Submitted by Madan Hunkare on 22 April, 2026 - 09:32
आमचा नातू लहान होता तेव्हां सारखा त्याच्या मम्मीच्या मागे मागे असायचा. सूनबाई त्यामुळं वैतागायची. माझा मुलगा कसा होता हे आता आठवत नाही. पण इतका मागं लागत नव्हता. मागे लागला लागला आणि मग जे बाहेर जायला लागला कि दरवाजाला फळी लावावी लागली. थोडा धरून चालायला लागल्यानंतर मग सतत बाहेरच असायचा.
पण त्या दिवसात त्याने सूनबाईंना नको नको केलं होतं. नंतर मुलगा म्हणजे त्याचा बाबा आला कि त्यालाही तसंच करायचा. माझ्याही मागे मागे असायचा. सगळे घाबरायचे त्याला. हाहा.
त्याला चिकटगुंडा नाव पडलं होतं. अशी बाळं असतात का? तुमचं बाळ असं चिकट होतं का?
काय कारण असेल यामागे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय कारण असेल यामागे? >> हा
काय कारण असेल यामागे? >> हा संशोधनाचा विषय आहे. याचं कारण उत्क्रांतीत दडलं असावं.
अवांतर: डीपी भारी आहे तुमचा.
अशी बाळं असतात का?>> हो. हे
अशी बाळं असतात का?>> हो. हे अगदी नॉर्मल आहे. इन फॅक्ट आमच्या पेडीने लेकाच्या ९ महिन्याच्या चेकअपच्या वेळी विचारले होते की चिकटायला लागला का म्हणून. बाळ मोठे होतानाचा महत्वाचा टप्पा. या काळात बाळाच्या मेंदूची वाढ झपाट्याने होते. पूर्वी घरात बरीच माणसे असत बाळाला खेळवायला तर फारसे जाणवत नसावे आता मोजकीच माणसे तर कदाचित त्यामुळे बाळ सतत चिकटून असे वाटत असणार.
मी शनिवार रविवार फक्त
मी शनिवार रविवार फक्त लेकरांना दिसते

एरवी ऑफिस आणि इतर कामात त्यांच्या वाटणीला आई येत नाही जास्त
म्हणूनच की काय ते वीकएंड ला शेपूट बनून फिरतात
जिथे गेले तिकडे सोबत दोघेही
मला पण आवडतं कारण आमचा तोच quality time
मला सुटी असेल तेव्हा घरात इतर कुणालाही भाव देत नाहीत ते
त्यांच्या मित्र मैत्रिणींना सांगतात आज आमची आई घरी आहे आम्ही नाही येणारे खेळायला
..
मुलीपेक्षा मुलगा (साडेचार वर्षे वय ) जास्त चिकट्या आहे
आई आई करत सतत मागे असतो
मी कामात असले तरी जवळपास कुठेतरी खेळत राहतो
मुलगी बिचारी, सांगितलेलं निमूट ऐकते (६ वर्षे वय )
जा खेळ म्हटलं की