करायला हव्यात अश्या गोष्टी कराव्याच लागतात ना सगळ्यांना. त्यामुळे उरतात त्या स्वान्तसुखाय गोष्टी. त्यातही अचानक समोर आलेल्या गोष्टी करताना आनंद मिळत असेल तर माणूस फारसा विचारही करत नाही की अजून काय करता आलं असतं. (आयुष्य हे असंच असतं लिहायचा जबरदस्त मोह टाळतेय इथे.) तसंच माझंही. १-२ गोष्टी आहेत ज्या मी केल्या पाहिजेत पण त्या करणं सर्वस्वी माझ्याच हातात असल्याने कधीतरी, गळ्याशी आल्यावर का होईना करेन.
पण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आज केल्या तरी काही उपयोग नाही, त्या राहून गेल्या हे खरं.
कॉलेजमध्ये असताना पहिल्या वर्षी मेकॅनिक्स होतं. त्यात स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स असायचं. हा विषय अभ्यास करताना सर वर्गात शिकवायचे त्यावेळी मला खूप आवडायचा, समजायचाही. पण सेमिस्टर आणि युनिट टेस्ट्समध्ये मला ती गणितं कधीच जमली नाहीत. कशीबशी काठावर पास झाले मी त्या विषयात. पहिल्या वर्षानंतर या विषयाशी संबंधही संपला. कधी कधी वाटतं की परत अभ्यास करावा, कठीण, कठीण गणितं सोडवावी आणि स्वतःला जी लाज वाटते ती संपवून टाकावी.
तसंच SDLC चं. त्याचा तर मला फुलफॉर्मही आठवत नाही. फक्त विषय लॉजिक गेट्सशी संबंधित होता. ते लॉजिक कधी विसरले नाही पण युनिट टेस्ट्समध्ये कधी चांगले मार्क्सही मिळवले नाहीत. त्यामुळे ते सर अगदीच तुच्छतेने वागवायचे. तर त्या
एक्झाम्समध्ये एकदातरी चांगले मार्क मिळवायचे राहून गेले.
सेमिस्टरमध्ये मिळालेले चांगले मार्क अजूनही ती खंत दूर करू शकत नाही.
कॅल्क्युलस आणि डेरीवेटीव्हज शिकत होते, जमत होते तेव्हा त्याचा उपयोग काय हे समजले नव्हते. जेव्हा ते वापरू शकेन अशी संधी समोर दिसली तोपर्यंत ठार विसरून गेले, इतकी की हे आपण कधी शिकलो होतो याचीही शंका वाटते. आता संधी आणि ज्ञान दोन्ही नाही. तरी परत शिकायची आहे. पुस्तकं आणून ठेवली आहेत पण त्यापेक्षा माबो, रील्स वगैरे जास्त इंटरेस्टिंग असतात ना.
तसंच c++ वापरून लिंक्ड लिस्ट वगैरे प्रोग्रामिंग करायचं आहे. करत होते तेव्हा खूप स्ट्रगल केला.
संस्कृत रिफ्रेश करून जुने ग्रंथ, काव्यं वाचायची राहून गेलीत.
परदेशी भाषा शिकायची राहून गेलीय.
शाळेत असताना शेजारी एक तामिळ कुटुंब बदलीवर आले होते. त्यांच्याकडे बेसिक मुळाक्षरं गिरवली पण पुढे काहीच नाही. ती शिकली असती तर ps2 ओरिजिनल तामिळ व्हर्शन पाहता आले असते.
हे जे सगळं आहे त्यात नक्षत्रांचं देणं राहिलं असं काही नाही, ऊर भरून यावा असंही काही नाही, ‘तेरे बिना ज़िन्दगी से शिकवा’ तर नाहीच नाही. फक्त ‘मैं और मेरी तन्हाई कभी कबार ये बातें करते हैं के ये होता तो कैसे होता’.
अस्मिता, अमितव
अस्मिता, अमितव

धमाल प्रतिसाद आहेत इथले.
धमाल प्रतिसाद आहेत इथले.
काय मस्तं लिहीलंय.
काय मस्तं लिहीलंय.
कॅलक्युलस, लॉग टेबल्स, लिमिट शिकताना हे का शिकायचं हा खरंच प्रश्न पडायचा.
एकदमच रिलेटेबल.
>> पण आपण मुलांच्या कलाकलाने
>> पण आपण मुलांच्या कलाकलाने घेतलं, मोकळेपणाने बोलू दिले की मुलांना वाटतं त्यांनी मोगली प्रमाणे स्वतःच स्वतःला मोठं केलं आहे. <<
हा हा लोल. आमचेही फूल अजूनही चड्डीतच असून देखील आत्ताच आम्हाला फाट्यावर मारते. एकेकाळी मी लांडगा होतो आता पार शेळी झालो आहे.
हॅहॅहॅ.
हॅहॅहॅ.
फुलाची चड्डी. भारी आहे ..
आमचे फूल अजून चड्डी स्वतःला नीट घालता येत नाही आणि आम्हालाच गेट आउट किंवा गो अवे फर्मावते.
अवघड आहे जंगलाचे.
Pages