१. शृंगार
२. वीर
३. करुण
४. हास्य
५. रौद्र
६. भयानक
७. बीभत्स
८. अद्भुत
९. शांत
यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा, श्लेष, रूपक, व्यतिरेक , अनन्वय, अपन्हुती......
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
तुम्ही म्हणत असाल , शीर्षकात तर शशक लिहिलंय. आणि व्याकरणाचा, त्यातही सौंदर्यशास्त्राचा तास का वाटतोय?
तर हो आणि नाहीही.
यंदा तुम्हांला शंभर शब्दांची अशी कथा लिहायची आहे ; जी वाचून नवरसांपैकी कोणत्याही एका रसाची अनुभूती येईल आणि या कथेत एका अलंकाराचा ठळक वापर असेल.
नियम
१. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२६' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्यनोंदणीकरता १४ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल.
२. लेखनाचा धागा हा पर्याय निवडून लेखन करा.
३. प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - शशक स्पर्धा - तुमचे नाव - कथेचे शीर्षक
४. एक सदस्य कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
५. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२६" अशी शब्दखूण द्यावी.
६. प्रवेशिका पाठवण्यासाठी अंतिम मुदत - शुक्रवार सप्टेंबर २५, २०२६ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
७. स्पर्धेचे विजेते मतदानाने ठरवले जातील.
चला तर मग. घ्या एक रसरशीत कथा लिहायला आणि करा तिला अलंकृत.
गणपती बाप्पा मोरया!
मस्तच सगळ्या खिचडी शशक पोस्टी
मस्तच सगळ्या खिचडी शशक पोस्टी.

मला आधी भूपाळी रोमॅन्टिक आहे की काय वाटले पण पुनर्भेट दिसले.
बाकी, शशकची स्पर्धा म्हणजे
बाकी, शशकची स्पर्धा म्हणजे माबोकरांचे गणेशोत्सवातले देखावेच आहेत जणू. कुणी ऐतिहासिक विषय घेतलेत, तर कुणी चालू घडामोडी, तर कुणी गूढ अगम्य चित्र उभं केलंय
Pages