बँका बुडणार?

Submitted by राज अज्ञानी on 6 October, 2026 - 08:10

जागतिक आर्थिक संकटाचा फटका भारताला बसणार आहे असे तज्ञ म्हणत आहेत.

वेगवेगळ्या काळात अर्थतज्ञ इशारे देत आहेत. मात्र सातत्याने सरकार धार्मिक, जातीय, वांशिक, भाषिक, प्रांतीय अ‍ॅटमबाँब फोडत असल्याने लोकांचे लक्ष त्याकडे जात नाहीये. तसेही सर्वसामान्य जनतेचे लक्ष आर्थिक घडामोडींकडे जातच नाही. नाहीतर २२,००६.५० कोटी रूपयातले फक्त वरचे ६.५० कोटी भरा बाकी २२००० तुम्हाला माफ असा लवादाचा निकाल आल्यानंतर जनता रस्त्यावर आली असती. तशी ती या मुद्द्यांवर येत नसल्याने व्हिडीओकॉन समूहाचे थकीत कर्ज ७२००० कोटींवर गेले तरीही त्यावर चर्चाच नाही. थकीत कर्जाची अ‍ॅसेसमेण्ट ६४००० कोटी इतकी आहे, ही काही थोडीथोडकी रक्कम नाही.

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचे ऑक्टोबर नंतर बँका बुडणार आहेत, पैसे काढून घ्या हे स्टेटमेण्ट धक्कादायक आहे, एरव्ही ते राजकीय नेते असल्याने अशी वक्तव्ये करणार म्हणून सोडून दिले असते पण या सनसनाटी विधानाने आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधण्याचे काम केलेले आहे. नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दल जागरूक नागरिक माहिती घेतील आणि देतील.

अर्थमंत्रीण निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर हे सातत्याने आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत आहेत. बजेटवरची त्यांची भाष्ये हा आजच्या परिस्थितीचा विषय नाही.

राहुल गांधी यांचे आर्थिक सल्लागार मधुकृष्ण दंडपाणी हे भारतातले एक प्रसिद्ध म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांनी तीन वर्षांचा इमर्जन्सी फंड तयार करा असे म्हटलेले आहे. त्यांच्या नावावरून ज्या कोट्या होत आहेत ते पाहता त्यांच्या म्हणण्यावरून लक्ष हटवण्याचे काम चालू आहे का ही शंका उपस्थित होते.

बँका बुडणार असे या दोन व्यक्तींचे म्हणणे नाही. पण गंभीर आर्थिक संकटाची चाहूल यातून लागते. ते एका राजकीय व्यक्तीचे सल्लागार असल्याने आक्षेप घेतला जाईलच. मात्र आर्थिक संकट असेल तर ते लपवून फायदा नाही.

स्वत: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चार एफ चे संकट घोंघावत असल्याचे म्हटलेले आहे.
फूड, फर्टिलायजर्स, फायनान्स आणि फुएल असे हे संकट आहे. याला रशिया युक्रेन युद्ध आणि खाडीतले अमेरिका इराण युद्ध तसेच सुपर एल निनोचा फटका याची पार्श्वभूमी आहे.

भारतात निरनिराळे फॅक्टर्स अजूनच हे संकट गडद करतात का? अमेरिकन निर्बंंधांमुळे निर्यातीला फटका बसलाच आहे. इंधनाचा तुटवडा असणार आहे. परकीय गुंतवणूकदार शेअर मार्केट मधला पैसा काढून घेऊन अन्य देशात गुंतवत असल्याने शेअर मार्केट कोसळले आहे. या बातम्या आपण बघतोच आहोत.

भारतातल्या कंपन्यांचे जास्तीत जास्त उत्पादन चीनमधे होत असल्याने भारतातले उत्पादन ९० च्या दशकाच्या तुलनेत टक्केवारीत किमान पातळीवर आहे. याचा परिणाम बेरोजगार्तीवर होत आहे. मधुकृष्ण दंडपाणी म्हणतात कि "पगार आणि पद याचा विचार न करता मिळेल ती नोकरी करा. कर्ज घेऊ नका. नवीन घर विकत घेऊ नका."

RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजीच पुढच्या आर्थिक संकटाचा धोका सांगितला आहे.

त्यांच्या मते पुढील आर्थिक संकटा पारंपरिक पद्धतीने "बँका खराब कर्जामुळे अडचणीत आल्या" म्हणूनच येईल असे नाही. भूराजकीय घटना cyberattack किंवा तंत्रज्ञानातले अपयश यांसारख्या बाह्य धक्क्यातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं संकट निर्माण होऊ शकते. त्यांना काय म्हणायचे आहे हे त्यांनाच ठाऊक. पण संकट आहे हे ते म्हणतात.
https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/next-financial-...

ताज्या भारत सरकारच्या September 2026 Monthly Economic Review मध्येही खालील धोके स्पष्टपणे नमूद आहेत:
- भूराजकीय तणाव
- कच्च्या तेलाच्या किंमती
- पुरवठा साखळीचे विस्कळीत होणे
- जागतिक आर्थिक व्यवस्थेतला ताण
- रुपयावर दबाव
- भांडवला मधील अस्थिरता
- महागाईचा धोका
- El Niño मुळे पिकांना धोका ( सुपर एल निनो किंवा एल निनो).
https://www.reuters.com/world/india/india-flags-risks-economic-outlook-c...

याच अहवालात भारताची परकीय गंगाजळी भक्कम असल्याचा दावा केला आहे. पण ती कशामुळे याचा खुलासा केलेला नाही. म्हणजे परकीय गंगाजळी ही भारत सरकारच्या किंवा व्यापाराच्या कामगिरीमुळे सुधारलेली आहे कि संकटाचे आवाहन केल्यानंतर परदेशस्थ भारतीय व उद्योगांनी केलेल्या मदतीमुळे ती सुधारली याचा उल्लेख नाही. दुसरे कारण असेल तर ती कायमस्वरूपी व्यवस्था नाही.

या पार्श्वभूमीवर आपल्या सारख्या सामान्यांनी काय करायचे? कुणाचे ऐकायचे?
कि सरकार सांगते त्याप्रमाणे निधास्त व्हायचे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा एका हुशार (खरंच आदरार्थी म्हणतेय) गणल्या जाणाऱ्या राजकीय नेत्याने त्याच्या मतदात्या बेसला आवाहन केले की बँका बुडणार आहेत तर पैसे काढून घ्या.
वरची सगळी कारणं जरी खोटी आहेत असं गृहीतकापुरतं धरलं (खोटी आहेत हे मी म्हणत नाही. तेवढं ज्ञान आणि अभ्यास नाही) तरी त्यांना मानणाऱ्या लोकांनी जर पैसे काढायला सुरुवात केली तर लिक्विडीटी क्रन्च होऊन नक्कीच बुडतील.

कुणाचं ऐकायचं ठाऊक नाही परंतु अफवा पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे बँक रन होण्याची शक्यता वाढते. असं होऊ नये आणि त्यासाठी आपला हातभार लागू नये एवढंच आपण करू शकतो.

पण तुमच्या सारख्या अनेक सरकारात्मक विचारांवर विश्वास ठेवणार्‍यांचं म्हणणं ऐकून नाहीच काढले पैसे तरी कर्जबुडवे गुजराती कायदेशीर मार्गाने बँका साफ करू शकतात ना (करतीलच असं नाही म्हणत मी, पण ढळढळीत उदाहरणे आहेत ना..अफवा नाहीत त्या). मध्यंतरी पंजाब नॅशनल बँक आणि अन्य बुडालेल्या बँकांच्या बाहेर रांगा लावलेल्या खातेदारांचे रडवेले चेहरे दिसत होते टिव्हीवर. सरकारने किती पैसे दिले त्यांच्या बचत खात्यावरचे? एकाच्या मुलीचं लग्न होतं.. अशा बुडालेल्या बँका अन्य बँकेत वर्ग केल्यानंतर नुकसान भरून काढायला प्रामाणिक खातेदारांवर नवनवे चार्जेस लावले गेलेत.

सामान्यांना एज्युकेशन लोन साठी रडवतात.

मी या बाबतीत न्यूट्रल आहे. सकारात्मक नाही, नकारात्मकही नाही.

प्रत्येक बँकेची ठराविक लिक्विडीटी असते. ती आणि बँक शॉर्ट टर्म मनी मार्केटमधून एका वेळी किती पैसे उभारू शकते या दोन गोष्टी जमेस धरल्या तर त्यापेक्षा जास्त पैसे एकाच वेळी खातेदारांनी मागितले आणि हे सलग काही दिवस चालू राहिले तर उत्तम बॅलन्सशीट असलेली बँकही फक्त लिक्विडीटी क्रायसिसमुळे धोक्यात येऊ शकते एवढेच मला सांगायचे आहे.

दुसरं म्हणजे काहीतरी चमत्कार होऊन बँक रन न होताही सगळ्या खातेदारांच्या हातात त्यांचे पैसे आले तरी बँकांकडे पैसे नाहीत पण हातांत पैसे खेळते आहे अशी विचित्र परिस्थिती येऊन चलनवाढ अपरिहार्य होईल. परिणामी हातात असलेल्या पैश्यांची किंमत घटेल.
उदा. दुसऱ्या महायुद्धापूर्वीची जर्मनीची परिस्थिती - पोतेभर पैसे देऊन किलोभर बटाटे आणावे लागत होते.
हे दुश्चक्र भेदणे कठीण होईल.

त्यामुळे सगळ्यांनी शॉर्ट टर्म नोटीसवर बँकेतून पैसे काढून घ्या हा सल्ला मला धोकादायक वाटतो. जर आपल्याला इकॉनॉमिक क्रायसिसची भीती वाटत असेल तर लॉन्ग टर्म व्हिजन ठेवून विश्वासू आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करून आपले असेट्स डायव्हर्सिफाय करणे हाच उत्तम उपाय आहे.

सुलतानी कमी पडली म्हणून की काय अस्मानीही हजर झाली असे म्हणावे लागते. अनियमित आणि कमी पाऊस यामुळे शेतीमाल डुबला. अन्न उत्पादन कमी होणार. या बाबतीत आपणच आपल्याला तारू शकतो. एवढे अन्न बाहेरून कुठून मिळणार? तेल हवेच आहे त्यात ही भर.

उद्योगधंधेही बंद झाले की बँका बुडतात. दुसरे एक मूळ कारण - युद्धे आणि लढाया. मोठे देश शस्त्रे निर्माण करून लढायांतून फायदा करतात आणि देशाच्या उत्पादनात भर घालतात. आपण ते करत नाही.

सुलतानी कमी पडली म्हणून की काय अस्मानीही हजर झाली असे म्हणावे लागते >>>> १००++
परतीचा पाऊसही फारसा दिसत नाही.
विशेषतः विंध्य पर्वतराजीच्या दक्षिणेला रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी मिळेल का शंका आहे.
उत्तरेला सिंधू पाणी वाटप करारामध्ये आपल्या वाट्याला आलेल्या नद्यांवर बरेच प्रकल्प उभे राहिले आहेत/पूर्ण होत आले आहेत. त्यामुळे पंजाबला पाणी कमी पडणार नाही असे वाटते.
नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमध्ये नद्यांमध्ये बराच गाळ वाहून आला आहे. त्यावर बरेच अवलंबून आहे.

आपण ते करत नाही. >>> यात जरा बदल होतो आहे असं वाटतं. अगदी मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स नाही, पण आपण शस्त्रास्त्रे निर्यात करायला लागलो आहोत. अर्थात या निर्यातीचे प्रमाण आणि इंधन आयातीचे प्रमाण व्यस्त आहे.

राज अज्ञानीजी,

महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.

लेखातील जागतिक आर्थिक अस्थिरता, वाढती महागाई, भू-राजकीय तणाव आणि बँकिंग व्यवस्थेसमोरील संभाव्य धोके हे मुद्दे निश्चितच विचार करण्यासारखे आहेत.

मात्र आर्थिक संकटाची शक्यता आणि प्रत्यक्ष बँका बुडण्याची परिस्थिती यांत फरक करणंही तितकंच आवश्यक वाटतं.

RBI गव्हर्नरांनी भविष्यातील संभाव्य धोक्यांविषयी सावधगिरी व्यक्त केली आहे; पण त्याचा अर्थ बँका बुडणार आहेत, असा थेट होत नाही.

सर्वसामान्य नागरिकांसाठी भीती निर्माण करण्यापेक्षा योग्य माहिती उपलब्ध करून देणं अधिक महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, DICGC अंतर्गत पात्र बँक ठेवींना प्रति ठेवीदार, प्रति बँक पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.

आपल्या लेखाच्या शेवटी विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे — सामान्य नागरिकांनी नेमकं काय करावं?

माझ्या मते, याच प्रश्नावर अधिक चर्चा व्हायला हवी. आपत्कालीन निधी, बचतीचं योग्य नियोजन, कर्जाचा विचारपूर्वक वापर आणि अधिकृत आर्थिक माहितीची पडताळणी या गोष्टींवर भर दिला पाहिजे.

आर्थिक धोक्यांकडे दुर्लक्षही नको आणि अनावश्यक घबराटही नको.

विचारप्रवर्तक लेखाबद्दल धन्यवाद!

आय डी बी आय बँकेतला एल आय सी आणि सरकारचा हिस्सा कॅनडाच्या फेअरफॅक्स कंपनीला विकला. फेअरफॅक्स म्हटलं कि विश्वनाथप्रतापसिंग आठवतात. अर्थात या कंपन्या वेगवेगळ्या आहेत. एका कंपनीने परदेशातली भारतियांची करचोरी उघड केली होती. धीरूभाई अंबानी आणि बच्चन परिवार.
आताच्या कॅनडास्थित कंपनीने भारताची बँक जवळजवळ विकतच घेतली आहे.
कदाचित यासाठीच बँका एकमेकात विलीन करण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वी केला असावा. कदाचित भारतात आता एकच बँक शिल्लक राहील अशी चिन्हे दिसतात.