Submitted by बिपिनसांगळे on 2 November, 2025 - 02:40
शाळेची वेळ झाली -बालकविता
चला चला बॅग भरा
चला चला डबा भरा
शाळेची वेळ झाली
शाळेची वेळ झाली
एक वही सापडत नाही
गृहपाठाचा पत्ता नाही
पेन्सिल तर तुटकी बाई
पेनामधून गळते शाई
शाळेची वेळ झाली
अंघोळ म्हणजे दोनच तांबे
नुसती बुडबुड जरा न लांबे
बाबांची तर चाले लुडबूड
टॉवेल मिळेतो माझी कुडकूड
शाळेची वेळ झाली
डब्यात काय ? पोळीचा रोल
आणि दोन बिस्किटं गोल
शाळा माझी तिची घाई
कित्ती कामं करते आई
शाळेची वेळ झाली
घाई आमची झाली भारी
तोच व्हॅन आली दारी
पण आई घे ना पापा
नाहीतर करणार नाही टाटा
शाळेची वेळ झाली
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दिवाळीची सुटी संपून
दिवाळीची सुटी संपून उद्यापासून सुरु होणाऱ्या शाळांना आणि पोरांना
छान झालीय कविता
छान झालीय कविता
गोड
गोड
छान
छान
मोठ्यांचा आभारी आहे पण लहान
मोठ्यांचा आभारी आहे पण लहान मुलांना नक्की सांगा अशी विनंती
गोड
गोड
सुंदर बालकविता..!
सुंदर बालकविता..!
भरत आणि रुपाली आभारी आहे
भरत आणि रुपाली आभारी आहे
छान
छान