
जाणते- अजाणते पणी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण डझनावारी ब्रँडस् वापरत असतो. सकाळी झोपेतून उठल्यावर “कोलगेट” ची टूथपेस्ट- टूथब्रश वापरून दात घासतो. “अमूल/ गोकुळ / वारणा” ब्रँडचं दूध येतं, त्यात “ब्रुकबॉण्डची” चहा पावडर किंवा “ब्रू/ नेस्केफे” ची कॉफ़ी पावडर टाकून चहा-कॉफी. नाश्त्याला पोहे, अंडी. पराठे, ब्रेड, सिरियल्स, त्यासाठी लागणारे तेल, तूप, मसाले, बटर, प्रोटीन पावडरी, बाटलीबंद ज्यूस …. ब्रिटानिया, केलॉग्स, आयटीसी, आशिर्वाद, हिन्दुस्तान यूनिलीवर, डाबर… अनेकानेक ब्रँडस् पुढ्यात येतात. अगदी मीठसुद्धा “टाटा नमक - देश का नमक” !

नानाविध ब्रँडसच्या सोबतीने सुरु झालेला हा प्रवास दिवस संपेपर्यंत चालूच राहतो. मिक्सर ग्राइंडर, ओवन, फ्रिज, टीव्ही, फोन, कार- दुचाकी- सायकली, घड्याळ, कपडे, पादत्राणे…. झोमेटो- स्विगी, BHIM - Gpay, Flipcart, Amezon, Big Basket, Dmart एक ना दोन. शहरी भागात राहणारी मध्यमवर्गीय भारतीय व्यक्ती एका दिवसात किमान ५० ब्रँडसच्या वस्तू वापरते असे तज्ञ सांगतात.
आजमतीला भारतात ३२ लाखांपेक्षा जास्त नाममुद्रांसकटचे ब्रँडस् सरकारदरबारी नोंदवलेले आहेत. त्यात शंभर वर्षांपेक्षाही जुने क्लासिक ब्रँडस् जसे आहेत तसे नवीन, अल्पावधीत लोकप्रिय झालेले जेन झी ब्रँडस् सुद्धा आहेत. त्यात दररोज नवी भर पडत आहे. Vocal for Local या नाऱ्यामुळे unorganised sector मधले अनेक छोटे व्यवसाय स्वत:च्या विशिष्ट ओळखीबद्दल, ट्रेडमार्क / नाममुद्रा आणि त्यांच्या उत्पादनांची नक्कल करणाऱ्या प्रतिस्पर्धींबद्दल जागरूक झाले आहेत, होत आहेत.

भारतीय बाजारात ग्राहकांसाठी सध्या spoilt for choice अशी परिस्थिती आहे. साधे चिप्स घ्यायचे असतील तर कोपऱ्यावरच्या वाण्याकडे १०-२० प्रकार दारातच मांडून ठेवलेले दिसतील, मिठाईच्या दुकानात ४० प्रकारच्या मिठाया आणि टीव्हीच्या शोरूम मधे भिंतभर चकाकत्या टीव्ही स्क्रीनस्.

बाजारात असंख्य उत्पादने सतत डोळ्यावर आदळत असतात. आता तर बाजारात जायचीही गरज नाही, बाज़ारच आपल्या टीवी-फोन स्क्रीनवर अवतरलाय. ब्रँडस् ची कधीही न संपणारी जत्रा.
या प्रचंड पसाऱ्यातून आपल्या वापरासाठी उत्पादने- सेवा आपण कशी निवडतो ?
रोजच्या वापरातल्या काही वस्तू आपण वर्षानुवर्षे एका विशिष्ट ब्रँडच्याच वापरतो. व्यक्तिगत पसंती, दर्जा, किंमत, सवय, वापरातून मिळणारा आनंद अशा अनेक घटकांचे मिश्रण या निवडी मागे असते. अगदी अट्टल मद्यपीसुद्धा त्याच्या नेहेमीच्या ब्रँडची दारू नसेल तर खट्टू होतो.

असेच काहीसे लहानपणी वापरलेल्या उत्पादनांबद्दल. आनंदमयी स्मृती आणि पुन:प्रत्ययाचे सुख यामुळे आपण त्या निर्जीव वस्तूंशी जोडले गेलेले असतो. दिवाळीच्या वाइब्ज देणारा मोती साबण असो की शाळेतल्या दिवसांची आठवण करून देणारी पार्लेची षट्कोणी सिक्सर्स बिस्किटे आणि रावळगावच्या पानपसंद कँडीज्. सुखस्मृतीतले ब्रँडस्.

बाजारात येणारी नवनवीन उत्पादने “एकदा वापरून तर पाहू” असा विचार करणारे लोक कमी नाहीत. आपणही असे करतो, नाविन्याची आवड कुणाला नसते ?
वस्तूची किंमत आणि आपले बजेट यावरही आपली निवड ठरते. आपल्या भारतीय मनाला “value for money” चे ज्ञान जणू जन्मत:च असते. म्हणून बहुतेक लोक हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घेतात. स्वस्त असेल तर त्याला पसंती मिळते, पण सरसकट नाही. काही दिवसातच निकामी होणारी उत्पादने आपण पुन्हापुन्हा त्याच ब्रँडची घेत नाही.
गुणवत्ता / चव / वापरायला सोपे या निकषांवर टिकणारे ब्रँडस - यांची उत्पादने पुन:पुन्हा खपतात. त्यासाठी premium देण्याची, अधिक किंमत मोजण्याची आपली तयारी असते. नीट तपासून पारखून अशी खरेदी होते. याउलट आणिबाणीची परिस्थिती असल्यास, खूप घाई असल्यास ब्रँडकडे दुर्लक्ष करून पटकन खरेदी आटोपली जाते.
मित्र / परिवार / अन्य वापरकर्त्यांचे सल्ले आणि अनुभव हा तर आपल्या निवडीवर मोठा पगडा असलेला घटक. त्यात आता भर डिजिटल डिस्कवरीची. इन्स्टाग्राम, वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या वेबसाईटस्, Influencers च्या सुचवण्यांची. त्यांनी सुचवलेली उत्पादने, सतत आपल्या स्क्रीन्सवर आदळणाऱ्या आकर्षक जाहिराती आपल्याला खूपदा भरीस पाडतात. हवे असलेले तर विकत घेतोच, फारशी गरज नसलेले, आधी कधीच न वापरलेले उत्पादन सुद्धा अलगद आपल्या खरेदीत सामिल होते. यात अन्य ग्राहकांनी उत्पादन/ सेवेला दिलेले मानांकन / रेटिंग आपण हमखास बघतो.
तर मंडळी, to cut the long story short, आपल्या आवडत्या ब्रँडस् बद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
• तुमचे आवडते ब्रँडस् कोणते ? तुम्हाला ते का आवडतात ? नावडते कोणते ?
• कोणतीही नवीन वस्तू (प्रॉडक्ट)/ सेवा (सर्विस) विकत घेतांना तुम्ही काय निकष लावता ? कसे ठरवता ?
• रोजच्या वापरातले आणि कधीतरीच लागणारे products; स्वस्त-महाग वस्तू यासाठी तुमची निवडप्रक्रिया- निकष सेम असतात की वेगवेगळे?
• डिजिटल डिस्कवरी/ जालावरून प्रथम माहिती घेऊन मग विकत घेतलेली उत्पादने आणि सेवा, त्यांचे प्रकार, त्याबद्दलचे बरेवाईट अनुभव सांगाल का ?
• आधी वापरलेले आणि अजून आठवणीत असलेले ब्रँडस्. ज्यांचा comeback व्हावा असे वाटते ते विस्मरणात गेलेले ब्रँडस् आणि आनुषंगिक आठवणी, अनुभव, माहिती.
• Aspirational, भविष्यात कधीतरी विकत घेऊ अशी आकांक्षा मनात असलेले ब्रँडस्.
• भारतात आता भरपूर विदेशी ब्रँडस् उपलब्ध आहेत. तस्मात् विदेशात रहाणाऱ्या माबोकरांनी तिथल्या आवडत्या-नावडत्या ब्रँडस बद्दल लिहिले तर त्याचेही स्वागत आहे.
• तुम्ही स्वत: एखाद्या ब्रँडनिर्मितीत सहभागी असल्यास त्याबद्दलचे अनुभव.
अशी सर्वसमावेशी चर्चा इथे करू या.
वि. सू :
१} हा कुठलाही (sponsored or otherwise) रीसर्च प्रोजेक्ट नाही, एक गंमत, माहितीची देवाणघेवाण आणि विरंगुळा म्हणून धागा काढला आहे.
२} आपले अनुभव आणि विचारप्रक्रिया जाणून घ्यायला, इथे होणाऱ्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आणि आवडत्या ब्रँडस् बद्दलच्या चर्चेतून समृद्ध व्हायला उत्सुक आहे.
=========
(धाग्यातले सर्व फोटो माझे)
वर्तमानपत्र लोकसत्ता
वर्तमानपत्र लोकसत्ता वर्षानुवर्षे सुरुय
हे राहिलेच लिहायचं.
(No subject)
Pixel 6a. No editing. No filters.
गोकुळ दूध
गोकुळ दूध
Samsung phone
Levis wrogn buffalo allen Solly clothes
Jockey
Cadbury
… आता जास्त चॉईस आहे…..
… आता जास्त चॉईस आहे…..
+ ११११११
प्रचंड चॉईस आहे ग्राहकांकडे. “रिपीट कस्टमर” बरोबर, सध्या तोच शब्द वापरात आहे. असा ग्राहक courtship material असतो ब्रँडस् साठी. तो नसेल तर ब्रँड खल्लास.
… आजवर कधीच एकाच ब्रँडमध्ये अडकल्याचे आठवत नाही….
कुणाचेही रिपीट कस्टमर नसून नवनवीन ब्रँडस् चे हक्काचे ग्राहक आहात मग. खरेदीबद्दल मायबोलीकरांचे मत हे सुद्धा एकप्रकारे influencer reco / peer review.
@ पॉपिन्स,
मिळतात अजून. किसमी चॉकलेटही मिळतात. Monaco बिस्किटेही. मेलोडी चॉकलेट तर गाजलेच होते इतक्यात.
@ झकासराव
@ झकासराव
वर्तमानपत्र लोकसत्ता वर्षानुवर्षे…. इंटरेस्टिंग !
वृत्तपत्रे सुद्धा ब्रँडस् च आहेत. 👍
लोकसत्ता कसा ठरवला याबद्दल सांगाल ? Just curious.
@ पॉपिन्स,
@ पॉपिन्स,
मिळतात अजून.
>>>>
काही दिवसांपूर्वी एका सुपरमार्केटमध्ये माझी नजर पॉपिन्सवर पडली. मी ती उचलली आणि घरी आणून त्या गोळ्या ग्लासभर पाण्यात विरघळवून ते सरबत मुलासोबत प्यायलो आणि नॉस्टेलजिक झालो.
ब्रँडचे माहित नाही पण आपल्या बालपणीच्या आठवणी अश्या चॉकलेट गोळ्यांसोबत जोडल्या गेल्या असतात हे नक्की.
पॉपिन्स् सारखे रोला कोला
पॉपिन्स् सारखे रोला कोला नावाचे एक सेम आकाराच्या गोळ्यांचे पॅकेट मिळत असे तसलेच उभे tightly packed, फक्त कोला फ्लेवर गोळ्या. ते आमच्या लहानपणी श्रीमंतीचे लक्षण होते, रोला कोला खाणारे पोरगे म्हणजे मामलेदाराचे किंवा नगर सेठ जनतेचे इतका तो हिशोब fix होता
ब्रँड कॅडबरी.. काल परवा हा
ब्रँड कॅडबरी.. काल परवा हा लेख वाचला आणि दुकानात हे डबल डेकर दिसले.
लहानपणी हे मला अत्यंत आवडायचं पण ते आमच्या जवळच्या दुकानात
मिळत नसे. दुरवरच्या एका दुकानातून (कधीतरी बाबांबरोबर गेलेले तेव्हा) दोन एक वेळेला घेतले होते.
लहानपजी कॅडबरी आणि पार्ले जी ब्रँड वगैरे शब्द माहित पडायच्या आधीपासून आयुष्यात आले. अजूनही आहेत.
पूर्वी चॉकलेट म्हणजे कॅडबरी
आता लिंड आणि Ghirardelli
कॅनडात आल्यापासून कॉस्टको जे
कॅनडात आल्यापासून कॉस्टको जे ठेवेल तो ब्रँड आपला.
Costco चांगल्याच वस्तू ठेवते, त्यामुळे विविध प्रकार डोळे मिटून वापरून बघता येतात. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम केल्याने टीव्ही सगळे एकाच ठिकाणी बनतात, त्यात ब्रँड साठी पैसे मोजणे शहाणपणा नाही हे समजले.
आणखी उत्पादने आणि ब्रँड विचार केला पाहिजे पण आता वरील चर्चेतील पिक्सेल फोन हा ब्रँड मी लॉयली गेली १0 वर्षे वापरतो आहे, अगदी जेव्हा HTC आणि LG गूगलचे फोन बनवत असत तेव्हा पासून. प्रत्येक व्हर्जन काही घेतलेलं नाही पण जेव्हा फोन अपग्रेड केला तेव्हा कायम पिक्सेल घेतला. त्यामुळे होम ऑटोमेशन डोअर बेल, वायफाय, स्पीकर सगळे गूगलचे वापरतो. जेव्हा परवडते तेव्हा घेतो, पण घेतो ते मनाजोगतेच घेतो. कंझ्युमेबल वस्तू आवडल्या की वस्तू लहान प्रमाणात घेण्याऐवजी मोठ्या प्रमाणात घेतो, त्याने पैसे आणि पॅकेजिंग वाचते.
ज्या गोष्टी वारंवार लागतात आणि क्लालिटीशी देणेघेणे नसते त्यात खराब माल आवर्जून घेतो. उगाच दणकट गारबेज बॅग्स घेत नाही.
रोला कोला हे पॉपिन्सचेच भावंड
रोला कोला हे पॉपिन्सचेच भावंड
पूर्वी चॉकलेट म्हणजे कॅडबरी … + १
फाइव्ह स्टार आणि कॅडबरी डेयरी मिल्क ह्या आमच्या वर्षातून २-४ दाच मिळणाऱ्या खास ट्रीटस् होत्या.
कॅनडाचे नाही बघितले पण अमेरिकन सुपरस्टोअर्सची दुनीयाच न्यारी. तिकडच्या Costco मधे Godiva, Lindt अशा भारी ब्रँडच्या चॉकलेटस् १-२ किलोच्या साध्या प्लास्टिक आवरणात ठेवलेल्या !! वाइनच्या बाटल्या मोठ्या टबमधे !! ज्याला मी तोवर exclusive - गॉरमे समजत होतो ते सर्व अगदीच किरकोळ सामान असावे असे मांडलेले. पैसे मात्र नक्कीच वाचतात, फार चांगल्या डील्स होत्या. त्यांच्याकडचा Organic Belgian Thins फार-फार आवडता चॉकलेट ब्रँड.
.. उगाच दणकट गारबेज बॅग्स घेत नाही.…😀
… कंझ्युमेबल वस्तू आवडल्या की वस्तू लहान प्रमाणात घेण्याऐवजी मोठ्या प्रमाणात घेतो…
+ १
उदा. वॉशिंग मशीनसाठी सोप, फरशी पुसण्याचे द्रव्य, विम बार- लिक्विड वगैरे
घड्याळ - टायटन
घड्याळ - टायटन
एकच होतं १० -१२ वर्ष वापरलं. ते गेल्यावर १-२ फुटकळ घेऊन बघितली. काही उपयोग नाही. Mobile phone आल्यापासून मनगटावरील घड्याळ तसही निरुपयोगी/ अडगळ वाटते.
टाटा नमक
Tanishq
Westside + cotton cottage ( + non branded local, exhibitions बऱ्याचदा. काहीतरी हटके तिकडेच मिळतं)
Bata
Red label nature care
Branded पेक्षा value for money. Bar जास्त भर.
छान लिहिलं आहे आणि प्रतिसाद
छान लिहिलं आहे आणि प्रतिसाद ही छान आहेत सगळेच.
साड्या आणि दागिने ह्या साठी नल्लीज आणि तनिष्क हे आवडते ब्रँड आहेत. तनिष्क ची घडणावळ जास्त असली तरी त्यांची कारागिरी सुपर असते. साडी साठी पहिली पसंती कायम नल्लीज ला. त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की लॉक डाऊन मध्ये मी महाग साड्या ही ऑनलाईन घेतल्या आहेत त्यांच्याकडून . मी नेसलेली एखादी साडी आवडली कोणाला की माझंच दुकान असल्या सारख्या अभिमानाने सांगते नल्लीज ची आहे असं.
"पत्र नव्हे मित्र" ही टॅग लाईन असण्याच्या काळापासून मटा आवडायचा. अगदी सुरवातीला तो फक्त चारच पानांचा असे. अलीकडे मात्र त्याचा दर्जा घसरला आहे म्हणून लोकसत्ता घेतो. त्याचा ही दर्जा फार छान आहे असं नाही पण त्यातल्या सुडोकू ची फॅन आहे मी.
रोज वापरत असणारे, आवडणारे आणि सवय ही झालेले ब्रँड अचानक मिळेनासे होतात तेव्हा काही दिवस पोकळी जाणवते. उदा गिनी गोल्ड शेंगदाणा तेल, हॅलो एग शाम्पू, सन लाईट साबण इ. पण मग होते substitutes चीही सवय.
ब्रँड पुराण continued -
ब्रँड पुराण continued -
अमूल ओगलिवी अँड माथरची जबरदस्त जाहिरात संयोजनाची जादू असेल किंवा अमूल सोबत संलग्न सहकार भावना असतील, त्यातून साधलेला ग्रामीण अभ्युदय, स्त्री सक्षमीकरण आणि गुणवत्तेची हमी असेल पण एकंदरीत प्रोसेस केलेलं दूध (पाश्चराइझ किंवा टोन्ड) , बटर, ताक, चीज दही असेल, अमूलला तोडच नाही.
मी फारसा brand conscious नाही
मी फारसा brand conscious नाही.
किंमत व कंफर्ट जास्त महत्वाचा. कोणत्याही brand वर पटकन शिफ्ट होतो.
पण काही गोष्टी आपोआप केल्या जातात, त्यातल्या काही….
पुण्यात चितळेंचे दूध, फरसाण व बाकरवडी, मिठासची रसमलाई काजू कतली, सुका मेवा डागा कडेच, लहान मुलांचे कपडे गजानन होजिअरी, दागिने PNG, shopping साठी lifestyle, पनीर साने डेअरी, पाणीपुरी कल्याण भेळ, समोसा चॅट गणेश भेळ, खेळसामान champion sport,….
बाकी in general गाड्यांमधे होंडा व टोयोटा, घरात वापरायचे सगळे कपडे जॅाकी, shoes शक्यतो स्केचर्स, फोन शक्यतो आयफोनचाच (कारण वर्षानुवर्षे टिकतो), paint मधे Asian, cement मधे ultratech, knives मधे Victorinox, कोल्ड कॅाफी साठी bru Tripti blend पावडर, अमुलचे दूध व सुजाताचाच मिक्सर….
सुजाता किंवा सुमित ब्रँडचे
सुजाता किंवा सुमित ब्रँडचे मिक्सर !
बाबो ! "The guys are built different" हेच खरे, ती मजा आजच्या मोर्फी रिचर्ड्स व तत्सम ब्रँड मधे नाहीच.
सर्व नवीन प्रतिसाद insightful
सर्व नवीन प्रतिसाद insightful ! मजा येतेय वाचायला.
Pixel चे चाहते अनेक आहेत असे दिसतेय. फोटो खरच चांगले आले आहेत.
@ अमूल
“अमूल” ची उत्पत्ती, त्यांचे प्रॉडक्ट्स, brand recall, polka dots चा फ्रॉक घातलेली ती पिटुकली गोबरी गोलू अमूल गर्ल आणि वर्षानुवर्षे तिला घेऊन करत असलेले अतरंगी advertising campaign …. भारतात कुठल्याही “सहकारी” ब्रँड ला असे नशीब आजवर लाभलेले नाही.
मस्त धागा आहे!
मस्त धागा आहे!
मी सगळ्याच ब्रॅंडच्या फारशी मागे लागत नाही, पण काही गोष्टी ठराविकच त्याच लागतात.
मैसूर सँडल साबण - दुसरा वापरायचा विचारच करत नाही. (अपवाद प्रसंग असतात, पण ते तेवढेच.)
टूथपेस्ट : विको वज्रदंती. लहानपणापासून तीच वापरतेय. मधूनमधून कोलगेट वगैरे वापरली, पण तीही अपवादच.
कपडे धुवायला पूर्वी पिवळा सनलाईट आणि पावडर रिन ची. आता वडी रिनची आणि पावडर सर्फ किंवा विशेष कपड्यांसाठी लिक्विड एरिअल
फिनेल, भांडी घासायचा लिक्विड सोप हे लोकल असतं. पण त्यातही लिक्विड सोप स्नोव्हाईटचाच.
रिस्ट वॉच टायटन.
त्याचा विचार करता स्पार्क्सवर सध्या स्थिरावले आहे.
दागिने पु ना गाडगीळ. (माहेरी आईचे विश्वासू सराफ आहे त्यांच्याकडे)
कपडे आवडतील ते, लक्ष्मी रोडवर जाऊन. ऑनलाईन खरेदी नाहीच. तसंही मी "आवडलं म्हणून घेतलं" किंवा "इम्पल्सिव्ह शॉपिंग" या दोन्हीत बसत नाही. त्यातही मला दुकानात जाऊन खरेदी आवडते. बूट/ फूटवेअर दुकानातच जाऊन, बहुतेक स्पार्क्स चे. पूर्वी आदिदास वगैरे वापरले, मग ज्या पद्धतीने मी ते तुडवते
पर्स पण कमी लागते मला. कोणतीही छान दिसणारी आणि पुरेसे कप्पे असलेली. त्यापेक्षा लॅपटॉप बॅग रोज लागते. एकूणच मी रोजच्या वस्तू माझ्या कंफर्टनुसार घेते. माझ्याकडून वस्तू टिकत नाहीत वर्षानुवर्षं, त्यामुळे घेताना उगीच फार हाय लेव्हल च्या अपेक्षा ठेवून ब्रँडेड म्हणून आणायचं तर "टिकेल का पण हे!?" अशी भीतियुक्त शंका असते. शेवटी "हे काय जन्मसावित्री नाहिये, कधीतरी तुटणार-मोडणार आहेच... मग परत घेऊ नवीन" म्हणून स्वस्तच घेते कधीकधी
बाकी खा-प्यायचं म्हटलं तर बाकरवडी आणि गायीचं लोणी (तूप घरी कढवायला) चितळे. बटर आणि चीज अमूल. आईसक्रीम अमूल/ नॅचरल्स/ मेरिडिअन. इतर मिठाया चितळे/ काका हलवाई - कुठली मिठाई यावर ठरतं.
पनीर श्रीराम डेअरी किंवा स्वदेशी डेअरी. बिस्किट्स ब्रिटानियाची.
बाकी लॅपटॉप डेल, स्मार्ट फोन सॅमसंग (त्यातल्या त्यात दणकट, पडला तरी निदान दुरुस्त होईल असा)
वॉशिंग मशीन सॅमसंग आहे १० वर्षांपूर्वीपासून, नवीन घेताना बघू. फ्रीज एल जी. टीव्ही कुठला आहे ते माहिती नाही कारण चालू करून सोडाच, मी बंद टिव्हीपण बघत नाही
बाकी जे जसं आवडेल तसं.
भारतात कुठल्याही “सहकारी”
भारतात कुठल्याही “सहकारी” ब्रँड ला असे नशीब आजवर लाभलेले नाही.
नशीब नाही विचारपूर्वक केलेली व्यवस्थापन प्रणाली. त्रिभुवनदास पटेल आणि डॉ. वर्गीस कुरियन ह्यांनी अमूलचे फक्त तांत्रिक, डेअरी टेक्नॉलॉजी, विपणन, पशु संवर्धन इतकेच कंगोरे तासले नाहीत तर अमूल ग्रासरूटला सहकारी असली तरी हायर मॅनेजमेंट कॉर्पोरेट पद्धतीने चालेल अशी ती व्यवस्था आहे. खास त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट (IRMA) स्थापन करणे इत्यादी व्हिजनरी प्रकार ह्या दुक्कलीने साधला होता. बऱ्याच वेळी कोअर डेअरी टेक डॉ. दलाया हँडल करत आणि मायक्रो मॅनेजमेंट डॉ. कुरियन करत.
गंमत ही की अमूल (आणंद मिल्क युनियन लिमिटेड) ब्रँड बनवताना गुजरात मध्ये इतर सहकारी डेअरी स्थापन करायला प्रोत्साहन दिले गेले, त्यानुसार सुमुल (सुरत मिल्क युनियन लिमिटेड) , साबर डेअरी, बनास डेअरी इत्यादी स्थापन करण्यात आल्या आहेत. ह्या सगळ्यांची आंब्रेला बॉडी म्हणजे गुजरात कोओपरेटीव मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जी सी एम एम एफ) ही असून "अमूल" हा ब्रँड त्यांच्या मालकीचा आहे, इतर डेअरीला अमूलच्या स्टँडर्डला फॉलो करून बनवलेल्या प्रोडक्ट पॅकेजिंग वर हा लोगो लावायचे Authorization GCMMF देते. ह्यातील प्रत्येक डेअरी एक एक डेअरी derivative मध्ये एक्सेल करते. उदाहरणार्थ मेहसाणा डेअरी, फर्मेंटेड प्रोडक्ट्स पक्षी, दही, ताक, चीज, व्हे, प्रोटीन isolate इत्यादींवर फोकस करते (along with dairy FMCG including pasturised tonned milk, tetra pack uht milk, domestic consumption buttermilk and Dahi) अंतिम प्रॉडक्ट पॅक होते ते अमूल ब्रँडिंगच्या पॅक मध्ये.
ह्या सगळ्या सहकारी डेअरी आपापले चेअरमन निवडतात ते सभासद शेतकरी पशुपालक मतदान घेऊन. इथे पॉलिटिकल हस्तक्षेप थोडा टच होतो अमूलला पण हे त्रिभुनदासजी आणि डॉक्टर कुरियन ह्यांना फार आधी कळले त्यामुळे त्यांनी अमूलच्या अंतर्गत संहितेत ह्या चेअरमन लॉबीला मुळात काहीच खास पॉवर delegate केलेल्या नाहीत. त्यांची एकमात्र पॉवर म्हणजे अमूल करता सीईओ निवडणे ! बरं त्यातही गोची ही की तो mba असायला हवा, ठराविक शिक्षण असणारा, ठराविक अनुभव असणारच असावा हे norms fix करून टाकलेले आहेत. त्याशिवाय एकदा सीईओ निवडला की बिझनेस डेव्हलपमेंट, मर्जर एकविजीशन, मार्केटिंग, restructuring, finance इत्यादी सगळे निर्णय तो घेणार, त्याच्यात चेअरमन apex काहीही हस्तक्षेप करू शकणार नाही.
अमूलच्या यशाचे गमक ते आहे.
अमूलच्या यशाचे गमक ते आहे. >>
अमूलच्या यशाचे गमक ते आहे. >> +१
I Too Had a Dream by Dr Verghese Kurien हे पुस्तक जरूर वाचावे अशी शिफारस मी करेन. (ह्याचा अनुवाद मराठीतसुद्धा झाला आहे.)
Van Heusen ऑफिस वेअरसाठी शर्ट
Van Heusen ऑफिस वेअरसाठी शर्ट.
फेविकॉल
फेविकॉल
मराठी लिहायला फक्त मायबोलीची
मराठी लिहायला फक्त मायबोलीची खिडकी.
बाकी कुठे (मला) मराठी नीट लिहितात येत नाही. सोशल मिडिया म्हणजे मायबोली आणि टिकटॉक.
फेसबुक, इंस्टा, युट्यूब कशात मन रमत नाही.
*आवडता ब्रँड - चितळे बाकरवडी
*आवडता ब्रँड - चितळे बाकरवडी !!* सहमत. आता तर ब्रँडच्या जोडीला brand ambassador ही संकल्पना रूढ होते आहे ! चितळे व सचिन तेंडुलकर ही अशीच एक एकमेकांना साजेशी जोडी - अस्सल मराठी व विश्वासार्ह !!!!
अमूलबद्दल अधिकची माहिती
अमूलबद्दल अधिकची माहिती वाचनीय.
श्री. कुरियन यांचे पुस्तक वाचले होते, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी मोठा वाद झाला होता त्याबद्दलही. आता फारसे आठवत नाही.
आईसक्रीम = अमूल ( नॅचरल्स कधी कधी)
अमूल ने आता आईसक्रीम लाउंजेस उघडली आहेत. अन्यत्र नसलेले फ्लेवर्स फक्त या अमूल लाउंजेस मधे विकतात. त्यातला टर्किश कॉफी आईसक्रीम हा अत्यंत आवडता 🤤
चितळे, png ज्वेलर्स ला मम
चितळे, png ज्वेलर्स ला मम
ब्रँडच्या जोडीला brand
ब्रँडच्या जोडीला brand ambassador…
हे तर फारच रोचक प्रकरण आहे. कोटी- कोटींचा व्यवसाय.
शिवाय ब्रँड ओनर आणि brand ambassador दोघांसाठी win-win proposition 👍
वरचे प्रतिसाद वाचायला मजा आली
वरचे प्रतिसाद वाचायला मजा आली. लोक ब्रँड कसे निवडतात किंवा त्याला loyal कसे राहतात याचे learning points!
मराठी वाचण्यासाठी मायबोली
फोन साठी वन प्लस
कार साठी महिंद्रा
कॉम्प्युटर साठी Mac
Domain emails साठी zoho
Make up साठी Sugar
हेअर आणि स्किन साठी NaturZest
कोणी ब्रँड उभा केला असेल तर त्याबद्दलही लिहिलेले चालणार आहे. त्यामुळे इथे लिहितेय.
माझा पाच वर्षापूर्वी सुरू केलेला ब्रँड नेचरझेस्ट NaturZest अजून उभा राहतोय. नारळाच्या दुधापासून काढलेले वर्जीन कोकोनट ऑईल आणि त्यापासून तयार केलेले स्किन हेअर केअर प्रॉडक्ट ही NaturZest ची खासियत आहे.
ब्रँड चे स्वप्न बघणे आणि ते मार्केट मध्ये उभा करणे या दोन फारच वेगळ्या गोष्टी आहेत. तुमचे products कितीही चांगले असले तरी प्रसिद्ध ब्रँड होण्यासाठी प्रचंड मेहनत, पैसा लागतो. त्याच बरोबर सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात. आणि तुमचे एथिक्स किंवा सद्सद्विवेक बुद्धी सतत जागृत असावी लागते. कितीही प्रलोभन आणि प्रश्न आले तरी जे एथिक्स तुम्ही ब्रँड तयार करताना ठरवले असतील त्यावर ठाम रहाणे गरजेचे आहे.
सावली अभिनंदन.
सावली अभिनंदन.
माहिती वाचायला आवडेल.
वरच्या माझ्या यादीत म्हैसुर
वरच्या माझ्या यादीत म्हैसुर सॅंडल राहिलाच.
किती गोष्टी बदलल्या पण तो साबण नाही. २२ वर्षे मी म्हैसुर सॅंडलच वापरतोय.
शूज मध्ये रिबॉक, woodland,
शूज मध्ये रिबॉक, woodland, स्केचर सगळे वापरून पाहिले.
आणि आता campus, sparx किंवा abros वर आलो.
मला टिकत नाही शूज.
वर्षात खराब मग 5000 चा घेण्यापेक्षा 1500 चा बरा असा।ममव हिशोब.
@अनिंद्य,
लोकसत्ता मी बॅचलर असताना वेळी पासून घेतोय.
त्यांच्या चतुरंग आणि।लोकरंग पुरवणीत खूप चांगले लेख यायचे, बरीच नावाजलेले लोकं सदर चालवतात म्हणून आवडतो.
मध्ये मटा पुण्यात सुरू झाला तेव्हा पेपरवल्याच्या आग्रहाखातर लोकसत्ता सोबत हा ही घेतलेला.
पण।मटा मध्ये मजा आली नाहीच.
सकाळ फक्त फक्त चिंटू साठी वाचायचो online.
Pages