शिक्षणक्षेत्रातल्या गंमतीजमती

Submitted by भरत. on 22 May, 2026 - 10:05

सध्या जिथे गंमतीजमती होत नाहीएत असं क्षेत्र शोधायला लागेल. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना अशा गंमतीजमतींनी फार फरक पडत नाही. त्यांची फार झळ लागत नाही की त्यांच्यामुळे आपला फार फायदाही होत नाही. त्यामुळे या गंमतीजमतींकडे आपण मजेत पाहू शकतो.

शिक्षणक्षेत्रातल्या गंमतीजमतींची नोंद घेण्यासाठी हा धागा.
सध्या नीटची गंमतजंमत सुरू आहे. पण त्यात नवीन काही नाही. म्हणून त्याबद्दल नंतर बोलू.

सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन - केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने शाळांमध्ये तिस री भाषा शिकवायचं मनावर घेतलं आहे. सध्या देशात सगळ्या गोष्टी एकसारख्या असाव्यात असा एक सूर उमटतो आहे. तसं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे सुद्धा या सीबीएसईच्या पावलावर पाऊल ठेवून चालतं आहे.
पण गंमत म्हणजे ही जी गंमत आहे, त्यात सीबीएसईने महाराष्ट्र बोर्डाचं अनुकरण केल्यासारखं दिसतंय.

आपण हे विसरूनच गेलो असू की गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाने पहिलीपासून हिंदी अनिवार्य म्हणजे कंपल्सरी करायचा निर्णय घेतला. त्याला विरोध झाल्यावर हिंदीच असं नाही, कोणतीही भाषा शिकू शकता, फक्त त्यासाठी एका वर्गातल्या किमान म्हणजे कमीतकमी २० मुलांनी ती भाषा निवडा यला हवी, नाहीतर हिंदी आहेच. मग पहिलीत फक्त बोलण्यापुरती भाषा शिका (कारण पाठ्यपुस्तकं कुठे छापलीत आम्ही?) मग थांबा आम्ही एक समिती नेमतो. ती तुमचं म्हणणं ऐकून घेऊन काय ते ठरवेल. या समितीने काढलेल्या प्रश्नावलीबद्दलचा एक धागा मी मायबोलीवर काढला होता. पण आपल्याला कुठे काय फरक पडतो? त्यामुळे कोणी त्याकडे लक्ष दिलं नसावं. समितीने आपला अहवाल दिला का? काय निर्णय होणार हे अजून कळलेलं नाही. तसंच गेल्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र बोर्ड मराठी, इतिहास, भूगोल सोडले तर सीबीएसईचा अभ्यासक्रमच वापरेल असाही निर्णय घेतला होता.
राज्य मंडळाचं शैक्षणिक वर्ष जून ते मे असे. ते यंदापासून सीबीएसई प्रमाणे एप्रिल ते मार्च असेल, असाही एक निर्णय घेण्यात आला होता.

आता केंद्रीय उच्च माध्यमिक बोर्ड म्हणजे सीबीएसईच्या गंमतीजमती पाहू.
गेल्या शैक्षणिक वर्षापर्यंत म्हणजे २०२५-२६ पर्यंत या बोर्डात नववी आणि दहावी या दोन वर्षांसाठी किमान दोन भाषा निवडणे अनिवार्य होते.
यातली पहिली भाषा हिंदी किंवा इंग्रजी व दुसरी भाषा त्यांनी दिलेल्या यादीतील कोणतीही भाषा. अर्थात इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषा अनिवार्य निवडणेही शक्य होते. याशिवाय तुम्हांला भाषा शिकायची खूपच हौस असेल् तर आणखी भाषा पर्यायी विषय म्हणून निवडता येत असे.
https://cbseacademic.nic.in/web_material/CurriculumMain26/Sec/Curriculum...

एप्रिल २०२६ मध्ये त्यांनी एक परिपत्रक काढून २०२५-२६ या वर्षापासून सहाव्या इयत्तेसाठी तिसरी भाषा शिकणे अनिवार्य केले. यात २०२३ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा संदर्भ दिला आहे.
यातल्या दोन भाषा भारतीय असल्या पाहिजेत. बोर्डाच्या मते इंग्रजी ही भारतीय भाषा नाही, विदेशी भाषा आहे. तीन भाषा शिकवण्यामागचे उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य , सांस्कृतिक समज आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणे असे आहेत.
बोर्डाचं नवं वर्ष १ एप्रिलला सुरू होतं. हे परिपत्रक ९ एप्रिलला काढलं . त्यामुळे अर्थातच तिसर्‍या भाषेसाठी पाठ्यपुस्तक तोवर तयार नव्हतं.

सहावीत निवडलेली तिसरी भाषाच नववी दहावीत निवडावी लागेल.
कोणती किंवा कोणत्या भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवायच्या , तो निर्णय शाळांनी बोर्डाला कळवायचा आहे.

याचा मला लागलेला अर्थ - सहाव्या इयत्तेत तीन भाषा शिका, त्यातल्या किमान दोन भारतीय. मग ही मुलं पुढच्या वर्गात जातील तिथेही तीन भाषा. अशा प्रकारे २०२९ -३० साली नवववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकायला लागतील . नववीत निवडलेले विषयच दहावीत घ्यावे लागतात.

मग ४ मे रोजी आणखी एक परिपत्रक आलं. यात तिसर्‍या भाषेची पाठ्यपुस्तके १ जुलैपर्यंत उपलब्ध होतील असं म्हटलं आहे.

आता १५ मे रोजी आणखी एक परिपत्रक आलं. त्यात या वरच्या दोन परिपत्रकांचा संदर्भ दिलेला नाही. यात याच वर्षापासून नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे अनिवार्य केले आहे.
With effect from 1st July 2026, for Class IX, the study of three languages (R1, R2, R3) shall be
compulsory, with at least two languages being native Indian languages. Students who wish to study
a foreign language may do so as the third language only if the other two languages are native Indian
languages, or as an additional fourth language.
तिसर्‍या भाषेसाठी नववीची पाठ्यपुस्तके उपलब्ध होईपर्यंत सहावीची पाठ्यपुस्तके वापरा.
ज्या शाळांना तिसर्‍या भाषेसाठी पुरेशी योग्यता असलेले शिक्षक मिळणार नाहीत, त्यांनी इतर विषय शिकवणार्‍या आणि तिसर्‍या भाषेचे कामचलाऊ ज्ञान असलेल्या शिक्षकांना तिसरी भाषा नववीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवायला जुंपा.
Schools facing constraints in the availability of adequately qualified native Indian language teachers may,
as an interim arrangement for R3 Language, engage existing teachers of other subjects who possess
functional proficiency in the concerned native Indian language

या तिसर्‍या भाषेमुळे विद्यार्थ्यांना ताण येऊ नये म्हणून दहाव्या इयत्तेला तिसर्‍या भाषेची परीक्षा बोर्ड घेणार नाही, तर शाळाच घेईल.
To keep the focus on learning and reduce any undue pressure on students, no Board Examination shall
be conducted for R3 at the Class X level. All assessments for R3 shall be entirely school-based and
internal. मात्र हे गुण दहावीच्या गुणपत्रिकेत दाखवले जातील.

परिपत्रकात शेवटी एक उदात्त गंमत आहे.
The Board reiterates that these transitional measures are designed solely to align with national policy
while protecting student interests. No student shall be disadvantaged due to this alignment. The focus
remains on joyful, meaningful language learning, not on examination pressure.

ज्यांची मुले सीबीएसई बोर्डात शिकत आहेत किंवा शिकली आहेत, त्या मायबोलीकरांनी याबद्दल आपल्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अधिक माहिती दिल्यास बरे होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

bhusa.jpg

बरेली - भटक्या गुरांसाठी प्रत्येक शाळेने ४६ किलो चारा दान द्यायचा आहे. दिला नाही तर शिक्षा .

यापेक्षा शाळा बंद करून त्यांचं रूपांतर गोशाळांमध्ये करावं. एका कॉन्व्हेंट स्कूलबाबत तशी मागणी एका संस्थेने केलीच होती.

शिक्षणक्षेत्रातल्या गमतीजमती असे शीर्षक पाहून विनोदी धागा असेल अशा अपेक्षेने उघडला.

====================================================

शिर्ष् क बदलावे

शीर्षक वाचल्यानंतर थेट प्रतिक्रिया देतात, अधले मधले काहीच वाचत नाहीत हे समजले, धन्यवाद.

डायपर बनवणाऱ्या कंपनीला ही परीक्षा घेण्याचे कंत्राट द्यावे, किमान काही लीक होणार नाही एवढी तरी ते काळजी घेतील

भ्रमर Lol

या परीक्षेत पेपर लीक होणे थांबवायचे असेल तर अधि़कृतरित्या या पेपरचा लिलाव व्हावा. या कामासाठी खासगी कंपन्यांना टेण्डर भरू द्यावे. ज्याची जास्त बोली त्याला पेपर मिळेल. सर्वात मोठी बोलीच्या रकमेपेक्षा दहा टक्के कमी रक्कम ही कमीतकमी राहील. जास्त बोली लावणार्‍याला दहा दिवस आधी पेपर मिळेल. त्यापेक्षा कमी असणार्‍यांना ९,७,६,५, ते काही तास आधी असे नियम करावेत.

रिलायन्सकडेच जर पेपर सेट करण्याचे आणि परीक्षा घेण्याचे काम दिले तर उत्तमच!

शिर्ष् क बदलावे>> एकुलता एक डॉन Happy असं काही म्हणणं नाही. भरत ह्यांनी उपरोधाने शीर्षक दिलं. उपरोध हा लेखनालंकार आहे. प्रत्येकाची लिहिण्याची धाटणी असते. त्यांची मर्जी. फक्त त्यावर कुणी सरळपणे प्रश्न विचारला तर त्यांना हिणवायला नको.
आपल्याला अपेक्षित असेच लेखन, शीर्षक, प्रतिसाद इतरांनी दिले पाहिजेत; नाहीतर अपशब्द वापरणे म्हणजे bullying झालं. मायबोलीवर आत्तापर्यंत कितीतरी विषयांवर गंभीर मतभेद, वाद विवाद झाले आहेत. लोक सभ्यपणे मतांतरे व्यक्त करू शकतात म्हणून तर मायबोलीचे धागे वाचण्यात आनंद आहे. शीर्षक वाचून मला वाटले होते त्यापेक्षा धाग्याचे स्वरूप थोडे वेगळे होते तरी उपरोधिक शीर्षकही अस्थानी नाही. ते बदलावे असे मला तरी वाटत नाही. डॉन साहेब तुम्हाला शीर्षक बदलावे असे वाटत असेल तर त्यावर माझे काही म्हणणे नाही. ते तुमचे मत आहे. तुम्ही मांडले. शेवटी भरत साहेबांची मर्जी.

भरत, बरेलीतल्या शाळेची बातमी वाचून कळलं इतक्या संख्येने उत्तर प्रदेशातले लोक महाराष्ट्रात का येतात. उनके पास और चाराही नही रहता Happy चारा दिला नाही म्हणून कारवाई केली गेली आणि एखादी शाळा त्याविरुद्ध कोर्टात गेली तर काय होईल ते पहायला हवं. एकंदरीत सगळंच कठिण आहे.

तिसरा आयडी. माणूस कितवा माहीत नाही.

संवेदनशील आणि सेन्सिबल माणूस काय करतो हे ज्यांना ठाऊक नाही अशांची गिनती चालू आहे. कोण कुठे अडकून बसतोय आणि काय फाट्यावर मारतो, त्यातलं साम्य विलक्षण आहे. बुलींगच्या व्याख्या आहेत कि स्कोअर सेटलमेंट?
आपल्या घरात जेव्हां काही वाईट होईल तेव्हां त्यात विनोद काय हे विचारायला लोक येतील तेव्हांच अशा लोकांना अक्कल येणार आहे का? कमाल आहे.

मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, त्यांची स्वप्नं बरबाद झाली ही गंमतजंमत आहे आणि त्यात विनोद आहे या समजुतीला झापणे हे बुलींग हे सांगायला देवाचे विविध अवतार येत आहेत, अजून येतील. उद्या पोर्शे प्रकरणातल्या पीडीतांबद्दल असेच बरःळतील.

भ्रमर Happy
The Centre is mulling over the possibility of using the Indian Air Force for the transportation of NEET-UG papers to ensure the foolproof conduct of the retest on June 21 >>>
म्हणजे सध्याच्या यंत्रणा सुधारता येण्यापलीकडे भ्रष्ट आहेत ह्याची कबुलीच की! आणि ट्रान्सपोर्टेशन च्या आधीच पेपर सेट करणार्यांकडून, किंवा छापणाऱ्यांकडून लीक झाला तर काय? मग काय डिफेन्स अकॅडेमीला पेपर सेट करायला आणि छापायला सुद्धा सांगणार का?

सीबीएसई ने शाळांकरवी विद्यार्थ्यांना , शिक्षकांना सांगितलं आहे की , रील्स बनवून OSM किती छान आहे, ते सांगा.
काय बोलायचं तेही लिहून दिलं आहे.

सीबीएस ईच्या त्रिभाषा धोरणाबद्दल हा एक लेख दिसला. यातले बहुतेक मुद्दे वर आलेच आहेत. पण मला हा लेख सुटसुटीत वाटला. तसंच मी फक्त बोर्डाच्या परिपत्रकांच्या आधा रे लिहिलं. या लेखात वास्तव स्थितीचा चांगला आढावा घेतला आहे.
https://www.ndtv.com/education/kids-as-experimental-rats-cbses-3-languag...

या निर्णयाविरोधात पालक आणि चक्क शिक्षक ही न्यायालयात गेले आहेत.
https://www.cnbctv18.com/education/supreme-court-seeks-centre-cbse-ncert...

न्यायालयांना कामं कमी आहेत, म्हणून सीबीएसई, नीट यांत लक्ष घालून त्यांचा वेळ उपयोगी लागेल.

ऐकावे ते नवलच

Cambridge cancels A-Level exams after Physics and Maths questions surface online.

Students from different countries who appeared for A-level examinations were shocked after reports claimed that some exam papers had been leaked online. While India is facing controversy over the alleged NEET UG paper leak, a similar issue has now come up in the UK-based A-level examinations as well.

https://bestcolleges.indiatoday.in/latest-news/cambridge-cancels-a-level...

हुश्श्य! चला आपणच एकटे नाही तर!
केंब्रिज इंटरनॅशनल एज्युकेशन .. नावात केंब्रिज आहे. गुड! आपली रेघ सुधारण्यापेक्षा दुसर्‍याची वाकुन बघितली आणि ती दिसली... जी कुठे ना कुठे कायम दिसणारच असते.... की अंकल लोकांना कसं गारगार वाटतं!
पाकिस्तानातील आणखी एक लीकची बातमी आणली की मग अंकल लोक जलसाच करतील.
वर ऐकावं ते नवल टाईप सिनिसिझम टाकलं की इगो ही सुखावतोच.

एकदा पिवळा चष्मा घातला कि सगळं जग कावीळ झाल्यासारखं दिसतं .

केम्ब्रिज सारख्या संस्थेत किंवा एन टी ए मध्ये पेपर लीक का होतात याचं कारण शोधण्यापॆक्षा येथील सदस्यांना केवळ धुळवड खेळण्यात रस आहे हे दाखवून द्यायचं होतं. आता धुळवडीला सुरुवात होईल कि नाही ते पहा.

मी बसलोय पोपकोर्न घेऊन.
))=((

अगदी खरं आहे! माझ्या घराला आग लागली की मी लोकल फायरब्रिगेडला बोलवत नाही तर अमेरिकेत वणवा कसा पसरतो यावर परिसंवाद घेऊन त्याचा बंदोबस्त कसा करता येईल याची कारणे शोधतो. आणि मग ती कारणे मॅथमॅटिकल इंडक्शनने ग्लोबली लागू असल्याने माझ्याकडे लागू करतो. Rofl

छे छे

माझ्या शेजारच्या घराला आग लागली कि मी त्यात पाणी टाकण्यापेक्षा हे मोदी शाह यांचे षडयंत्र आहे कि अदानी ना शेजारचे घर विकत घ्यायचे आहे याबद्दल परिसंवाद भरवतो.

आणि मग सगळे तेच यशस्वी कलाकार येऊन मोठा समारंभ करतात.

मोदी शहा कुठे आले? आणि अदानी? त्यांचा यात हात कसा काय आहे? देवा!!! ते पेपर का लीक करतील!! असं तुम्हाला का वाटलं आता?! काविळीला औषध नसतेच म्हणतात ना?
आता पीएमओ परीक्षा घेणार, पेपर वाटणार असं सगळं करत असेल तर ते उत्तरदायी तरी आहेत असं त्यांनाच वाटतंय असं दिसतंय ना? का नाही?

मोदी शहा कुठे आले? आणि अदानी?

असं कसं असं कसं

काहीही झाले तर मोदी शाह च जबाबदार असतात ना?
इथे नाही तर धुळवड कशी खेळणार?
आणि अदानी अंबानी यांना नावं ठेवल्याशिवाय काहींना अन्नच पचत नाही!

चालायचंच

एक सेट असा आहे ज्याला विषयापेक्षा यात गंमतीजंमती शोधण्यात रस आहे. संवेदनशीलता कशाशी खातात हे ठाऊक नाही. त्यावर बोट ठेवलं कि बुलिंग म्हणून वेगवेगळी रूपं घेत थयथयाट करताहेत.

दुसरा सेट असा आहे कि ज्याला या विषयातल्या सांगोपांग चर्चा म्हणजे धुळवड आणि आपल्या मनाच्या पाटील देशमुखांवरचे आरोप वाटताहेत. या परीक्षा रद्द कराव्यात हे मत कदाचित चूक असेल किंवा बरोबर असेल, पण ते शिमगा आहे हे इथे समजलं.

अशा दोन्ही सेटसच्या इसमांनी आपल्याला इग्नोर किंवा ब्लॉक केलं काय किंवा आपण त्यांना केलं काय, आपल्याला आयुष्यात काय फरक पडतो?
पण असे सेटस उद्या बहुमतात आले तर देशाला पडतो.

ट्रोलिंग , बुलिंग याला म्हणतात का?
कि आपण करतो ते सोडून सगळे ट्रोलिंगन/ बुलिंगन?
व्याख्या कोण करतंय..
709013989_1326523099580994_4392221171665326064_n.jpg

जे काम पत्रकारांनी करायला हवं, ते १७- १८- १९ वर्षांची पोरं करताहेत.
https://x.com/timesnow/status/2060624050834083842
ज्यांच्याकडे ट्विटर नाही, त्यांच्यासाठी यु ट्यूब
https://www.youtube.com/watch?v=-4OAJjJesPo

आणखी एका ट्विटर हँडलने धर्मेंद्र प्रधान आणि coempt चे आणखी संबंध असल्याचा आरोप केला आहे. ते राजकारणाच्या धाग्यावर लिहितोय.

तर मोदी शाह च जबाबदार असतात >> मोदी! मोदी!! जिभेला काही हाड!!!
श्री मोदी, श्री मोदी असं सहस्रनाम जप करून तुमची ही अवस्था! कुफेहिपा?
ठीक आहे... आता फुल्स्केप पेपर घ्या आणि १०० वेळा श्री मोदी लिहा म्हणजे परत ती चूक होणार नाही!

Cambridge International education - A level paper leak investigation (June 2025)

Screenshot_20260530-190242__01.jpg

एक खूप रोचक फॅक्ट समजला, दर वर्षी केंब्रिज जवळपास १६० देशांच्या स्कूल्समधे २० लाखांहून अधिक परीक्षा कंडक्ट करते The International Education group मार्फत.

ही बातमी बघा. आजतकची.
प्रयागराज मध्ये संगणकावर घेण्याच्या परीक्षेत जेवढे संगणक आहेत त्यापेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांना त्या केंद्रात बोलावलेझ प्रवेश दिला त्याने गोंधळ.
मुझफ्फरपूर मध्ये सूचना न देता परीक्षा रद्द.
गोरखपूरमध्ये शंभरच्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र असुन केंद्रात प्रवेश मिळाला नाही, विद्यार्थी रस्त्यावर, मग तांत्रिक कारण आहे विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र जमा करावे, एक दोन दिवसात त्यांचा पेपर घेतला जाईल सांगितलं.

Pages