेस वे बांधून त्याचे पैसे कधीचेच वसूल होऊनही अद्याप टोल चालूच आहे. मधल्या काळात महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख पक्षांची सरकारे आली. या सर्व पक्षांनी हात धुवून घेतले. राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलला, आंदोलन केलं, नंतर त्यांची शासनासोबत मीटिंग झाली. नंतर पुढे काय झालं कुणालाच काही समजलं नाही.
राजकीय भूमिका घेतली पाहिजे म्हणणार्यांनी सांगावं यातल्या कुठल्या पक्षाची भूमिका घेतली तरच तुमच्या जीवाला थंड वाटते? तुम्ही या पक्षांची चाकरी करता म्हणून मतदारांनी या पक्षाच्या वाड्यावर जाऊन जोहार घालायचा का? त्यांनी कुठल्या पक्षाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवणार का? काहीतरी तुम्हाला मिळतं, मतदारांना नाही. जास्त बेताल बडबड करू नका ही हात जोडून विनंती.
<<<विकासाच्या नावाखाली फक्त
<<<विकासाच्या नावाखाली फक्त झाडेतोडीला प्रोत्साहन असल्यासारखे वागतात>>>
१००% सहमत...
पावसाळ्याच्या तोंडावर सुरक्षेच्या नावाखाली सगळी झाडं भुंडी करून टाकतात ते बघूनही प्रचंड चीड येते.
पावसाळ्याच्या तोंडावर
पावसाळ्याच्या तोंडावर सुरक्षेच्या नावाखाली सगळी झाडं भुंडी करून टाकतात ते बघूनही प्रचंड चीड येते.>>>> +११११११
तेही अगदी ऐन मे महिन्यात, कडाक्याचे ऊन पडत असताना!!!
सगळी झाडं भुंडी करून टाकतात
सगळी झाडं भुंडी करून टाकतात ते बघूनही
>>>>
+७८६
एखादा मोठा वृक्ष असा तोडलेला आणि खाली छोटासा रुक्ष ओंडका स्वरूपात दिसतो ते दृश्य नजरेला प्रचंड त्रासदायक असते.. आणि हे नेहमीच्या रस्त्यावरच्या एखाद्या वृक्षाबद्दल सांगत आहे.. बरीच असतील तर ते आणखी विदारक. तिथले स्थानिक जे त्या निसर्गाच्या सानिध्यात लहानाचे मोठे झाले आहेत त्यांना काय वाटत असेल कल्पनाच करू शकतो.
हे सर्व होते कारण ती जी
हे सर्व होते कारण ती जी रिप्लेस्मेंट वाली झाडं लावणार असं सरकार सांगते त्याचा भूतकाळ चांगला नाही. एकदा प्रकल्प झाल्यावर ती खरच लावली की नाहीत ते दाखवायला कोणीच नसतं. खरं तर असले प्रकल्प सुरू व्हायला वर्ष दोन वर्ष सहज जातात. ती जी ९०००० झाडे लावणार असं आता सांगताहेत, ती सुरुवातीलाच ठरलेल्या जागेवर लावावीत. प्रकल्प सुरु होईपर्यंत ती एक दीड वर्षाने मोठी होतील. प्रकल्पासाठी झाडे तोडण्या अगोदर ती वर्षभर जुनी ९०००० झाडं वन्यप्रेमींकडून रिव्ह्यू करून त्यांचं अप्प्रूवल आलं तरच जुनी झाडं तोडायला परवानगी असावी.
त्याच प्रमाणे एखाद्या प्रकल्पामुळे भविष्यात आता आहे त्यापेक्षा कार्बन फूट्प्रिंट्स किती वाढेल याचा अभ्यास असावा आणि ती एखाद्या स्वीकार्य लिमिट्पेक्षा जास्त असेल तर असले प्रकल्प आणूच नयेत. या प्रकल्पात मा.मु. म्हणताहेत की भविष्यातली कार्बन फूट्प्रिंट आता आहे त्यापेक्षा कमी असेल कारण ही विद्युत निर्मिती कोळशामुळे न होता पाण्यामुळे होईल. पण फक्त मा.मु. चे म्हणणे फेस वॅल्यु वर घेऊ नये. त्यांनी पहिला पावसाळा हा रस्त्यांचा डिफेक्ट फाईंडिंग पिरियड असतो असं सांगितलं होतं.
विद्युत निर्मिती ही काळाची गरज आहे. ती शक्यतोवर पर्यावरण पूरक पद्धतीने कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे.
इंडी जर्नल - विद्युत अभियंते
इंडी जर्नल - विद्युत अभियंते मयूरेश वारुंजीकर
https://www.youtube.com/watch?v=Kqn7TvOSP6A
<<<तिथले स्थानिक जे त्या
<<<तिथले स्थानिक जे त्या निसर्गाच्या सानिध्यात लहानाचे मोठे झाले आहेत त्यांना काय वाटत असेल कल्पनाच करू शकतो.>>>
माझ्या घराजवळ एक भला मोठा वड आहे. रस्ता रुंदीकरणाची पाटी लागली गेल्या वर्षी. छातीत कळ येते रोज बघितलं की.
हे लिहून काही उपयोग नाही.
हे लिहून काही उपयोग नाही. याची बातमी प्रसारमा ध्यमांत होती. मायबोलीवरही लिहिलं होतं.
वर्सोवा भाइंदर किनारी मार्गासाठी खारफुटीची झाडं तोडणार. त्याची भरपाई कुठे करणार तर पार चंद्रपूरला.
देवव्रत मेहता पुण्याचे मनपा
देवव्रत मेहता पुण्याचे मनपा आयुक्त असताना सिंहगड रस्स्त्याची झाडं तोडण्याचं फर्मान निघालेलं. त्या वेळी प्रोटेस्ट मधे सामील झालो होतो. मनापासून वाईट वाटलेलं. मोजून दहा बारा टाळकी होती. त्यातल्या दोघांशीच मीडीयावाले बोलले. आमचं तिथे काय काम होतं हे कळलंच नाही. या प्रोटेस्टला विकासविरोधी असं लेबल लावलं. रस्ता ओकाबोका झाला, पण देशी दारूचं दुकान नऊ (जास्तच) वर्षे तसंच होतं. तिथे रस्ता अरुंद होता.
ती झाडं कुठे लावलीत हे मेहतांनाच माहिती.
लोहगाव रस्ता (विमानतळ रस्ता) एका रात्रीत रूंद केला. त्या वेळीही झाडं तोडलेली. त्या कामासाठी कलमाडी विकासपुरूष ठरले. झाडांची तक्रार करणारे विकासविरोधी आणि पर्यावरणतज्ञ माधव चितळे मिस्टर नो झाले.
आता ईडी जर्नलची व्हिडीओ
आता ईडी जर्नलची व्हिडीओ मुलाखत बघत होतो. अर्धी पाहिली.
बरेच प्रश्न निर्माण झाले. काहींचा खुलासा मयूरेश वारंजीकर यांनी केला आहे. पण त्यातून हाती काही लागत नाही.
माझ्या शंका :
१. हल्लीचे सोलर एनर्जी प्रोजेक्टस थेट ग्रीडला जोडलेले असतात का? कि बॅटरी वापरली जाते?
२. विंड टर्बाईन्स रात्रीही वीज निर्माण करतात. त्यालाही बॅटरी वापरण्याची पद्धत होती. आताचं माहिती नाही. थेट ग्रीडला वीज पुरवत असतील तर ते काय तंत्रज्ञान आहे?
३. दिवसा कमी लोड असताना कमी वीज निर्मिती आणि रात्री जास्तीची मागणी असताना जास्तीची वीज निर्मिती असं काही सूत्र आहे का? असेल तर कधीपासून? नसेल तर कधीपासून?
४. पंप स्टोरेज साठी दिवसा कमी मागणी असताना अतिरिक्त वीज म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न ३ चाच उपप्रश्न आहे. थोडक्यात दिवसा मागणी असो वा नसो वीजनिर्मिती तेव्हढी होणारच असे आहे का? असल्यास का?
५. जर तसे नसेल तर पंप स्टोरेजची गरज काय आहे? आणि जर असेच असेल तर मग वाया जाणारी वीज दिवसा पाणी वर चढवण्यासाठी वापरली म्हणजे थोडक्यात डंप लोड म्हणून वापरली तर त्यात काय चुकीचे आहे?
६. पंप स्टोरेज असावा कि नसावा हा मुद्दा नसून जंगलांची तोड करणे अपरिहार्य का होतं हा मुद्दा असायला हवा होता. विंड टर्बाईन्स झा पर्याय का नाही?
७. हायब्रीड प्रोजेक्टस म्हणजे विंड + पाणी (डेन्मार्क, स्वीडन मधे आहेत तसे) वापरले तर Betz law च्या मर्यादेवर मात करता येईल, तसेच ज्या वेळी वारा नसेल त्या वेळीही वीज निर्मिती होत राहील. समुद्राच्या लाटा, नदीचा प्रवाह याचा विचार करून हायब्रीड प्लाण्ट डिझाईन का करता येत नाहीत?
८. धोरणातल्या हेतूतः असलेल्या दोषांबदल कुणीच का बोलत नाही?
विकास साधण्यासाठी आज ३०, ०००
विकास साधण्यासाठी आज ३०, ००० पूर्ण वाढलेली झाडे कापली आणि तेव्हढीच किंवा ३ पट जास्त नवीन रोपटे इतर ठिकाणी लावली तरी पर्यावरणाचे नुकसान होणारच आहे .
एखाद्या नवीन लावलेल्या रोपाला पूर्ण वाढ होऊन, पूर्ण वाढलेल्या झाडाकडून मिळणारे सर्व पर्यावरणीय लाभ पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी १० ते ४० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो.