शाळेची वेळ झाली
Submitted by बिपिनसांगळे on 2 November, 2025 - 02:40
शाळेची वेळ झाली -बालकविता
चला चला बॅग भरा
चला चला डबा भरा
शाळेची वेळ झाली
शाळेची वेळ झाली
एक वही सापडत नाही
गृहपाठाचा पत्ता नाही
पेन्सिल तर तुटकी बाई
पेनामधून गळते शाई
शाळेची वेळ झाली
अंघोळ म्हणजे दोनच तांबे
नुसती बुडबुड जरा न लांबे
बाबांची तर चाले लुडबूड
टॉवेल मिळेतो माझी कुडकूड
शाळेची वेळ झाली
डब्यात काय ? पोळीचा रोल
आणि दोन बिस्किटं गोल
शाळा माझी तिची घाई
कित्ती कामं करते आई
शाळेची वेळ झाली
विषय:
शब्दखुणा: