मागच्या आठवड्यात मी चार दिवसांसाठी गावाला गेलो होतो. जाताना घरून पुणे स्थानकावर गेलो तेव्हा उबर रिक्षा केली होती. त्या ॲपमध्ये बुकिंगच्या वेळेला जी रक्कम दाखवली तीच प्रवास संपताना घेतली गेली. चार दिवसांनी मी मध्यरात्रीनंतर पुण्यात परतलो तेव्हा उबर रिक्षा बुक केली. ती बऱ्याच प्रतिक्षेनंतर मिळाली. परंतु रिक्षा चालकाने आधी फोनवरच मला सांगितले की रात्रीच्या मीटरप्रमाणे पैसे होतील, ॲपनुसार नाही.
त्यावेळेस माझी सहनशक्ती संपलेली होती आणि पुन्हा नव्याने अन्य बुकिंग करणे मला शक्य नव्हते म्हणून मी होकार दिला.
रिक्षात बसल्यानंतर मी चालकांना विचारले की हा नियम कधी झाला आहे ? त्यावर ते म्हणाले की तुम्हाला एसएमएस आला नाही का ? नुकताच हा आमचा करार झालेला आहे.
अर्थात मला काही कंपनीचा संदेश वगैरे आलेला नसल्याने मला त्यांचे म्हणणे काही पटत नव्हते. प्रवासात मी त्यांना माझी नाराजी बोलून दाखवली. अखेरीस माझे घर आले. ॲपनुसार 115 रुपये होते तर रात्रीच्या मीटर नुसार 163 झाले. संपूर्ण प्रवासात मी बडबड केलेली असल्यामुळे त्या चालकांनी स्वतःहूनच थोडी तडजोड करून माझ्याकडून दीडशे रुपये घेतले. सध्याच्या धोरणानुसार उबरचा वाटा गेल्यानंतर चालकांना बरीच कमी रक्कम मिळते असे त्यांनी मला नम्रपणे सांगितले.
आज वृत्तपत्रात संबंधित नियम १ एप्रिलपासून लागू झाल्याची बातमी आली आहे : https://www.freepressjournal.in/pune/ubers-new-auto-fare-rule-leaves-pun...
म्हणून पुण्यातील सर्वांच्या माहितीसाठी हा धागा काढलेला आहे. आपापला अनुभव नोंदवा. या संदर्भात ओलाची काय भूमिका आहे ते अद्याप कळलेले नाही. कुणाला काही अनुभव आला असल्यास लिहा.
वरील बातमीनुसार उबरने त्यांच्या aggregator धोरणापासून फारकत घेतलेली दिसते. आता ते रिक्षाचालकांकडून दिवसाला फक्त 19 रुपये अशी संगणकीय फी म्हणून घेणार आहेत. तसेच रिक्षाचालकाने ग्राहकाकडून घ्यायच्या रकमेबाबत त्यांनी कानावर हात ठेवले आहेत.
या संदर्भात ग्राहक कायदा वगैरेंची कोणाला माहिती असल्यास जरूर लिहा.
* * *
*मीटरप्रमाणे मिळणारी किंमत
*मीटरप्रमाणे मिळणारी किंमत "रास्त" धरली तर अॅप मधून मिळणारे कमी भाडे रिक्षावाला का स्वीकारेल? *
>>>> इथे एक मुद्दा मांडतोय; कदाचित तो चुकीचा असेल.
जेव्हा ॲप वगैरे प्रकार नव्हते तेव्हा असे होते :
रिक्षा थांब्यावर रिक्षा लावून (लांबच्या भाड्याच्या !) गिऱ्हाईकाची वाट पाहत बसणे किंवा रस्त्यावर सुद्धा एखादे ग्राहक सोडल्यानंतर पुढचे गिऱ्हाईक लगेच मिळेल याची पण खात्री नसते. तेव्हा काही अंतर रिक्षाचालकाला पदरमोड करूनच पुढे जावे लागते.
आता ॲपच्या माध्यमातून प्रवाशाला कुठूनही कुठे सोडल्यानंतर (अगदी शहराबाहेरची ठिकाणे वगळता) काही मिनिटात ॲपच्या माध्यमातून पुढच्या ग्राहकाची शक्यता बरीच राहते. निदान दिवसा तरी ग्राहकांची वाट बघत रिकामे बसण्याची वेळ कमी येते.
त्यामुळे समजा, प्रति ग्राहक मीटरपेक्षा रक्कम कमी मिळाली असेल तरीही दिवसभरातल्या एकूण ग्राहक फेऱ्या जर सव्वा किंवा दीडपट वाढणार असतील तर कदाचित दैनंदिन उत्पन्न मीटरनुसार इतके किंवा कदाचित त्याहून जास्त सुद्धा होऊ शकेल.
यात माझा तांत्रिक अभ्यास नाही पण एक शक्यता मांडतोय.
डॉक्टर साहेब,
डॉक्टर साहेब,
मी एक तिसराच मुद्दा काढतोय त्याबद्दल दिलगिरी! विषय रिक्षांचा आहे म्हणून हे बरेच दिवसांपासून केलेले निरीक्षण नोंदवत आहे.
पुण्यात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक असलेले रिक्षावाले आहेत. त्यासंदर्भात काहींशी बोलणे झाले त्यातून कळले ते असे:
घरे लहान असतात. सुनांना सासरे दिवसभर घरात नको असतात. त्या त्यांना घराबाहेर वेळ काढायला भाग पाडतात. मग हे लोक निवृत्तीनंतर एखादी रिक्षा घेतात आणि दिवसभर फिरत राहतात. गिऱ्हाईक मिळाले तर उत्तमच! ते रिक्षेवाले गरीब वगैरे नसतात, त्यामुळे रिक्षेवर फारसे अवलंबून नसतात. ते रस्त्याच्या मधून फार कमी वेगाने रिक्षा चालवतात, पटकन साईड देत नाहीत. वयाकडे बघून त्यांना कोणी काही बोलत नाही. मात्र वाहतुकीला अडथळा ठरतात ते! शिवाय कोणतेही गिऱ्हाईक स्वीकारतील असेही नसते.
हा एक निराळाच प्रॉब्लेम आहे
अच्छा !
अच्छा !
म्हणजे हे नाईलाजाने झालेले हौशी रिक्षाचालक
असो
(निवृत्तीनंतर घरी जास्त वेळ काढल्यास भांड्याला भांडे लागून कौटुंबिक समस्या वाढतात असा सर्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे तब्येत चांगली असलेले असे काही ज्येष्ठ नागरिक हौस म्हणून बरेच काही उद्योग करताना दिसतात. हा एक स्वतंत्र विषय असल्याने इथे अवांतर लिहीत नाही)
त्यामुळे समजा, प्रति ग्राहक
त्यामुळे समजा, प्रति ग्राहक मीटरपेक्षा रक्कम कमी मिळाली असेल तरीही दिवसभरातल्या एकूण ग्राहक फेऱ्या जर सव्वा किंवा दीडपट वाढणार असतील तर कदाचित दैनंदिन उत्पन्न मीटरनुसार इतके किंवा कदाचित त्याहून जास्त सुद्धा होऊ शकेल. >>> हो हे बरोबर आहे. त्या शक्यतेमुळे रिक्षावाले तयार होत असावेत आत्तापर्यंत. पण कदाचित वाटला तितका "डाउनटाइम" कमी होत नसेल तर मग मीटरप्रमाणेच मागू असे झाले असावे.
असे रिटर्न भाडे घेऊ देत नाहीत >>> स्टॅण्डवर रिक्षा उभ्या असल्या तर अगदी समोर घेऊ देत नाहीत. पण अगदी समोर नसेल तर त्यांनाही माहीत नसते. स्टॅण्डवरचे येत नसतील तर समोरही पकडली तरी फरक पडत नाही.
आजचा उबरचा अनुभव :
आजचा उबरचा अनुभव :
शहरातल्या मध्यवर्ती भागातून रिक्षा बुक केली. चालक पोचल्याचा संदेश आल्यावर फोन करू लागलो. अनेकदा करूनही त्यांनी उचलला नाही. मग इकडे तिकडे बघायला लागलो तेव्हा समोर थांबलेल्या रिक्षातून त्यांनी हात केला. या चालकांनी आणलेली रिक्षा माझ्या ॲपवर दाखवलेल्या क्रमांकापेक्षा वेगळी होती. फोन का उचलला नाही असे विचारता ते म्हणाले, मला एकही रिंग आली नाही.
आपण करतो ते फोन आधी कंपनीला जाऊन मग त्यांना येतात. यात काय गडबड होते कुणास ठाऊक.
मी रिक्षात बसल्यानंतर त्यांनी मीटर काही टाकला नाही. मी शांत बसलो. माझे ठिकाण आल्यावर त्यांनी शिस्तीत app प्रमाणे पैसे घेतले. एकूण ते बोलायला बरे असल्याने त्यांना सध्याच्या नव्या नियमाबद्दल विचारले. यावर ते म्हणाले की सगळा सावळा गोंधळ आहे. कोणी मीटरप्रमाणे तर कोणी appप्रमाणे घेतात, असे काहीही चालले आहे.
या रिक्षात तरी नियमाचा तिन्ही भाषांमधला माहितीफलक काही लावलेला नव्हता.
आजचा अनुभव :
आजचा रॅपिडो ऑटो अनुभव :
दुपारी एका कामाच्या ठिकाणी जाताना रॅपिडो ऑटो आल्या आल्या " रॅपिडो वर काहीही दाखवत असलं तरी मीटरवर पैसे घेणार" असं जाहीर केलं. मला घाई असल्याने मान्य करावं लागलं. रिक्षात बसल्यावर त्याला "हा नियम कधी आला" असं विचारल्यावर ओला उबर ला ऑलरेडी आलेला आहे. रॅपिडो ला आम्हाला आलाय.. तुम्हाला पण येईलच इतक्यात / काही दिवसात / काही आठवड्यात" अशी काहीतरी फालतू उत्तरे उद्दाम टोन मध्ये द्यायला लागला. मीटरवर पैसे देईन हे असेही रिक्षात बसल्या बसल्याच मीच कबूल केलेले असल्याने मी विषय पुढे वाढवला नाही. App वर १५३ रुपये झालेले असताना *** माणसाने २००/- रुपये घेतले.
घरी येताना मी मीटरवर पैसे द्यावे लागतील या मानसिक तयारीने रॅपिडो ऑटो बुक केली. आधी एका शांतीदूत माणसाकडे गेली. तो माणूस map वर अजिबात हलताना दिसेना. त्याला येणार ना म्हणून फोन केल्यावर त्याने "मीटरवर यायला तयार असाल तरच मी येतो" असे सांगितले. माझी मानसिक तयारी झालेली असल्यामुळे मी अर्थातच हो म्हणाले. तर काय झाले कळलेच नाही. App वरच अचानक माझ्या ड्रायव्हरचे नाव आणि रिक्षा नंबर आणि सगळेच बदलले (बहुतेक अगदी जवळ असलेल्या रिक्षावाल्याने क्लेम केली असेल राईड.. यांचे काम कसे चालते कल्पना नाही). आणि तो ड्रायव्हर दारात उभा होता. मी निमूट रिक्षात बसले. त्या काकांनी एकही शब्द न बोलता, मीटर न टाकता नियोजित map प्रमाणे रिक्षा आणली. उतरल्यावर app मध्ये झाल्याप्रमाणे १५३ रुपये मागितले. मी त्यांना पैसे देऊन थँक्यू म्हणून निघून आले.
रिक्षावाले आपल्याच पायावर दगड
रिक्षावाले आपल्याच पायावर दगड मारून घेतायत का? रिक्षा बुक करणाऱ्याच प्रमाण नक्कीच कमी होईल असा वागणुकीने.
आताच या नव्या गोंधळाचा अनुभव
आताच या नव्या गोंधळाचा अनुभव आला. App वर १२० होत होते. ऑटोवाल्याने बसताना च मीटर प्रमाणे घेणार असे सांगितले. या धाग्यामुळे हा नवीन नियम माहीत झाला होता. आणि मला पण घाई होती त्यामुळे हो म्हटले. मीटर ने १७५ झाले. दिले मग..
नव्या नियमानुसार त्यांनी पैसे
नव्या नियमानुसार त्यांनी पैसे घ्यायला हरकत नाही फक्त सर्व चालकांनी नियम लागू केल्यास गोंधळ संपेल.
आता या ॲपवाल्या यंत्रणांकडून अपेक्षा :
१. लोकेशन गंडणे बऱ्याचदा होते. कित्येक वेळा आपण अवजड सामानासह प्रवासाला किंवा महत्त्वाच्या कामाला निघालेलो असतो आणि तेव्हा आपण उभे असलेल्या ठिकाणी ते वाहन बरोबर यावे अशी आपली अपेक्षा असते. परंतु लोकेशन गंडल्यामुळे कित्येकदा ते वाहनचालक तुम्ही रस्त्याच्या त्या बाजूला या वगैरे वगैरे सांगून ग्राहकाची गैरसोय करतात. असे होऊ नये यासाठी संबंधितांनी लक्ष घालावे.
२. चालकानेच भाडे नाकारणे/ त्याच्या बाजूने प्रवास रद्द करणे यावर कारवाई झाली पाहिजे. काही वेळेस चालकानेच प्रवास रद्द करूनही ग्राहकाला पुढील भाड्यात भुर्दंड पडतो. तसे होता कामा नये.
३. ॲपमध्ये दाखवलेलीच रिक्षा आणि तोच चालक ग्राहकाला मिळाला पाहिजे. यात अदलाबदल होणे सुरक्षेच्या दृष्टीने चांगले नाही. तसेच वाहन शोधण्यासाठी ग्राहकाने केलेला फोन मध्यस्थाकरवी न जाता थेट चालकाला लागल्यास उत्तम होईल ( तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास).
नव्या नियमानुसार त्यांनी पैसे
नव्या नियमानुसार त्यांनी पैसे घ्यायला हरकत नाही फक्त सर्व चालकांनी नियम लागू केल्यास गोंधळ संपेल.>>> यात आणखी ॲड होऊ शकते....या रिक्षांच्या मिटर्स ची ॲप कंपनीकडून नियमीत तपासणी व्हायला हवी, मिटर योग्य वेगात चालतेय याची खात्री त्यांनी ग्राहकास द्यायला हवी, न पेक्षा ॲप मधेच एक मिटर रिडींग widget अंतर्भूत करायला हवे. ( हे फार कठीण काम आहे असं मला वाटत नाही)...जेणेकरुन ग्राहकाला योग्य मिटर रीडींगचेच पैसे मोजावे लागतील. याचा API सरकारी संकेतस्थळावरुन उपलब्ध झाला तर अधिक उत्तम.
अहो अॅप मध्ये रिक्षा
अहो अॅप मध्ये रिक्षा रस्त्याच्या या बाजुला आहे का त्या बाजुला हा गोंधळ होतो. नकाशात चुकीच्या ठिकाणी जातो आणि इतर किती गडबडी होतात, आणि त्याच अॅप मध्ये जीपीएस कोऑर्डिनेट्स वरुन दर ठरवा हे कोण मान्य करेल?
आणि एपीआय सरकार कशाला उल्लब्ध करेल? सरकारने मीटर रेग्युलेट केले. काय झालं? बाकी प्रत्येक शहरात मिटर आणि भाड्याचा रेट वेगवेगळा असतो. आता त्या एपीआयने अंतर सांगा म्हणाल आणि रेट टेबल वरुन गुणाकार ते अॅप करेल. ते रेट टेबल दर दोन वर्षांनी बदलतात अशी लाखभर शहरे भारतात आहेत. हा उपद्व्याप सरकार करेल आणि त्यात सावळागोंधळ करणार नाही ही अपेक्षा ठेवायची.
मिटर प्रमाणे पैसे देणे .... हे इतकं साधं तत्त्व आपण पाळू शकतो का? त्यात इतक्या हजार भानगडी करुन ठेवल्या आहेत. आणखी क्लिष्ट काही करुन भूमितीय श्रेणीने गोंधण वाढवण्यात काय हशील?
>> आधी एका शांतीदूत माणसाकडे गेली>> म्हणजे मुसलमान ना? मायबोलीवर तरी अशी पद्धत, की कोणाचा कारण नसताना धर्म जात लिहून पोस्ट करायची, आणू नये असं वाटतं.
हो. फक्त दोन्ही वेळेला मीटरवर
हो. फक्त दोन्ही वेळेला मीटरवर पैसे दिले तरच आम्ही येऊ असं म्हणणाऱ्या दोघांमध्ये योगायोगाने हे साम्य होतं म्हणून तसं लिहिलं गेलं. पण तो योगायोग असावा असं म्हणून ते वाक्य मी मागे घेते. आता पोस्ट एडिट करायची वेळ गेली.
त्याच अॅप मध्ये जीपीएस
त्याच अॅप मध्ये जीपीएस कोऑर्डिनेट्स वरुन दर ठरवा हे कोण मान्य करेल?>>>> मी दर ठरविण्यासाठी नव्हे तर फक्त एक रिअल टाईम व्हेरीफिकेशन टूल म्हणून कस्टमर एम्पॉवरमेंट साठी पर्याय सुचवला होता. जे रिक्षाने प्रवास सुरू केल्यावर रीडींग्ज दाखवायला सुरु होईल प्रवास थांबल्यावर ग्राहक आपले रिडींग रिक्षाच्या मिटर रिडींग सोबत पडताळून घेऊ शकेल असं काहीसं म्हणण होतं.
ते रेट टेबल दर दोन वर्षांनी बदलतात अशी लाखभर शहरे भारतात आहेत. हा उपद्व्याप सरकार करेल आणि त्यात सावळागोंधळ करणार नाही ही अपेक्षा ठेवायची.>>>> मी निदान शहरांपुरते बोललेलो, त्यांची संख्याही काही लाखभर नसून ४-५ हजारांच्या घरात जाते...पण तरीही सरकारकडून अंमलबजावणी होणे कठीण ( आपल्या इथल्या सरकारांची कार्यतत्परता/ इच्छाशक्ती पहाता) हे मान्य.
मिटर प्रमाणे पैसे देणे .... हे इतकं साधं तत्त्व आपण पाळू शकतो का?>> नक्कीच ..पण त्याकरिताच मिटर untampered आहे याची खात्री ग्राहकालाही मिळणे हा त्याचा अधिकार आहे ज्याला सध्याच्या व्यवस्थेत सर्रास हरताळ फासला जातो, आणि त्याचे कुणाला ही सोयरसुतक नाही... म्हणूनच मिटर रिडींग ॲप च्या आधी, आणखी एक पर्याय सुचवलेला की या सर्व ॲप्सनी निदान त्यांच्या ॲपवर नोंदणीकृत असलेल्या रिक्षांचे मिटर हे योग्य वेगाने चालत असून अवास्तव भाडे आकारत नाही आहेत याची खात्री वेळोवेळी ग्राहकाला द्यावी ही मागणी देखील अवास्तव आहे का?
ॲपवरील मिटरमुळे डोकी फुटण्याचा संभव जास्त आहे... जर यातलं काहीच नाही झालं तर जास्तीत जास्त काय होईलं? वर्षभरात ज्या लाखो नविन गाड्या रस्त्यावर उतरतात त्यात आणखी काही लाखांची भर पडेल इतकचं....रिक्षावाले ही भोगतील, आणि प्रवास करणारे देखील..
त्याकरिताच मिटर untampered
त्याकरिताच मिटर untampered आहे याची खात्रीही ग्राहकाला मिळणे हा त्याचा अधिकार आहे ज्याला सध्याच्या व्यवस्थेत सर्रास हरताळ फासला जातो, आणि त्याचे कुणाला ही सोयरसुतक नाही>>>> १००+++
मी दर ठरविण्यासाठी नव्हे तर
मी दर ठरविण्यासाठी नव्हे तर फक्त एक रिअल टाईम व्हेरीफिकेशन टूल म्हणून कस्टमर एम्पॉवरमेंट साठी पर्याय सुचवला होता >>> हे पटते. जरी हजारो शहरे असली, तरी जेथे सरकारने मीटरचे कॅलिब्रेशन आखून दिलेले आहे तेथे ती माहिती कोणत्यातरी सरकारी सिस्टीम मधे नक्की आहे. त्यातून ते अॅप वाल्यांना मिळेल अशी सोय सरकारने करावी ही अपेक्षा चुकीची नाही. विशेषतः आता शहरातील विविध व्यवस्था "स्मार्ट" करण्याच्या घोषणा पाहता.
अॅप मधून बॉलपार्क एस्टिमेट दिसले व प्रत्यक्ष मीटरवर दिसणारे भाडे त्याच्या १०% इकडेतिकडे होऊ शकते इतके कळाले तरी बास आहे. नेहमी रिक्षाने जाणार्याला फास्ट मीटर सहसा लक्षात येतो. अशा वेळेस रिक्षावाल्याशी वाद घालण्यापेक्षा अॅपवर तक्रारीची सोय असेल तर करतील. एकाच रिक्षावाल्याबद्दल अनेक तक्रारी आल्या तर आपोआपच त्यातला खरेपणा कळेल व ते ही अॅपवर किंवा त्या रिक्षावाल्याच्या रेटिंगवर दिसेल.
खरे म्हणजे अशा वेळेस लोकांनीच प्रत्यक्षात दिलेले भाडे त्यात टाकायची सोय केली, तर अॅपनुसार भाड्याची रेंज ही आहे, प्रत्यक्षात घेतल्या गेलेल्या भाड्याची रेंज ही आहे हे दोन्ही दिसेल. अर्थात अॅप वाल्यांकरता या रिक्षा हा मोठा बिझिनेस असेल तरच ते यात पडतील.
हे सगळे लोकांना माहिती हवी व पर्याय हवेत म्हणून. प्रत्यक्षात फक्त एकच रिक्षा उपलब्ध असेल आणि तो ही कमी रेटिंग वाला, मीटरच्या तक्रारीवालाच असेल, तरीही गरजेनुसार लोक जातीलही. जेथे पर्यायच उपलब्ध नाही तेथे लोक जी रिक्षा मिळेल ती वापरतील. हे वरचे सगळे अशा केसेसकरता नाही.
इथली चर्चा वाचून असे वाटते
इथली चर्चा वाचून असे वाटते आहे की इकडे झाले तसेच ॲपवाले सबसिडाइज करून भाडी दाखवत होती की लोकं आपल्या ॲप वर जास्ती येतील. आता त्यांना ते परवडेनासे झाले. आणि रिक्षा वाल्यांना पण कदाचित ते परवडत नसेल. त्यामुळे परत मीटर वर जाणे सुरू झाले. मी स्वतः पुण्यात ॲप आणि साधी अशी दोन्ही रिक्षा मागच्या ट्रिप मध्ये वापरली. मीटर वर थोडे जास्ती भाडे वाटले पण फार फरक वाटला नाही. वरती म्हटल्यानुसार १०% इकडे तिकडे. पुण्यात पूर्वी दरवर्षी मीटर ची तपासणी करून सर्टिफिकेट घेणे बंधनकारक होते. तेव्हा पुणे शहरातले तरी मीटर मला सगळ्यांची सेम वाटायची. आता डिजिटल मीटर चे काय आहे माहिती नाही.
चांगली चर्चा. वाचतोय.
चांगली चर्चा. वाचतोय.
. . .
रिक्षा पाठोपाठ कॅबचालकांच्याही संघटनेची बैठक सांगवी येथे होणार असून त्यात 18 एप्रिलपासून मीटरप्रमाणेच पैसे घेणार असा ठराव मांडला जाणार आहे.
(बातमी छापील म टा, 9 एप्रिल)
वरील बातमीत ॲप-रिक्षाबाबतचा
वरील बातमीत ॲप-रिक्षाबाबतचा खुलासा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलेला आहे.
त्यांच्या निवेदनानुसार,
रिक्षात बसतानाच ग्राहकाला कोणत्या प्रकारे भाडे घेणार याची कल्पना द्यावी व त्यानुसारच भाडे घ्यावे. आधी न सांगता नंतर जास्त असलेले भाडे घेतल्यास कारवाई केली जाईल.
news
news
प्रवाशाच्या पूर्वसंमतीने ऑटो ड्रायव्हर मीटर प्रमाणे भाडे घेऊ शकतात .आरटीओ पुणे.
https://www.punekarnews.in/pune-rto-clarifies-uber-auto-drivers-can-char...
ठीक आहे. आता उबरचे नवे धोरण
ठीक आहे. आता उबरचे नवे धोरण समजले. यातून भविष्यात काही वाद/ समस्या निर्माण होऊ शकतील असे वाटते. काही शंका व्यक्त करून ठेवतो :
१. नव्या पद्धतीत सुद्धा रिक्षा बुक केल्यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर जुन्या पद्धतीतले भाडे दाखवले जाणार आहे. प्रत्यक्षात आकारणी मीटरनुसार होणार. या दोन्हींमध्ये किती टक्केपर्यंतचा फरक क्षम्य /वाहतुकीच्या दृष्टीने व्यावहारिक मानला जाईल ?
२. वरचा फरक अपेक्षित प्रमाणाबाहेर दिसला तर ग्राहक रिक्षाचालकावर मीटरमध्ये फेरफार केल्याचा आरोप करु शकणार का आणि समजा एखाद्याने प्रकरण धसास लावले तर परिवहन कार्यालय कारवाई करणार का ?
३. ॲपमध्ये दाखवलेले भाडे हा एक प्रकारे रिक्षाचालकांवर थोडाफार वचक राहील का ? तसे असल्यास ते ग्राहकाच्या दृष्टीने चांगलेच राहील. ( परगावच्या नवख्या प्रवाशांना लांबच्या रस्त्याने घुमवणे, इत्यादी प्रकारांवर)
४. जर ॲपच्या भाड्याला काही अर्थच नसेल तर कालांतराने या कंपन्या ते दाखवणे बंद करतील का ?
माहित नाही.
मला अँप आणि मीटर मध्ये ४६% चा
मला उबर अँप आणि मीटर मध्ये ४६% चा फरक पडला.
आणि मीटर किती नीट पळते आहे याची शंका वेगळीच.
आता rapido बुक केली. अँप ने ४५ भाडे दाखवले. परत अँप ने दाखवले की या भाड्यात कॅप्टन तयार नाहीत, तर भाडे वाढवा. १० रुपये जास्त टाकल्यावर रिक्षा मिळाली.
* ४६% चा फरक >>> !
* ४६% चा फरक >>> !
. .
* कॅप्टन तयार नाहीत, तर भाडे वाढवा >>> अच्छा !
हे नव्याने समजले. हे फक्त रॅपिडोला असते का ? मी अजून ते वापरलेले नाही
प्रवाशाच्या पूर्वसंमतीने ऑटो
प्रवाशाच्या पूर्वसंमतीने ऑटो ड्रायव्हर मीटर प्रमाणे भाडे घेऊ शकतात .आरटीओ पुणे. >>
मीटरनुसार भाडे घेण्याचा प्रामाणिक पर्याय भारतात सर्वत्र उपलब्ध असेल तर उबर सारखे app आलेच नसते.
अवांतर १: उबर सारख्या कंपन्या enshittification करतात. कसा ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर बघा किंवा दिलेली विकिपिडीया लिंक वाचा अशी शिफारस करेन.
२. 'enshittification' was 2024 Word of the Year and added to the dictionary.
लेखाच्या मजकुरात मी जो
लेखाच्या मजकुरात मी जो बातमीचा दुवा दिला आहे त्यातले हे वाक्य पहा :
Prakash Shinde, an auto driver, expressed, "It's a matter of understanding only. Most of the time, the fare based on the meter reading is lower compared to the displayed fare on the app."
'Most of the time' ?? हे पटत नाही.
खूप मागणी असलेल्या वेळा किंवा मध्यरात्रीनंतर हे एक वेळ खरे असू शकते पण बहुसंख्य वेळा ॲपचे पैसे कमीच (निदान ऊबरचे ) असतात असा स्वानुभव. (लेखात मी अनुभवलेले रात्रीचे उदाहरण दिले आहे. त्यातही ॲपचे पैसे कमीच आहेत). किंबहुना ते कमी असतात म्हणूनच गेली अनेक वर्षे लोक अशा रिक्षांकडे आकर्षित झाले आहेत.
काय वाटते ?
त्या रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार जर आता कोणाला "उलटे" अनुभव आले तर जरूर लिहा.
https://www.merriam-webster
https://www.merriam-webster.com/slang/enshittification
उबो धन्यवाद.
मी अॅप वापरायचो कारण प्रत्येक वेळी खिसे उलटे सुलटे करून सुट्टे पैसे नाहीत सांगत ३ ४ रुपयांची आचमने टाकणारा रिक्षावाला डोक्यात जायला लागला.
अजूनही रिक्षा चालकांची मनमानी
अजूनही रिक्षा चालकांची मनमानी, प्रवाशांची लूट आणि गोंधळ थांबलेला नाही. परिवहन विभागाने चालकांना मीटरनुसार घ्यायला सांगितले असताना देखील मनमानी दिसते आहे. App अथवा मीटर यातील जे भाडे जास्त असेल ते आकारले गेल्याच्या काही घटना घडल्यात. कमी अंतरासाठी ॲपनुसार भाडे घ्यायचे (कारण ते जास्त) असाही काहींचा उद्योग चालू आहे.
एका प्रवाशांनी सांगितल्यानुसार रिक्षा बुक केल्यानंतर ग्राहकापर्यन्त पोचण्याच्या आधीच चालकाने मीटर चालू केला होता.
(छापील म टा १६ एप्रिल)
उबर रिक्षा आल्यापासून काही
उबर रिक्षा आल्यापासून काही दिवस चांगले गेले. रिक्षाचा नंबर माहिती असायचा. मॅपवर रिक्षा कुठे आहे, ते कळायचं. आपल्या गावात नवीन मंडळी, ज्येष्ठ नागरीक वगैरे कुठे जात असतील, तर हे फिचर उपयोगी होतं. जिथे जायचं आहे, तिथे जाऊ इच्छिणारा रिक्षावाला आल्यामुळे ती वादावादी टळायची. पैसे किती होणार, हे आधी माहिती असायचं. त्यांच्याकडे युपीआय असल्यामुळे सुट्ट्या पैशांवरून कटकट होत नसे.
हे सुख आता संपलं, असं दिसतंय. पुन्हा मीटर योग्य / अयोग्य, अॅप की मीटर, इतके पैसे देणार असाल तरच येईन वगैरे दादागिरी सुरू झालेली दिसते आहे.
पुणे जिल्ह्यात 1 मे पासून
पुणे जिल्ह्यात 1 मे पासून सर्व cabs चे भाड्याचे नवीन नियम लागू होत आहेत.
ग्राहकाने प्रवास संपल्यानंतर
www.onlymeter.in. या संकेतस्थळाच्या QR कोडवर जाऊन पाहायचे आहे आणि तिथे भाडे दाखवले जाणार आहे. पहिल्या दीड किलोमीटरला 37 तर पुढील प्रत्येक किलोमीटरला पंचवीस रुपये दर असणार आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/ola-uber-rapido-cabs-to-ch...
नवीन सरकारी आदेशानुसार ओला,
नवीन सरकारी आदेशानुसार ओला, उबर इ ना आता घाईगर्दीच्या वेळेत दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची परवानगी दिलेली आहे.
बातमी सर्वत्र प्रकाशित
अरे बापरे !!
अरे बापरे !!
Pages