मायबोली गणेशोत्सव २०२६ - मतदान आणि निकाल

Submitted by संयोजक on 27 September, 2026 - 12:00

१. शशक लेखन स्पर्धा

प्रवेशिकांची यादी

विजेते

१. हरचंद पालव - अर्जुनविषादयोग

२. स्वाती_आंबोळे - परिपूर्ती

३. मॅगी - अहम् अहम् अस्मि

*=*=*=*=*=*=*=*=*=*

२. लेखन स्पर्धा - पाककृती लेखन

प्रवेशिकांची यादी

विजेते

१. अस्मिता - चिवडा आणि पाल्हाळ

२.स्वाती_आंबोळे - शीघ्रकुंभ कुक्कुटी सावजी रस्सा

३.ऋन्मेऽऽष - स्वयंपाक न जमणार्‍या बाबाचे अंड्याचे फंडे

*=*=*=*=*=*=*=*=*=*


३. पाककृती स्पर्धा १ : जिन्नस एक, पदार्थ अनेक

प्रवेशिकांची यादी

विजेते

१. मूगाष्टक - मूगाच्या आठ रूपांची चविष्ट मैफिल.- अनामिका.

२. पपईचे अष्टावतार- सहेली

३. मस्त, स्वस्त आणि गुणांनी जबरदस्त ! लाल भोपळा.. – धनवन्ती

*=*=*=*=*=*=*=*=*=*

४. पाककृती स्पर्धा २ : दिसतं तसं नसतं

प्रवेशिकांची यादी

विजेते

१. फ्रेश फ्रुट केक, फसवा - अनामिका

२. रसमलाई सरप्राईज - धनि

३. पायनापल पेस्ट्री उर्फ मेयोनीज सँडविच - सहेली

*=*=*=*=*=*=*=*=*=*

५. पाककृती स्पर्धा ३ :पेय- फळ+फूल+ मसाला - चवींचा त्रिवेणी संगम

प्रवेशिकांची यादी

विजेते

१. रंगमोहिनी, फ्रुट ऑम्ब्रे - अनामिका.

२.सुगंधित मोसंबी सरबत - ऋतुराज.

३.रोझ ऑरेंज मोहितो - निल्स_23

मतदानाची वेळ : अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रौ बारा वाजेपर्यंत

स्पर्धांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मायबोलीकरांचे आभार आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> आधीचे स्वतःला दिलेले मत कॅन्सल करायचे शोधताय हे वाचूनच भरून पावलो.
माझे मत दिले तर तुम्हाला एकगठ्ठा ३ मते मिळतील फक्त ते कॅन्सल बटन दिसू देत Happy

अमित, अजून एक सांख्यिकी - अमुक धाग्याला मत दिलेल्या आयडींपैकी कितींनी तो धागा एकदातरी उघडला आहे हे पण बघता येईल Wink

स्वतः प्रवेशिका दिलेली असताना पण दुसऱ्या कोणाची तरी प्रवेशिका आवडली म्हणून त्यांना मतदान करतात, अशा सदस्यांची पण टक्केवारी काढा.

व त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार पण करा.

जर हे सगळे करणारच असाल तर,
आपल्या धाग्यावर प्रतिसाद दिला तर म्हणून त्या आयडीच्या धाग्यावर प्रतिसाद देणारे पण शोधा. लेखक व प्रतिसाद देणारे यांच्यातले relation पाहता येईल, establish होत आहे का ते.

अतरंगी, (अंदाज अपना अपनाच्या भल्लाच्या आवाजात त्याचाच डायलॉग >> ) आपकी मांगे मजदूरों की तरह बढ रही हैं

कोरिलेशन डज नॉन इम्प्लाय कॉजॅलिटी. म्युच्युअल फंड इनवेस्टमेंट्स आर सबजेक्ट टू मार्केट रिस्क!

एकापेक्षा जास्त प्रवेशिकांना मतदान करायचा पर्याय ठेवा, अर्थात एका प्रवेशिकेला एकदाच मत देता येईल Happy पण तसं झालं तर आपल्याला आवडलेल्या सर्व प्रवेशिकांना मत देता येईल. शशक स्पर्धेत खूप दर्जेदार प्रवेशिका आहेत त्यात डावं-उजवं करणं आणि फक्त एकाच प्रवेशिकेला मत देता येणं ये बहुत नाइन्साफी है Happy

चिकु+ १

प्रत्येक विभागात किमान दोन मतं द्यायची सुविधा हवी होती. अन्याय होतोय आपल्याकडून असं वाटतंय.
मूकवाचक असणारे किती छान लिखाण करतात, या वेळी एरव्ही न लिहीणार्‍यांचे आधी वाचले. नियमित मंडळाचे हळू हळू वाचन चालू आहे. वेळ लागतोय.

दिवाळी संपल्यावर जशी फराळाची आठवण होते कि नै, तसं आता छान वाटतंय वाचायला. अगदी दिवाळीच झाली. सर्वांच्या ताटात तेच जिन्नस पण चव वेगवेगळी. संयोजकांचे कौतुक कि त्यांनी एव्हढ्या लोकांना लिहीतं केलं.

मी शाल श्रीफळाची मानकरी आहे. >>>>

पुढच्या गटगला तुला शाल व श्रीफळ नक्की.

सोबत तीन साष्टांग नमस्कार पण.

हा उत्सव फक्त आपल्या आनंदासाठी असतो त्यामुळे मतदान कसे का होईना हे एखाद्याचे वैयक्तिक मत म्हणून आपल्या जागी योग्य आहे. पण मतदान म्हटले की ते शक्य तितके योग्य प्रकारे व्हावे हेच उत्तम.

जर काही त्रुटी किंवा सुधारणा शक्य असतील तर त्या कराव्यात.
नाही सहज शक्य तर सोडाव्यात. ज्यांना हे असे व्हावेसे वाटते त्यांनाही हे उपक्रम तितकेच आनंदाचे वाटत असतातच.

याचे इंटरनॅशनल उदाहरण द्यायचे झाल्यास, २०१९ क्रिकेट वर्ल्ड कप फायनल इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड बघताना एक क्रिकेट प्रेमी म्हणून कोणी का जिंकला आपल्याला फरक पडणार नव्हता. आपल्याला दर्जेदार क्रिकेट आणि रोमहर्षक सामना बघायचा आनंद हवा होता जो त्या सामन्यात पुरेपूर मिळाला. पण तरीही शेवटी एका अयोग्य नियमाने विजेता ठरवला गेला ज्याचा न्यूझीलंडला फटका बसला याचे सर्वांना वाईट वाटलेच.

पुढे तो नियम बदलला गेला.

मला राज ठाकरे यांच्या सारखे वाटते आहे ... Happy म्हणजे माझ्या शशकवर हासले - बोलले बरेच जण, पण मत कुणी देईना....
Biggrin

माझ्या बेसन पोळ्या आवडल्या सगळ्यांना.. पण....

मला एकमताने विजयी घोषित करायला काय हरकत आहे?

एकच मत आहे मला....

शशक चं तर deposit जप्त....
माझं पण मत नाही मिळालं मला.

चमचमीत तुकड्यांनी काही चमक दाखवली नाही...
नुसताच पंजा दाखवला. आता झाकली मूठ सव्वा लाखाची करावी लागणार ...

विमानप्रवास तर इतका तळाला गेलाय.... उडायलाच तयार नाही माझं विमान.

शर्मिला Lol

नेटफ्लिक्स वरची लस्ट स्टोरी महा बोअर असल्याने त्याचा फटका बसून माझही डिपॉझिट जप्त झालय Lol

मी यावेळी कोणत्याच शशक वाचल्या नाहीत.खूप प्रचंड गदारोळ चालू कामात.
त्यामुळं मत दिलंच नाही.
आता जरा चवीने सर्व वाचते.

>>>>म्हणजे माझ्या शशकवर हासले - बोलले बरेच जण, पण मत कुणी देईना....
Biggrin
अरे प्रत्येकाचे आपापले शशक आहेत ना. सरळ ड्यु आय डी काढ Wink

>>>>>मला एकमताने विजयी घोषित करायला काय हरकत आहे?
वा गं तू!!
मला काय पुसतेस?
बरीच की दिसतेस Happy
माझ्या भूपाळीला मिळत नाहीये हे माझे शल्य आहे.

मला काय पुसतेस?
बरीच की दिसतेस >>
मस्त आठवण केलीस.
पूर्ण गाण आठवतय का भोंडल्याचं?

On-line मतदानाचं काय खरं नाय. Ballot paper चा पर्याय असेल आणि मत दिल्यावर बोटाला शाई लावायची व्यवस्था असेल तरच मत दिल्यासारखं वाटतं.

मी शंभर शब्दांत पा कृ लिहून शशक म्हणून डकवली होती. ती दिसतच नाही. कुणी खाल्ली की काय नकळे.

>>>>पूर्ण गाण आठवतय का भोंडल्याचं?

मला नवर्‍याचा पार्ट नीट लक्षात आहे बाई Wink
आणा फणी घाला वेणी
जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी
गेली राणी माहेरा माहेरा

आधी वाटे किती प्रेमळ नवरा आहे नाही! नंतर कळलं बायको माहेरी गेली की यांना जगभर उंडारायला मिळते. Wink

आधी वाटे किती प्रेमळ नवरा आहे नाही! नंतर कळलं बायको माहेरी गेली की यांना जगभर उंडारायला मिळते.>> हा... हा...

Pages