बिट्टू तबाही - जलप्रदूषणाचा विनाश!

वरील चित्रात दिसत आहे ती एक छोटीशी नदी होती. तिचा लोकांनी कचरा टाकून नाला केला. कालांतराने नाला सुद्धा कचऱ्याने तुंबून गेला.
मग एक वीस वर्षाचा पोरगा बिट्टू तबाही आपल्या मित्रांसह त्या प्रदूषित नदीत उतरला. ना हातमोजे, ना बूट, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोहता देखील येत नसताना त्याने स्वतःहून ती नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. हे असले काही अचाट खूळ मुळात डोक्यात येते कुठून याचेच मला आश्चर्य वाटले.
२६ जानेवारी २०२६ रोजी, मध्य प्रदेशातील हा BSc विद्यार्थी सुरेंद्र सिंग चौधरी आपल्या मित्रांसह बियाओरा येथील अजनार नदीची स्वच्छता करू लागला. त्याने प्लास्टिक आणि इतर कचरा नदीतून बाहेर काढला. त्याने पूजेचा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली. तसेच, मित्रांसोबत पैसे जमा करून स्वच्छतेसाठी लागणारी साधने आणि कचरापेट्या खरेदी केल्या.
त्या घाणेरड्या पाण्याचा हातापायावर संसर्ग होऊ लागला, तसेच तिथे साप फिरताना दिसू लागले तसे एकेक करत त्याचे सारे मित्र या उपक्रमातून बाहेर पडले. अर्थात हे स्वाभाविकच होते. पण बिट्टू तबाही दटून राहिला.
तो रोज हे स्वच्छतेचे काम करायचा आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा. हळूहळू त्याचे हे काम ऑनलाइन हजारो लोकांपर्यंत पोहोचले. काही लोकांनी मात्र तो हे सर्व फक्त लाइक्स मिळवण्यासाठी करत आहे, असा आरोप केला. पण प्रत्यक्षात या कामासाठी त्याला सुमारे ३० हजार रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागले.
एकीकडे तो नदी साफ करत होता तेव्हा दुसरीकडे लोक सवयीने आपला कचरा तिथेच टाकत होते, ते देखील त्याच्यासमोरच. यावर उपाय म्हणून त्याने आपल्या खिशातून पैसे खर्च करून लोकांना निर्माल्य आणि इतर कचरा टाकण्यासाठी नदीकाठी वेगळे ड्रम पुरवले. तर ते ड्रम सुद्धा लोकांनी तोडून त्याच नदीत टाकलेले त्याला आढळले.
पण बरेचदा बदलाची सुरुवात तेव्हा होते, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणीतरी सुरुवात करण्याची आणि इतरांच्या बदलण्याची वाट पाहणे थांबवते. बिट्टू तबाहीने तेच केले.
त्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याने बिफोर आणि आफ्टर असा फोटो टाकला त्यावर लोकांनी "AI है भाई" अश्या कॉमेंट देण्यास सुरुवात केली. इतके त्याचे काम अदभुत होते. पण सुदैवाने या कामाचे आजवरचे सारे व्हिडिओ पुराव्यादाखल त्याच्याकडे होतेच.
तबाहीचा अर्थ “विनाश” असा होतो. बिट्टू तबाहीने जलप्रदूषणाचा विनाश केला होता.
त्याच्या या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेतली गेली.
लेखातील फोटो इंग्लिश क्रिकेटर केविन पीटरसन याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केलेला आहे.
नेदरलँडच्या एका मोठ्या ओशियन क्लिनिंग कंपनीकडून त्याला जॉब ऑफर देखील आली आहे.
मध्यंतरी मी एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यात आपल्या देशातील नद्यांची दुर्दशा दाखवली होती. आणि कॅप्शन होते की या नद्या त्या देशातील आहेत जिथे नदीला माता समजले जाते. वाईट वाटले. तरी हे चित्र काही बदलणार नाही म्हणत स्क्रॉल करून पुढील व्हिडिओवर गेलो होतो. पण एखादा बिट्टू जर एकहाती नदीच्या पात्राचा इतका कायापालट करू शकतो तर जनता आणि सरकार यांनी मनावर घेतले तर काय होईल हा विचार मनात आल्यावाचून राहवले नाही. भले आपण बिट्टू बनून नदीतला कचरा उचलायला त्यात उतरू शकत नसतो तरी दोन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे स्वतः नदीच्या अस्वच्छतेचे कारण न बनणे. आणि त्यानंतर ज्यांनी नद्या स्वच्छ करणे अपेक्षित आहे त्यांच्याकडे ती मागणी लावून धरणे.
या संदर्भातील बिट्टू तबाहीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील आणि इतर काही व्हिडिओच्या लिंक खाली देत आहे. एखाद्यासाठी हा बिट्टू आणि त्याचे कार्य प्रेरणादायी ठरू शकते.
https://www.instagram.com/reel/Dc4TD9-I-4P/?stkn=MTR2M3A4b2ludzRxbw==
https://www.instagram.com/reel/DbIBGohNEvT/?stkn=MXgzNmk0dno5OXRjNw==
https://www.instagram.com/reel/Dc58hBAIw_x/?stkn=MTczYnh1MTB5N29qYw==
बिट्टूू्ची ओळ्ख छान करून
बिट्टूू्ची ओळ्ख छान करून दिली आहे,
सलाम !!!!
सलाम !!!!
बिट्टुचे सुंदर काम आणि त्या
बिट्टुचे सुंदर काम आणि त्या कामाची छान ओळख करून दिली आहे. धन्यवाद ऋन्मेष
फार मस्त बातमी दिलीत ऋन्मेष.
फार मस्त बातमी दिलीत ऋन्मेष. छान विधायक, सकारात्मक बातम्या देताय.
ही बातमी खरंच खूप भारी आहे.
ही बातमी खरंच खूप भारी आहे. अगदी जीवावर उदार होऊन बिट्टून काम केलंय. मला हा ख-या अर्थाने विष्णूचा कार्यकर्ता ( preserver of universe )वाटतो. सलाम. त्याचं नावही बिटृटू महान असं करावं.
जादव पायेंग एकटा जंगल वाढवतो. दुसरा नाव विसरलो एकटा टेकडी खणून रस्ता बनवतो. राहीबाई पोपेरे एकटी बीज संवर्धन करणे. अजून काही उदाहरणं आहेत.
ही सगळी उदाहरणं आलात तर सह, अन्यथा एकटा चलो रे. अशी माणसं खरंच एक वेगळा जिन घेऊन जन्माला येतात. म्हणून ती असामान्य असतात.
<<< दुसरा नाव विसरलो एकटा
<<< दुसरा नाव विसरलो एकटा टेकडी खणून रस्ता बनवतो >>> दशरथ मांझी… mountain man .. त्यांच्यावर चित्रपट सुद्धा होता. नवाझुद्दीन सिद्दीकीचा. मी तो पिच्चर सुद्धा पाहिला आहे. त्यामुळे मलाही ही बातमी वाचून तेच पहिला आठवले.
छान ओळख. भारी काम आहे हे!
छान ओळख. भारी काम आहे हे!
खूप प्रेरणादायी आहे सर्व.
खूप प्रेरणादायी आहे सर्व. बिट्टू ला यश मिळो.
असे बरेच लोक आहेत, जे एआय म्हणुन खिल्ली उडवतील, पण जर खरे आहे कळाले तर माफी मागून कौतुक करायला ही येणार नाहीत. इन्स्टा अशा भंपक लोकांनी भरलेय
>>>दशरथ मांझी… mountain man .
>>>दशरथ मांझी… mountain man .. >>>
ऋन्मेssष धन्यवाद
अतिशय सुंदर ओळख करून दिलीत
अतिशय सुंदर ओळख करून दिलीत साहेब ! फार आवडला लेख. बिट्टू तबाही ने केलेली तबाही तर फारच खास आहे.
बिट्टुचं कौतुक. पण मला वाईट
बिट्टुचं कौतुक. पण मला वाईट वाटलं की जे काम सरकारने, प्रशासनाने आणि लोकांनी करायला हवं ते एका तरूणाला आपल्या खांद्यावर घ्यावं लागलं.
अतिशय सुंदर ओळख करून दिलीत.
अतिशय सुंदर ओळख करून दिलीत.
मस्त रुन्मेष याचा एक व्हिडिओ
मस्त रुन्मेष याचा एक व्हिडिओ बघितला होता पण फॉलो करत नव्हतो
आणि इतकी माहिती नव्हती
आज पेपरला पण आलं आहे छापून त्याच्याबद्दल
कचरा आणि ड्रम टाकणाऱ्या लोकांना जागीच फोडून काढावं असा संताप झाला ते व्हिडिओ बघताना
ही सगळी उदाहरणं आलात तर सह,
ही सगळी उदाहरणं आलात तर सह, अन्यथा एकटा चलो रे. अशी माणसं खरंच एक वेगळा जिन घेऊन जन्माला येतात. म्हणून ती असामान्य असतात.>>>कृपया अशा लोकांना असामान्यत्व बहाल करून त्यांना सामान्यांपासून डिस्कनेक्ट करणे थांबवायला हवे, उलट सामान्य लोक जेंव्हा स्वतःतील उणीवा, साधनसंपत्तीचा अभाव, आणि वर वर सध्या वाटणाऱ्या गोष्टी ही चिकाटीने करायच्या वृत्तीला स्वताःच्या स्थितीशी कनेक्ट करू शकतील तेंव्हाच इतर सामान्यांकडूनही अशाच प्रकारची कामे होण्याची शक्यता वाढेल...हे फक्त माझे मत आहे, मतभिन्नता असु शकते.
फाविद, तुमचा मुद्दा योग्य
फाविद, तुमचा मुद्दा योग्य असला तरी सद्य परिस्थिती पाहता इतरांच्या भावना सुद्धा स्वाभाविकच आहेत.
@ सुनिती
<<< जे काम सरकारने, प्रशासनाने आणि लोकांनी करायला हवं ते एका तरूणाला आपल्या खांद्यावर घ्यावं लागलं.
>>>
हो, दुर्दैवाने अपवाद वगळता हीच आपली देशभरातील सिस्टिम आहे.
पण जर एक सामान्य मुलगा हे करू शकतो तर प्रशासनाने मनावर घेतल्यास ते बरेच काही करू शकतात आणि गैरसोयीना चलता है म्हणत स्वीकारने गरजेचे नाही ही जाणीव लोकांना होईल तसे चित्र बदलू लागेल. ही उदाहरणे घेऊन लोकं आपल्या परिसरात सुद्धा बदल घडावा अशी अपेक्षा करू लागतील.
ट्विस्ट
ट्विस्ट
https://maharashtratimes.com/india-news/madhya-pradesh-bittu-tabahi-ajna...
या ट्विस्ट मध्ये किती सत्यता
या ट्विस्ट मध्ये किती सत्यता आहे हे पुढे मागे येईल समोर.
त्या दरम्यान आज अजून एका ग्रुपने नदी साफ केल्यावर before - after व्हिडिओ टाकला तो बघण्यात आला.
https://www.instagram.com/reel/Dc8L1hXpL58/?stkn=MXg0ZTA5ZzJ3Z2hzag==
https://www.instagram.com/reel/Dc556_IpYXd/?stkn=MXVveHlqMWVld2E5bQ==
खूपच छान ओळख करून दिली आहेस.
खूपच छान ओळख करून दिली आहेस. मला बिट्टूचे इन्स्टा रीलही आले आहे कालच. कामाचे कौतुक आणि आदर. फक्त स्वतःची काळजी घेऊन करावं सगळं बिट्टूने. वर साप, कचरा व्यवस्थापन हे सगळं आलं आहे. नदीत अक्षरशः काहीही असू शकते. रिअल हिरो आहे बिट्टू!
बिट्टुचं कौतुक. पण मला वाईट
बिट्टुचं कौतुक. पण मला वाईट वाटलं की जे काम सरकारने, प्रशासनाने आणि लोकांनी करायला हवं ते एका तरूणाला आपल्या खांद्यावर घ्यावं लागलं.+११११
>>>>>>नदीत अक्षरशः काहीही असू
>>>>>>नदीत अक्षरशः काहीही असू शकते.
+१०१
मगरी, सुसरी व अजगर नकोत बाई. फार मोठी रिस्क घेतोय तो युवक.
बिट्टुच्या कामाची छान ओळख
बिट्टुच्या कामाची छान ओळख करून दिली आहे ऋन्मेष
मनापासून सॅल्युट...
मनापासून सॅल्युट...
छान लेख आहे. सुंदर ओळख करून
छान लेख आहे. सुंदर ओळख करून दिली आहेस.
ऋन्मेष,
ऋन्मेष,
उत्कृष्ट धागा व उत्कृष्ट माहिती
नमस्कार!
अतिशय सुंदर ओळख करून दिलीत...
अतिशय सुंदर ओळख करून दिलीत.....+१.
बिचारा बिट्टू.http://youtube
बिचारा बिट्टू. लोकांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही.
http://youtube.com/post/UgkxOJBxvhVOccBfz2BFsHAr-0mcusGjvWi_?si=TFucBtVh...
(No subject)
अरेरे बिचारा बिट्टू. बिट्टूला
अरेरे बिचारा बिट्टू. बिट्टूला हे लोकं डाकू केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
बाप रे... कचऱ्यासाखी लोकं
बाप रे... कचऱ्यासाखी लोकं असल्यावर सर्वत्र कचराच होणार. एक कुणीतरी रुथलेस लीडर आणि शूट ॲट साइट च्या ऑर्डर्स. लिहायला जड जातंय पण हाच उपाय दिसतोय.
एक कुणीतरी रुथलेस लीडर आणि
एक कुणीतरी रुथलेस लीडर आणि शूट ॲट साइट च्या ऑर्डर्स.+1111
आपल्याकडे लोकशाहीचा अतिरेक झाला आहे, थोड्या प्रमाणात हुकुमशाही हवी काही काळासाठी. किंवा ब्रिटिश अधिकारी जसे लाथा-बुक्क्यांनी तुडवायचे तसे तुडवले गेले पाहिजेत!!!!