
धुरंधर ह्या सिनेमाने प्रचंड यश मिळवले आहे आणि अनेक डाव्या, सेक्युलर लोकांना त्यातील अनेक गोष्टी खटकताना दिसत आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसर्या भागात सुरवातीलाच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असा श्लोक अनुवादासकट दाखवला होता त्यावरून काहीसा गदारोळ झाला. सिनेमात धार्मिकता कशाला हवी असा एक टीकेचा सूर काही व्यक्तींच्या बोलण्यात आला. ह्यावरून गेल्या ६०-७० वर्षे हिंदी सिनेमात दिसणारा दुटप्पीपणा चर्चिला जावा असे वाटते.
सिनेमात हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट हे विविध पद्धतीने आडवळणाने दाखवले जाते. उलट अन्य धर्म, विशेषतः इस्लाम कसा शांतता प्रेमी आहे. तो धर्म पाळणारे दयेचा, विशाल हृदयाचा, सहिष्णूतेचा, त्यागाचा मूर्तीमंत पुतळा कसे असतात ते कधी सरळ तर कधी आडवळणाने सुचवले जाते.
एक मोठे उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चनला अँग्री यंग मॅन म्हणून पुढे आणणारा पहिल्या दोन तीन सिनेमातला एक दीवार.
ह्यात नायक म्हणजे अमिताभ बच्चन देवळात जात नाही. आई त्याला देवळातला प्रसाद देते तर तोही खायला नाखूश. भाऊ त्याला प्रसाद नाही तर मिठाई समजून खा असे सांगितल्यावर नाईलाजाने खाणारा.
उलट कामावर बिल्ला लावावा लागतो त्यावरील नंबर हा मुस्लिमांसाठी कमालीचा पवित्र आहे असे कुठलासा मुस्लिम चाचा (अर्थातच दयाळू, मदतीला तत्पर, सहृदयी वगैरे वगैरे!) सांगतो तेव्हापासून तो बिल्ला ह्या हिरोसाठी कमालीचा पवित्र बनतो. हिंदू देव वगैरे न मानणारा बिसमिल्लाह ह्या अर्थाचा बिल्ला तो मोठ्या आदराने जवळ बाळगतो.
हे एक उदाहरण झाले.
असंख्य सिनेमात खलनायक बटबटीत गंध लावून, जाडजूड शेंडी दाखवत, महाकाय निरांजन ओवाळत जय काली मा नाहीतर जय भवानी अशी गर्जना करतो आणि पूजा होताच विकट हास्य करत कुठल्याशा दीन गरीब माणसाचा गळा चिरतो नाहीतर असहाय अबलेवर हात टाकतो असे रमणीय दृश्य आपण अनेकदा पाहिले असेल.
हिंदू धर्मातील जातीभेद हा तर हिंदूना झोडपायचा हक्काचा विषय. तोही वेळोवेळी दिसतोच. पण मुस्लिम धर्मावर अशी टीका करायचा प्रयत्न केला तर प्रचंड वादंग निर्माण होतो. सिनेमावर बंदी येते. दंगल, आंदोलने होतात. मग आपला सिनेमा विविध मौलाना मुफ्ती मंडळींना दाखवून त्यात बदल करून मगच प्रदर्शित होतात. उदा. निकाह, कुली.
सिनेमात धोतर पगडी वगैरे नेसलेला माणूस एक तर विदुषकी आचरट चाळे करणारे पात्र किंवा अत्यंत वाईट वृत्तीचा खलनायक असतो.
उलट मुस्लिम जर म्हातारा, मुस्लिम पद्धतीची दाढी टोपी बाळगणारा असेल तर दयेचा पुतळा, त्यागाची मूर्ती वगैरे असतो.
भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांबद्दल काही दाखवायचे असेल तर दोन्ही देश कसे चांगले आहेत उलट "दोन्ही बाजूचे" काही वाईट लोक दोन देशातले संबंध कसे खराब करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत असे दाखवले जाते.
(No subject)
दीवारपासून चकदे पर्यंतचे सारे
दीवारपासून चकदे पर्यंतचे सारे सिनेमे नीट लक्ष देऊन पाहिलेले आहेस म्हणजे. का? आवड म्हणून की अभ्यास म्हणून? दोन्ही गोष्टी तुला शक्य नाहीत असं तुझ्याच पोस्टवरून कळतंय नीट
रंगाबिल्लापैकी एकाला मराठी
रंगाबिल्लापैकी एकाला मराठी दाखवले आहे.
>>>
काहीतरी दाखवावं लागणार ना. कॅरेक्टर पोर्ट्रेयिंग आहे ना ते.
रंगाबिल्ला गुजराती दाखवले असते तर पुन्हा आक्षेप घेतला असतास तू.
स्पष्ट शब्दात सांगायचं तर
स्पष्ट शब्दात सांगायचं तर (इथे ते शक्य नाही
, इथे नारळाला नारळ न म्हणता श्रीफळ म्हणायचं) तर रहीमचाचा, अब्दुल च्या नावाने गळे काढणारे जे आहेत ते मराठी सिरीयल्स मधल्या ब्राह्मणी वातावरणावर कधी बोलतील का?
हिंदी सिनेमात सेक्रेटरी म्हणून टीना, रीटा, ल्युसी अशा बाया नेहमी तोकड्या कपड्यात आणि " हे मैन ... आइंगा, जाएंगा " करत ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावतात याबद्दल या मंडळींना कधी खेद, खंत वाटतो का?
वर्तमानपत्रात विशिष्ट जातीच्या लोकांचा गुन्ह्यात सहभाग असला कि प्रतिष्ठीत व्यक्ती असे म्हणून नाव न देणे, काही विशिष्ट जातीधर्माचे नाव, पत्ते देणे, अलिकडे तर पीडीतांच्या बाबतीत सरळ फोटो छापणे, गावाचे नाव सांगणे हे केले जाते.
सिनेमाचा असाच अभ्यास केला तर हे रहीमचाचाच्या नावाने भोकाड पसरणारे तोंड लपवून पळतील. एक रहीमचाचा कनवाळू दाखवला कि उपहासात्मक बोचकारे काढणारे लोक गरीब मास्टरजी नेहमी, शर्मा, वर्मा मंडळी का असतात यावर काय बोलतील ?
दीवार मधे याच सलीम जावेदने गरीब मास्टर का घर म्हणून ए के हंगल दाखवले ते अब्दुल, रहीमचाचा नव्हते. स्कूलमास्टरला पेंशन असते, एव्हढी दैना नसते. कुठल्याही कथेतला ब्राह्मण गरीब असतो. याबद्दल पण बोला कि राव. कि आपलं ते चालतं, दुसर्याचं ते खुपतं.
आपलं लपवायला हे उगाचच काहीतरी भोकाड पसरायचं , पण किती?
नेहमी काही मंडळी यावर पाजळत असतात. हसून सोडून द्यायचं असतं. पण तुणतुणं किती वाजवावंं? भान सुटता कामा नये.
+1 राज अज्ञानी
+1 राज अज्ञानी
मुळामध्ये, सिनेमांमध्ये हिंदू वाईट आणि मुसलमान चांगले असा सरसकट प्रोपगंडा आहे ह्यास काहीही आधार नाही. हिंदी सिनेमांत ९०% पात्रं हिंदूच असतात, मग त्यात चांगली आणि वाईट सगळी आली. एक रहिमचाचा दाखवला तर एवढी जळायची काय गरज आहे ?
चांगले मुसलमान पात्र दाखवणे म्हणजे प्रोपोगंडा ही व्याख्याच ताळतंत्र सुटल्याचे लक्षण आहे.
हिंदी सिनेमांत ९०% पात्रं
हिंदी सिनेमांत ९०% पात्रं हिंदूच असतात, >> जर देशातली ७९% लोकसंख्या हिंदू असेल तर आणखी वेगळं कसं दाखवणार ना? असो बोलाव तेवढं थोडं यांच्याबाबत.
थोडक्यात ,
थोडक्यात ,
चोराच्या उलट्या बोंबा!
शेंडे नक्षत्र हे बावळट
शेंडे नक्षत्र हे बावळट असल्याचा आव आणत असले तरी ते नेहमी हिंदू मुसलमान बायनरी खेळत असल्याने ते अत्यंत धूर्त असल्याचे ध्यानात आले आहे. सोशल मीडीयाच्या उदयानंतर मुसलमानांबद्दल काहीही बोलणे हे नॉर्मल आहे आणि जयभीमवाले किंवा अन्य जातींबद्दल बोलणे नाही असा लोकांचा समज झालेला आहे का?
मुसलमानांबद्दल बोलणे ही गरज आहे तर ब्राह्मण हा शब्द का वापरू नये? मग आमच्यावरच कसा रिव्हर्स जातीयवाद होतो अशी कोल्हेकुई सुरू होते.
हिंदी चित्रपटसृष्टी हा व्यवसाय जोवर असभ्य समजला जात होता तोपर्यंत खानदानी स्त्रिया या व्यवसायात येत नसत. तेव्हां गाणार्या मुस्लीम स्त्रियांनी चित्रपटसृष्टीची नायिकांची गरज भागवली. जेव्हां या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा मिळतो हे दिसले तेव्हां उच्चवर्णिय त्यातून ब्राह्मण स्त्रिया या व्यवसायात आल्या. नंतर बनिये आले. बनियांचा पैसा आणि क्षत्रिय, ब्राह्मणांची सिनेमा उद्योगाची फॅक्टरी असे समीकरण बनत चालले तरी सुरूवातीला मुस्लीमांचा टक्का लक्षणीय असल्याने सुरूवातीला सहमतीने हा उद्योग चालत होता. तेव्हां राजकीय वातावरणही सलोख्याचेच असल्याने तसे सिनेमे बनले.
हिंदू मुसलमान बायनरी खेळून आपल्याकडे असलेले वर्चस्व झाकून इतर जाती समूहांचे लक्ष मुसलमान या शत्रूकडे वळवण्याचा डाव सुरू झाल्यापासून रहीमचाचाबद्दलची कोल्हेकुई सुरू झाली. हा विधवा आलाप आळवायला सुरूवात झाली कि ज्यांचा या व्यवसायात शून्य सहभाग आहे ते एकतर मान डोलावतात किंवा मुस्लिमांची बाजू मांडू लागतात. पण जे हा आलाप आळवतात त्यांच्या वर्चस्वाबद्दल बोलणे विसरून जातात.
त्यातून कुणी बोललेच तर मग तुम्ही बनवा ना तुमच्या पैशाने तुमच्या विषयांवर तुमचे कलाकार घेऊन सिनेमे असे आगंतुक सल्ले मिळतात. मग हे मुसलमानांबद्दलच्या कोल्हेकुईच्या वेळी स्वतःच स्वतःला का सांगितले जात नाही हा नेहमी पडणारा प्रश्न आहे.
एव्हढा दुटप्पी किंवा तिटप्पीपणा अंगात कसा येतो?
अशा आयडींना न भुंकणारे स्पार्कलसारख्या आयडीचे तृतीयपंथीय मालक का गप्प असतात हे पण कोडंच आहे. हे आयडी राजरोस गरळ ओकत फिरत राहतात यातच सगळं आलं.
Pages