Submitted by अजिंक्यराव पाटील on 18 May, 2026 - 03:36
तर वाल्हेकरवाडी सोडून बाकी सर्व परिसरात अनेक कटिंग सलॉन्सला जाऊन आलो (जिथे दाढी साधारण ७०-१०० रुपये, कटिंग १००-१५० रुपये आणि तेलमालीश १००-२०० रुपये या रेंजमध्ये करतात. याहून अधिक पैसे देणे परवडणारे नाही म्हणून अति उच्च लेव्हल न्हाव्यांकडे गेलो नाहीये). प्रत्येक दुकानात उत्तर प्रदेशातले मुस्लिम"च" होते (धर्म एक जनरल ऑब्झरव्हेशन आहे, फक्त मुस्लिमच घाण असू शकतात असे काही म्हणणे नाही). एकूण एक कलाकार बिना अंघोळीचाच असतो, तोंडाला पण अतिशय घाण वास येत असतो. तोंड उघडलं कि तारा दिसतात. काल तर शब्दशः विचारलं कि अंघोळ का नाही करत तुम्ही लोक असं.
तर मी आता ह्या परिसरात स्वच्छ आणि मराठी न्हाव्याच्या शोधात आहे. साधारण एका बैठकीत उपरोक्त ३ कामांचे ५०० रुपये शकतो. तुम्हाला माहित असल्यास सुचवा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्राधिकरण पेठ २८ (सेक्टर २८)
निगडी प्राधिकरण पेठ २८ (सेक्टर २८) मध्ये Provident Fund कार्यालयाच्या रस्त्यावर आहे एक दुकान, जो तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. दुकानाचे नाव आठवत नाही, पण एकदा गेलात तर फोन वर त्याच्या बरोबर बोलून ठरवू शकता .
बाकी आता मुंबई-पुणे शहरात या कामाकरता अशीच मंडळी आहेत. कळपाने येतात, कळप करून राहतात आणि अश्या प्रकारची कामे करून पैसे मुलुखला पाठवतात.
Did you try Urban company
Did you try Urban company सर्विसेस?
माझ्या बाबांसाठी एक जण बोलावला होता. स्वच्छ होता आणि काम नीट केले. केस कापून नंतर झाडून स्वच्छ करून गेला.
Up side च्या कारागीर मुळे
Up side च्या कारागीर मुळे वैतागलो होतो.
शेवटी शोधाशोध केल्यावर आमच्याच एरिया मध्ये एका बारक्या गल्लीत एक कराड side चा मराठी माणूस सापडला.
चांगलं ट्युनिंग जमलंय त्याच्यासोबत.
तंबाखू खातो तो पण शक्यतो ग्राहकाचे काम सुरू असताना खात नाही.
शुभेच्छा असा माणूस मिळायला.
याईक्स!!!
याईक्स!!!
आयब्रोस थ्रेडिंग करताना, एक मुलगी दोरा तोंडात धरुन अखंड बोले. आय चेन्ज्ड द प्लेस. चेहर्याजवळ चेहरा आणुन तुम्ही बोलू शकत नाही. कॉमन सेन्स आहे.
विशेष म्हणजे हे लोक बहुधा
विशेष म्हणजे हे लोक बहुधा कॉन्ट्रॅक्ट vr असतात. malak मराठीच असतो, हे लोक ६०-४० किंवा ७०-३० बेसिस वर काम करतात. दुकाने एकदम झाकपाक पण कारागीर याक याक !
मुंबईत तर मराठी कारागिर उरले
मुंबईत तर मराठी कारागिर उरले असावेत का, ह्याबद्दल शंका आहे.
इंटरेस्टिंग धागा आहे.
इंटरेस्टिंग धागा आहे.
यातले निगडी जर कराडसाताऱ्याचे असेल तर सासुरवाडी बहुधा तिथेच कुठेतरी आहे.
पण काही सुचवू शकत नाही.
तरी धागा वाचायला मजा आली.
बायको स्वतःसाठी पार्लरवाली घरीच बोलावते. मी एकदाच हा प्रयोग केला पण सलूनची मजा नाही आली.
दाढी कोणीही करू शकते पण केस कापणारे चांगले असणे गरजेचे. गबाळे किंवा छपरी नको. त्याच्याकडे बघून वाटले पाहिजे बंदे मे कुछ बात है तरच तो आपले छान स्टायलिश केस कापेल अशी खात्री वाटते.
मुंबईत तर मराठी कारागिर उरले
मुंबईत तर मराठी कारागिर उरले असावेत का, ह्याबद्दल शंका आहे.
>>>>>
आमच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सारेच जण माझ्या मागच्या पिढीपर्यंत याच व्यवसायात होते. पण त्यांच्या घरातील माझ्या पिढीतील कोणीच हा व्यवसाय पुढे नेला नाही. शिक्षण घेऊन वेगळ्या फील्ड मध्ये गेले. कारण या व्यवसायासोबत जात चिकटली जाते ती त्यांना नको होती.
हे किंवा हेच एक कारण यामागे असावे असे म्हणायचे नाहीये. शेजारचे च कुटुंब असल्याने वरील पोस्ट वाचून हे चटकन आठवले. हे कारण त्यांनीच आम्हाला सांगितले होते.
थोडे खाली या चिंचवड मध्ये
थोडे खाली या चिंचवड मध्ये मराठी न्हावी मिळेल. सकाळी गेला तर स्वच्छ अंघोळ आणि पुजा करुन काम चालु करतो. मराठी भक्तीगीत ऐकत तिन्ही कामे ५०० पेक्षा कमी मध्ये होईल.
निगडी पुण्यात आहे
धनवन्ती ला अनुमोदन. अर्बन
धनवन्ती ला अनुमोदन. अर्बन कंपनीकडून एकदा सर्व्हिस घेऊन बघा.
हो, चिंचवडला सापडू शकेल.
हो, चिंचवडला सापडू शकेल. धन्यवाद!! बघतो रविवारी
जात चिकटते: न्हावी म्हणजे बिनभांडवली धंदा असं म्हणायचे पूर्वी. गावाकडे ज्वारीच्या बदल्यात डोकं भादरून घ्यायचे आधी.. मी देखील त्या पोत्यावर बसून बऱ्याचवेळा कटिंग करवून घेतली आहे. पण आता आता भांडवल न्हाव्याला देखील लागतेच. तरीही, कौशल्य असेल तर फार फायद्याचा धंदा आहे हा. काही ठिकाणी जातीने नसलेले न्हावी अतिशय उत्तम कारागीर असल्याचे पाहिले आहे. आणि मी तर म्हणेन की तुमच्याकडे कौशल्य, गिऱ्हाईक बांधून ठेवण्याची हातोटी आणि परफेक्ट जागा असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी महिन्याला लाखभर रुपये आणि टायर 4 मध्ये 70-80 हजार आरामात कमवता येतील न्हावीकाम करून.
पुण्यात एक अत्यंत प्रसिद्ध
पुण्यात एक अत्यंत प्रसिद्ध कलाकार होते "राम नगरकर" कदाचित तुम्ही त्यांचं आत्मचरित्र वाचलं असेल. दादा कोंडकें बरोबर "विच्छा माझी पुरी करा" हे तत्कालीन खूप गाजलेलं राजकीय प्रहसन असलेलं नाटक करत. युट्यूबवर त्यांचं गाजलेला आत्मचरित्र "रामनगरी" ऐकलं नसेल तर आवश्य एका.
हे सगळं लिहायचं कारण टिळक रोडवर या कलाकार माणसाचं केशकर्तनालय होतं. त्यांच्या पुढच्या पिढ्या चालवतात का माहीत नाही.
अर्बन कं वर मराठी लोक आहेत पुण्यात.
" रामनगरी " वर अमोल
" रामनगरी " वर अमोल पालेकरांनी सिनेमा देखील काढला होता
रामनगरी, लहानपणी दूरदर्शनवरती
रामनगरी, लहानपणी दूरदर्शनवरती पाहीलेले.
अजिंक्यराव
अजिंक्यराव
माझे एक।मित्र आहेत
जातीने आणि हाच बिजनेस करणारे.
हातावर पोट प्रकार होत असे तो. फारच आर्थिक त्रास व्हायला लागला.
आता तर त्यांनी एक छोटासा जॉब सुरू केला आणि सेकड शिफ्ट घेतली आहे.
सकाळच्या वेळात काही रेग्युलर customer आहेत त्यांना एका दुकानात टाय up करून तिथे बोलवतात.
म्हणावे तसे income traditional पद्धतीत नाही.
तुम्हाला लेटेस्ट सर्व styles आणि प्रकार येत असतील, मोक्याच्या जागी दुकान असेल , सर्व चकाचक असेल तर तुम्ही म्हणता तसा बिजनेस होउ शकतो.
Btw
मला सोलापुरात फार छान अनुभव , दाढी कटिंग चा आलाय.
छोट्याश्या दुकानात देखील.
कारागीर मूळचा कन्नड आणि सोलापुरात पिढ्यान पिढ्या गेलेले.
मन लावून तबियत मध्ये काम सर्व.
उगी घाई गडबड नाही.
(No subject)
आपले केस आपणच कापणे. हाच उपाय
आपले केस आपणच कापणे. हाच उपाय. काही अवघड नसते.
उत्सुकता असेल तर टेक्निक सांगेन.
किल्ली, गल्ली चुकली की काय???
किल्ली, गल्ली चुकली की काय????
चर्चा आवडल्यामुळे किल्लीने
चर्चा आवडल्यामुळे किल्लीने चहा आणून ठेवला अस वाटतंय
WA वरच चहा ठेवू का sticker :p
पनवेल जवळ एका area मध्ये अर्बन कंपनी मधून आलेल्या मुलीने client २-३ दिवस घरात एकटी असणार होती ही माहिती कळल्यावर बाकीचे काम उद्या करू अस सांगून दुसऱ्या दिवशी येऊन साथीदारासह घर लुटले. त्या क्लायंट बाईला खुर्चीला बांधून ठेवले
दुसऱ्या दिवशी नवरा ट्रिप हून आला तेव्हा तिची सुटका झाली.
Ohh
Ohh
गल्ली चुकली खरंच.
पण मस्त आहे ना चहा
फार आवडतो हा कप मला pixabay चा आहे कुठे मिळेल पहायला हवं
..
मुग्धा स्टिकर ना, ठेव बिनधास्त
शिवार चौक मॅकडीपाशीचे हबीब
शिवार चौक मॅकडीपाशीचे हबीब ट्राय करून बघा.
तिथले रोड फेसिंग दुकान फॅन्सी, महाग आहे पण मागे (कुठलीतरी कबाब/ रोल्सच्या दुकानशेजारी) मुलींचा कोणताही हेअरकट 179/- ला करून देतात. पुरुषांचा त्यापेक्षा स्वस्तच आहे. नक्की किती आठवत नाही.
ऍमी
ऍमी
खूप दिवसांनी दिसलात
बऱ्या आहात ना
तुमच्या पोस्ट्स मिस करते मी
अॅमी वेलकम गं. इथेच रहा आता.
अॅमी वेलकम गं. इथेच रहा आता. मिस युअर युनिक & इम्पार्शल व्ह्यु. आणि हो धीट व ट्रोल्स ना भीक न घालणारं.