ब्रँडस् - आवडीचे, नावडते

Submitted by अनिंद्य on 29 June, 2026 - 06:28

जाणते- अजाणते पणी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण डझनावारी ब्रँडस् वापरत असतो. सकाळी झोपेतून उठल्यावर “कोलगेट” ची टूथपेस्ट- टूथब्रश वापरून दात घासतो. “अमूल/ गोकुळ / वारणा” ब्रँडचं दूध येतं, त्यात “ब्रुकबॉण्डची” चहा पावडर किंवा “ब्रू/ नेस्केफे” ची कॉफ़ी पावडर टाकून चहा-कॉफी. नाश्त्याला पोहे, अंडी. पराठे, ब्रेड, सिरियल्स, त्यासाठी लागणारे तेल, तूप, मसाले, बटर, प्रोटीन पावडरी, बाटलीबंद ज्यूस …. ब्रिटानिया, केलॉग्स, आयटीसी, आशिर्वाद, हिन्दुस्तान यूनिलीवर, डाबर… अनेकानेक ब्रँडस् पुढ्यात येतात. अगदी मीठसुद्धा “टाटा नमक - देश का नमक” !

7a1e1dc4-baf6-4041-86fa-a4867687fc46.jpeg

नानाविध ब्रँडसच्या सोबतीने सुरु झालेला हा प्रवास दिवस संपेपर्यंत चालूच राहतो. मिक्सर ग्राइंडर, ओवन, फ्रिज, टीव्ही, फोन, कार- दुचाकी- सायकली, घड्याळ, कपडे, पादत्राणे…. झोमेटो- स्विगी, BHIM - Gpay, Flipcart, Amezon, Big Basket, Dmart एक ना दोन. शहरी भागात राहणारी मध्यमवर्गीय भारतीय व्यक्ती एका दिवसात किमान ५० ब्रँडसच्या वस्तू वापरते असे तज्ञ सांगतात.

आजमतीला भारतात ३२ लाखांपेक्षा जास्त नाममुद्रांसकटचे ब्रँडस् सरकारदरबारी नोंदवलेले आहेत. त्यात शंभर वर्षांपेक्षाही जुने क्लासिक ब्रँडस् जसे आहेत तसे नवीन, अल्पावधीत लोकप्रिय झालेले जेन झी ब्रँडस् सुद्धा आहेत. त्यात दररोज नवी भर पडत आहे. Vocal for Local या नाऱ्यामुळे unorganised sector मधले अनेक छोटे व्यवसाय स्वत:च्या विशिष्ट ओळखीबद्दल, ट्रेडमार्क / नाममुद्रा आणि त्यांच्या उत्पादनांची नक्कल करणाऱ्या प्रतिस्पर्धींबद्दल जागरूक झाले आहेत, होत आहेत.

dc61c6d7-3c4f-4626-be4a-eeb7b1258be1.jpeg

भारतीय बाजारात ग्राहकांसाठी सध्या spoilt for choice अशी परिस्थिती आहे. साधे चिप्स घ्यायचे असतील तर कोपऱ्यावरच्या वाण्याकडे १०-२० प्रकार दारातच मांडून ठेवलेले दिसतील, मिठाईच्या दुकानात ४० प्रकारच्या मिठाया आणि टीव्हीच्या शोरूम मधे भिंतभर चकाकत्या टीव्ही स्क्रीनस्.

35504ace-084a-4193-8c18-4a7005bd5cf7.jpeg

बाजारात असंख्य उत्पादने सतत डोळ्यावर आदळत असतात. आता तर बाजारात जायचीही गरज नाही, बाज़ारच आपल्या टीवी-फोन स्क्रीनवर अवतरलाय. ब्रँडस् ची कधीही न संपणारी जत्रा.

या प्रचंड पसाऱ्यातून आपल्या वापरासाठी उत्पादने- सेवा आपण कशी निवडतो ?

रोजच्या वापरातल्या काही वस्तू आपण वर्षानुवर्षे एका विशिष्ट ब्रँडच्याच वापरतो. व्यक्तिगत पसंती, दर्जा, किंमत, सवय, वापरातून मिळणारा आनंद अशा अनेक घटकांचे मिश्रण या निवडी मागे असते. अगदी अट्टल मद्यपीसुद्धा त्याच्या नेहेमीच्या ब्रँडची दारू नसेल तर खट्टू होतो.

3f7eef11-d8fc-4c29-9a18-2aa21c77b511.jpeg

असेच काहीसे लहानपणी वापरलेल्या उत्पादनांबद्दल. आनंदमयी स्मृती आणि पुन:प्रत्ययाचे सुख यामुळे आपण त्या निर्जीव वस्तूंशी जोडले गेलेले असतो. दिवाळीच्या वाइब्ज देणारा मोती साबण असो की शाळेतल्या दिवसांची आठवण करून देणारी पार्लेची षट्कोणी सिक्सर्स बिस्किटे आणि रावळगावच्या पानपसंद कँडीज्. सुखस्मृतीतले ब्रँडस्.

2211081e-e17f-4267-b3b2-e40b6fab3bd8.jpeg

बाजारात येणारी नवनवीन उत्पादने “एकदा वापरून तर पाहू” असा विचार करणारे लोक कमी नाहीत. आपणही असे करतो, नाविन्याची आवड कुणाला नसते ?

वस्तूची किंमत आणि आपले बजेट यावरही आपली निवड ठरते. आपल्या भारतीय मनाला “value for money” चे ज्ञान जणू जन्मत:च असते. म्हणून बहुतेक लोक हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घेतात. स्वस्त असेल तर त्याला पसंती मिळते, पण सरसकट नाही. काही दिवसातच निकामी होणारी उत्पादने आपण पुन्हापुन्हा त्याच ब्रँडची घेत नाही.

गुणवत्ता / चव / वापरायला सोपे या निकषांवर टिकणारे ब्रँडस - यांची उत्पादने पुन:पुन्हा खपतात. त्यासाठी premium देण्याची, अधिक किंमत मोजण्याची आपली तयारी असते. नीट तपासून पारखून अशी खरेदी होते. याउलट आणिबाणीची परिस्थिती असल्यास, खूप घाई असल्यास ब्रँडकडे दुर्लक्ष करून पटकन खरेदी आटोपली जाते.

मित्र / परिवार / अन्य वापरकर्त्यांचे सल्ले आणि अनुभव हा तर आपल्या निवडीवर मोठा पगडा असलेला घटक. त्यात आता भर डिजिटल डिस्कवरीची. इन्स्टाग्राम, वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या वेबसाईटस्, Influencers च्या सुचवण्यांची. त्यांनी सुचवलेली उत्पादने, सतत आपल्या स्क्रीन्सवर आदळणाऱ्या आकर्षक जाहिराती आपल्याला खूपदा भरीस पाडतात. हवे असलेले तर विकत घेतोच, फारशी गरज नसलेले, आधी कधीच न वापरलेले उत्पादन सुद्धा अलगद आपल्या खरेदीत सामिल होते. यात अन्य ग्राहकांनी उत्पादन/ सेवेला दिलेले मानांकन / रेटिंग आपण हमखास बघतो.

तर मंडळी, to cut the long story short, आपल्या आवडत्या ब्रँडस् बद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

• तुमचे आवडते ब्रँडस् कोणते ? तुम्हाला ते का आवडतात ? नावडते कोणते ?

कोणतीही नवीन वस्तू (प्रॉडक्ट)/ सेवा (सर्विस) विकत घेतांना तुम्ही काय निकष लावता ? कसे ठरवता ?

रोजच्या वापरातले आणि कधीतरीच लागणारे products; स्वस्त-महाग वस्तू यासाठी तुमची निवडप्रक्रिया- निकष सेम असतात की वेगवेगळे?

डिजिटल डिस्कवरी/ जालावरून प्रथम माहिती घेऊन मग विकत घेतलेली उत्पादने आणि सेवा, त्यांचे प्रकार, त्याबद्दलचे बरेवाईट अनुभव सांगाल का ?

आधी वापरलेले आणि अजून आठवणीत असलेले ब्रँडस्. ज्यांचा comeback व्हावा असे वाटते ते विस्मरणात गेलेले ब्रँडस् आणि आनुषंगिक आठवणी, अनुभव, माहिती.

Aspirational, भविष्यात कधीतरी विकत घेऊ अशी आकांक्षा मनात असलेले ब्रँडस्.

भारतात आता भरपूर विदेशी ब्रँडस् उपलब्ध आहेत. तस्मात् विदेशात रहाणाऱ्या माबोकरांनी तिथल्या आवडत्या-नावडत्या ब्रँडस बद्दल लिहिले तर त्याचेही स्वागत आहे.


• तुम्ही स्वत: एखाद्या ब्रँडनिर्मितीत सहभागी असल्यास त्याबद्दलचे अनुभव.

अशी सर्वसमावेशी चर्चा इथे करू या.

वि. सू :

१} हा कुठलाही (sponsored or otherwise) रीसर्च प्रोजेक्ट नाही, एक गंमत, माहितीची देवाणघेवाण आणि विरंगुळा म्हणून धागा काढला आहे.

२} आपले अनुभव आणि विचारप्रक्रिया जाणून घ्यायला, इथे होणाऱ्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आणि आवडत्या ब्रँडस् बद्दलच्या चर्चेतून समृद्ध व्हायला उत्सुक आहे.

=========
(धाग्यातले सर्व फोटो माझे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्वालिटी माहिती नाही पण बेनेट कोलमन अँड कंपनी (बीसीसीएल) जितके स्पर्धात्मक आणि अग्रेसिव ब्रँड पोझिशनिंग करते तितके दुसरे मीडिया ग्रूप करताना दिसले नाहीत, इलेक्ट्रॉनिक मध्ये इंडिया टुडे नेटवर्क.

तुम्ही गुगल पूर्व जमान्यात लिहिलंय खरं, पण गुगलच आज इतिहास जमा झालं आहे. शुद्ध सात्त्विक गूगल सर्च शेवटचा कधी केला असेल आठवावे लागेल परिस्थिती गेल्या पाच सहा महिन्यांत आलेली आहे. जेमिनाय, चॅटजिपिटी यांनीच माझ्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. Happy समर्पक असल्याने त्यांना अव्हेरुन सर्च रिझल्ट बघण्याची वेळ फार कमी आली.

अमितव,

यू म्हणिंग राइट. गुगलवा थोडा पुराना हुई गवा.

सध्या जाहिरातींचा सारखा मारा करणारा ब्रँड म्हणजे Rayban + Meta AI glasses. आता तर Gen2 सिरीज पण आली आहे.

मी ब्रँड बघून शक्यतो कधी खरेदी करत नाही. पण आवडीच्यांमध्ये पार्ले जी, जॉकी, खादी, विको, PNG, WHP , प्रेस्टीज आणि चितळे आठवलेच. कोणी decathlon बद्दल वरती लिहिलंय का माहित नाही पण त्याच्या बऱ्याच वस्तू घरात आहेत. एका हंगेरियन बाईकडे माझ्याकडे असलेल्या योग मॅट सारखी मॅट पाहिली आणि विचारपूस केल्यावर समजले की तिने इथे decathlon नसल्यामुळे ती मॅट हंगेरी हून आणली आहे आणि ती त्यांची फॅन आहे.

क्लिनिक व एस्टी लॉडर. - निव्वळ!
क्लिनिकचे अ‍ॅरोमॅटिक एलिक्झिर. एस्टी लॉडरची 'रेड डोअर' पावडर.

decathlon स्वस्त आणि मस्त प्रॉडक्टस् ठेवतात.

कधीकधी फार चांगल्या डील्स असतात. Worth grabbing.

@ सामो, तुमचे ब्रँडस् ओळखीचे नाहीत. क्लिनिकचा शँपू माहित आहे फक्त.

“जगात भारी” असलेल्या काही ब्रँडस् ना भारतीय बाजाराने “आम्ही नाही जा” म्हटलेली काही उदाहरणे :

१} Ford / फ़ोर्ड मोटर कंपनी आणि General Motors जनरल मोटर्स

२० वर्ष प्रयत्न आणि भरपूर नुकसान सहन केल्यावर २०२१ मधे फोर्डनी भारतातून गाशा गुंडाळला.

२} त्याआधी २०१७ मधेच GM सारख्या नामांकित ब्रँड ने Chevrolet कार्सचे भारतातील उत्पादन थांबवून भारतीय मार्केटला टाटा केला होता.

३} Kellogg's हा जगप्रसिद्ध ब्रँड नव्वदीच्या दशकात भारतात पहिल्यांदा ब्रेकफास्ट सिरियल्स घेवून आला तेव्हां सपाटून आपटला होता. बहुतेक सर्व भारतीय management schools च्या case studies मधे हा एक मुद्दा असायचाच. आता अनेक वर्षांनी बऱ्याच खटाटोपानंतर या ब्रँडला भारतात थोड़े बरे दिवस आले आहेत.

४} McDonald's, KFC आता भारतात स्थिरावले आहेत पण यांच्याचसोबत आलेला Wendy's मात्र गडगडला. बिझनेस मॉडल फार वेगळे आहे असे नाही पण समहाऊ हा international fast-food chain ब्रँड भारतात जम बसवूच शकला नाही.

५} Kodak, Nokia, Onida TV, Blackberry, Volkswagen Bettle हे असेच काही फेल गेलेले ब्रँडस्. पैकी Blackberry फोन्स वर मागील पानांमधे चर्चा झाली आहे.

वर आलेले ब्रँडस् भारतात बाहेरून आलेले आहेत पण Tata Nano, किंवा Bisleri Pop हे देशी ब्रँडस् सुद्धा असेच झोपलेत.

Nano ची स्टोरी तर सर्वांनाच माहिती आहे.

बिसलेरी हा packaged drinking water बाटलीबंद पाण्याचा अत्यंत लोकप्रिय भारतीय ब्रँड. जसे फ़ोटोकॉपीला xerox हा शब्द पर्यायवाची झाला, स्थिरावला, तसेच भारतात बिसलेरी म्हणजे पाण्याची बाटली, इतकी प्रसिद्धी. पण याच देशी ब्रँडने Pina Colada, Fonzo, Spice, Limonata ही शीतपेयं Bisleri Pop म्हणून लॉंच केलीत तर त्याला कुत्रंही विचारे ना !! सपशेल फेल गेले हे Bisleri Pop.

Videocon हा रंगीत टीव्हीतला आद्य भारतीय ब्रँड असाच अचानक कालवश झाला.

Chevrolet भारतातून तवेरा मुळे गेली हे नुकतेच वाचले. पुन्हा शोधून देईन हवं असेल तर. इंटरेस्टिंग स्टोरी आहे.

Videocon चं कारण माहिती असेलच.

Chevrolet भारतातून तवेरा मुळे गेली हे नुकतेच वाचले. पुन्हा शोधून देईन हवं असेल तर. इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
Submitted by राज अज्ञानी on 23 July, 2026 - 14:37

https://www.youtube.com/watch?v=cOy69EhpQ64

थँक्यू.

टवेरा स्टोरीकडे लक्ष गेले नाही आधी, बघतो- ऐकतो.

प्रथम दर्शनी लिंक मधले AI generated graphics बोअर दिसताहेत, hope the story makes up for it Happy

अमेरिकन मार्केट मधले इसुझुचे पिकप मस्त, स्टर्डी होते. इथे इसुझुने पॅसेंजर मार्केटमधुन काढता पाय घेतला आणि आता ते फक्त कमर्शियल ट्रक बनवतात..

वरची क्लिप अर्धवट पाहिली, ऑडियोचा लोचा आहे. शेवीने भारतात इसुझु एसयुवि रिब्रँडकरुन आणली तर तो स्कॅम होत नाहि, कारण जीएमचा इसुझु मधे स्टेक होता...

इथे इसुझुने पॅसेंजर मार्केटमधुन काढता पाय घेतला आणि आता ते फक्त कमर्शियल ट्रक बनवतात.

तरीही एकंदरीत इसुझूने डी - मॅक्स सिरीज काढून देशी जनतेला (टोयोटाने Hilux भारतात आणे आणे पर्यंत) चांगली झटापट केली होती !

उबो, चांगला बनवला आहे व्हिडीओ. हेच वाचले आहे.
याच मुलाचा पजेरोचा व्हिडीओ लगोलग पाहून घेतला. पजेरोचा लुक फॉर्च्युनर पेक्षा जास्त आवडतो.

ब्रँड अधोगती भविष्यवाणी -

पेपरबोट (इंडिगो अन् तत्सम कंत्राटे संपल्यावर) फुल गाळात जाणार ! चाईल्डहूड नॉस्टॅल्जिया सारख्या पिचिंग वर मार्केट मधे उभी झालेली कंपनी पण आता एकंदरीतच प्रॉडक्ट रेंज मधे साखरेचे प्रमाण पाहता काही खास भविष्य दिसत नाही !

दुसरे म्हणजे स्टोरीया ह्यांनी तर हद्द केली ! नॅचरल कोकोनट वॉटर म्हणून साखर ॲड केलेले नारळपाणी विकू लागले आहेत ते पण ₹ ९८/ लिटर !

आमच्या हापिसाच्या जवळ एकदा पान टपरी वर ऊर्जा कंपनी/ डेअरीचे ताक बघितले. पुण्याच्या कुतवळ फूड प्रॉडक्ट कंपनीचे आहे ३५ का ४० रुपयांना अर्धा लिटरची पेट बॉटल (खालीलप्रमाणे) मिळाली, अगदीच मापात मीठ अन् प्रमाणशीर (जास्त घट्ट नाही जास्त पाणी नाही) असे ताक फारच बेस्ट आवडले मला तर, कधी चान्स मिळाला तर नक्की ट्राय करा आणि रिव्ह्यू द्या

images (36)_0.jpegऊर्जा ताक

पेपरबोट

बरोबर आहे जेम्स.

यांची सुरुवात फार चांगली झाली होती. आधी फक्त इंडिगो फ़्लाइटस मधे, नंतर मोजक्या स्टोअर्स मधे. जामुन, चिल्ड रस्सम, आम पना वगैरे अनवट फ़्लेवर्स.

पैकी जांभुळ ज्यूस इतरत्र सहजासहजी उपलब्ध नसल्याने हमखास आणायचो, कॉकटेल- मॉकटेल मधे वापरायचो. आता काहीतरी बिनसलयं - too much sugar आहेच पण चव सुद्धा थोडी synthetic वाटते. They have to either reinvent or perish 👍

BTW ब्रँड दीर्घकाळ टिकवायचा कसा याचे अनेक formule / तंत्र असतील, उद्योजक ते वापरत असतीलच. खालील काही उदाहरणे बघा, totally different products and management styles पण काही शंभरी गाठलेले विशुद्ध भारतीय ब्रँडस :

गोदरेज ची कुलुपं, ब्रिटानियाची बिस्किटं, मैसूर चंदन साबण, अमृतांजन बाम, डाबरची चव्यनप्राशादि आयुर्वेदिक उत्पादनं, किर्लोस्करांचे पंप, रुह अफजा बाटलीबंद सरबत, बॉम्बे डाइंगच्या चादरी- कापड, मुंबईचे ताज आणि बंगलुरुची MTR रेस्तरां चेन, MDH चे तयार मसाले हे सर्व शंभरी पार केलेले “भारतीय” ब्रँड !

एक ब्रँड असाही -

सहसा वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, आभूषणे, मोटारी इत्यादींचे ब्रँड कायम चर्चेत असतात, पण काही काही अनवट गोष्टी सर्वार्थाने ब्रँड म्हणवल्या जात नसतील तरीही अंगभूत गुणामुळे अन् लोकप्रियतेमुळे ब्रँड पदाला पोचतात. असेच एक उदाहरण म्हणजे सिनेमे ! प्रत्येकाचा एक ब्रँड असावा असे सिनेमे नसतात पण कल्ट सिनेमा त्या पदाला पण पोचतात, काही लोकांसाठी तो दो आँखें बारा हाथ असू शकतो, कोणासाठी शोले, कोणासाठी देवदास, कोणासाठी मोहब्बते!

आमचा ब्रँड - रहना है तेरे दिल में (RHTDM)

ह्या ब्रँडचे पोझिशनिंग झाले ते मुळातच आम्ही दहावी मधून मुक्त होऊन अकरावी नावाच्या मोकाट माळावर आलो तेव्हा ! चौफेर उधळणाऱ्या घोड्यांसारखे आम्ही टोटल मोकाट, बुडाखाली (बापाच्या ऐपतीनुसार) स्कूटी ते हिरो पूक लागलेल्या. वाटेल तेव्हा वाटेल तसे हिंडायचे, सिगारेटी फुंकायला शिकायचे, पोरी पटवण्याचा केविलवाणा प्रवास करत रहायचा, अशातच डोळ्यासमोर आला मॅडी!

जमेशदपूर + कोल्हापूर बॉय माधवन प्लस त्याची ती बजाज एलिमिनेटर मोटारसायकल.

सैफची तत्कालीन स्टाईल

दिया मिर्झाचा फ्रेश चेहरा

आणि सोबतीला अनुपम खेर/ व्रजेश हिरजी !

- अय अमेरिका अमेरिका अमेरिका, तू कौन ? इंडियन !

- गलत वक्त पर, गलत जगह पर, गलत वजह से, गलत आदमी पर तूने हाथ उठाया, अगली बार किसी दुखे हुए को मारने से पहले सौ बार सोचना.

- मैने तेरे ब्लैक में टिकट खरीद के टाइटेनिक देखने ले गया उसमें से तू सिखा क्या ?

- अबे तो उसके साथ उसने जिसमें खाना खाया वो प्लेट भी ले के आता जूठी वाली ! मॉडर्न आर्ट बन जाता सटकेले

- ये तो बावा ऐसे हुआं की मुंह खोला और बीयर की बरसात !

- आज से तू मेरा दोस्त है, तू कितना नेक है तेरे मेरे रस्ते एक है

असले अजरामर डायलॉग आणि गाणी तर यंव रे यंव ! रूपकुमार राठोडचे दिल को तुमसे प्यार हुआ विशेष आवडते.

हे झाले तांत्रिक इत्यादी इत्यादी, ह्या सिनेमाला ब्रँड मधे कन्व्हर्ट होता आले कारण खाऊजा होऊन एक दशक लोटले होते, भांडवली बाजाराची चिन्हे पक्षी आर्चीज गिफ्ट गॅलरी इत्यादी जिल्हा मुख्यालये असणाऱ्या गावात रुळली होती , केबल टीव्ही नवीन नॉर्मल होऊनही पाच एक वर्षे रुळली होती, चॅनल व्ही, चॅनल एम सारख्या संस्थानांनी घरच्या हॉल मध्ये प्रवेश मिळवला होता !

तिथल्या आमच्या सारख्या पोरांचे ऍस्पिरेशन्स चढत्या भाजणीवर होते, आता आम्हाला आमच्या गावात मिळणारे "बर्गर" म्हणजे तेलात तळलेल्या दोन पावाच्या तुकड्यात टोमॅटो सॉस, कांदा टोमॅटो चकत्या, कोबी किसून एक रगडा पॅटिसची आलू टिक्की टाकून देणारा गुप्ता फसवा वाटू लागला होता खात्रीशीरपणे, कारण कळत्या वयात कक्षा रुंदावत असताना बर्गरला तीळ लावलेले सुके बनपाव असतात, मधे मेयोनीज नावाचा पांढरा तेलकट सॉस असतो, ती कोबी नाही लेट्यूस असते इत्यादी प्राथमिक माहिती झाली होती, आम्हाला ते हवे होते, बारावी नंतर पुण्याला/ मुंबईला/ औरंगाबादला/ नाशिकला अभ्यासाला गेल्यावर लाल स्टुलावर बसून, लाल वाडग्यातले लाल रंगाचे मंचाव सूप खाण्यात पण एक क्रांतिकारी फिलिंग होते स्वातंत्र्याचे ! . आठवड्यातून किंवा खिशाचा आकार पाहून महिन्यात एक दोनदा मॅक डोनाल्ड मध्ये जाऊन ते आपण सिनेमात बघितलेले बर्गर फक्त ९० रुपयांना मिळते ह्याचे अप्रूप मानत खायची धन्यता होती !

अशा परिस्थितीत सिनेमा आला, मॅडी आवडला कारण तो आमच्यासारखा वाटत असे, शिवराळ, मित्रांत कायम पडीक, मधे एखाद बियर मारणारा, पोरीवर नितांत प्रेम करणारा, तिच्यासाठी काहीही कोलांट्या मारायला तयार असा, राजीव सामरा उर्फ सॅम ऊर्फ राजीव फ्रॉम अमेरिका बद्दल एक खास असूया तरीही अप्रूप असणारा, मारामाऱ्या करणारा आणि शेवटी एअरपोर्ट वर लग्नाच्या भरजरी कपड्यातील आपल्या गर्लफ्रेंडला

अपुन का नाम मैडी है, अमेरिका नहीं, आमची मुंबई लोकल, अपुन तुझसे बहुत प्यार करता है, एक दिन शादी करेगी का अपुन से

हे लिजेंडरी proposal देणारा आमचा ब्रँड

माधव शास्त्री @ मॅडी !

ab67616d0000b273290d0f50df10bb62d7a67b6e.jpeg

एमटीआर - एक सुरस कथा ही आहे की दुसऱ्या विश्वयुद्धात जेव्हा ब्रिटिश सरकारने तांदूळ युरोप मध्ये लढणाऱ्या फौजांसाठी रिझर्व्ह म्हणून उचलून नेला तेव्हा दक्षिण भारतात तांदळाची टंचाई निर्माण झाली, अशावेळी ह्याच एमटीआरने पहिल्यांदा टंचाई नसणारा आणि बाजारात बऱ्यापैकी उपलब्ध असणारा गव्हाचा बारीक रवा दह्यात भिजवून बिना आंबवता थोडासा फुलून आल्यावर पातळ सरसरीत भिजवून गरम तव्यावर शिंपडून त्याच्या कुरकुरीत जाळ्या सांबर अन् चटणी सोबत विकायला सुरुवात केली, हा मामला जनतेत अतिशय हिट झाला आणि जन्म झाला तो

रवा डोसा ! बटाटा भाजी घातला तर रवा मसाला ! बटर वर भाजला तर रवा बटर ! चीज घातले तर रवा चीज ! इतकेच काय रवा शेजवान डोसा सुद्धा !

MTR ला जाऊन डोसा खाऊन दाखवा हे रिक्षावाल्याने चॅलेंज दिलेलं. त्या ट्रीप मधे नंबर लागला नाही. बादशाही थाळी प्रमाणे मामला आहे. दुसऱ्या वेळी गेलो तर ते जुनं एम टी आर होतं. तिथे फक्त जेवण होतं. पण एक नंबर जेवण. बंगळुरू मधे असणार्‍यांनी सांगावे है दोन्ही एकाच मालकाचै आहेत कि वेगवेगळे आहेत?

जेम्स, होय ऐकले आहे त्याबद्दल. त्यांचे बघून मुंबईतही रवा इडली- रवा डोसा चालू झाले.

रवा मसाला डोसा पर्सनल फेव्ह. जास्त कुरकुरीत. पण ग्रुप असला तर आपला डोसा सर्वात उशिरा येणार, रवा डोसा करायला जास्त टाइम लागतो Happy खूप गर्दी असलेले आउटलेटस् रवा डोसा विकतच नाहीत.

बंगलुरुकर नीट सांगतीलच पण MTR चे १० तरी आउटलेटस् असावेत बंगलुरु शहरात. एकाच कुटुंबाची मालकी आहे.

लालबाग रोडवरचे MTR ओरिजिनल - सर्वात जुने. ते तिकडचे चितळे बंधू आहेत ; हे-ते संपले, आता उद्या या टाईप्स. दुपारी बंद वगैरे.

दिल को तुमसे प्यार हुआ विशेष आवडते >>> मलाही. म्हणजे इतर गाणी सुश्राव्य वगैरे होती पण या गाण्याच्या व्हाइब्ज एकदम वेगळ्या वाटायच्या.

bijoux earrings - बोल्ड & ब्युटिफुल!!! स्टेटमेन्ट ज्वेलरी. घातल्यानंतर मस्त वाटते. एकदम आत्मविश्वास येतो. सापडले तर फोटो टाकते.

Pages