उबर-रिक्षाचा ग्राहकांसाठी नवा जाचक नियम

Submitted by हेमंतकुमार on 3 April, 2025 - 01:54

मागच्या आठवड्यात मी चार दिवसांसाठी गावाला गेलो होतो. जाताना घरून पुणे स्थानकावर गेलो तेव्हा उबर रिक्षा केली होती. त्या ॲपमध्ये बुकिंगच्या वेळेला जी रक्कम दाखवली तीच प्रवास संपताना घेतली गेली. चार दिवसांनी मी मध्यरात्रीनंतर पुण्यात परतलो तेव्हा उबर रिक्षा बुक केली. ती बऱ्याच प्रतिक्षेनंतर मिळाली. परंतु रिक्षा चालकाने आधी फोनवरच मला सांगितले की रात्रीच्या मीटरप्रमाणे पैसे होतील, ॲपनुसार नाही.
त्यावेळेस माझी सहनशक्ती संपलेली होती आणि पुन्हा नव्याने अन्य बुकिंग करणे मला शक्य नव्हते म्हणून मी होकार दिला.

रिक्षात बसल्यानंतर मी चालकांना विचारले की हा नियम कधी झाला आहे ? त्यावर ते म्हणाले की तुम्हाला एसएमएस आला नाही का ? नुकताच हा आमचा करार झालेला आहे.
अर्थात मला काही कंपनीचा संदेश वगैरे आलेला नसल्याने मला त्यांचे म्हणणे काही पटत नव्हते. प्रवासात मी त्यांना माझी नाराजी बोलून दाखवली. अखेरीस माझे घर आले. ॲपनुसार 115 रुपये होते तर रात्रीच्या मीटर नुसार 163 झाले. संपूर्ण प्रवासात मी बडबड केलेली असल्यामुळे त्या चालकांनी स्वतःहूनच थोडी तडजोड करून माझ्याकडून दीडशे रुपये घेतले. सध्याच्या धोरणानुसार उबरचा वाटा गेल्यानंतर चालकांना बरीच कमी रक्कम मिळते असे त्यांनी मला नम्रपणे सांगितले.

आज वृत्तपत्रात संबंधित नियम १ एप्रिलपासून लागू झाल्याची बातमी आली आहे : https://www.freepressjournal.in/pune/ubers-new-auto-fare-rule-leaves-pun...

म्हणून पुण्यातील सर्वांच्या माहितीसाठी हा धागा काढलेला आहे. आपापला अनुभव नोंदवा. या संदर्भात ओलाची काय भूमिका आहे ते अद्याप कळलेले नाही. कुणाला काही अनुभव आला असल्यास लिहा.

वरील बातमीनुसार उबरने त्यांच्या aggregator धोरणापासून फारकत घेतलेली दिसते. आता ते रिक्षाचालकांकडून दिवसाला फक्त 19 रुपये अशी संगणकीय फी म्हणून घेणार आहेत. तसेच रिक्षाचालकाने ग्राहकाकडून घ्यायच्या रकमेबाबत त्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

या संदर्भात ग्राहक कायदा वगैरेंची कोणाला माहिती असल्यास जरूर लिहा.

* * *

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिवहन आयुक्तांशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे बुधवारपासून (१६/७) राज्यातील ऑनलाईन सेवा देणारे सर्व कॅब आणि रिक्षाचालक संपावर जाणार आहेत.

उबेर आटो मधून उतरल्यावर आजकाल रिक्षाचालकास ऑनलाइन/कॅश पेमेंट करणे हे नेहमीचे झाले असल्याने तशी सवयच लागली आहे. परवा कॅब केली. कॅब पोस्टपेड आहे लक्षात आले नाही. उतरल्यावर सवयीप्रमाणे त्याला गुगल पे केले. त्यानेही घेतले (त्याला बिचाऱ्याला काय कल्पना माझे उबर पोस्टपेड आहे). नंतर ऍप पाहतो तर उबर मला हे पेमेंट केल्याशिवाय पुढचे बुकिंग करू देत नव्हते. झाले. उबरलाही तितकीच रक्कम पे केली! नशीब त्यांच्या कस्टमर सर्विसला सांगितल्यावर (तेही त्यांच्या ऍप मध्ये बरीच धडपड करावी लागली. ऑनलाइन पेमेंटचे स्क्रीनशॉट वगैरे द्यावे लागले) त्यांनी "एकवेळ उपकार" म्हणत रिफन्ड केले. चूक माझीच होती म्हणायचं नी काय.

वरील संपात सर्व संघटना सहभागी नसल्याने फूट पडली आहे. त्यामुळे रस्त्यावर आलेले कॅबचालक मनमानी भाडे आकारणी करत आहेत.

पुण्यात काल ओळखीच्यांना रॅपिडो मात्र नेहमीच्या दरात मिळाली

uber, ola, rapido वापरताना १५ मिनिट आधीच बुक करावी, ड्राइवर एक्स्ट्रा चार्जेस मागत असेल तर स्पष्ट नाही सांगावे, ऍप जेवढे दाखवत आहे तेवढेच देणार असे स्पष्ट सांगावे. भलेही चार गाड्या सोडाव्या लागल्या तरीही चालेल. गाडी बुक केल्यावर ड्रायव्हरचा फोन येतो, कुठे जायचे आहे चार्जेस किती आहे वगैरे तो विचारतो, ड्रायव्हरच्या ह्या मनुपुलेशन ला बळी पडू नये, जे मूर्ख लोक ड्रायव्हरचा फोन उचलून ह्या गोष्टी करतात त्यांनाच ड्रायव्हर त्रास देतात. एक तर ड्रायव्हरला तुम्ही कुठे आहात हे दिसत असते नि तुम्हाला कुठे जायचे आहे हे त्याला गाडीत बसण्याआधीच सांगण्याची गरजच नाही. आपण मुर्खासारखी ही सगळी माहिती ड्रायव्हरला देतो, तो अशिक्षित माणूस तुमच्या सारख्या सुशिक्षित माणसाला maupulet करतो. एकाच वेळी ओला उबेर रॅपिडो वर राईड लावाव्यात जो आधी येईल त्याच्या गाडीत बसून ओटीपी सांगून निघावे. पण कुणाचाही फोन आजिबात उचलायचा नाही. ड्रायव्हर हलत नसेल तसे ऍप मध्ये दिसते त्याची गाडी हलत आहे की नाही तर आपण स्वतःहून फोन लावायचा नाही, ही त्यांची टेक्निक असते जास्त पैसे मागायची, नाहीतर ते आपल्यालाच राइड दिलीत करायला सांगतात किंवा आपण डिलीट करू ह्याची वाट पाहतात, राईड आजिबात डिलीटकरायची नाही त्या ऐवजी दुसऱ्या आप वरून सेम ठिकाणी जाण्यासाठी राईड बुक करावी. ड्रॉव्हरला येऊ द्यावे, ऍप दाखवते आहे एवढेच पैसे देणार स्पष्ट सांगावे. पैसे शक्यतो कॅशच द्यावेत, पोस्टपेड, ओला वॉलेट वगैरे वापरू नये एवीतेवी आपले पैसे जाणारच असतात.
लक्षात ठेवा जो ड्रायव्हरचा फोन उचलतो तो फसतो.
मी कधीही एक्स्ट्रा चार्जेस देत नाही, जेवढे ऍप दाखवत आहे तेवढेच देतो, जर ड्रायव्हर आरटीओ नियम वगैरे दाखवायला लागला तर त्याला स्पष्ट सांगावे हे तुक्ष्य कंपनीला समजाव आणी त्यांना ऍप मध्ये हे चार्जेस लावयला लाव. आणी हो उध्दट, जास्त पैसे मागणाइय ड्रायव्हर चे रिव्हीव खराब करावे नी राईड झाल्यावर कंपनीला तक्रार करावी, रिफंडही मागावा. ड्रायव्हरला ऍपच्या बाहेर दाखवत असलेल्या रकमेच्या वर एक रुपयाही जास्त देऊ नये आणी त्याला हे त्याच्या गाडीत बसण्याआधी स्पष्ट सांगावे.

परवा काचीगुडा रेल्वे स्टेशनवरून एअरपोर्टला जाताना ओला कॅब बुक केली. ड्रायव्हर चा फोन आला. त्याने भाडे किती होत आहे ते विचारले. आम्ही सांगितले. गाडी आली. गाडीत बॅगा वगैरे ठेवून ओटीपी सांगायची वेळ आल्यावर ड्रायव्हर म्हणाला,"राईड कॅन्सल करा. मी तुम्हांला तसंच (म्हणजे ओला ऍप न वापरता) नेतो.मला तुम्ही डायरेक्ट पैसे द्या." त्याला पैसे किती विचारले तर ६०० म्हणाला. ओलावर ५३० होते. मग नवरा म्हणाला,"तुम्ही जास्त मागताय पैसे तर मी का कॅन्सल करू?" मग जास्त काही न बोलता तो आम्हांला एअरपोर्टला घेऊन गेला . त्याला ५३०/-च दिले.
ड्रायव्हर लोकांना किती बिल होणार हे आधीच माहिती नसते का?

ग्राहकांना गंडवण्याचे प्रकार बऱ्यापैकी दिसत आहेत. ग्राहकांनी ठाम राहणे हाच त्यावरचा उपाय आहे.. आपल्या कामाच्या तातडीनुसार आपल्याला निर्णय घ्यावा लागेल.

खरं आहे कुमार१, रात्री अकरा वाजता परक्या गावात मी एकटी असताना एरवी ड्रायव्हर असं म्हणाला असता तर मी गप्प ऐकलं असतं. नवऱ्याने जरा ठामपणे सांगितले म्हणून तो गप्प आला असावा.

काल इथे उबर बुक करताना अव्वाच्या सव्वा भाडे दिसले. धोरणांमध्ये काहीतरी बदल झाला आहे, असे कानावर होते आणि दुसरा सोयीचा पर्याय नव्हता म्हणून उबर टॅक्सी बुक केली. लगेचच उबर चालकाचा फोन आला - "तुमची बुकींग ओरिजिनलच आहे ना?" मी उडालोच. म्हटले यातही आता फेक बुकींग वगैरे काही प्रकरण चालू झालेय की काय. मी त्याला 'म्हणजे काय?' असे विचारल्यावर म्हणाला की 'अहो, उबरचा बंद चालू आहे. आणि काही ठिकाणी खोटे बुकींग करतात आणि तिथे पोचल्यावर ड्रायवरला खाली ओढून मारहाण करतात. माझ्या मित्राला काल असे मारलेय. म्हणून विचारले. दोन दिवसांपासून गाडी बंद ठेवली. धंदा झाला नाही. किती दिवस बंद ठेवणार? शेवटी तुमचं बुकींग घाबरत घाबरत स्वीकारलंय.'

ड्रायव्हर लोक खोटे बोलतात, पहिली गोष्ट त्यांचे फोनच उचललायचे नाहीत. एयरपोर्ट ला असल तर एयरपोर्ट टैक्सी वापरावी १००-२०० जास्त गेले तरी चालेल. ओला उबेर ची राईड तर मुळीच कॅन्सल करू नये, सामान ठेऊन झाल्यावर कॅन्सल करायला लावतात ह्यामागे ट्रिक आहे, आपण परत सामान उठाठेव करणार नाही असा त्यांचा होरा असतो, शांतपणे गाडीतून उतरून सामान उतरवून दे म्हणून सांगावे.

ड्रायव्हर लोक खोटे बोलतात, पहिली गोष्ट त्यांचे फोनच उचललायचे नाहीत. एयरपोर्ट ला असल तर एयरपोर्ट टैक्सी वापरावी १००-२०० जास्त गेले तरी चालेल. ओला उबेर ची राईड तर मुळीच कॅन्सल करून प्रायव्हेट करू नये. सामान ठेऊन झाल्यावर कॅन्सल करायला लावतात ह्यामागे ट्रिक आहे, आपण परत सामान उठाठेव करणार नाही असा त्यांचा होरा असतो, शांतपणे गाडीतून उतरून सामान उतरवून दे म्हणून सांगावे.

उबर कंपनीने उच्च न्यायालयात नाव घेतल्याने चालकांनी उबरवर बहिष्कार टाकून त्यांचे ॲप काढून टाकण्याचे ठरवले आहे

https://indianexpress.com/article/cities/pune/cab-drivers-unions-call-st...

Rapidoने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्याबद्दल त्यांना 10 लाख रुपयांचा दंड

'गॅरंटीड ऑटो' आणि '५ मिनिटांत ऑटो अथवा ५० रुपये मिळवा'
(AUTO IN 5 MIN OR GET ₹ 50) या दोन जाहिरातींची स्वेच्छादखल घेत सीसीपीएकडून ही कारवाई

https://pudhari-news.cdn.ampproject.org/v/s/pudhari.news/amp/story/featu...

सहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी ही सरकारी सेवा आजपासून दिल्लीत सुरू होत आहे. लवकरच ती भारतातील सर्व शहरांमध्ये चालू होईल
https://www.loksatta.com/desh-videsh/bharat-taxi-app-to-be-launched-toda...

सध्या पुण्यात ओला रिक्षा आणि सध्या रिक्षा (ओला कचरा सुका कचरा म्हटल्यासारखे वाटते) वापरून पहिल्या. बरेचदा ओला असेल तर जितके भाडे ठरलेले आहे तितके कॅश देत होतो. एक रिक्षावाला भेटला की कमी आहे साहेब तुम्ही मिटर ने द्या. मी म्हणालो ठीक आहे. ओला वर मला १७८ दिसले होते. ₹२ न परत देता त्याला १८० मिळाले असते. पण मीटर ने १७५ झाले. मी ५ सुट्टे दिले वरचे. असे करून त्याने स्वतःचे ₹५ चे नुकसान करून घेतले. काय एक एक अनुभव येतात Proud

*ओला कचरा सुका कचरा >>> भारी !
. . .
या लोकांपेक्षा भारत टॅक्सीचे दर 30% ने कमी असतील असा दावा केलेला आहे

काही दिवसांपूर्वी मी सिंहगड रोड पुणे इथून खराडी इथे जाण्यासाठी कॅब बुक केली . ऍपवर मला ३ ५ ३ रुपये दिसत होते. ड्रायव्हरचा फोन आला , मला म्हटला ४ २ १ होतील , मी म्हटलं असं कसं ? तर म्हटला जी आर निघाला आहे . म्हटलं तुम्ही इथे या , मला जी आर दाखवा , मी ४ २ १ काय , ५ ० ० देईन . फक्त जे आहे ते सगळं सरकारमान्य हवं . त्यावर तो म्हटला राईड कॅन्सल करा , मी म्हटलं मी करणार नाही तुम्ही करा . मग त्यानेच केली . नंतर मी दुसरी बुक केली , त्याने मला तितक्याच पैश्यात (३ ५ ३ ) मध्ये खराडीपर्यंत नेले . माझ्याशी हुज्जत घालणाऱ्याला मी अजिबात जास्त पैसे देत नाही , पण याला मी पाच दहा रुपये चढ दिले .

आता दुसरा अनुभव सेम खराडीतून मला घरी परतायचे होते , रात्रीचे साडेअकरा वाजले होते . मी गाडीत बसल्यावर ड्राइव्हर म्हणतो मॅडम आता पर किमी २ १ रुपयांनी गाडी बुक होते माहिताय ना ? मी काहीच बोलले नाही . ऍप वर ३७ ९ दिसत होते . मी म्हटलं चला बघू . घरापर्यंत पोहोचल्यावर मी त्याला म्हटलं गाडी आता पर किमी बुक होईल असं पत्रक दाखवा . मग त्याने मला एक झेरॉक्स दाखवली ती अत्यंत बाळबोध होती . मी म्हटलं यावर सरकारी मोहोर नाही . आणि जर हे सरकारमान्य आहे तर उबर ने त्यांच्या पेमेंट structure मध्ये बदल करून ऍप वर तसं दाखवायला हवं ना ? ड्राइव्हर म्हटला उबर ला हे मान्य नाही . मग मी म्हटलं तुम्ही उबर मधून गाडी काढून का नाही टाकत ?
तर म्हणतो कसा , आम्हाला परवडत नाही , धंदा कसा मिळणार ?

मी इतकी संतापले , म्हटलं तुम्हाला उबर कडून धंदा हवा आणि मनाप्रमाणे पैसे हवेत म्हणून तुम्ही ग्राहकांना वेठीस धरणार ? हे चालणार नाही . मी जास्तीचे पैसे देणार नाही . तो गप्प बसला आणि मला क्यू आर कोड देऊ केला . मला फार वाईट वाटलं , मग मी त्याला राउंड फिगर ४ ० ० दिले . इतक्या रात्री मज एकटीस त्याने सुखरूप आणून सोडले .

त्यांच्याही काही अडचणी असतील मी नाही म्हणत नाही . पण अशी लबाडी योग्य नव्हे .

अजून एकदा गम्मत झाली तेव्हा मी उबर ऑटो बुक केली मला एकूण ६ ५ रुपये दिसत होतं बिल . मला चालणार होतं . रिक्षात बसले , ओटीपी दिला . तर ऑटोवाला म्हटला मी मीटर ने जाणार . ... मी म्हटलं बरं . डेस्टिनेशन ला पोहोचलो . तर मीटर वर ४ ५ रुपये झाले होते . म्हटलं याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण . भोग आपल्या कर्माची फळे .

भारत टॅक्सी ही सरकारी सेवा आजपासून दिल्लीत सुरू होत आहे. >> सरकार टॅक्सी चालवण्याच्या धंद्यात का उतरत आहे?
कालांतराने याचं खाजगीकरण करणार असतील तर खाजगी संस्थापनाने 'भारत' टॅक्सी हे नाव वापरणे ही योग्य नाही. का असे गोंधळ करतात?

भारत टॅक्सी सरकारी नाही. हे एक सरकार-समर्थित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे जे सहकारी मॉडेल म्हणून विकसित केले गेले आहे, जिथे ड्रायव्हर्स पारंपारिक खाजगी कंपन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी भागधारक आणि सह-मालक असतात. ह्याला promote करण्यांमध्ये Amul, Nabard यांसारख्या मोठ्या सहकारी संस्था आहेत. एकंदरीत structure मलातरी गोंधळाचे वाटत आहे.

खाजगी संस्थापनाने 'भारत' टॅक्सी हे नाव वापरणे ही योग्य नाही >>> असे का पण? सरकारचा संबंध नसलेल्या गोष्टींचे नाव भारत असू शकते की. 'भारत' नावाचे एक थिएटर होते पुण्याजवळ कोठेतरी Happy

मला पडलेला प्रश्न वेगळा आहे. हे लोक उबर, ओला कंपन्यांशी स्पर्धा कशी करणार? रेट कमी ठेवायला सबसिडी तरी हवी किंवा तंत्रज्ञानाने कमी केलेली किंमत - इथे ही सर्विस देण्याकरता येणारा खर्च. इथे सरकार सबसिडी देणार असावे. नाहीतर किंमत कमी कशी ठेवणार. म्हणजे मनपाची बससेवा वेगळ्या रूपात असल्यासारखे वाटते.

त्यात या गाड्या चालवणारे डेमोग्राफिकही तेच असेल - समाजातील त्याच वर्गातून आलेले. त्यांच्या अडचणी, त्यांचे जनरल वागणे, सवयी, ते कधी लोकांना गंडवतात, तर कधी ते स्वतः परिस्थितीपुढे हतबल आहेत - सगळे बहुधा सेम आहे. मग हे किती दिवस वेगळे राहील?

मुळात सरकारला "उबर सारख्या कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्या"ची गरज काय आहे? कॅब व्यवसायाचे "राष्ट्रीयीकरण"? Happy

एकंदरीत structure मलातरी गोंधळाचे वाटत आहे.…

+ १

Unclear financial structure, त्यात आपली आरंभशूरता

हे बाळ रांगेल असे वाटत नाही, चालले-धावले तर आनंदच आहे.

सरकारचा संबंध नसलेल्या गोष्टींचे नाव भारत असू शकते की. >> ह्म्म.. असायला नको असं वाटतं. कारण नावात 'भारत' असेल तर सरकारी अ‍ॅफिलिएशन, भरवसा, एक सचोटी/ ठोस प्रतिमा असं काही पाठबळ उगाचच येतं.
कॉपीराईट मध्ये असा काही नियम ही असावा असं वाटतं. नॉट सजेस्टिव्ह ऑफ गव्हर्नंमेंट पार्टिसिपेशन/ कंट्रोल अशी गाईडलाईन असते. पुसट वाचलेलं आठवतं पूर्वी पण शोधलं पाहिजे.

सरकारचा संबंध नसलेल्या गोष्टींचे नाव भारत असू शकते की>> बरोबर आहे.

स्पेसिफिकली government असे म्हटले नाही तो पर्यंत संबंध नसतो असे मला वाटते. सरकारमान्य असे काही दुकानांवर असते ते सुद्धा खाजगीच असतात फक्त license असते त्यांच्याकडे.

* भारत आणि तत्सम नावे वापरायला सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज आहे असे इथे म्हटले आहे :
https://www.barcouncilofindia.org/info/circular-p-7mkqjn

"1. Framework Governing the Use of the Terms “India,” “Indian,” “National,” “Bharat,” “Bharatiya,” and “Rashtriya”

The Emblems and Names (Prevention of Improper Use) Act, 1950, prohibits the use of certain names and terms, including those that suggest government or national patronage, without explicit permission from the Central Government".

सरकारने धंद्यात पडू नये. जर एखाद्या क्षेत्रात मक्तेदारी किंवा काही कंपन्यांची अरेरावी होत आहे असे वाटले तर कायदे आणून, स्पर्धेला प्रोत्साहन देऊन बदल करण्याचा प्रयत्न करावा.

उबर ओला या कंपन्या वाईट नाहीत , त्यात काम करणारे ड्रायव्हर्स खोडसाळ आहेत . त्यांना बिझनेस तर हवाच पण मनाजोगते पैसे हवेत . त्यामुळे भारत सरकारने कितीही स्पर्धा केली तरी लोकांची वृत्ती बदलल्याशिवाय काही फायदा नाही .

* लोकांची वृत्ती बदलल्याशिवाय काही फायदा नाही . +१२३४५६७
अ ग दी.

ग्राहकांना वेठीस धरले जाते ते हि वाईट आहे , त्यासाठी ग्राहकांनी जास्त सजग होऊन यांची अरेरावी आणि मनमानी कारभार चालू नये म्हणून एकजूट केली पाहिजे .

Pages