शशक ३ - डेलिगेशन - आशिका

Submitted by आशिका on 2 September, 2025 - 01:52

हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?”

स्थापना केली तेव्ह्ढं ठीक पण या स्पर्धा नि उपक्रमांची रेलचेल?....अबब... रिकामटेकडा वाटलो होय मी? कुठे कुठे पुरा पडू ? अमकी स्पर्धा तमका उपक्रम, प्रकाश चित्रांचे धागे, चिमुरड्यांची चित्रं........... शिवाय प्रायमरी रिस्पोन्सिबिलिटिज तर आहेतच.... प्रार्थना-गार्‍हाणी ऐका, त्याला प्रतिसाद द्या, संकटं पळवा, आरत्या, प्रसाद स्वीकारा, दर्शन द्या.....हुश्श.....दमलो बुवा.....

पण तरीही एक डोळा मायबोलीवर असतोच. आवडतं मला तिथे बागडायला या दिवसांत, काय वाचू, काय पाहू असं होऊन जातं ...

ते काही नाही आता ठरवलंय ,पुढच्या वर्षीपासून कैलासावरुन येतानाच बाबांना सांगून कामाचं 'डेलिगेशन' करायचं....'परफॉर्मंस बोनस'ला भुलुन शिवगण धावत राहतील भक्तांच्या हाकेला, आपण मस्तपैकी बागडणार मायबोलीवर….यिप्पी !!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Cute

छान!

बाप्पाची शशक छान जमलीये.