CJP जंतरमंतर सीझन 2

Submitted by सिम्बा on 2 October, 2026 - 21:52

काल 2 ऑक्टोबरला दिल्ली, मुंबई आणि इतर ठिकाणी प्रचंड मोठी निदर्शने झाली.
जंतरमंतर 1 वेळेस सरकार जरा ऑफ गार्ड पकडले गेले होते. अधिवेशन चालू, त्यातच बाहेर लाठीमार झाला,विरोधीपक्ष आक्रमक झाला, त्या सगळ्या ची परिणीती प्रधान राजीनाम्यात झाली. CJP ची एक specific मागणी होती. So त्या मुद्द्यावर आंदोलन यशस्वी झाले असे म्हणता येईल

पण आज काल झालेल्या आंदोलनाचे भविष्य काय असेल?
1) सरकार यावेळी तयारीत असेल
2) ग्यानेश कुमार ने राजीनामा दिल्याने तसा फारसा फरक पडणार नाही. आयोग काही एकाएकी वेगळे नियम लागू करणार नाही.
3) SIR cancel होऊन, जुनी मतदारयादी लागु होण्याची शक्यता नगण्य आहे.
4) प्रधान सुट्टी कडी होते, इकडे ग्यानु ने राजीनामा दिला याचा अर्थ निवडणुका प्रक्रिया कॉम्प्राईस्ड होती हे मान्य केल्या सारखे होईल, आणि त्यातून मोदी राजीनामा मागणी अजून जोरकस समोर येईल,
किमान पुढच्या निवडणुकीत त्यांच्यापुढे आव्हाने वाढतील.
5) सरकारसाठीं अस्तित्व पणाला लागले आहे, त्यामुळें अर्थात आंदोलन दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न होणार.
6) आंदोलन आक्रमक झाले नाही, आणि सरकारने अतिरिक्त बळाचा वापर केला नाही तर आंदोलन याच जोराने चालु ठेवणे CJP ला कठीण जाईल. आणि हळूहळू जोर ओसरेल.
7) CJP साठी काहीही outcome आला, तरी फायदेशीर आहे. आंदोलन यशस्वी झाले तर प्रचंड फेम, अयशस्वी झाले तरुणांपुढे 3 वर्षें हातात आहेत,

तुम्हाला काय वाटते? How will season 2 end?

Group content visibility: 
Use group defaults

हे किती क्यूट आहे.
Saurav Das
@SauravDassss
IMPORTANT ANNOUNCEMENT

Gyanesh Kumar is India’s Enemy Number 1. Even a minute of his continuance as Chief Election Commissioner is unacceptable.

In view of this, the Cockroach Janta Party has resolved to call for a national protest in Delhi on 10th of October.

Jaha rokenge, waha baithenge, woh kehlayega Jantar Mantar!

The young generation will ensure Gyanu’s resignation and fix our Election Commission. Because no country and its dreams survive theft of voting rights! The Gen Z will reclaim our nation. Start marching to Delhi folks! #DilliChalo

Inquilab Zindabad!

@Cockroachisback

@abhijeet_dipke

@AshutoshRanka

@whattalawyer

एक मिनिट पण नको. पण मुहूर्त ८ दिवसांनंतरचा.

या मुद्द्यावर फक्त सीजेपी आंदोलन करत नाहीए. काल दिल्लीतलं आंदोलन सीजेपीचं नव्हतं. तिथे पोलिसांनी बळाचा वापर केला. मुंबईत सगळं गोड गोड होतं. मागच्या आंदोलनासारखंच हेही ऑर्गॅनिक आहे. ज्यांचा सीजेपीवर विश्वास नाही, असे लोकही काल शिवाजीपार्कला गेलेले दिसले.

उच्च शिक्षण व्य वस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याने फार तर त्यांना जबाबदारी घ्यावी लागली एवढं निष्पन्न झालं. त्या त्रुटींवरची चर्चा मागे गेली.

आता निवडणूक आयोगाच्या कारभारात अनेक घोळ आहेत आणि हे सहेतुक आहेत. त्याला प्रचंड ट्रॅक्शन मिळालं आहे. एस आय आरच्या नावावर व्हर्च्युअल जिनोसाइड सुरू आहे. त्यात ग्यानुचा राजीनामा मागण्यावर सगळी शक्ती खर्च करायची आणि सरकारला पळवाट काढून द्यायची , असा मागच्यासारखाच बेत आहे.

काल मुंबईतल्या आंदोलनाचं नाव जेल भरो होतो. पोलिसांनी धरपकड केली असती तर सीजेपीवाले आंदोलकांच्या मदतीला येणार होते का? नीट आंदोलनाच्या वेळी त्यांनी या सगळ्यांना वार्‍यावर सोडलं होतं.

शेवटचे 2 मुद्दे i agree.
पण पहिला मुद्दा आंदोलन सुरू करण्याचा मुहूर्त,
इंडियन एक्सप्रेस ची बातमी बाहेर आल्या आल्या CJP ने bro it's done सांगितले होते. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर निदर्शन करायचे तर रिसोर्स प्लॅनिंग ची आवश्यकता असणारच, त्याला 8 10 दिवस लागणार, सिग्निफिकन्ट तारीख ठेवायचे गीमिक यामुळे पुढची तारीख पकडली असेल.

आणि EC च्या कारभाराविरुद्ध RG निवडणूक झाल्या दिवसापासून ओरडतो आहे, पण त्याला अपेक्षित ट्रॅक्शन मिळाले नव्हते. जनतेमधून आणि इंडिया सदस्यांकडून सुद्धा. त्यानंतर झालेल्या 2 निवडणुका, आणि इंडियन एक्सप्रेस मधली बातमी यानंतर अनेकांचे लक्ष त्याकडे वळले.
इतक्या मोठ्या प्रमाणावर निदर्शन करणे काँग्रेसला अलीकडील काळात जमले नाहीये ( पंजाब शेतकरी बहुदा शेवटचे असावे)

यात मला उत्सुकता हिच आहे की हे प्रकरण संपते कसे? सरकारला फक्त ग्यानु चा बळी देऊन प्रकरण शांत करता येणार नाहीये. ग्यानु गेला, म्हणजे एकप्रकारे सरकारने कबुली दिली असा अर्थ होईल, जे त्यांना चांगलेच महागात पडेल.

सरकारला फक्त ग्यानु चा बळी देऊन प्रकरण शांत करता येणार नाहीये>>>
सरकार प्रधान सारखं ज्ञानेश कुमार यांना हटवू शकत नाही. ते घटनात्मक पद आहे. एक तर त्यांना स्वतः जावं लागेल नाहीतर संसदेत प्रस्ताव आणून काढावं लागेल.
सरकार ज्ञानेश कुमार यांना काढायला जराही प्रयत्न करणार नाही, करुही नये.

<इतक्या मोठ्या प्रमाणावर निदर्शन करणे काँग्रेसला अलीकडील काळात जमले नाहीये > मीडियाने दिपकेला जितकं कव्हरेज दिलं त्याच्या १/१० ही काँग्रेसच्या आंदोलनांना दिलं नाही.
राहुलच्या प्रेस कॉन्फरन्सच्या बातमीला जितकं फुटेज मिळतं त्यापेक्षा जास्त भाजपने त्याला दिले ल्या उत्तराला मिळतं.

इंडियन एस्क्प्रेसनेच कालची आंदोलने कशी कव्हर केलीत? दिपकेचा पहिल्या पानावर फोटो. हेडलाइनमध्ये सीजेपी. दुसर्‍या पानावर त्या बातमीच्या उर्वरित भागात जंतरमंतर. फोटो नाही.

(याचं कारण काय असेल? )

पंजाब शेतकरी आंदोलन काँग्रेसचं नव्हतं.

सीजेपी ग्यानेशला एनिमी नंबर १ म्हणतेय. ग्यानेश त्याच्या मनाने हे करतोय असं वाटतंय त्यांना?

मतदान चोरी, मत चोरी , मतदार यादीमधले गैरव्यावहार या सर्व प्रकारांबद्दल राहुल गांधी यांनी अनेक महिने आधी आवाज उठविला होता.

लोकशाही मधे मतदानाचा हक्क हेच सर्वात मोठे हत्यार आहे. कोट्यावधी मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणे म्हणजे अक्षम्य गुन्हा आहे. सदसद्विवेकबुद्धी चा काही अंश जरी शिल्लक असेल तर एव्हाना चालते व्हायला हवे होते.
ग्यानेश हा ज्ञानेश नाही. Sad त्याने हे काम त्याने एकट्याने केलेले नाही.

सर्वत्र दाट अंधार आहे असे वाटत असतांना तरुण पिढी पुढे आलेली आहे. त्यांच्या हातामधे संविधानाचे पुस्तक आहे, राज्यघटने बद्दल आदर आहे आणि शांती/ अहिंसक मार्गाने आपला असंतोष दाखविण्याचा गांधीवादी मार्ग त्यांनी निवडलेला आहे.

दिल्ली पोलिस अत्याचाराच्या घटना अस्वस्थ करणार्‍या आहेत. पोलिसांचे प्रदर्शनकार्‍यां सोबत तसेच महिला पत्रकारां सोबतचे वर्तन निषेधार्ह आणि चिड आणणारे आहे. मुलींच्या / महिला पत्रकारांच्या छातीला हात लावणे, मागून पकडणे, ढुंगणावर चिमटे काढणे हे असले प्रकार दिल्ली पोलिस करत असल्याचे एकापेक्षा जास्त व्हिडीओ बघितले आहेत. घरी गेल्यावर हे पोलिस आपल्या कुटुंबियांना, मुलाबाळांना काय सांगतील? "आंदोलन कर्त्या मुलींचे नैतिक मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आम्ही त्यांचे लैंगिक शोषण केले. " Angry

यावेळी पण अनेक पोलिसांकडे नावाचा बिल्ला नव्हता . बिल्ला पडला असेल अशी एक शक्यता आहे. पण दोन गोंष्टी लक्षात ठेवायला हव्यात (अ) स्वतंत्र भारद्वाजने मुलाखतीमधे " आम्हाला पोलिसांचे गणावेश/ बुटे अगदी सहज मिळतात " हे सांगितलेले आहे. (ब) तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेले अनेक गुन्हेगार जंतर मंतरवर पोचो चले होते असे CCTV मधे आले आहे ( हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे ).
https://indianexpress.com/article/express-exclusive/delhi-police-facial-...

कोट्यावधी मतदारांचे नाव मतदार यादीमधून काढून टाकण्याचा प्रकार फार मोठा गुन्हा आहे, देशद्रोहच आहे. प्रत्येक नागरिकाला या घोर अन्यायाबद्दल निषेध नोंदविण्याचा अधिकार आहे.

नेहा बोरा बद्दल अनेकांनी चांगले लिहीले आहे. तिचे धाडस, धैर्य बघून कौतूक वाटते. She is like a roaring flame, ज्वालामूखीच आहे.

तिच्या एक एक छोट्या क्लिप्स बघणार्‍या प्रत्येकाला आपल्या हक्कांची जाणिव करुन देतात. मला सर्वात जास्त आवडलेली क्लिप.
https://www.facebook.com/reel/1774167537106900

बंगाल, महाराष्ट्र तसेच अनेक राज्य आणि लोकसभा निवडणूकांत मोठी बनवाबनवी/ फसवणूक झाली होती हे आता स्पष्ट झाले आहे.

प बंगाल मधे नुकत्याच झालेल्या निवडणूकांत ९० लाख मतदार ( १२ % आहेत ) यादीतून वगळले होते. वगळ्यात आलेले बहुतांष मुस्लिम नागरिक आहेत. मग आता निवडून आलेल्या सरकार हे अवैध ठरते का? घटनात्मक पेच नाही का?
https://www.bbc.com/news/articles/cy51qg00dezo

सीजेपीने वाट बघण्यात वेळ घालवला. डाव्या आणिकाँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनंतर आज राहुलच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचा आयोगावर हल्ला बोल.

तिकडे तुम्ही डिटेन होता कारण तुमची स्ट्रॅटेजी चुकते म्हणणा रा क्युट सौरभ दास आम्हांला अटक होईल, पण आम्ही घाबरत नाही, असं सांगतोय.

संजय राउत , अरविंद सावंत व अनिल देसाई हे आज दिल्लीतील विरोधी पक्षांच्या मोर्चात सामील झाले. त्यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते डिटेन केले गेले आहेत.

मुंबई २ ऑक्टोबरच्या मोर्चात सामील झालेल्या शेकडो लोकांवर एफ आय आर झालेत.
रविवारच्या ४ ऑक्टोबरच्या सेना मनसे मोर्चाच्या आयोजकांविरोधात एफ आय आर झालेत.

या सगळ्यांची स्ट्रॅटेजी चुकली असे म्हणावे का?

आज बिजू जनता दलाचे खासदार सुद्धा या मोर्चात सामील झाले.

आपकडे खासदार आहेत का माहीत नाही. पण त्यांचं कोणी आजच्या आंदोलनात नव्हतं.

जंतर मंतर २.० संबंधीत अनेक व्हिडिओ , फोटो व्हायरल होत आहे. भयंकर चित्र दिसत आहे. काय खरे, खोटे याची शहानिशा करता येत नाही.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार्‍यांना रोखण्याचा प्रयत्न होत आहे? एव्हढ्या मोठ्या प्रमाणांत मुस्कटदाबी सुरु आहे असेल तर फार भयानक चित्र आहे. हे अपेक्षित नाही. Sad
https://www.facebook.com/share/r/19XiKavpiP/

अजून एका रिल्स मधे १०वीची मुलगी ( वडिलांना सोबत घेऊन ) आलेली आहे . १८ वय पण नाही.

हो. आधीच्या आंदोलनात सहभागी झालेल्यां वर पोलिस दडपण आणताहेत. माझ्या भाचा १९ जुलैमध ल्या मुंबई प्रोटेस्टला गेला होता.त्याला डिटेन केलं होतं. काल त्याच्या घरी पोलिस "चौकशी" साठी आले होते की तो दिल्लीला जाणार आहे का?

आज रात्रीपासून दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानके बंद असणार आहे.
प्रचंड संख्येने सुरक्षा दले जमा होत आहेत.

पुण्यातिल mpsc आंदोलनकर्त्यांना गाशा गुंडाळण्याचे आदेश आहेत. नागपुरात देखील झुजपा च्या निदर्शनावर बंदी घातली

काल त्याच्या घरी पोलिस "चौकशी" साठी आले होते की तो दिल्लीला जाणार आहे का?>> ओह! अतीच आहे पण अपेक्षितही. DNA मधली लोकशाही दाखवून देत आहेत.

Indian Railways has cancelled all trains arriving at and departing from New Delhi and Hazrat Nizamuddin stations for 10 hours on Saturday, October 10, amid a protest by the Cockroach Janta Party (CJP) in the national capital.

Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार

Sorry जरा इतरत्र उनाडक्या करत होतो Happy
1) राहुल ने vote chori बद्दल आवाज उठवला होता हे खरे आहे. त्याची निवडणुकांनंतर झालेली प्रेस कॉन बरीच आक्रमक होती. मात्र भाजप ने आपल्या नेहमीच्या redicule tech वापरून ते प्रकरण फारसे मोठे होऊ दिले नाही.
त्यानंतर काँग्रेसने पण फार लाऊन धरले असे वाटत नाही.
आता IE रिपोर्ट नंतर सुद्धा पहिलावार CJP ने केला, काँग्रेस जरा उशीराच आली.

2) काँग्रेस उशिरा आली पण 2 oct te 10 Oct मधला slow period त्यांनी पुरेपूर वापरून घेतलाय. गेले 3 दिवस RG अक्षरशः छा गया है, राहुल गांधी बद्दलचे लोकांचे पर्सेप्शन बदलत चालले आहे.
2015 मध्ये सोनिया गांधींनी असहिष्णुतेबद्दल मोर्चा काढून राष्ट्रपती भेट घेतली होती. तेव्हाच्या फोटोत असणारी RG ची बॉडी लँग्वेज आणि कालच्या फोटो मधली यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
आणि same goes for मोदी शहा , पण उलट्या अर्थाने. ते दिवसेंदिवस तेजरहित, आणि पोकळ वाटू लागले आहेत. विशेषतः सध्याच्या आर्थिक घडामोडी पाहता, मोदींचे we will do it भाषण मूर्खपणा वाटू लागले आहे.

3) भरत नी नोंदवलेली CJP बद्दलची निरीक्षणे खरी असली तरी cJP , भाजप ची B team आहे असे वाटत नाही., इतका खर्च, इतके प्रचंड आंदोलन वगैरे करून काँग्रेस cha vote शेअर खाण्यापेक्षा त्यांना MP विकत घेणे स्वस्त पडले असते. आत्ता अचानक दिसणारी unrest CJP नंतर आलेली आहे. अगदी ऑगस्ट पूर्वी लोक सुशेगाद होते. नीट रद्द झाली तरी इन्वॉल्वड मुलांचा, पालकांचा outbreak दिसला नव्हता.

मगाशीच कोणतीतरी ट्विट वाचले. दिल्लीत 57 स्टेशन बंद केली आहेत. पूर्ण मुंबई मेट्रोत 77 स्टेशन्स आहेत, पुणे मेट्रो बहुतेक 50 स्टेशन.
It is huge.
दिल्लीत जाण्यापासून थांबवलेल्या लोकांनी उद्या ठिकठिकाणी रेल्वे बंद केल्या नाहीत म्हणजें मिळवले.
तिकडे अगदी 200 300 निदर्शक असले तरी रेल्वे 3 4 तास disturb होऊ शकते.
आंदोलन चिरडण्याची सरकारची तयारी ऊर दडपवून टाकणारी आहे. पण कधी नव्हें ते कोर्ट proactively निर्णय देते आहे.
नाहीतर आंदोलनं होऊन 6 महिने गेल्यावर कोर्टाने केंद्राला फटकारले , असे ऐकायची सवय आहे

सीजेपी काँग्रेसचा व्होट शेअर खाण्यासा ठी नाही, तर काँग्रेस जी आंदोलनेने करीत आहे त्याला ट्रॅक्शन मिळू नये यासाठी उभा केलेला ऑल्टरनेटिव्ह आहे. त्यात त्यांना यश मिळतंय हे तुझ्याच पोस्ट्स वरून दिसतंय. सीजेपी आपचं अपत्य आहे हे दोघांनीही लपवलेलं नाही.
सर्वपक्षीय खासदारांच्या मोर्चात आप नव्हता.

तसंच जंतरमंतरवर गर्दी वांगचुकच्या उपोषणामुळे आणि त्यांना उचलल्यामुळे वाढली. कोणीतरी आपल्यासाठी लढतोय, तर आपणही तिथे असलं पाहिजे. ही भावना होती. पुढे वांगचुक पतीपत्नींनी आपला खरा भगवा रंग दाखवला.

आपल्याकडे अपोलिटिकल असणे, सगळे पक्ष वाईट, राजकारण वाईट , असे म्हणणे हे लोकांना फार आवडते. अशा लोकांसाठी सीजेपी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. माझा भाचा दादरच्या प्रोटेस्टला गेला तो सीजेपीचा समर्थक म्हणून नव्हे तर त्याला ते कॉज महत्त्वाचं वाटलं म्हणून.

मी आधी अनेकदा म्हटलं तसं हे आंदोलन ऑर्गॅनिक आहे. जशी चूक अण्णा हजारेंना उचलून युपीएने केली, तीच जंतरमंतरवर लाठीमार करून मोदीशहाने केली. आंदोलन सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त तीव्रतेने पसरलं.
अण्णा हजारे आणि दिपके दास माझ्यालेखी सारखेच आहेत.

दिपकेला गोदी मीडियाने इतकी प्रसिद्धी का दिली? तो अमेरिकेहून परत आला तेव्हा विमानतळापासून त्याच्या क्लिप्स झळकू लागल्या. पोलिस एस्कॉर्टही होता. आंदोलनाला परवानगी मिळाली.

असो. मला याबाबत आणखी चर्चा करण्यात वा कोणाला पटवून देण्यात हशील नाही. मी चूक आहे, असं दिसलं तर मान्य करेनच.

माझ्या भाच्याच्या या दोन इन्स्टा रील्स
https://www.instagram.com/reel/DePQl_ABbTT/
https://www.instagram.com/reels/DePQl_ABbTT/

मला आत्ता तरी काँग्रेस चे लागेबांधे असावेत असे वाटते.
तुम्हीं म्हणता तसे काँग्रेस 1.0 पासून दूर राहिली, पण संसदेत मोदी शहा ना व्यवस्थित कॉर्नर केले.
आता सुद्धा दोघांच्या मागण्या किंचित वेगळ्या असल्या तरी दोघे परस्पर पूरक काम करत आहेत असे वाटते.

Cause - पेपर फुटी cause gen z ला जितकी जवळची वाटली तेव्हढी vote chori वाटेल का याबद्दल मला थोडी शंका आहे.

कव्हरेज, गोदी मीडिया पेक्षा social media वर अफाट कव्हरेज मिळाले. Primarily त्याच लोकांनी ती buzz निर्माण केली.

अर्थात हे आत्तापर्यंत झालेले मत आहे. पुढे काय होतंय ते दिसेलच.

समजा सीजेपी किंवा कोणी देशभर जागो जागी आंदोलनं करायची घोषणा केली तर सरकारच भारत बंद करेल.

बाकी पोलिसांना द्यायच्या कामांची प्रायॉरिटी वाखाणण्याजोगी आहे. बलात्कार, खून झाले तरी चालतील. आंदोलन नको.
रेल्वे , बसमध्ये शिरून पोलिस आंदोलकांना उतरवताहेत. घरातून उचलून नेताहेत. हेच लोक दर वर्षी इंदिरेच्या आणीबाणीच्या नावाने गळा काढतात.

Pages