करायला हव्यात अश्या गोष्टी कराव्याच लागतात ना सगळ्यांना. त्यामुळे उरतात त्या स्वान्तसुखाय गोष्टी. त्यातही अचानक समोर आलेल्या गोष्टी करताना आनंद मिळत असेल तर माणूस फारसा विचारही करत नाही की अजून काय करता आलं असतं. (आयुष्य हे असंच असतं लिहायचा जबरदस्त मोह टाळतेय इथे.) तसंच माझंही. १-२ गोष्टी आहेत ज्या मी केल्या पाहिजेत पण त्या करणं सर्वस्वी माझ्याच हातात असल्याने कधीतरी, गळ्याशी आल्यावर का होईना करेन.
पण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आज केल्या तरी काही उपयोग नाही, त्या राहून गेल्या हे खरं.
कॉलेजमध्ये असताना पहिल्या वर्षी मेकॅनिक्स होतं. त्यात स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स असायचं. हा विषय अभ्यास करताना सर वर्गात शिकवायचे त्यावेळी मला खूप आवडायचा, समजायचाही. पण सेमिस्टर आणि युनिट टेस्ट्समध्ये मला ती गणितं कधीच जमली नाहीत. कशीबशी काठावर पास झाले मी त्या विषयात. पहिल्या वर्षानंतर या विषयाशी संबंधही संपला. कधी कधी वाटतं की परत अभ्यास करावा, कठीण, कठीण गणितं सोडवावी आणि स्वतःला जी लाज वाटते ती संपवून टाकावी.
तसंच SDLC चं. त्याचा तर मला फुलफॉर्मही आठवत नाही. फक्त विषय लॉजिक गेट्सशी संबंधित होता. ते लॉजिक कधी विसरले नाही पण युनिट टेस्ट्समध्ये कधी चांगले मार्क्सही मिळवले नाहीत. त्यामुळे ते सर अगदीच तुच्छतेने वागवायचे. तर त्या
एक्झाम्समध्ये एकदातरी चांगले मार्क मिळवायचे राहून गेले.
सेमिस्टरमध्ये मिळालेले चांगले मार्क अजूनही ती खंत दूर करू शकत नाही.
कॅल्क्युलस आणि डेरीवेटीव्हज शिकत होते, जमत होते तेव्हा त्याचा उपयोग काय हे समजले नव्हते. जेव्हा ते वापरू शकेन अशी संधी समोर दिसली तोपर्यंत ठार विसरून गेले, इतकी की हे आपण कधी शिकलो होतो याचीही शंका वाटते. आता संधी आणि ज्ञान दोन्ही नाही. तरी परत शिकायची आहे. पुस्तकं आणून ठेवली आहेत पण त्यापेक्षा माबो, रील्स वगैरे जास्त इंटरेस्टिंग असतात ना.
तसंच c++ वापरून लिंक्ड लिस्ट वगैरे प्रोग्रामिंग करायचं आहे. करत होते तेव्हा खूप स्ट्रगल केला.
संस्कृत रिफ्रेश करून जुने ग्रंथ, काव्यं वाचायची राहून गेलीत.
परदेशी भाषा शिकायची राहून गेलीय.
शाळेत असताना शेजारी एक तामिळ कुटुंब बदलीवर आले होते. त्यांच्याकडे बेसिक मुळाक्षरं गिरवली पण पुढे काहीच नाही. ती शिकली असती तर ps2 ओरिजिनल तामिळ व्हर्शन पाहता आले असते.
हे जे सगळं आहे त्यात नक्षत्रांचं देणं राहिलं असं काही नाही, ऊर भरून यावा असंही काही नाही, ‘तेरे बिना ज़िन्दगी से शिकवा’ तर नाहीच नाही. फक्त ‘मैं और मेरी तन्हाई कभी कबार ये बातें करते हैं के ये होता तो कैसे होता’.
छान लिहिलं आहेस, म्हणजे तू
छान लिहिलं आहेस, म्हणजे तू लिहिलेलं नेहमीच आवडतं.
शेवट छान केला आहेस.
परदेशी भाषा शिकायची राहून
परदेशी भाषा शिकायची राहून गेलीय.>> हे अजूनही करता येईल.
छान लिहिले आहेस. शेवट तर एकदम
छान लिहिले आहेस. शेवट तर एकदम खास !! आपणच आपल्याशी याबाबत संवाद साधतो तेव्हा हे खूप जाणवते.
शेवट फार मस्त आहे. लेख आवडलाच
शेवट फार मस्त आहे. लेख आवडलाच.
माझेमन, सुंदर लिहिलं आहे.
माझेमन, सुंदर लिहिलं आहे.
पण माझ्या मते यातील सगळं तुम्हाला अजूनही करता येईल..नव्हे तुम्ही ते करालच!!
<<पुस्तकं आणून ठेवली आहेत पण
<<पुस्तकं आणून ठेवली आहेत पण त्यापेक्षा माबो, रील्स वगैरे जास्त इंटरेस्टिंग असतात ना.>> हे मात्र पटले

बाकी बराचसा अभ्यासच राहिला आहे तुमचा
सुरेख. शेवट आवडला.
सुरेख. शेवट आवडला.
कॅलक्युलस आणि डेरिवेटिव्हने
कॅलक्युलस आणि डेरिवेटिव्हने टडोपा. इंटिग्रेशन सुद्धा.
शेवटच्या परिच्छेदाला अनुमोदन.
मस्त लिहिले आहेस.
तुमचा लेख वाचताना मला सगळ्या
तुमचा लेख वाचताना मला सगळ्या सीमा आठवल्या.
परीक्षा आहे आणि अभ्यास झाला नाही ही दुस्वप्ने अजूनही पडतात, त्याची आठवण झाली.
On a serious note-
इंजिनियरिंग ही अप्लाइड शाखा आहे. त्यात अप्लाइड गणित असतं परंतु तरीही आपल्याला प्रत्यक्ष एप्लिकेशन्स च काम खूप कमी बघायला मिळतं. हा फरक मला मुख्य करून अमेरिकेतील शिक्षण पद्धत बघितल्यावर जाणवला. म्हणून आत्मविश्वास थोडा डळमळीत होती किंवा आपण विसरतो.
खूप छान लिहिलं आहेस. आणि
खूप छान लिहिलं आहेस. आणि यातलं बहुतेक सगळंच तुला कधीही करता येईल.
प्रोग्रामिंगचं माझंही असंच झालं होतं. मला अभ्यासक्रमातलं प्रोग्रामिंग कधीच जमलं नाही त्यामुळे आवडलं नाही. शंका विचारल्यावर हुशार मुलांकडून तु क मिळत. लॉजिक बिनचूक असायचं पण कोड जमत नसे. मग तो फोबिया झाला. पण आपल्याला हे जमेल का... अशी सुप्त शंका कम इच्छा मधेच वर यायची. ती संधी सध्याच्या नोकरीत मिळाली. स्वतः शिकत मुलांना शिकवणं आवडायला लागलं आणि जिप्ट्या तर इतका समंजस आहे की कुठल्याही फालतू किरकोळ शंकेचं पण प्रेमाने निरसन करून देतो. तु क देत नाही नि अक्कल काढत नाही
आणि जिप्ट्या तर इतका समंजस
आणि जिप्ट्या तर इतका समंजस आहे की कुठल्याही फालतू किरकोळ शंकेचं पण प्रेमाने निरसन करून देतो. तु क देत नाही नि अक्कल काढत नाही >>
इंजिनीयरिंगवाले लोक
इंजिनीयरिंगवाले लोक कॉलेजातल्या विषयांची आठवण काढून हळहळतात? काय म्हणावं याला?
कॅल्क्युलस, डेरिव्हेटिव्ह्ज,
कॅल्क्युलस, डेरिव्हेटिव्ह्ज, सी प्रोग्रामिंग, परदेशी भाषा >>>
स-ग-ळ्या-ला +१, +१, +१, +१
छान लिहिलं आहेस.असे बरेच विषय
छान लिहिलं आहेस.असे बरेच विषय की तेव्हा मनापासून अभ्यास केला असता तर आता कुठच्या कुठे जाता आलं असतं वाटतं.
>> कॅल्क्युलस आणि
>> कॅल्क्युलस आणि डेरीवेटीव्हज शिकत होते, जमत होते तेव्हा त्याचा उपयोग काय हे समजले नव्हते.
तार छेडली. कारण यावर आधीही प्रतिसादांतून प्रतिध्वनी उमटलेत
कॅल्क्युलस आणि डेरीवेटीव्हज हे खरं तर अकरावी बारावीला शिकवण्यासारखे विषय नाहीत. कोण्या महाभागांच्या डोक्यातून हे अकरावी बारावीच्या सिलॅबसमध्ये टाकावे असे आले हे कळत नाही. कारण त्याचा उपयोग काय? थेट व्यवहारात काहीच नाही. भाजी घेताना, बँकेत पैसे भरताना किंवा घराचे क्षेत्रफळ काढताना (dy/dx) लागत नाही. अरे जिथे सायंटिफिक रिसर्च केला जातो तिथे कॅल्क्युलसची गरज असते. वर्तुळाचे क्षेत्रफळ (pi r^2) हे दैनंदिन वापरासाठी माहिती असणे उपयुक्त. पण ते formula calculus वापरून कसे derive होते, हे प्रत्येकाला माहित असण्याची गरज नाही. ते अकरावीच्या मुलांना कशासाठी?
>> c++ वापरून लिंक्ड लिस्ट वगैरे प्रोग्रामिंग करायचं आहे
आता इथून पुढे कोणी प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकण्यात अर्थ नाही. आता हे सगळे एआय करेल इथून पुढे. हो, माहिती साठी किंवा छन्द म्हणून शिकायला हरकत नाही.
बऱ्याच गोष्टींना अगदी अगदी
बऱ्याच गोष्टींना अगदी अगदी झाले.
छान आहे लेख..!
छान आहे लेख..!