शशक स्पर्धा - अ'निरु'द्ध - सर्दी (रस : बीभत्स)

Submitted by अ'निरु'द्ध on 14 September, 2026 - 15:04

सर्दी (रस : बीभत्स)

शेजारचा राजू माझ्याच वयाचा.
नेहमीच आमच्याकडे यायचा.

त्याला वारंवार व्हायची सर्दी.
नाकात व्हायची मग भलतीच गर्दी

सोबत शुभ्र रुमाल असायचा.
सारखा सारखा नाक पुसायचा.

एकदा आला आमच्याकडे टोकाची सर्दी घेऊन.
आणि नेमका रुमाल घरी विसरुन.

सर्दीने झाला होता प्रचंड बेजार..
खेळाचा वगैरे सुचतही नव्हता विचार..

अशातच त्याला एक मोठी शिंक आली.
नेहेमीच्या सवयीने ओंजळ नाकावर गेली.

पाठोपाठ तीन चार जोरदार शिंका आल्या
आणि उजवी ओंजळ भरुन गेल्या.

किळस वाटून राजू बेसिनकडे धावला.
डाव्या हाताने पटकन नळ उघडला.

नळाखाली धरले दोन्ही हात.
घाईघाईने एकमेकांवर चोळू लागला जोरात.

पण हाय रे दैवा त्याचं नशीब आडवं आलं…
त्यादिवशी नेमकं आमच्याकडचं पाणीच होतं गेलं..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच !
संपूर्ण शशक यमकात आणि बीभत्स ओत्प्रोत भरलाय

मस्तच
रस आणि अलंकार दोन्ही पुरेपूर आहेत.>>>+१