पाककृती स्पर्धा क्रमांक १ - जिन्नस एक पदार्थ अनेक - मूगडाळीचा महिमा - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 22 September, 2026 - 04:11

मूगडाळीचा महिमा

मुगडाळ पौष्टिक आणि पचायला सोपी असली तरी चणाडाळी एवढी ती लोकप्रिय नाहीये. तरी ही मुगडाळ वापरून सौम्य चवीची तरी ही स्वादिष्ट अशी थाळी तयार केली आहे.

१) शेपूची भाजी : भिजवलेली मुगडाळ , कांदा , हिरवी मिरची आणि जिरं घालून .

२) काकडीच्या कोशिंबिरीत भिजवलेली मुगडाळ घातली आहे. नारळाचा चव, लिंबू आणि फोडणी गार करून घातली. डाळ अजिबात कच्ची लागत नाही. अशी पडवळाची ही छान लागते. नक्की करून बघा.

३) आम्ही रोजच तूर, मूग मसूर मिक्स डाळीचं वरण करतो आज फक्त मूग डाळीचं. टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता थोडी लसूण फोडणीत घातली. आणि गोडा मसाला घातला आहे.

४) मूगडाळीचा सर्वात लोकप्रिय गोड पदार्थ हलवा पण तुपामुळे आमच्याकडे बिग नो. एवढं तूप खाऊच शकत नाही, म्हणून मुगडाळ पायसम केलं. मुगडाळ धुवून सुकवून भाजून घेतली आणि शिजवली, साधारण घोटून त्यात गुळाच पाणी घालून दोन उकळ्या काढल्या. शेवटी नारळाचा रस घातला. रस काढायचा कंटाळा आला तर साधं दूध ही घालू शकता. स्वादासाठी जायफळ आणि वरून थोडा सुकामेवा.

५) मुगडाळ बोंड : नवीन काही नाही.

६) मुगडाळ डोसा: मुगडाळ भिजवून बारीक वाटून घेतली, वाटताना मीठ, लसूण हिरव्या मिरच्या घातल्या. डोश्याच्या पीठा इतपत पातळ करून पानात नीट वाढता यावेत म्हणून छोटे डोसे घातले. डोसे खूप छान झाले होते. जरा ही चिकटत वगैरे नव्हते आणि कुरकुरीत झाले होते. हाय प्रोटीन डाएट साठी मस्त ऑप्शन आहे.

20260922_120905.jpg

हे पूर्ण ताट
20260922_122254.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच भारी दिसतेय सगळं ममो. यापैकी पायसम नवीन आहे ते करून बघेन. अळू मिळाली की त्याचेही येऊ द्या. Happy

ममोताई, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे..! रुपाली थँक्यु सो मच.
अस्मिता धन्यवाद... अळू आलं तर गाठींची आणि अळूवड्यांची भाजी नक्की दाखवीन इथे.

Pages