हिंदी चित्रपट सृष्टीत दिसणारा दुटप्पीपणा

Submitted by shendenaxatra on 5 April, 2026 - 17:22
दीवार

धुरंधर ह्या सिनेमाने प्रचंड यश मिळवले आहे आणि अनेक डाव्या, सेक्युलर लोकांना त्यातील अनेक गोष्टी खटकताना दिसत आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसर्‍या भागात सुरवातीलाच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असा श्लोक अनुवादासकट दाखवला होता त्यावरून काहीसा गदारोळ झाला. सिनेमात धार्मिकता कशाला हवी असा एक टीकेचा सूर काही व्यक्तींच्या बोलण्यात आला. ह्यावरून गेल्या ६०-७० वर्षे हिंदी सिनेमात दिसणारा दुटप्पीपणा चर्चिला जावा असे वाटते.
सिनेमात हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट हे विविध पद्धतीने आडवळणाने दाखवले जाते. उलट अन्य धर्म, विशेषतः इस्लाम कसा शांतता प्रेमी आहे. तो धर्म पाळणारे दयेचा, विशाल हृदयाचा, सहिष्णूतेचा, त्यागाचा मूर्तीमंत पुतळा कसे असतात ते कधी सरळ तर कधी आडवळणाने सुचवले जाते.
एक मोठे उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चनला अँग्री यंग मॅन म्हणून पुढे आणणारा पहिल्या दोन तीन सिनेमातला एक दीवार.
ह्यात नायक म्हणजे अमिताभ बच्चन देवळात जात नाही. आई त्याला देवळातला प्रसाद देते तर तोही खायला नाखूश. भाऊ त्याला प्रसाद नाही तर मिठाई समजून खा असे सांगितल्यावर नाईलाजाने खाणारा.
उलट कामावर बिल्ला लावावा लागतो त्यावरील नंबर हा मुस्लिमांसाठी कमालीचा पवित्र आहे असे कुठलासा मुस्लिम चाचा (अर्थातच दयाळू, मदतीला तत्पर, सहृदयी वगैरे वगैरे!) सांगतो तेव्हापासून तो बिल्ला ह्या हिरोसाठी कमालीचा पवित्र बनतो. हिंदू देव वगैरे न मानणारा बिसमिल्लाह ह्या अर्थाचा बिल्ला तो मोठ्या आदराने जवळ बाळगतो.
हे एक उदाहरण झाले.
असंख्य सिनेमात खलनायक बटबटीत गंध लावून, जाडजूड शेंडी दाखवत, महाकाय निरांजन ओवाळत जय काली मा नाहीतर जय भवानी अशी गर्जना करतो आणि पूजा होताच विकट हास्य करत कुठल्याशा दीन गरीब माणसाचा गळा चिरतो नाहीतर असहाय अबलेवर हात टाकतो असे रमणीय दृश्य आपण अनेकदा पाहिले असेल.
हिंदू धर्मातील जातीभेद हा तर हिंदूना झोडपायचा हक्काचा विषय. तोही वेळोवेळी दिसतोच. पण मुस्लिम धर्मावर अशी टीका करायचा प्रयत्न केला तर प्रचंड वादंग निर्माण होतो. सिनेमावर बंदी येते. दंगल, आंदोलने होतात. मग आपला सिनेमा विविध मौलाना मुफ्ती मंडळींना दाखवून त्यात बदल करून मगच प्रदर्शित होतात. उदा. निकाह, कुली.
सिनेमात धोतर पगडी वगैरे नेसलेला माणूस एक तर विदुषकी आचरट चाळे करणारे पात्र किंवा अत्यंत वाईट वृत्तीचा खलनायक असतो.
उलट मुस्लिम जर म्हातारा, मुस्लिम पद्धतीची दाढी टोपी बाळगणारा असेल तर दयेचा पुतळा, त्यागाची मूर्ती वगैरे असतो.

भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांबद्दल काही दाखवायचे असेल तर दोन्ही देश कसे चांगले आहेत उलट "दोन्ही बाजूचे" काही वाईट लोक दोन देशातले संबंध कसे खराब करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत असे दाखवले जाते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.youtube.com/watch?v=iPUF8YWuTO4&t=294s
रहीम चाचा जवान हो रहा है.
दीवारमधे म्हातारा परमदयाळू, परमसहिष्णू, परोपकारी रहीमचाचा विजयरूपी अमिताभला इस्लामची दीक्षा देतो.
हल्लीच्या सिनेमात रहीमचाचा तरूण बनतो.
कधी चक दे इंडीयातील मूळचा हिंदू प्रशिक्षक कबीर बनून आपल्याला मुस्लिम असल्यामुळे कसे तुच्छ, फितूर समजतात आणि आपले देशप्रेम कसे उत्तुंग आहे हे स्पष्ट केले जाते.
बिल्ला रंगाच्या हत्याकांडावर आधारित राख नामक सिरीजमधे अकारण रंगाबिल्लापैकी एकाला मराठी दाखवले आहे. तर तपास करणारे नि:स्पृह अधिकारी मस्लिम आणि जयभीमवाले दाखवले आहेत जेणेकरून त्यांना हिंदूंच्या संकुचित वृत्तीचा बाजार मांडता यावा. यातील एकही पात्र खरोखर घडलेल्या घटनांना अनुसरून नाही. परंतु इस्लामचा गौरव आणि हिंदूंचा अपमान ह्या बॉलिवुडी तत्त्वज्ञानाला साजेशीच मांडणी आहे.

अगदी १९६० पासून बनलेल्या बहुतांश सिनेमातील विचार आणि अलीकडे निघालेल्या धुरंधर, कश्मीर फाईल इत्यादि सिनेमात मांडलेला विचार ह्यात फरक आहेच पण संख्येतील प्रचंड फरक लक्षात घ्या.
धुरंधर टाईप दोन चार सिनेमे एका पारड्यात आणि मुस्लिमांची भलावण, इस्लामला उदात्त आणि हिंदुंना तुच्छ हीन लेखणारे हजारो सिनेमे दुसर्‍या पारड्यात घालून आपणच तपासा कुठल्या प्रकारचा पूर्वग्रह हिंदी सिनेमा सृष्टीत प्रकर्षाने आढळतो ते.

लाज आणि विवेक सोडला की असं बोलता येतं. पाकिस्तान, मुसलमान आणि दलित- हे या पृथ्वीवरून समजा नाहीसे झाले, की यांचं जगण्याचं प्रयोजन संपेल. अक्षरशः तडफडून जीव देतील. या तिघांना आपण या महाभागांचे ऑक्सिजन व्हेंटिलेटर वगैरे आहोत हे गावीच नाही! Proud

ज्यांच्या जगण्याचं प्रयोजनच द्वेष आणि द्वेष पसरवणं हे आहे- त्यांच्याबद्दल याहून वाईट आणि गचाळ भाषेत बोललं पाहिजे खरं तर, पण हा द्वेष यांना स्वतःलाच जाळत सुटेल, आणि द्वेषाचीच एकदाची सुटका होईल- अशी एक अंधुक आशा आहे.

धुरंधरला रिलायन्सने सहाय्य केले म्हणजे काय गुन्हा केला का? प्रचंड बजेट असणारा सिनेमा काय हवेत निर्माण होतो का?
आदित्य धरने जीव तोडून दोन्ही सिनेमे बनवले आणि प्रेक्षकांनी दाद दिली तर तुमच्या पोटात का दुखावे?

आणि मुख्य प्रवाहातील बॉलिवूड गेले पन्नास वर्षे आपला मुस्लिम धार्जिणा प्रचार चालवत आहे तो ह्या दोन सिनेमांमुळे कसा काय समर्थनीय ठरतो?
मुळात धुरंधरमधे हिंदू चांगले आणि मुस्लिम वाईट असे कधी आणि कुठे दाखवले आहे?

मुस्लिम धार्जिणा प्रचार चालवत आहे >> तरीही भारत "हिंदुस्थान" नाही झाला . आणि मुस्लिम अजूनही तुमच्या द्वेषाचे कारण आहेच !!

>>
लाज आणि विवेक सोडला की असं बोलता येतं. पाकिस्तान, मुसलमान आणि दलित- हे या पृथ्वीवरून समजा नाहीसे झाले, की यांचं जगण्याचं प्रयोजन संपेल. अक्षरशः तडफडून जीव देतील. या तिघांना आपण या महाभागांचे ऑक्सिजन व्हेंटिलेटर वगैरे आहोत हे गावीच नाही!
<<
डोके ठिकाणावर नसले की असले काहीबाही बिनडोक मौक्तिक निघते! असो.

माझा मुद्दा हा आहे की बॉलिवूड मुख्य प्रवाहात असे दाखवले जाते की दुष्ट हिंदू मुस्लिम आणि दलित लोकांना वाईट वागवतात.
मुस्लिम मात्र साक्षात दयेचा निर्झर असतात आणि ते अस्पृश्यता वगैरे मानतच नाहीत. उदा. गंगा की सौगंध हा दिव्य सिनेमा.
समस्त पारंपारिक हिंदू एका दलित कुटुंबाला कायम हिडिस फिडिस करतात. माझ्या अंगावर तुझी सावली पडली आता मला पुन्हा अंघोळ करावी लागणार म्हणून शिव्याशाप देणारा सत्येन कप्पू.
दुसरीकडे आवर्जून त्या दलित कुटुंबाच्या घरी जाऊन तिथे चहापाणी आनंदाने स्वीकारणारा परम दयाळू कनवाळू मुस्लिम.
हा ढोंगीपणा आहे.
मुस्लिम राज्यात धिम्मी म्हटल्या जाणार्या बिगर मुस्लिम लोकांना दुय्यम स्थान असते. शरियाच्या नियमानुसार त्यांना जिझिया तर द्यावा लागतोच. शिवाय कुठली अधिकारी पदावर नेमणूक केली जाऊ शकत नाही. त्यांना वेगळा वेष परिधान करावा लागतो. त्यांना घोड्यावर बसायची परवानगी नसे (जेव्हा घोडे हे वाहतुकीचे साधन होते तेव्हा). अशा बिगर मुस्लिम लोकांची साक्ष मुस्लिमाच्या बरोबरीची समजली जात नाही. वगैरे वगैरे.
(उत्सुकता असेल तर फतावा-ए-आलमगिरी नामक ग्रंथ वाचा.)
असे असताना केवळ हिंदूंना वाईट दाखवण्यासाठी हिंदी सिनेमात दलित आणि मुस्लिम हे सर्वगुणसंपन्न आणि हिंदू मात्र संकुचित, असहिष्णू, क्रूर वगैरे दाखवतात.
अक्षरश: ढिगाने उदाहरणे देता येतील.

हाय! इस नादानी (innocence ) पर मैं सदके जावाँ.
धुरंधर मध्ये २०१४ च्या पूर्वी भारताच्या गुप्तहेर खात्याने केलेली कामगिरी इ. २०१४ नंतर घडल्या असं दाखवलं. म्हणून तो प्रपोगंडा.

तेच राजी बघा. खर्‍या व्यक्तींवर आणि घटनांवर आधारित. तरीही कुठे जिंगोइज्म नाही , ऊर बडवणं आणि फुगवणं नाही.

तेच राजी बघा. खर्‍या व्यक्तींवर आणि घटनांवर आधारित.
>>>> एक चित्रपट म्हणून राजी उत्तम आहे. पण 'कॉलिंग सहमत' पुस्तकाचे (सहमत खान - जिच्यावरून राजी चित्रपट काढला आहे) लेखक हरिंदर सिक्का यांनी राजी पुस्तकाशी प्रामाणिक नाही असा जाहीर आरोप केला आहे. पुस्तक वाचले नसल्याने नेमकं काय चुकीचं दाखवलं आहे माहीत नाही. त्यामुळे राजीचा आस्वाद मिठाच्या चिमटीसोबत घ्या.

सिक्का यांच्या प्रमुख आक्षेपांचा सारांश:

  • पुस्तकातील Sehmat ही आपल्या देशासाठी केलेल्या कामाबद्दल ठाम आणि अभिमानी आहे; चित्रपटातील शेवट तिला मानसिकदृष्ट्या तुटलेली आणि आपल्या कृतीबद्दल पश्चात्ताप करणारी दाखवतो.
  • पुस्तकात भारतात परतल्यावर तिचे स्वागत “Jana Gana Mana” ने होते, असा सिक्का यांचा दावा आहे; चित्रपटात हा भाग नाही.
  • भारतीय प्रतीकांचे चित्रण कमी केले, तर पाकिस्तानी लष्कराला तुलनेने “soft” पद्धतीने दाखवले, असा त्यांचा आरोप आहे.
  • RAW चे चित्रणही पुस्तकापेक्षा वेगळे/कमी प्रभावी केले, असा त्यांचा आरोप आहे.
  • Meghna Gulzar यांना Raazi दिग्दर्शक म्हणून निवडणे ही “gravest misjudgement” असल्याचे म्हटले आणि कथेला “ideological bias” मुळे मूळ स्वरूपापासून दूर नेल्याचा आरोप केला.

नितनवे, तुम्ही माझ्या म्हणण्याला पुष्टीच दिलीत. कुठे जिंगोइज्म नाही , ऊर बडवणं आणि फुगवणं नाही. एका व्यक्तीची कहाणी दाखवली.

Sehmat ही आपल्या देशासाठी केलेल्या कामाबद्दल ठाम आणि अभिमानी आहे हे लिहिणे किंवा एखाद्या हेराचे स्वागत राष्ट्रगीताने करणे हे उर बडवणे आहे का?

धुरंधरसोबत परातीने मीठ घ्या माझी काही हरकत नाही. मी धुरंधरबद्दल इथे काहीच बोलले नव्हते.

वरच्या रणवीर सिंगच्या मेसेजमध्ये काय आक्षेपार्ह आहे? त्याच्या पडत्या काळात रिलायन्सने त्याला हात दिला आणि त्या भूमिकेने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली एवढेच आहे त्याबद्दल त्याने जाहीर आभार मानले आहेत. हा रिलायन्सच्या छत्रीखाली बनवलेला चित्रपट आहे ही काय नवीन माहिती नाही.
काही प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही म्हणून त्याने त्याचे मत व्यक्त करू नये की काय?

गंगा की सौगंध हा दिव्य सिनेमा.
समस्त पारंपारिक हिंदू एका दलित कुटुंबाला कायम हिडिस फिडिस करतात. माझ्या अंगावर तुझी सावली पडली आता मला पुन्हा अंघोळ करावी लागणार म्हणून शिव्याशाप देणारा सत्येन कप्पू.>>>> १९७८ मध्ये भारतातील ग्रामीण भागातील, ते ही उत्तरेतील जातीव्यवस्थेचे वास्तव काय होते? जिथे आजही इतके कायदे असताना खालच्या जातीतील वर मुलगा लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसला म्हणून मारहाण केली जाते. ...विचार करायची गरज कुणाला आहे?

राजीबरोबर मिठाची चिमटी घ्यायची तर धुरंधर सोबत मूठ घ्यावी लागेल.>>> आदित्य धर चे चित्रपट मीठागारात बसूनच पाहावेत... Rofl

सिक्का ह्यांचे बरेचसे आक्षेप पांचट वाटले. शेवटी जन गण मन नाही? C'mon.

चित्रपटाच्या शेवटी ती तुटलेली दाखवली आहे ह्यात प्रोपोगंडा नक्की कसला ? एका माणसासोबत अनेक दिवस पत्नी म्हणून राहिल्यावर त्या माणसाला मरताना पाहणे थोडेतरी ट्रॉमॅटिक असू शकते ना ? म्हणजे काही गुलजार बाईंनी आउटलँडीश असे तरी काही दाखवले नाहीये. ते लेखकाच्या प्रतिमेशी मॅच होत नाही इतकेच.

>>चित्रपटाच्या शेवटी ती तुटलेली दाखवली आहे ह्यात प्रोपोगंडा नक्की कसला ? एका माणसासोबत अनेक दिवस पत्नी म्हणून राहिल्यावर त्या माणसाला मरताना पाहणे थोडेतरी ट्रॉमॅटिक असू शकते ना ? म्हणजे काही गुलजार बाईंनी आउटलँडीश असे तरी काही दाखवले नाहीये. ते लेखकाच्या प्रतिमेशी मॅच होत नाही इतकेच.>> +१
लग्नाचा सगळा काळ ती दुहेरी आयुष्य जगते, त्यातच ती गर्भवती होते. तिचा पती काही कुणी व्हिलन नाहीये, पण तरी शत्रू आहे, त्याचे मरणे आवश्यक आहे. त्यातून ट्रॉमा येणे हे नॉर्मल!
आमचे काही मित्र वेटरन होते/ आहेत. विएतनाम काय , डेझर्ट स्टॉर्म काय त्यांच्यासाठी त्या आठवणी कायम क्लेशकारक राहील्या. आयुष्यावर कायमचे सावट राहीले.

समस्त पारंपारिक हिंदू एका दलित कुटुंबाला कायम हिडिस फिडिस करतात. माझ्या अंगावर तुझी सावली पडली आता मला पुन्हा अंघोळ करावी लागणार म्हणून शिव्याशाप देणारा सत्येन कप्पू.
दुसरीकडे आवर्जून त्या दलित कुटुंबाच्या घरी जाऊन तिथे चहापाणी आनंदाने स्वीकारणारा परम दयाळू कनवाळू मुस्लिम.
हा ढोंगीपणा आहे.>>
हिंदू, मुस्लीम, दलित याबद्दल बोलायचे तर ज्या काळात कोकणात हिंदू-मुस्लीम, हिंदू -दलित रोटी व्यवहार नव्हता (हिंदूंना चालत नसे) त्या काळात मुस्लीम- दलित रोटी व्यवहार होत असे ही माझ्या आईची आठवण होती.

कॉमी+१.
झाल्या प्रकारा मुळे शेवटीं ट्रॉमा येणे म्हणजे कामावर ठाम नाही देशाभिमानी नाही? काहीही ओळख नसलेल्या अचानक समोर आलेल्या शत्रुला मारणारे सैनिक ट्रॉमटाईझ होतात.

आणि भारतातले बहुतांश मुस्लिम मूळ खालच्या समजल्या गेलेल्या जाती समूहातले आहेत. त्यांनीही असे भोगुन हाताशपणातून धर्म बदलला आहे.
अशा त्रास दिलेल्या कुणाला आवर्जून जाऊन भेटणं साहजिक आहे.
तसं दाखवलंय तर त्यात काय ढोंगीपणा?

शेंडे , तुम्ही का नाही एखादा चित्रपट काढत ? ज्यात केवळ हिंदू , त्यातही ते ब्राह्मण हे सद्गुणी आणि इतर सर्व पात्रं दुर्गुण ठासून भरलेली , ती देखील इतर जाती धर्माची वगैरे! प्रमुख भूमिकेत शरद पोंक्षेच हवा .

आजही पांढरपेशा मुस्लिम कुटुंबाला तथाकथित उच्चभ्रू भागात भाड्याने घर मिळाणे अवघड असते, दलित वस्तीत सहज मिळून जाते.

>>> प्रमुख भूमिकेत शरद पोंक्षेच हवा
Lol
मी नायिकेसाठी शेफाली वैद्यांचं नाव सुचवते. त्यांना या निमित्ताने पदार्पणाची संधी द्यावी.

आठवड्यापूर्वी नदीपात्रातून येत असताना दोन्ही बाजूंनी ठराविक अंतरावर ढोल वाजत होते. ढोलपथकं सराव करत होती.
मनात आलं आरक्षणवाल्या, जयभीमवाल्यांनी नऊ महिने आधीच सुरूवात केली का? आता कानाच्या डॉक्टरांचा धंदा वाढणार, हृदयविकाराचे झटके येणार...

आणि पिक्चरमधे फक्त हिंदूंना झोडपणार.

Pages