
वृद्धाश्रमातील संचालक व काम करणारे सह्कारी मदतनीस लोक यांनीच खर्या अर्थाने वृद्धांचे पालकत्व स्वीकारलेले असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मृत्यूची वाट पहात जगणार्या बेडवरील वृद्ध रुग्णांच्या समस्या समजून घेण्यासाठी बुद्ध्यांका पेक्षा भावनांक अधिक लागतो. वृद्धकल्याण शास्त्राचा अकॅडमिक शिस्तीत अभ्यास करुन केलेले एखादे संशोधन, लेखमाला, पुस्तक यांच महत्व आपल्या जागी आहेच. पण कधी कधी विद्वत्ताप्रचूर सल्ल्यापेक्षा एखादी निर्बुद्ध वाटणारी कृति देखील रुग्णाची भावनिक गरज भागवते. मला इथे विचारवंत लेखक राम बापटांची आठवण आली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी मनस्वास्थ्य राखण्यासाठी मानसोपचार तज्ञाच्या सल्ल्याने रामरक्षेचा आधार घेतला होता. त्यांच्याशी वैचारिक चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या चळवळीतील अनेक तरुण घरी जायचे. एकदा एका विद्रोही कार्यकर्ती तरुणीला त्यांच्या टेबल वर रामरक्षेचे पुस्तक दिसले. त्यावरुन फेबुवर तिने राम बापट यांच्या रामरक्षा प्रकरणावर खिल्ली उडवणारी चर्चा पोस्ट एका विद्रोही विचारमंचावर त्यांच्या मृत्यूनंतर टाकली होती त्यावर बरीच चर्चा झाली.
मी ही त्यांवर एक प्रतिक्रिया दिली -मला वाटत राम बापटांना तुम्ही लोकांनी अगोदर आदर्शवादाच्या तुमच्या प्रतिमेत बंदिस्त केले आहे आणि नंतर चिकित्सा या टायटल खाली आरोपीच्या पिंजर्यात बंदिस्त केले आहे. त्यांची सुटका नाही. त्यांच्या आत्म्याची या बंदिस्त वातावरणात घुसमट होत असेल नाही? मे.पु रेग्यांनी मात्र त्यांच्या हयातीतच सुटका करुन घेतली
एका उपहास स्पेशालिस्ट प्रागतिक राजकीय विचारवंताला अशाच एका बुद्धीवादी चर्चेत प्रतिक्रिया देताना मी लिहिले कि उद्या तुमच्याही मेंदुत रासायनिक बद्ल झाले तर तुमच्याबाबतही हे घडू शकत. हे घडणारच नाही त्याची खात्री आज तुम्ही कशी काय देउ शकता? त्यांनी मला उत्तर देण्याऐवजी तातडीने ब्लॊक करुन टाकले.काही लोक असे असू शकतात की ज्यांना देव, श्रद्धा या संकल्पनेच्या आधाराची आयुष्यभर गरज पडली नाही. काही लोक देव वा श्रद्धा या संकल्पनेचा गरजेपुरताच ( संकट काळी) आधार घेतात पण त्यात अडकून पडत नाही. काही लोक सर्वकाही सुरळीत चालले आहे पण हे असेच चालू राहील याची खात्री नाही तेव्हा सुखाच्या प्रसंगी सुद्धा देवाची आठवण ठेवतात व कृतज्ञता व्यकत करतात.
बी प्रेमानंद जे अब्राहम कोवूर यांच्या चळवळीचा वारसा चालवणारे एक निरिश्वरवादी ( विवेकवादी / बुद्धीप्रामाण्यवादी) चिकित्सक कार्यकर्ते होते. त्यांच्या आजारपणात शेवटच्या दिवसात एक अशी अफवा / बातमी पसरली कि त्यांनी ईश्वराची संकल्पना मान्य केली/ ईश्वर मानला. त्यामुळे काही स्केप्टिक लोकांनी त्यांचे अशा अवस्थेत एक स्टेटमेंट घेतले की" मी ईश्वर मानीत नाही" व त्यांची सही घेतली व ते पत्रक प्रसिद्ध केले.( आता मला त्याचा दुवा देता येणार नाही पण मला मेल आले होते) त्यानंतर ते गेले. खर तर अशा विकलांग अवस्थेत स्टेटमेंत घेणॆ याला तसा अर्थ नाही.
"अस्तु" या चित्रपटात जेव्हा अल्झायमर्स ग्रस्त संस्कृत पंडित डॉ. चक्रपाणि शास्त्री (डॉ. मोहन आगाशे) रस्त्यावरून चालणाऱ्या हत्तीच्या पाठीमागे जात जात माहुताच्या घरापर्यंत पोहोचतात, तेव्हा ते आपले जुने आयुष्य, विद्वत्ता आणि ओळख पूर्णपणे विसरलेले असतात. त्या हत्तीकडे आणि आजूबाजूच्या गोष्टींकडे ते अगदी लहान मुलासारख्या निरागसतेने पाहत असतात.त्यावेळी माहुताची पत्नी 'चन्नम्मा' (अमृता सुभाष) त्यांच्यातील हे बालपण आणि आजारपण सहज ओळखते.
त्या प्रसंगात अमृता सुभाष यांच्या तोंडी थेट संवादापेक्षा कानडी भाषेतील अंगाईगीत आणि तिच्या चेहऱ्यावरील मातृत्वाचे भाव अधिक बोलके आहेत. ती त्यांना जेवण भरवताना आणि सांभाळताना अक्षरश: एखाद्या लहान मुलासारखेच वागवते आणि गाते.थोडक्यात सांगायचे तर, अमृता सुभाष यांच्या अभिनयाने नटलेला हा प्रसंग आपल्याला हेच सांगतो की, जेव्हा वयोमानानुसार माणसाची बुद्धी आणि स्मृती थकते, तेव्हा त्यांच्याशी वैचारिक वाद न घालता, (मग ते कितीही तर्कशुद्ध असोत) त्यांना लहान मूल समजून मायेने जवळ करणे हाच एकमेव मार्ग असतो. अनेक ॲकॅडमिस्ट बुद्धीवंतांना हे कळत असते पण वळत नसते. तसे का होते हा पुन्हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे. मानसशास्त्रज्ञ त्यावर अधिक चांगल्या पद्धतीने लिहू शकतील.
या पोस्ट मधे सोबत जे चित्र आहे त्यावर खर तर भाष्य करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.जे सांगायला हजार शब्दही अपुरे पडतात, ते एखादे चित्र सहजपणे सांगून जाते. माझ्या एका हितचिंतकाने त्यांच्या एका वृद्धाश्रम भेटीत संमतीने घेतलेला तो फोटो आहे. वृद्धाश्रम कोणता? ती वृद्ध स्त्री कोण? हे चित्र कोणत्या सालातील आहे? हे प्रश्न माझ्या दृष्टीने गौण आहेत. हल्ली तर अशी चित्रे ए आय च्या मदतीने सहज उपलब्ध होतात. वर्तमान पत्रे देखील आपल्या बातमी वा लेखाची आशय संपन्नता वाढवण्यासाठी अशा ए आय चित्रांचा वापर करतात. हातात असलेली जपमाळ, बेडवर असलेली दुपट्यात गुंडाळलेली बाहुली,डोळ्यात वाट पहाणारे भाव पाहिले कि करुणाष्टकाची आठवण येते.
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥
… लहान मूल समजून मायेने जवळ
… लहान मूल समजून मायेने जवळ करणे हाच एकमेव मार्ग …
+ १
तर्ककर्कष्य संवाद आणि प्रेमाचे शब्द यात नेहेमी प्रेमच जिंकते. Always offer love, it works better than medicines.
BTW, लहानपणी-तरुण आयुष्यात प्रेमाचा अभाव, कमतरता असेल तर उत्तर आयुष्यात स्वभावातला कोरडेपणा वाढलेला असतो असे एक निरिक्षण आहे.
अमेरिकेतील माझ्या एका सहकार्
अमेरिकेतील माझ्या एका सहकार्याने (जे की स्वतः रिटायर होणार होते, वृद्ध होते), भारतिय कुटुंबव्यवस्थेचे विशेषतः मोठ्या मुलाने आई-वडीलांना सांभाळण्याचे कौतुक केलेले होते. आता विकेंद्रित कुटुंबसंस्थेमुळे ही वृद्धांची समस्या ठळक झालेली आहे हे खरे आहे. 'व्यवस्था' होती ती. त्यात फायदे-तोटे-लाभ-हानी सर्व काही होते.
बुद्धीवादी लोकांचे म्हातारपण
बुद्धीवादी लोकांचे म्हातारपण अजून कठीण. परावलंबित्व व विकलांगता याच्याशी सामना करताना ना धड श्रद्धेचा आधार मिळतो ना वैज्ञानिक दृष्टीकोनाचा. वरील उदाहरणात राम बापटांना केवळ एका रामरक्षेच्या आधारासाठी एका दलित विद्रोही गटाकडून टार्गेट केले गेले ते ही मृत्युपश्चात. म्हणजे त्यांनी आतापर्यंत पुरोगामी वैचारिक साहित्यात जी भर घातली ती एकदम मोडीत काढली . पुरोगामी राजकीय पुढारी व विचारवंत एस एम जोशी यांनी आपल्या मी एस एम या आत्मचरित्रात ईश्वराची लेकरे या प्रकरणात आयुष्याच्या उत्तरार्धात आपले "मी ईश्वर मानत नाही" हे मत कसे बदलले हे वाचण्यासारखे आहे.
सुरेख लेख.
सुरेख लेख.
लहान मूल समजून मायेने जवळ करणे हाच एकमेव मार्ग ….. वाचायला कितीही छान वाटले तरी आचरणात आणायला माझ्यासारख्यांना कठीण, अवघड होते.
आपले "मी ईश्वर मानत नाही" हे मत कसे बदलले हे वाचण्यासारखे आहे...... देवाला रिटायर करा म्हणणाऱ्या डॉ.लागूंनी ,त्यांच्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नियतीवर विश्वास ठेवला होता.
रामरक्षेबाबत मलाही चांगला अनुभव आला आहे. ते काही दिवस महा बेचैनीचे होते. लक्ष विचलित(divert) करण्यासाठी रामरक्षा म्हणत गेले किंवा ऐकली तरी नंतर एक शांतता अनुभवास येत असे. तीच गोष्ट एखाद्या स्तोत्राची .
बाकी देवावर वगैरे विश्वास नाही.
देवाला रिटायर करा म्हणणाऱ्या
देवाला रिटायर करा म्हणणाऱ्या डॉ.लागूंनी ,त्यांच्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नियतीवर विश्वास ठेवला होता.>>>>>>याचा संदर्भ उपलब्ध आहे का? त्यांना अभिप्रेत असलेला नियतीचा अर्थ काय? हे समजून घेतले पाहिजे.
लेख आवडला.
लेख आवडला.
>देवाला रिटायर करा म्हणणाऱ्या डॉ.लागूंनी ,त्यांच्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नियतीवर विश्वास ठेवला होता.>>>>>>> माझ्यासाठी याचा अर्थ त्यांनी मुलाचे अपघाती जाणे स्विकारले, दु:ख झाले तरी 'आमच्याच बाबतीत असे का?' म्हणत ते उगाळत राहीले नाहीत.
>>राम बापटांना केवळ एका रामरक्षेच्या आधारासाठी एका दलित विद्रोही गटाकडून टार्गेट केले गेले ते ही मृत्युपश्चात. >> त्या गटाला स्वतःचा अजेंडा एकतर्फी रेटायला संधी हवी होती ती त्यांनी घेतली. खर्या अर्थाने चर्चा करण्यात रस असता, तितका अभ्यास असता तर ते हयात असताना टार्गेट केले असते.
>>बुद्धीवादी लोकांचे म्हातारपण अजून कठीण>>
खरे बुद्धीवादी असतील तर असे व्हायचे कारण नाही. तसे तर देवावर श्रद्धा असलेलेही बरेचदा माझ्याच वाट्याला हे भोग का म्हणून आक्रोश करताना आढळतात. म्हातारपण हे दुसरे बालपण असे जरी म्हटले तरी ते तसे नसते. बालपणी रोज काहीतरी सकारात्मक बदल, नवे स्किल मिळवणे आहे तर इथे र्हास आहे, बरे तो कशाप्रकारे होईल त्याचाही काही नेम नाही. जोडीला वाढत्या परालंबित्वाची टोचणारी जाणीव आहे. ते 'टेरीबल टू ' मधले बाळ असते ना तसे काहीसे एका टप्प्यावर होते.
गेल्या महिन्यात एक करुण अनुभव आला. माझा एक जेष्ठ मित्र दरवर्षी प्रमाणे फ्लावर शोला मदतनीस म्हणून आला होता. सोबत स्पर्धेसाठी त्याचीही बरीच फुले होती. मी खरे तर एकेकाळी त्याच्याकडूनच मदतनिसाची सर्व कामे शिकले त्यामुळे या वर्षी नेहमीप्रमाणे सर्व काही असे धरुन चालले होते. मी बाकी लोकांचे पेपरवर्क करते तोवर तू तुझ्या फुलांचे पेपरवर्क कर आणि मग मला मदतीला ये असे म्हणून मी त्याचे सर्व सामान माझ्या शेजारच्या टेबलवर मांडले, पेपरवर्कसाठी आवश्यक असलेली लेबल्स, फॉर्म्स वगैरे दिले आणि माझे काम करु लागले. पाचच मिनीटांनी त्याचा प्रश्न आला, 'स्वाती, या फुलाचे नाव काय गं?' मी जरा गोंधळले, पण मनात आले की त्याच्या बायकोने वाढवलेल्या झाडाचे नवे फूल म्हणून विचारत आहे. मी नाव सांगितले, स्पेलिंग सांगितले. काय कॅटेगरीत टाकायचे ते सांगितले. थोड्या वेळाने परत त्याने हाक मारली. हे फूल कशात टाकू? खरे तर ते त्याचे 'हमखास जिंकणारे' फूल होते पण त्याला लेबल करायला जमत नव्हते. आता मात्र मी चमकले पण तसे न दाखवता माझे काम दुसर्याच कुणालातरी सोपवून त्याला प्रत्येक एंट्री कशात करायची, काय लेबल वगैरेसाठी मदत करु लागले. मंदावलेले लेखन, अजून दोनदा फुलाचे नाव काय म्हणून विचारणा, चुकीच्या कॉलममधे चुकीचा कोड वगैरे मागे-पुढे होत एकदाचे पेपरवर्क झाले. टॅग्ज वरचे स्पर्धकाचे नाव झाकले जाईल अशा प्रकारे फोल्ड करणे फक्त उरले होते. टॅग्ज फोल्ड कर मग मी सगळे टेबलवर लावायला नेईन सांगून मी दुसरे काम करायला घेतले. १० मिनीटांनी येवून बघितले तर सगळे टॅग्ज उलट फोल्ड केलेले, नाव न झाकलेले. मी ते सगळे सुलट फोल्ड करायला घेतले. 'ओह! मला वाटलच मी काहीतरी गडबड करतोय पण काय ते कळत नव्हते. असे कसे झाले?' माझ्याकडे उत्तर नव्हते. पुढे दिवसभर या ना त्या निमित्ताने मित्राच्या शरीराचे आणि मनाचे थकणे जाणवत राहिले. घरी आले आणि दिवाही न लावता एकटीच रडत बसले.
आई ग्ग!!! स्वाती तुझी भीती
आई ग्ग!!! स्वाती तुझी भीती दुर्दैवाने खरी असावी. पुढे काय करायचं ठरवलयस? त्यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेणार?
खरे बुद्धीवादी असतील तर असे
खरे बुद्धीवादी असतील तर असे व्हायचे कारण नाही.>>>>>>> हाच तो कळीचा मुद्दा. एका चर्चेत त्या बुद्धीवादी राजकीय विचारवंतानी माझ्या असा बदल होणे शक्यच नाही असे ठाम विधान केले होते
तुम्हा आम्हाला आज जे चुकीचे वाटते तशीच परिस्थिती तुमच्या अंतापर्यंत राहील याची शाश्वती आजे देणे हा तो मुद्दा. भविष्यात एखादी आपत्तीजन परिस्थिती उदभवल्यावर त्या माणसाचा मेंदू कसा काम करेल याचे भाकित आज तुम्हाला देता येत नाही. कुणाच्या डोक्यात अशा परिस्थितीत काय केमिकल लोच्या होतील हे सांगता येत नाही.केमिकल लोच्या तून दयाळू माणुस क्रूर होउ शकतो वा उलट. अधिक संदर्भासाठी मेंदुच्या मनात, मनात. मेंदुतला माणुस ही पुस्तके वाचावीत. मानसशास्त्तज्ञ यावर अधिक चांगले भाष्य करतील.
नास्तिकतेच्या पट्ट्यातील काही लोक सश्रद्ध व अस्तिक लोकांविषयी ममत्व बाळगून असतात त्यांना कट्टर नास्तिक लोक 'कच्चे मडके' असे संबोधतात. त्यांचे मते ईश्वर मानणार्यांना संधी मिळेल तिथे झोडपले पाहिजे व नास्तिकवादाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. सामाजिक दबावामुळे तसे थेट म्हणण्याचे ते धाडस करत नसतील पण त्यांच्या लेखनशैलीतून/ बोलीतून तसे जाणवते
मानला तर देव नाही तर दगड हे सश्रद्ध मूर्तिपूजक जाणत असतो. निर्गुण निराकार ईश्वर हा मेंदुला कल्पायला अवघड जात असावा त्यामुळे त्याचे सगुण साकार रुप निर्माण झाले.प्रतिक ही मानवी मेंदुच्या गरजेतून निर्माण झाली. राजमुद्रा, राष्ट्रगीत राष्ट्रध्वज लोगो ही काय आहेत शेवटी प्रतिकच आहेत.तिरंगी झेंडा हा तीन रंगात असलेले मध्ये एक चक्राची आकृती असलेले कापड आहे असे त्याचे वस्तुस्थिती दर्शक वर्णन करता येतील.पण त्याच्या शी निगडीत असलेया भावनेच काय? एक बुद्धीप्रामाण्यवादी उदार राजा असतो. तो अनेकांना दरबारात बोलवून विविध विषयांवर चर्चा वाद संवाद करीत असे. एकदा एक साधु आला. त्याचे आदरातिथ्य राजाने केले. नंतर राजाने त्याच्याशी मुर्ती हा देव नसून एक दगड आहे असा वाद घातला. साधुने राजाची एक तसबीर मागवली. त्या तसबीरीवर नंतर तो थुंकला. राजाला राग आला पण त्याने नम्रपणे विचारले," महाराज मी आपले आदरातिथ्य केले. पण आपण मात्र माझा अनादर केलात." साधु म्हणाला." नाही मी तसबीरीवर थुंकलो राजावर नाही. तसबीर ही केवळ एक वस्तू आहे."
अशा आशयाची बोधकथा आपण वाचतो.प्रतिक या गोष्टीच महत्व सांगणारी ती कथा आहे. केवळ बुद्धीने विचार करुन चालत नाही तर व्यकीच्या भावनिक ही काही गरजा असतात. म्हणुनच ईक्यू देखील महत्वाचा आहे. जास्त आयक्यू व कमी ईक्यु मुळे मानसिक आरोग्याच्या काही समस्या उदभवतात. बुद्धीवंतांची त्याच्यातून सुटका नाही.
>>कुणाच्या डोक्यात अशा
>>कुणाच्या डोक्यात अशा परिस्थितीत काय केमिकल लोच्या होतील हे सांगता येत नाही.>> बरोबर. म्हणूनच म्हटले की खरे बुद्धीवादी असल्यास हे सत्य स्विकारलेले असावे. तुमचे शरीर बदलते तसे मनही बदलू शकते. वार्धक्यात शरीराच्या गरजा बदलतात तशा मनाच्याही बदलू शकतात. निरीश्वरवादी आहात ठीक आहे पण म्हणून दुसर्या ईश्वरवादी व्यक्तीला येताजाता झोडपत रहायला हवे असा नाही. मात्र देवाधर्माच्या नावाखाली चुकीचे वर्तन असेल तर नक्कीच विरोध करावा. आपल्या बर्याच संतांनीही तो केला आहे.
मी आस्तिक आहे. उद्या एखादी निरीश्वरवादी व्यक्ती परीस्थितीला शरण जावून देवाची प्रार्थना करु लागली तर अशावेळी मी तिला होईल सगळे ठीक म्हणून शक्य ती मदत करणेच योग्य असणार. त्या परीस्थितीत तिला खिजवणे, तिने पूर्वी वेळोवेळी माझ्या श्रद्धेची खिल्ली उडवली होती म्हणून आता त्याची परतफेड करणे असे काही मी करणार असेन, तिची आजची स्थिती बघून मला आनंद होणार असेल तर मग माझ्या आस्तिक असण्यावरच प्रश्नचिन्ह.
प्रघा, हे सगळं शिर्षकापासून
प्रघा, हे सगळं शिर्षकापासून वेगळ्या दिशेने जात नाहीय का? (मला आधी फेसबुकवरील वृद्धांचे पालकत्व असा धागा आहे, त्या धर्तीवर धागा आहे असे वाटले होते. नसल्यास आक्षेप नाही पण शीर्षक अधिक समर्पक करता येईल का?)
वृद्धांचे पालकत्व मध्ये आस्तिकता/नास्तिकता त्याचे फायदे तोटे हा एक मुद्दा असु शकतो पण तोच मुख्य मुद्दा झाला असे वाटले तेव्हा काही मुद्दे मांडतो:
किती नास्तिक आहेत भारतात याबद्दल काहीवेळा शोधुन वाचले आहे. आताही परत वाचले.
२०११ च्या जनगणनेत नास्तिक अशी (आवर्जून म्हणता येईल बहुतेक) नोंद केलेले ३३ हजार. नंतर २०१८ आसपास खाजगी सर्वेक्षणानुसार २८ लाख.
१२५ करोड (तेव्हाची लोकसंख्या धरली तर) मध्ये २८ लाख.
आता नास्तिक पैकी काही लोक तो एक पंथ असल्यासारखे वागतात, "हा /ही नक्कीच नास्तिक ना" परखून पहात रहातात आणि हिरीरीने "सापडलं! हा /ही नाहीच नास्तिक" करतात हे बरोबर आहे. पण परत नास्तिकांपैकी असे किती टक्के? आणि अस्तिकांपैकीही किती टक्के? हे स्वतःला नास्तिक म्हणवतात पण त्यांना स्वतःलाच कळत नाही, अमुक म्हणजेही श्रद्धाच बरं का करणारे आस्तिक? अस्तिकांना झोडपले पाहिजे म्हणणारे आहेत तसेच नास्तिकांना झोडपले पाहिजे म्हणणारे ही असतात.
डिमेन्शिया किंवा तत्सम मेंदू/मानसिक ऱ्हासामुळे माणुस कसा वागेल सांगता येत नाही हे बरोबर आहे. पण ते दोन्ही बाजुंनी होऊ शकते ना. आणि कठीण प्रसंगी लोक बदलू शकतात हे ही बरोबर. पण त्याच बरोबर आधीच प्रचंड दीर्घकाळ कठीण परिस्थितीतून गेलेले जात असलेले लोकही असतात (साधारण बहुतेकांच्या जीवनात चढ उतार असतातच त्याबद्दल नव्हे, तर सहसा जावे लागत नाही त्या मल्टिपल परिस्थितींमधुन.) मुद्दा हा की सगळं काही आलबेल आहे, म्हणुनच नास्तिक आहेत असेच नसते.
तेव्हा परत एकदा हे सगळं वृद्धांचे पालकत्वमध्ये चर्चिण्यापेक्षा आस्तिकता/नास्तिकता त्याचे फायदे तोटे हा एक मुद्दा असु शकतो पण इतर बरेच काही आहे.
उदा: डिमेन्शिया किंवा समरणशक्ती क्षीण होणाऱ्या वृद्धाला "ही कोण सांगा बरं? नाही ओळखलं? आठवा बरं. बरं याला ती ओळखलं का?" वगैरे करू नये. उलट आपणच कोण हे पटकन सांगुन पुढं आणखी थोडं लक्षात येईल अशी माहिती सहज बोलल्या सारखी सांगावी नाहीतर त्यांना आपण विसरतोय ते चांगलंच चुकतंय वाटून उलट त्रासच होतो.
त्यांना शक्यतो स्वतंत्रपणे ते करू शकतात ते करू द्यावे, तसे प्रोत्साहन द्यावे. खुबीने जेवणाखाणाचे तसेच इतर पर्याय निवडू द्यावे. वगैरे. डिमेन्शिया व्यतिरिक्त इतर आजार, समस्या, आव्हाने.
लोकांचे आपापले अनुभव शेअर करता येतील.
<< त्यांचे मते ईश्वर मानणार्
<< त्यांचे मते ईश्वर मानणार्यांना संधी मिळेल तिथे झोडपले पाहिजे व नास्तिकवादाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. >>
------ हे उलट प्रकारे पण होत असते. ईश्वर न मानणार्यांना संधी मिळेल तिथे झोडपले पाहिजे व आस्तिकवादाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे... सर्वच लोक असे करत नाही, अपवाद आहेत.
ईश्वराला मानणारे लोक हे शेवट पर्यंत देवावर विश्वास ठेवतात असेही नाही. त्यांचेही मत परिवर्तन ( देव देव करुन किती वेळा वाया घालविला आणि शेवटी हाती का य आले/ राहिले ? ) होत असते.
विचारांत बदल होणे हे नैसर्गिक आहे, चढ उतार असणारच. आजचे जे काही विचार असतील ते काळाच्या बदलणार्या कसोटीवर आहे तसेच रहातील असे नाही.
>>>>>उदा: डिमेन्शिया किंवा
>>>>>उदा: डिमेन्शिया किंवा समरणशक्ती क्षीण होणाऱ्या वृद्धाला "ही कोण सांगा बरं? नाही ओळखलं? आठवा बरं. बरं याला ती ओळखलं का?" वगैरे करू नये. उलट आपणच कोण हे पटकन सांगुन पुढं आणखी थोडं लक्षात येईल अशी माहिती सहज बोलल्या सारखी सांगावी नाहीतर त्यांना आपण विसरतोय ते चांगलंच चुकतंय वाटून उलट त्रासच होतो.
त्यांना शक्यतो स्वतंत्रपणे ते करू शकतात ते करू द्यावे, तसे प्रोत्साहन द्यावे. खुबीने जेवणाखाणाचे तसेच इतर पर्याय निवडू द्यावे. वगैरे. डिमेन्शिया व्यतिरिक्त इतर आजार, समस्या, आव्हाने.
उत्तम सूचना.
मानव, चर्चा कोणत्या दिशेने
मानव, चर्चा कोणत्या दिशेने जावी हे धागालेखकाच्या हातात नसते. यावर पुर्वी मी धागा भरकटण्याचा धोका या धाग्यात ती चर्चा आहे.
वृद्धावस्थेत होणारे मानसिक बदल हे एक समान सूत्र धाग्यात व चर्चेत आहे. अशा वृद्धांचे पालकत्व स्वीकारणारे लोक वेगवेगळे असतील जसे की चित्रात असलेल्या वृद्धेचे पालकत्व हे वृद्धाश्रमातील स्वीकारलेले आहे. तर धाग्यातील इतर वृद्धांचे पालकत्व हे कुटुंबिय व समाजाने स्वीकारले आहे. मला स्वत:ला वाचकांना वृद्धांमधे होणारे मानसिक व शारिरिक बदल हा मुद्दा महत्वाचा वाटत असल्यास ती आनुषंगिक चर्चा देखील उपयुक्त वाटते. वृद्धकल्याण शास्त्राचा अकॅडमिक शिस्तीत अभ्यास करुन केलेले एखादे संशोधन, लेखमाला, पुस्तक यांच महत्व आपल्या जागी आहेच. हे मी धाग्यात म्हटले आहेच. स्वाती2 यांनी स्वीकारलेले त्यांच्या जेष्ठ मित्राचे प्रासंगिक पालकत्वाचे उदाहरण मला महत्वाचे वाटले. बिंदुगामी चर्चेच्या चौकटीत कधी कधी आनुषंगिक मुद्द्यांची घुसमट होते व साकल्याने विचार करण्याची क्षमता कमी होते
उदा: डिमेन्शिया किंवा
उदा: डिमेन्शिया किंवा समरणशक्ती क्षीण होणाऱ्या वृद्धाला "ही कोण सांगा बरं? नाही ओळखलं? आठवा बरं. बरं याला ती ओळखलं का?" वगैरे करू नये. उलट आपणच कोण हे पटकन सांगुन पुढं आणखी थोडं लक्षात येईल अशी माहिती सहज बोलल्या सारखी सांगावी नाहीतर त्यांना आपण विसरतोय ते चांगलंच चुकतंय वाटून उलट त्रासच होतो.>>>>>>> +१
वृद्धकल्याण शास्त्राच्या अभ्यासकांसाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कदाचित त्यांना अरे आपण हा ही एक आयाम आहे हे आपण लक्षात घेतलेच नव्हते असे देखील वाटू शकते
प्रतिसाद थोडा घाईत दिला मी,
प्रतिसाद थोडा घाईत दिला मी, अस्थानी आहे ते नंतर लक्षात आले. 🙈
आता संपादनाची वेळ निघून गेली.
याचा संदर्भ उपलब्ध आहे का?
याचा संदर्भ उपलब्ध आहे का? त्यांना अभिप्रेत असलेला नियतीचा अर्थ काय? >>>>>> हा उल्लेख दिवाळी अंकातील दुसर्याच लेखकाच्या लेखात वाचला होता.लागूंचे नव्हे तर विपरीत परिस्थितीमुळे माणूस विकल होतो त्याचे वाईट त्यावेळीही वाईट वाटले होते,आताही वाटते.
नंतरचे प्रतिसाद वाचायचे आहेत.फक्त स्वाती२ यांचा प्रतिसाद पटकन वाचला.
अनिंद्य, तुमचा प्रतिसाद
अनिंद्य, तुमचा प्रतिसाद अस्थानी कसा?
लहानपणी-तरुण आयुष्यात प्रेमाचा अभाव, कमतरता असेल तर उत्तर आयुष्यात स्वभावातला कोरडेपणा वाढलेला असतो असे एक निरिक्षण आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे.