
जाणते- अजाणते पणी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण डझनावारी ब्रँडस् वापरत असतो. सकाळी झोपेतून उठल्यावर “कोलगेट” ची टूथपेस्ट- टूथब्रश वापरून दात घासतो. “अमूल/ गोकुळ / वारणा” ब्रँडचं दूध येतं, त्यात “ब्रुकबॉण्डची” चहा पावडर किंवा “ब्रू/ नेस्केफे” ची कॉफ़ी पावडर टाकून चहा-कॉफी. नाश्त्याला पोहे, अंडी. पराठे, ब्रेड, सिरियल्स, त्यासाठी लागणारे तेल, तूप, मसाले, बटर, प्रोटीन पावडरी, बाटलीबंद ज्यूस …. ब्रिटानिया, केलॉग्स, आयटीसी, आशिर्वाद, हिन्दुस्तान यूनिलीवर, डाबर… अनेकानेक ब्रँडस् पुढ्यात येतात. अगदी मीठसुद्धा “टाटा नमक - देश का नमक” !

नानाविध ब्रँडसच्या सोबतीने सुरु झालेला हा प्रवास दिवस संपेपर्यंत चालूच राहतो. मिक्सर ग्राइंडर, ओवन, फ्रिज, टीव्ही, फोन, कार- दुचाकी- सायकली, घड्याळ, कपडे, पादत्राणे…. झोमेटो- स्विगी, BHIM - Gpay, Flipcart, Amezon, Big Basket, Dmart एक ना दोन. शहरी भागात राहणारी मध्यमवर्गीय भारतीय व्यक्ती एका दिवसात किमान ५० ब्रँडसच्या वस्तू वापरते असे तज्ञ सांगतात.
आजमतीला भारतात ३२ लाखांपेक्षा जास्त नाममुद्रांसकटचे ब्रँडस् सरकारदरबारी नोंदवलेले आहेत. त्यात शंभर वर्षांपेक्षाही जुने क्लासिक ब्रँडस् जसे आहेत तसे नवीन, अल्पावधीत लोकप्रिय झालेले जेन झी ब्रँडस् सुद्धा आहेत. त्यात दररोज नवी भर पडत आहे. Vocal for Local या नाऱ्यामुळे unorganised sector मधले अनेक छोटे व्यवसाय स्वत:च्या विशिष्ट ओळखीबद्दल, ट्रेडमार्क / नाममुद्रा आणि त्यांच्या उत्पादनांची नक्कल करणाऱ्या प्रतिस्पर्धींबद्दल जागरूक झाले आहेत, होत आहेत.

भारतीय बाजारात ग्राहकांसाठी सध्या spoilt for choice अशी परिस्थिती आहे. साधे चिप्स घ्यायचे असतील तर कोपऱ्यावरच्या वाण्याकडे १०-२० प्रकार दारातच मांडून ठेवलेले दिसतील, मिठाईच्या दुकानात ४० प्रकारच्या मिठाया आणि टीव्हीच्या शोरूम मधे भिंतभर चकाकत्या टीव्ही स्क्रीनस्.

बाजारात असंख्य उत्पादने सतत डोळ्यावर आदळत असतात. आता तर बाजारात जायचीही गरज नाही, बाज़ारच आपल्या टीवी-फोन स्क्रीनवर अवतरलाय. ब्रँडस् ची कधीही न संपणारी जत्रा.
या प्रचंड पसाऱ्यातून आपल्या वापरासाठी उत्पादने- सेवा आपण कशी निवडतो ?
रोजच्या वापरातल्या काही वस्तू आपण वर्षानुवर्षे एका विशिष्ट ब्रँडच्याच वापरतो. व्यक्तिगत पसंती, दर्जा, किंमत, सवय, वापरातून मिळणारा आनंद अशा अनेक घटकांचे मिश्रण या निवडी मागे असते. अगदी अट्टल मद्यपीसुद्धा त्याच्या नेहेमीच्या ब्रँडची दारू नसेल तर खट्टू होतो.

असेच काहीसे लहानपणी वापरलेल्या उत्पादनांबद्दल. आनंदमयी स्मृती आणि पुन:प्रत्ययाचे सुख यामुळे आपण त्या निर्जीव वस्तूंशी जोडले गेलेले असतो. दिवाळीच्या वाइब्ज देणारा मोती साबण असो की शाळेतल्या दिवसांची आठवण करून देणारी पार्लेची षट्कोणी सिक्सर्स बिस्किटे आणि रावळगावच्या पानपसंद कँडीज्. सुखस्मृतीतले ब्रँडस्.

बाजारात येणारी नवनवीन उत्पादने “एकदा वापरून तर पाहू” असा विचार करणारे लोक कमी नाहीत. आपणही असे करतो, नाविन्याची आवड कुणाला नसते ?
वस्तूची किंमत आणि आपले बजेट यावरही आपली निवड ठरते. आपल्या भारतीय मनाला “value for money” चे ज्ञान जणू जन्मत:च असते. म्हणून बहुतेक लोक हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घेतात. स्वस्त असेल तर त्याला पसंती मिळते, पण सरसकट नाही. काही दिवसातच निकामी होणारी उत्पादने आपण पुन्हापुन्हा त्याच ब्रँडची घेत नाही.
गुणवत्ता / चव / वापरायला सोपे या निकषांवर टिकणारे ब्रँडस - यांची उत्पादने पुन:पुन्हा खपतात. त्यासाठी premium देण्याची, अधिक किंमत मोजण्याची आपली तयारी असते. नीट तपासून पारखून अशी खरेदी होते. याउलट आणिबाणीची परिस्थिती असल्यास, खूप घाई असल्यास ब्रँडकडे दुर्लक्ष करून पटकन खरेदी आटोपली जाते.
मित्र / परिवार / अन्य वापरकर्त्यांचे सल्ले आणि अनुभव हा तर आपल्या निवडीवर मोठा पगडा असलेला घटक. त्यात आता भर डिजिटल डिस्कवरीची. इन्स्टाग्राम, वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या वेबसाईटस्, Influencers च्या सुचवण्यांची. त्यांनी सुचवलेली उत्पादने, सतत आपल्या स्क्रीन्सवर आदळणाऱ्या आकर्षक जाहिराती आपल्याला खूपदा भरीस पाडतात. हवे असलेले तर विकत घेतोच, फारशी गरज नसलेले, आधी कधीच न वापरलेले उत्पादन सुद्धा अलगद आपल्या खरेदीत सामिल होते. यात अन्य ग्राहकांनी उत्पादन/ सेवेला दिलेले मानांकन / रेटिंग आपण हमखास बघतो.
तर मंडळी, to cut the long story short, आपल्या आवडत्या ब्रँडस् बद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
• तुमचे आवडते ब्रँडस् कोणते ? तुम्हाला ते का आवडतात ? नावडते कोणते ?
• कोणतीही नवीन वस्तू (प्रॉडक्ट)/ सेवा (सर्विस) विकत घेतांना तुम्ही काय निकष लावता ? कसे ठरवता ?
• रोजच्या वापरातले आणि कधीतरीच लागणारे products; स्वस्त-महाग वस्तू यासाठी तुमची निवडप्रक्रिया- निकष सेम असतात की वेगवेगळे?
• डिजिटल डिस्कवरी/ जालावरून प्रथम माहिती घेऊन मग विकत घेतलेली उत्पादने आणि सेवा, त्यांचे प्रकार, त्याबद्दलचे बरेवाईट अनुभव सांगाल का ?
• आधी वापरलेले आणि अजून आठवणीत असलेले ब्रँडस्. ज्यांचा comeback व्हावा असे वाटते ते विस्मरणात गेलेले ब्रँडस् आणि आनुषंगिक आठवणी, अनुभव, माहिती.
• Aspirational, भविष्यात कधीतरी विकत घेऊ अशी आकांक्षा मनात असलेले ब्रँडस्.
• भारतात आता भरपूर विदेशी ब्रँडस् उपलब्ध आहेत. तस्मात् विदेशात रहाणाऱ्या माबोकरांनी तिथल्या आवडत्या-नावडत्या ब्रँडस बद्दल लिहिले तर त्याचेही स्वागत आहे.
• तुम्ही स्वत: एखाद्या ब्रँडनिर्मितीत सहभागी असल्यास त्याबद्दलचे अनुभव.
अशी सर्वसमावेशी चर्चा इथे करू या.
वि. सू :
१} हा कुठलाही (sponsored or otherwise) रीसर्च प्रोजेक्ट नाही, एक गंमत, माहितीची देवाणघेवाण आणि विरंगुळा म्हणून धागा काढला आहे.
२} आपले अनुभव आणि विचारप्रक्रिया जाणून घ्यायला, इथे होणाऱ्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आणि आवडत्या ब्रँडस् बद्दलच्या चर्चेतून समृद्ध व्हायला उत्सुक आहे.
=========
(धाग्यातले सर्व फोटो माझे)
@ सावली,
…. लोक ब्रँड कसे निवडतात किंवा त्याला loyal कसे राहतात याचे learning points!….
Exactly, तो एक उद्देश आहेच धाग्याचा. 👍
@ सावली,
@ पियू
तुमचे Brand building चे अनुभव, त्यामागची कथा, तुमची भूमिका हे सर्व वाचायला उत्सुक आहे. जरूर लिहा. यथावकाश.
ज्यांनी ज्यांनी मैसूर साबणाला उत्तम ब्रँड म्हटले आहे त्या सर्वांचे खूप आभार. मेरे कू बी भौत पसंद …. माझा स्नानांतर धागा आणि त्यावरचे निम्मे प्रतिसाद मैसूर चंदन साबणावरच आहेत 🙈
त्यांच्या चतुरंग आणि।लोकरंग
त्यांच्या चतुरंग आणि।लोकरंग पुरवणीत खूप चांगले लेख यायचे, बरीच नावाजलेले लोकं सदर चालवतात म्हणून आवडतो.>> +१
मी शाळकरी वयात असताना गुरूवारी युवा पुरवणी असायची, मग मंगळवारी करिअर वृत्तान्त सुरू झाला होता. चतुरंग मधे शुभदा चौकर मस्त लिहायच्या. शुभा प्रभु-साटम पण मस्त लिहायच्या.
रोजच्या वापरात असे
रोजच्या वापरात असे पर्टिक्युलर ब्रँड्स कोणते वापरतो असं नेमकं लक्षात येत नाही पण चहा पावडर ब्रुकबाँड नॅचरल केअरच. आणि बाकी काही रेडी पदार्थ इथे आणायचे असल्यास पहिली पसंती ‘दीप’लाच. अगदी हल्लीच चितळ्यांचा बटाट्याचा चिवडाही खाववला नाही. बाकरवड्या मात्र चितळ्यांच्याच.
एका विशिष्ठ ब्रँडकडे माझी
एका विशिष्ठ ब्रँडकडे माझी लॉयल्टि नाहि, पण अॅपल हा अपवाद. याबाबतीत मी वॉरन बफेटचं तत्वं मानतो..
गेली तीस वर्ष मी (आणि अर्थात माझं कुटुंब) अॅपलच्या इकोसिस्टम मधे आहे. त्यामागचं प्रमुख कारण एकच - प्रायवसी आणि सिक्युरिटी. अॅपल व्यतिरिक्त इतर हाउसहोल्ड डिव्हायस सोबतचं सीमलेस इंटिग्रेशन, ऑटोमेशन, युझर एक्स्पिरियंस इ. हा अॅडेड बोनस...
काही ब्रॅण्डशी लॉयल्टी होती
काही ब्रॅण्डशी लॉयल्टी होती/आहे पण नवीन प्रॉडक्ट्स आवडले व चांगले वाटले तर सहज बदलतेही .
अनेक वर्ष नायकेचे शुज वापरत होते खूप आवडत होते. पण मग 'होका' चे वापरायला सुरवात केली. आणि ८ /९ तास त्यात काढल्यावर खरे कंफर्ट म्हणजे काय ते कळले. आता परत नायकेकडे वळणे नाही.
रोजचे शूज किंवा सॅंडलबद्दल किमतीशी फारशी तडजोड करत नाही. कंफर्ट महत्वाचा.
चहामध्ये आधी फॅमिली मिक्सचर, रेड लेबल, वाघ बकरी वरून आता सोसायटी मसाला चहाच वापरते.
चितळे बाकरवाडी आधी प्रचंड आवडे पण आता चितळेंची कुठलीच उत्पादने आवडेनाशी झाली आहेत. सध्या जोशी स्वीट्स व मिठास आवडते .
ऍपलचे सर्व प्रॉडक्ट्स फोन, एअर पॉड्स , आय पॅड , watch, मॅक बुक अगदी ऍपल पेनसिलही
@ राज, आ_रती, अतरंगी,
@ राज, आ_रती, अतरंगी,
वर्षानुवर्षे स्वत: + कुटुंब (एका जेष्ठ मेंबरचा अपवाद) अॅपलच्या इकोसिस्टम मधे आहोत. कारणे तुम्हीं लिहिलीत तीच - प्रायवसी आणि सिक्युरिटी, long product life and excellent user experience. दर ६ वर्षांनी बदलतो. Camera बद्दल दुसरे फ़ोन्स जास्त चांगले आहेत पण still prefer Apple.
अॅपलच्या आधी Blackberry होता. खूपच चांगला अनुभव. तो ब्रँड असा गडगडेल आणि रसातळाला जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. Very dependable phone आणि BBM सर्विस तर फारच उत्तम होती. मालदीव मधे असतांना अचानक army coup होऊन सर्व फोन सर्विस बंद केल्या तरी माझे बीबीएम एकदम व्यवस्थित चालत होते, सर्वांना खुशाली + अपडेट्स त्यानीच दिले. उत्तम प्रॉडक्ट.
आता सफरचंदी दुनियेत स्थिरावलो आहे, सीमलेस सर्विस.
शूज बद्दल तर एक दुखभरा लेख होईल इतके वांदे आहेत माझे. ते नंतर.
Apple प्रॉडक्ट विषयी मला थोडा
Apple प्रॉडक्ट विषयी मला थोडा आकाश होता..
पण एक MC book वापरल्यावर त्याची क्वालिटी- बॅटरी लाइफ, परफॉर्मन्स, windows पेक्षा खूप उजवा असल्याचे लक्षात आले.
तरीही अजून एवढे जास्तीचे पैसे खर्च करायला धीर होत नाही.
>>अॅपलच्या आधी Blackberry
>>अॅपलच्या आधी Blackberry होता. खूपच चांगला अनुभव.<<
सेम हियर. कॉर्परेट वर्ल्ड मधे ब्लॅकबेरी डिफॅक्टो स्टँडर्ड होता. ब्लॅकबेरी किल्ड पेजर्स, अँड इवेंचुली आय्फोन किल्ड ब्लॅकबेरी. सुरुवातीला ब्लॅकबेरी मधे एक गोम अशी होती कि सगळा डेटा एक एक्स्ट्रा हॉप घेउन मदरशीप (रिसर्च इन मोशन) कडे जायचा आणि तिथुन डेस्टिनेशनला. बर्याच कंपन्यांची (आणि देशांची देखील) यामुळे गोची व्हायची पण ब्लॅकबेरीला पर्याय नसल्याने त्यांची चलती होती. अॅपल ब्रोक दॅट बॅरियर, अँड रेस्ट इज हिस्टरी. लेटर ब्लॅकबेरी रिव्हँप्ड देर होल इन्फ्रास्ट्रक्चर्, बट इट वाज टु लेट, टु लिटल..
इवन अँड्रॉय्ड, अँडि रुबिनने अॅपलकडुन ढापलेली आहे. अॅपल मधे असताना अँडि आयओएस प्रोजेक्टवर काम करत होता, तिथुन बाहेर पडल्यावर त्याने स्वतःची कंपनी (अँड्रॉय्ड) लाँच केली. पण आज २०-२२ वर्षांनंतर अँड्रॉय्ड युनिक्सच्या मार्गाने जातेय तर आयओएस हॅज गॉटन स्ट्राँगर अँड स्टेबल दॅन एवर बिफोर. आणि त्यामगचं प्रबळ कारण आहे - अॅपल्स युनिफाय्ड प्रॉडक्ट स्ट्रॅटजी बिल्ट अराउंड इट्स ओन हार्डवेर्+सॉफ्टवेर. दे कंट्रोल एवरी पिस ऑफ द पझल टु डिलिवर टॉपक्लास प्रॉडक्ट लाइन. आता अॅपलच्या पावलावर पाउल ठेउन माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल हि स्वतःचे प्रॉडक्ट्स आणतायत पण त्याचा विशेष परिणाम अॅपलच्या एस्टॅब्लिश्ड कस्टमरबेसवर होताना दिसत नाहि..
माफ करा थोडा भरकटलो, बट आय होप इट ऑगमेंट्स द ओरिजिनल ऑब्जेक्टिव ऑफ धिस थ्रेड...
बेसिकली Apple च्या जंजाळात
बेसिकली Apple च्या जंजाळात अडकायचे नाही म्हणूनच Pixel वापरतो आहे. अगदी बेसिक android feels more powerful than iOS. पण हे माझे वैयक्तिक मत झाले. असो हा धाग्याचा विषय नाही त्यामुळे इतकेच.
वरती शूज बद्दल आले आहे ते अगदी खरे वाटले. Brooks वापरायला सुरुवात केली आणि १०-१२ वर्ष तेच वापरतो आहे. आता पहिल्यांदाच on ब्रँडच्या शूज ची खूप हवा आहे म्हणून ते घालून पाहिले पण मग Brooks च घेतले.
खूप चांगले, मुद्देसूद
खूप चांगले, मुद्देसूद प्रतिसाद येत आहेत. So good.
… ऑगमेंट्स द ओरिजिनल ऑब्जेक्टिव ऑफ धिस थ्रेड...
होय. काही ब्रँडस् आवडतात हे तर जवळपास सगळ्याच प्रतिसादांमधे आहे. न आवडणारे ब्रँडस् सुद्धा असतीलच, त्याबद्दल ओझरते उल्लेख आहेत. हे का नाही आणि तेच का याबद्दलही वाचायला आवडेल. 👍
साधारण पंधरा-सोळा
साधारण पंधरा-सोळा वर्षांपूर्वी आंबेनळी घाटातून प्रतापगडला जात असताना वाटेत बारसगावच्या पुढे एक छोटे गाव होते तिथल्या एका दुकानात बिस्किटे आणि वेफर्स चे डमी ब्रँड होते कमीत कमी बारा ते पंधरा प्रकार होते म्हणजे good day ऐवजी god day .
Balaji ऐवजी belaji असे
मोठ्या, प्रसिद्ध ब्रँडस् च्या
मोठ्या, प्रसिद्ध ब्रँडस् च्या भ्रष्ट नकला हा मुद्दा वर काहीजणांनी मांडलाय. हे भारतभर सर्वत्र आहे.
यांच्या विक्रीचे हमखास पॉइंट्स म्हणजे रेल्वे आणि बस स्थानके, हॉस्पिटल, कॉलेज सारखी खूप गर्दीची ठिकाणे. फारशी चौकशी न करता घाईत असलेले ग्राहक पटकन विकत घेतात आणि नीट न बघता वापरतात.
महाराष्ट्र तरी बरा म्हणावा, गुजरात राज्य तर नकली ब्रँडस् ची खूपच मोठी बाजारपेठ आहे. Almost all daily use items have a fake twin, often sold cheaper.
ओखला , कमला मार्केट इथे बाजार
ओखला , कमला मार्केट इथे बाजार पाहिला. उत्तरेत लग्नात महागड्या वस्तू द्याव्या लागतात. या मार्केटमधे टीव्ही, फ्रीज कय वाटेल ते मिळते. सांगू त्या कंपनीचा लेबल लावलं जातं. पंजाबात घरगुती फॅक्तरीत ट्रे़क्टर बनतात. त्यावर पण हवं ते लेबल लावलं जातं.
गाझियाबाद मधे एक्साईडच्या ड्युप्लिकेट बॅटर्या बनतात. हे सगळं चायना माल येण्याच्या आधीचं. आता काय परिस्थिती आहे माहिती नाही.
आपल्याकडे अशा कामगिरीसाठी
आपल्याकडे अशा कामगिरीसाठी उल्हासनगर कुप्रसिद्ध आहे म्हणतात, अनुभव नाही खास, पण मेड इन युएसए (उल्हासनगर) हा कैक चर्चांत एक विषय असतो.
स्वस्त चायना मालाने डुप्लिकेट
स्वस्त चायना मालाने डुप्लिकेट तयार करायची भानगड अलमोस्ट संपवली आहे. They simply flood the market with cheap imitation of almost everything - as finished products.
आता चीनी ब्रँडस् ना राजरोस प्रवेश तर आहेच, respect सुद्धा मिळू लागला आहे. विशेषतः स्वस्त इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्स.
हल्लीच एका लग्नात रिलायन्स
हल्लीच एका लग्नात रिलायन्स विमल कंपनीच्या शर्टपीस पँटपीस एकत्र असणारे गिफ्ट पॅक आहेरात मिळाले. चांगली कल्पना वाटली अन् काही जुन्या आठवणी पण जागृत झाल्या वडील आणि काका विमलच्या कापडाचे कपडे शिवून वापरत असत. सहज म्हणले आलेले पॅक तसेच पुढे ढकलण्यापेक्षा बघावे कसे काय आहे ते.
तर आत शर्टपीस (कॉटन, २०० जीएसएम , १.६ मीटर लांब आणि ५८ इंच पन्हा) व पँटपीस (पॉली कॉटन, १.३ मीटर लांब आणि ६० इंच पन्हा) निघाले. कलर पण डिसेंट होता आणि शर्ट वर प्रिंट होत्या स्मार्ट कॅज्युअल टाईप, शिवून घेतले तर चांगले वाटले घालायला, आता विचार करतोय असेच पॅक विकत आणून शिवून घ्यावे
शर्टपीस पँटपीस गिफ्ट पॅक
शर्टपीस पँटपीस गिफ्ट पॅक….
हो, हे आधी खूप यायचे अहेर म्हणून. रेमंडचे म्हणजे भारी असा लौकिक होता
@अनिंद्य, अजूनही मिळतात
@अनिंद्य, अजूनही मिळतात रेमंडचे, मुंबईत वरळीला रेमंड हाऊस (जिथून गौतम सिंघानियाने आपले वडील विजयपत सिंघानियाना घालवून दिले होते त्यासाठी कुप्रसिद्ध झालेले ते) त्याच्या खाली तळमजल्यावर रेमंडचे एक दुकान आहे, फ्लॅगशीप स्टोअर शब्द लाजेल असले पॉश एकदम. तिथे गेल्यावर सर्विस अन् प्रॉडक्ट्स तर क्या कहने ! गेल्याबरोबर आधी बसायला ऐसपैस जागा, तिथे स्थानापन्न झाले की प्रॉपर हॉटेल मॅनेजमेंट टीम असावी तसा हाऊस कीपिंग स्टाफ पाणी घेऊन येणार, चहा, कॉफी, ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स विचारणार, नंतर मास्टर टेलर क्राफ्ट्समन येणार, requirement इत्यादी विचारणार तो पण प्रॉपर सूट बूट टू बटन ब्लेझर सकट, तुम्हाला स्वतः सल्ला देणार, उंची, वजन, स्कीन टोन नुसार कापड/ रंगसंगती/ फॅब्रिक मटेरियल/ सध्या इन फॅशन असणारे कट इत्यादी सांगणार, तुम्ही होकार दिला की दुसरा एक ज्युनिअर टेलर येणार, हवे त्या मापानुसार कापड फाडणार (with your permission sir म्हणत) इत्यादी. त्यानंतर ठराविक तारीख देणार डिलिव्हरी साठी (त्यांच्याकडे टेलर बसतात ते पण सूट घालून), एक पॅन्ट आणि एक शर्ट शिलाई सकट १३,०००/- रुपयांना पडले तिथे पण experience म्हणून एकदा जायचेच होते.
खासकरून सुट्स मधे गेब्रिएल माख्त ने रंगवलेला हार्वे स्पेक्टर आणि त्याचे सूट, ते शिवणकाम करून त्याचे कस्टम सूट देणारा त्याचा टेलर इत्यादी पाहून एकदा तरी तसला अनुभव घेण्याची ईच्छा तितकी सफल झाली.
स्वस्त चायना मालाने डुप्लिकेट
स्वस्त चायना मालाने डुप्लिकेट तयार करायची भानगड अलमोस्ट संपवली आहे. >> आता (म्हणजे जुनं झालं) उलटा ट्रेण्ड आहे. चीनच्या वस्तूंना भारतीय ब्रॅण्डचं नाव लावायचं.
बोट, मायक्रोमॅक्स असे बरेच आहेत. बोट ठणकावून खोटं सांगत आले. सत्य समजल्यावर डुबला ब्रॅण्ड.
अजंता सारख्या घड्याळाच्या जुन्या ब्रॅण्डसनी उत्पादन चीनमधून बनवायला सुरूवात केली आहे.
मुंबई-ठाण्यात रेमंडची सर्वच
मुंबई-ठाण्यात रेमंडची सर्वच मोठी शोरूमस् “custom made” साठी ऑनसाइट एक्सपर्ट टेलर ठेवतात बहुतेक, मापाबरहुकुम लग्नाळू सूट-शेरवानी- बंदगला शिवायला. फ्लोरा फ़ाउंटन नजिकही एक आहे, 1960 पासून.
तुम्ही तर डायरेक्ट HQ लाच धड़क दिलीत
BTW, “कस्टम मेड” स्टिचिंग आधी सगळीकडे भारतीय pricing होते, आता खूप महाग झाले आहे - American pricing for Indian clothing.
@ चीनच्या वस्तूंना भारतीय ब्रॅण्डचं नाव
अनेक मोठे भारतीय ब्रँड तयार चीनी उत्पादने स्वत:चे लेबल लावून नक्कीच विकत असणार. अधिक नफा !
@ रॉयल एनफिल्ड … ३
@ रॉयल एनफिल्ड
… ३ पिढ्यांपासून loyal customers आणि चौथ्या पिढीचा ओढाही तिकडेच !!!
This is the real power of timeless brands 👍
असाच आमच्याकडचा एक म्हणजे Favre Leuba. ह्या ब्रँडचे जन्मवर्ष 1737.
१९६०- ७० च्या दशकात ही स्विस मेड घड्याळं मनगटावर- टेबलावर असणे प्रचंड अभिमानाचे प्रकरण आणि भारतात फक्त मुंबई आणि कलकत्ता शहरातच ती उपलब्ध होती.
बाबांकडे दोन्ही, एक स्वत:च्या scholarship च्या पैश्यातून आणि दुसरे पहिल्या पगारातून घेतलेले. VPP ने मागवलेली. आमच्या जेमतेम १५०० लोकवस्ती असलेल्या छोट्या गावात अप्रूप आणि पहिलेपणाचा मान असलेली.
दोन्ही घड्याळं त्यांनी ४०+ वर्ष उत्तम वापरलीत. मग घरे-शहरे बदलण्यात एक गहाळ झाले तर दुसरे बाबांनी एका प्रियपात्र विद्यार्थ्याला आठवण म्हणून दिले. आता दोन्ही घड्याळे आमच्याकडे नाहीत …. तो brand बंद पडून २-३ दशके लोटली.
As luck would have it, काही वर्षांपूर्वी टाटा ग्रुपच्या एका स्विस उपकंपनीने बंद पडलेली Favre Leuba कंपनी विकत घेतली आहे आणि आता ते मनगटी घड्याळे पुन्हा लॉंच करत आहेत.
प्रचंड महाग दिसताहेत पण aspirational buy मधे हे एक आहे, पुढच्या जूनमधे बाबांच्या Wine Birthday / ८५ व्या वाढदिवसाला त्यांच्या मनगटावर बघायची इच्छा आहे. … इंशागोविंदा.
रॉयल एनफिल्ड सक्सेस स्टोरी वर
रॉयल एनफिल्ड सक्सेस स्टोरी वर तर डॉक्युमेंट्री इत्यादी आहे. आधी इंग्लंड मधला हा ब्रँड भारतीय होतो काय, फौजी अन् पोलिसांच्या फटफट्या असल्या फ्रेम मधून निघतो काय अन् जगातील तिसरा सगळ्यात सशक्त ऑटोमोबाईल ब्रँड होतो काय (ते पण फेरारी आणि ऑडीला पछाडून) सगळे सुरस आहे !
तसे टॉप टेन स्ट्रॉन्गेस्ट ब्रँड मध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि हिरो मोटारकॉर्प पण आहेत.
ब्रँड स्ट्रेंग्थ इंडेक्स स्कोअर पाहूनच भारी वाटले. आणि गंमत म्हणजे रॉयल एनफिल्ड अजिबातच कटिंग एज टेक्नॉलॉजी इत्यादी नाही तर प्रॉपर ठरवून क्रिएट केलेल्या कल्ट स्टेटस वर चालते.
भारताची हार्ले डेविडसन हा सिंगल अँकर आहे त्यांचा.
मला ब्रँड बरोबर त्यांच्या टॅग
मला ब्रँड बरोबर त्यांच्या टॅग लाईन खूप आवडतात. त्यातल्या काही
Wills - Made for each other.
Amul - The taste of india
Philips- when its Philips you are sure.
Dunlop- Dunlop is Dunlop always ahead.
आणि सगळ्यात भारी
जॉनी वॉकर- keep Walking.
कॉलेज काळातले
) - Aristo स्टुडिओ.
क्रिकेट bats चे ब्रँड. विजय स्पेशल SG.
कॅरम बोर्ड- suraco
स्लाईड रुल ( आठवतोय का कुणाला
कॅम्लिन पेन.
कॅम्लिन इंक पेन नंबर
कॅम्लिन इंक पेन नंबर ३६ हवा आहे, मुंबईत कुठे विकत मिळेल ? ऑनलाईन एक बॅक टू द नाइनटीज नावाच्या साइट वर सापडला होता पण डिलिव्हरी फक्त तामिळनाडू मध्ये दाखवत होते.
मुंबईत हा पेन मिळेल असे दुकान जमले तर सुचवावे ही विनंती.
रॉयल एनफिल्ड बुलेट अमेरिकेत
रॉयल एनफिल्ड बुलेट अमेरिकेत पण मिळते. २५० सीसी गाडी इथल्या बाकीच्या गाड्यांच्या मानाने खूप लहानखुरी असते. बाईका बघायला बायकोबरोबर गेलो होतो तेव्हा दुकानदाराने special दाखवली होती.
.. रॉयल एनफिल्ड कटिंग एज
.. रॉयल एनफिल्ड कटिंग एज टेक्नॉलॉजी नाही तर कल्ट स्टेटस वर चालते…..
👍
… बाकीच्या गाड्यांच्या मानाने खूप लहानखुरी…
American size obsession is a real thing. गाड्याघोड्यात engine power obsession. सगळे मूळचे अमेरिकन असलेले ब्रँड त्याकडे नीट लक्ष देतात, त्यांच्या ग्राहकांची डिमांडच तशी आहे.
@ taglines !
@ विक्रमसिंह
taglines !
Very intelligent and interesting part of branding and brand existence.
Carlsberg बियरची टॅग लाईन त्या बियरएवढीच, किंबहुना थोडी अधिकच आवडते.
शतकभरात अनेकदा best brew चे मानांकन, अवाढव्य विक्री, प्रचंड व्यावसायिक यश, उत्तम प्रॉडक्ट रिकॉल असे सगळे सगळे असून त्यांची टॅग लाईन काय तर :
Carlsberg, “probably” the best beer 🍺 in the world.
Such humility, such grace. मी-मी-मी करणाऱ्या जगात विनम्रतेने उठून दिसणारा ब्रँड … कोपनहेगन शहराच्या भेटीत याचे स्थानिक भाषेतले version सुद्धा पाठ झाले होते, आता विसरलो.
पुढच्या वर्षी १८० वर्षांचा होईल हा डेनमार्कचा प्रसिद्ध ब्रँड, but forever fresh, forever young.
हो! हा असा सेल्फ डेप्रिकेटिंग
हो! हा असा सेल्फ डेप्रिकेटिंग सेन्स ऑफ ह्यूमर आवडतोच.
सेन्स ऑफ ह्यूमर नसावा. टिपिकल
सेन्स ऑफ ह्यूमर नसावा. टिपिकल डेन बिहेवियर 🙂
@ झकासराव, मनीमोहोर, प्रज्ञा९
@ झकासराव, मनीमोहोर, प्रज्ञा९
वृत्तपत्रांच्या तुमच्या निवडीबद्दल लिहिलेत, थँक्यू. तेसुद्धा नीट आखणी केलेले, cultivate केलेले फ़ोकस्ड ब्रँडस् च असतात-आहेत.
गूगलपूर्व जगात शब्दकोश वापरणारे कमी पण Collins, Webster, Oxford अशा वेगवेगळ्या शब्दकोशांच्या चाहत्यांचे गट होते.
अगदीच ब्रँड नाही म्हणता येणार पण Encyclopaedia, Reader’s Digest वगैरेचाही संग्रह करायचे लोकं. गूगलपूर्व जमान्यात एकदम “हटके” माहिती त्यात असायची.
Pages