Submitted by च्रप्स on 30 October, 2025 - 22:13
डिसेंबरदरम्यान अंटार्क्टिकामध्ये तिथल्या माबोकरांना भेटण्याची तीव्र (आणि थंडगार) इच्छा आहे.
७-८ डिसेंबरचा वीकांत मोकळा आहे.
कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा सुरू केला आहे.
फक्त अंटार्क्टिकामधलेच माबोकर असं काही नाही …आसपास कुणी येऊ शकणार असतील, त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.
२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा, आणि गरम चहावर चर्चा — असं डोक्यात आहे.
तर, इथे कृपया कळवा — जॅकेट आणि थर्मस तयार ठेवा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शामियाना...>>> हरपा
शामियाना...>>> हरपा


वाटेत सीलच्या डोळ्यात डोळे घालून पाहू नका, "तुम्हारी आंखो में जादू है" म्हणत प्रेमात पडतात म्हणे ते. उगा मला निस्तरायला लावू नका.>>>
धमाल प्रतिसाद आहेत सगळेच
वाटेत सीलच्या डोळ्यात डोळे
वाटेत सीलच्या डोळ्यात डोळे घालून पाहू नका, "तुम्हारी आंखो में जादू है" म्हणत प्रेमात पडतात म्हणे ते. उगा मला निस्तरायला लावू नका.>>>
'यारा सिली सिली' हे त्यांचं राष्ट्रगीत आहे..
मी चिकन करी आणत आहे. त्यात
मी चिकन करी आणत आहे. त्यात चिकन ऐवजी पनीर घातले तर चालेल का ?
आमच्या शेजारच्या मुलाचं ४
आमच्या शेजारच्या मुलाचं ४ डिसेंबरला लग्न आहे.
तो आणि त्याची वाग्दत्त वधू मायबोलीचे वाचनमात्र सभासद आहेत.
गटग बद्दल वाचल्यावर 'गटग (अल्प हजेरी)-कम-मधुचंद्र' अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आलीय.
तर मधुचंद्र साजरा करण्याठी एखादी पंचतारांकित इग्लू मिळू शकेल का असं त्यांनी मला संयोजकांना विचारायला सांगितलंय.
वेळच आली तर ८ तारखेच्या सकाळी एखादं कोतबो सेशन त्यांच्या कामी येईल असंही त्यांचं म्हणणं आहे.
(होत असेल तर आपणही तिथे 'इग्लू शृंगारणं', 'इग्लूसमोर कोळशाची रांगोळी काढणं' अशा स्पर्धा घेऊ शकतो.)
संयोजकांनी कृपया विचार करावा आणि नवदांपत्याचा दुवा घ्यावा.
इतक्या सौजन्याने आदरातिथ्य
इतक्या सौजन्याने आदरातिथ्य केलेल्या नव दांपत्याच्या जुळया मुलींची नावे अन्तरा antara अंतरिका antartica ठेवतील का ते दोघे
पुणे दर्शन सारखी बस आहे का हो
पुणे दर्शन सारखी बस आहे का हो? नाही, इतक्या लांबवर यायचं तर तो दक्षिण ध्रुव का कायसा त्याला भेट द्यावी म्हणतो.
शेजारच्या वाड्यातले आप्पा नित्सुरे एकदा मुलीकडे अमेरिकेला जाऊन काय आले, अन् त्या नायगारा स्तुतीचा धबधबा थांबतच नाही! त्यांना थंड करायला हा दक्षिण ध्रुव बरा! कसं?
तसं काय म्हणा, आमच्या मेहुणपुऱ्यातल्या दक्षिणामुखी मारुतीला नमस्कार घडला की त्रैलोक्याचं दर्शन झाल्यागतच आहे. पण तरीही...
झकासराव, तुमच्या कार मधून मला
झकासराव, तुमच्या कार मधून मला न्या. मला एरवी प्रवासाची आवड नाही, पण आता इतकं अगत्याने धागा काढलाय तर यायलाच हवं. नवरा कैलास-मानस परिक्रमा करून आला, मी का मागे राहू!
मी तर रेनडिअरवर बसून येणार
मी तर रेनडिअरवर बसून येणार आहे. सोबत अजून एका व्यक्तीला नेता येईल अशी सोय आहे.
सगळेच
सगळेच
*आहे
माझं यायचं नक्की झालं होतं पण आयत्या वेळी घरचा अहेर मिळाला -
अहो, माती खाल्ल्याशिवाय एकही दिवस जात नाही तुमचा, मग कसे राहणार आहात त्या बर्फात !!
भाऊ
भाऊ
तिकडे जावून अति करावे मग
तिकडे जावून अति करावे मग म्हणी प्रमाणे अति तेथे माती मिळेल ती खावी. तात्पर्य ― आनाही पड़ेगा
M2M फेरी सुरू झाली का?
M2M फेरी सुरू झाली का?
माझ्या पाळीव पेंग्विनला तिथला
माझ्या पाळीव पेंग्विनला तिथला डिसेंबरमधला उन्हाळा सहन होणार नाही. नाहीतर नक्की आलो असतो त्याच्यासकट.
राणीच्या बागेत ठेवून या की..
राणीच्या बागेत ठेवून या की..
ड्रेस कोड? नको ती कोडी कशाला
ड्रेस कोड? नको ती कोडी कशाला ?
भर डिसेंबरात गरमी आहे म्हणे..
भर डिसेंबरात गरमी आहे म्हणे.. बर्फाच्या पाण्याची तळी बनली असतील. पोहत पोहत गट्ग करायचा आनंद घेता आला तर घ्यायचा ह्या हिशेबाने कपडे घ्या.
बर्फाच्या पाण्याची तळी...
बर्फाच्या पाण्याची तळी...
मग तिथे तुषार स्नान करून ह्या वर्षीचा राहिलेला ववि पण उरकता येईल.
नवीन रंगात नवीन ढंगात........ अंटार्क्टिकात
टी
मला घरचा आणखी एक अहेर -
लग्न झाल्यापासून सगळ्यावर फक्त टीकाच करताय ना, मग ती अंटार्टीका आणखी कशाला हवींय आता तुम्हाला !!!
भाऊ दोन्ही आहेर छान
भाऊ दोन्ही आहेर छान
भाऊ
भाऊ
भाऊ
भाऊ
भाउ
भाउ

मी तर रेनडिअरवर बसून येणार
मी तर रेनडिअरवर बसून येणार आहे. सोबत अजून एका व्यक्तीला नेता येईल अशी सोय आहे.> मला यायचं आहे या गटग ला ..... मी येऊ का तुमच्यासोबत रेनडिअरवर ? त्यासाठी मी खादाड माऊ असा ID घ्यायला तयार आहे
साऱ्या रेनडियर ची मीटिंग
साऱ्या रेनडियर ची मीटिंग ठेवलीय अखिल विश्व मृग नयन संघटना द्वारे आणि नाताळ ची सुट्टी नाही दिली तर संप करायची प्लानिंग आहे त्यामुळे अख्खा डिसेंबर कोणीही रेनडियर उपलब्ध नसेल ह्याची कृपया नोंद घ्यावी असे सांता बाबा काल आमच्या व्हाट्सअप ग्रुपात बोलत होते
वरचे सगळे वाचून माझी यायची
वरचे सगळे वाचून माझी यायची प्रबळ इच्छा झाली आहे.
पण आधीच असलेले लंबोदर इग्लूत राहून पिग्मी सारखे नाही ना होणार?
( अवांतर : तिकडे रेनडिअर
( अवांतर : तिकडे रेनडिअर सुट्टी हवी म्हणून संप करताहेत तर इकडे आमचा डियर रेन दिवाळी, तुळशीचं लग्न झालं तरीही हक्काची वार्षिक सुट्टीही घेत नाहीय ! शिका म्हणावं आमच्या रेनकडून अशी कामाची आस्था !! )
भाऊ
भाऊ
भाऊकाका
भाऊकाका
मस्त झाला गटग. बरेच मायबोलीकर
मस्त झाला गटग. बरेच मायबोलीकर आले होते. सगळ्यांना भेटून मस्त वाटलं. वेळ कसा निघून गेला समजलंच नाही.

फोटोखाली नावं लिहा ना.
फोटोखाली नावं लिहा ना.
मला यायचं होतं पण त्याच दिवशी एव्हरेस्ट वर फॅमिली गेट टुगेदर होतं.
(No subject)
बोकलत धन्यवाद, डोंबिवलीकर
*पण त्याच दिवशी एव्हरेस्ट वर
*पण त्याच दिवशी एव्हरेस्ट वर फॅमिली गेट टुगेदर होतं.*
( पूर्वी आम्हीही नियमितपणे जात होतो एव्हरेस्टवर; पण आता प्रदूषणाची इतकी संवय झालीय, की तिथे गेलं की जीव गुदमरतो शुद्ध हवेने !! )
अरे काय हे?
अरे काय हे?
डिसेंबर दरम्यान करणार म्हणालात आणि नोव्हेंबर मध्येच करून रिकामे?
याला काय अर्थ आहे?
मी गटगसाठी नवीन कपडे घेतले होते, तिकिटे काढली होती….. सगळे पैसे पाण्यात गेले.
खादाडी चे फोटो येऊ द्यात
खादाडी चे फोटो येऊ द्यात
सगळे पैसे बर्फात गेले
सगळे पैसे बर्फात गेले
खातेच गोठवले !!
खातेच गोठवले !!
अहो ती recce साठी गेलेली टीम
अहो ती recce साठी गेलेली टीम आहे, वर्षाविहार आधीआपले संयोजक कसे recce करतात , तसेच आताही केले असेल. संयोजनात असल्याचा परिणाम . खात्रीलायक सूत्रांकडून कळले आहे कि गटग डिसेंबर मधेच आहे. कुणाचेही पैसे बर्फात गेले नाहीत... चला पुन्हा तयारीला लागा
रेकीचे स्पेलिंग आज पहिल्यांदा
रेकीचे स्पेलिंग आज पहिल्यांदा कळले मला आयुष्यात.
कुणाचेही पैसे बर्फात गेले
कुणाचेही पैसे बर्फात गेले नाहीत... चला पुन्हा तयारीला लागा>>>>
हुश्श
Cold Cash is a good thing.
Cold Cash is a good thing.
थोडक्यात वृतांत.
थोडक्यात वृतांत.
अंजूताई आम्ही फक्त साईटची पाहणी करायला गेलो होतो. महागटग डिसेंबर महिन्यातच आहे. त्यात लय मोक्कार मायबोलीकर येणार आहेत. तर तिथल्या पेंग्विनना त्रास होऊ नये म्हणून आम्ही पेंग्विन कपडे घालून गेलो होतो. आता झालं असं की चेहरा दिसत नसल्यामुळे हा नक्की कोण आहे हे ओळखणं कठीण झालं.थोडक्यात आपल्या डू आयडीसारखा प्रकार खरोखरच्या गटगला झाला. जाताना हसत खेळत असणाऱ्या मायबोलीकरांचा सुप्त गुण जागृत झाला आणि तिकडे पण मोदी, बीजेपी, बिहार निवडणूक काँग्रेस वैगरे सुरू झालं आणि थेट मारामारी करेपर्यंत मजल गेली.. एकाने तिथे आलेल्या खरोखरच्या पेंग्विनची कॉलर पकडली सगळा पेंग्विन समाज घाबरलेला आहे. आता सगळे पेंग्विन ही पूर्वीची अंटार्क्टिका राहिली नाही म्हणत उत्तर ध्रुवावर जाण्याचा विचार करत आहेत. मी त्या गदरोळात हिंदी मराठी पिक्चरची गाणी बोलण्याची हौस फिटवली. नंतर परतीच्या प्रवासात सगळे ओरिजिनल आयडीच्या रुपात आले होते. परतीच्या प्रवासात सगळ्यांना प्रेमाचं भरतं आलं होतं, एक दुसरेसे करते है प्यार हम , हम साथ साथ है वैगरे गाण्यावर नाचत गात परत आले.
डफग
हट्टच असेल तुमचा तर खुशाल जा , पण तुमच्या पेन्शनसाठी लागणारं ' लाईफ सर्टिफिकेट ' मात्र द्या आणि मगच जा तिथल्या गटगला !!
Submitted by भाऊ नमसकर on 13
Submitted by भाऊ नमसकर on 13 November, 2025 - 21:39>>>
IYKYK 
if you know, you know
if you know, you know
अगदी अगदी. आम्हीही मजा करतो ही.
भाऊ ग्रेट.
भाऊ ग्रेट.
lol भाऊ एक नंबर
lol भाऊ एक नंबर
या महिन्यात १७ फेब्रुवारीला
या महिन्यात १७ फेब्रुवारीला सूर्यग्रहण आहे, ते भारतातून दिसणार नाही पण अंटार्क्टिका इथून दिसेल.
या गटगचा पुढचा भाग १७ फेब्रुवारीला तिथं करायचा का?
कोण कोण येणार?
"सूर्यग्रहण असताना गटग का
"सूर्यग्रहण असताना गटग का करू नये" असा काकाफॉ लिहायला नामी संधी आहे.
Pages