मायबोली गणेशोत्सव २०२६ - मतदान

Submitted by संयोजक on 27 September, 2026 - 12:00

मी पाककृती स्पर्धा 3 मध्ये मलाच मत दिलं होतं ते आता गायब दिसतंय आणि नवीन मत देता येत नाही. ये evm का चक्कर तो नही Wink

तिथेही नाही दिसत cancel ऑप्शन. कुठल्याच स्पर्धेच्या धाग्यात कॅन्सल ऑप्शन दिसत नाही. बाकी सगळीकडे दिलेली मते दिसत आहेत.

दिसतो.
मी क्रोम वापरते

मी २ वेळा मत कॅन्सल करुन परत देऊन पाहिलं

दिसतो.
मी क्रोम वापरते

मी २ वेळा मत कॅन्सल करुन परत देऊन पाहिलं>>> सेम

मीही क्रोम वापरते. फोन आणि लॅपटॉप दोन्हीकडे मला हा ऑप्शन दिसत नाही.
असो, तसंही शुन्य मतं आहेत माझ्या एका मताने काही फरक नाही पडणार.

मतदान करून आले
मे द बेस्ट माबोकर विन
गणपती बाप्पा मोरया

मत बदलायचा पर्याय नाही पाहिजे.
स्पेशली जेव्हा मत दिल्यावर कोणाला किती मते पडली हे दिसत असेल तर बिलकुल नाही पाहिजे.
अन्यथा कोणीही तो कल बघून मग आपले मत फिरवून देईल.

रिया, नाही दिसत. आपण मत दिल्यानंतर दिसतं कोणाला किती मतं आहेत ती.
तुला आधीच दिसत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे.

तुला आधीच दिसत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे.>> असं असेल तर तिच्या माझ्यासारखे बरेच आहेत की मेग इथे Lol दिसतं ग दरवर्षीच पण इथल्या स्पर्धा उत्सव सगळच मजेमजेसाठी असतय म्हणून काही फरक नाही पडत तो भाग वेगळा

Done

स्वाती, मी गणेशोत्सव संयोजकसुद्धा होते, मग मला दिसायला हवा.
दिसतच दरवर्षी पण फरक पडत नाही अजिबात कारण हा उत्सव फक्त आपल्या आनंदासाठी असतो.>> हे तर आहेच ममो. मी फक्त माझी शंका विचारली. सॉफ्टवेअरमध्ये काही बग असेल तर अ‍ॅड्मिनच्या लक्षात आणून देते आहे. कोणाचा विरस करण्यासाठी नाही.

असं नसावं बहुदा स्वाती कारण कधीही संयोजक न झालेल्या आयडींना देखील माझ्यासारखाच ऑप्शन दिसत आहे.

मॅगी, तुला हे असं नाही दिसतेय?IMG_6887.png

'कॅन्सल' ऑप्शन मलाही दिसत नाहीये.
'व्ह्यु पेज सोर्स' मध्ये 'कॅन्सल' असे सर्च केले तर काहीच येत नाही.
.
मला फार फरक पडत नाही. पण जमल्यास, माझे मत मला हपांना द्यायचे आहे. मी इम्पल्सिव्हली स्वतःला दिलेले आहे.

त्या निमित्ताने ड्युआयडीची फौज कामाला लावा. नसेल तर ड्युआयडी काढायला आजचा मुहुर्त चांगला! एआयला विचारुन सदस्यसंख्या मतदान काळात वाढते का? ही एक सांख्यिकी काढता येईल.

त्यानिमित्ताने फस्क्लास आणि सेकंड क्लास मेंबर असा एक धुरळा उडवायचा असेल तर उत्सव संपल्याने आता काही हरकत नाही.
मतदानाचा धागा वर ठेवायला संयोजकांना ही त्यानिमित्ताने मदतच होईल! Wink
तर... आपले अमूल्य मत वाया घालवू नका. मतदान नक्की करा! Happy

हाहा सामो, तुम्ही तेवढ्यासाठी आधीचे स्वतःला दिलेले मत कॅन्सल करायचे शोधताय हे वाचूनच भरून पावलो. नका बदलू प्लीज, बट यू मेड माय डे!

Pages