माझी संस्मरणीय भटकंती - मदुरो डॅम

Submitted by आशिका on 4 September, 2025 - 08:08

२०२३ च्या एप्रिल महिन्यात युरोप टूर् केली. त्या वेळी ट्युलिप फुलांचा सीझन संपल्यामुळे जगप्रसिद्ध अशा Keukenhof tulip gardens काही दिवसांपूर्वीच बंद झाल्याचे समजले आणि मन जरा खट्टू झाले. टूरिस्ट कंपनीकडून तेव्हा मदुरोडॅम चा पर्याय देण्यात आला. ट्युलिप्स गार्डन च्या तोडीस तोड असे दुसरे काय ते असणार असा विचार मनात येऊन गेला आणि थातुर मातुर ठिकाणी जाऊन वेळ , ताकद आणि अपुरी राहिलेली झोप या बाबींशी तडजोड करण्यापेक्षा त्या दिवशी हॉटेल रूम वरच मस्त ताणून द्यावी असाही विचार मनात झळकून गेला. मात्र इतकं संस्मरणीय स्थळ पाहणं, तो अद्भुत अनुभव आथठवणींच्या शिदोरीत रहावा असं विधिलिखित असावं, त्यामुळे कसं कोण जाणे पण आयत्या वेळी आपणही या मदुरो डॅमच्या टूरवर जायचं असं जाहीर करुन आम्ही तिथे प्रस्थान केलं.

तिथे पोहोचतांच बरं झालं आपण हे थिकाण स्किप केलं नाही असं वाटायला त्या वास्तूने भाग पाडलं. तिथे फिरत असतांना, जागोजागी अवाक होण्याची पाळी येत होती. ट्युलिप गार्डनच्या सौंदर्यापेक्षा हे काही कमी नाही, याची प्रचिती आली. एक निसर्गाचा साक्षात्कार तर दुसरे संपूर्णपणे मानवी कर्तृत्व !!!

आवर्जून भेट द्यावी असे हे अ‍ॅमस्टरडॅममधील पर्यटनस्थळ !

थोडक्यात हे स्थळ निर्माण होण्याआधीची पार्श्वभुमी सांगते.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेली ही एक सत्य कथा. नाझी जर्मनी एकेक देश पादाक्रांत करत होता. नेदरलँड त्यांतीलच एक. नेदरलँडचे सैनिक मायभूमीच्या रक्षणासाठी प्रयत्नांची शर्थ करीत होते. यांमध्येच एक शूरवीर जवान होता, मदुरो त्याचं नाव, जो देशासाठी प्राणपणाने लढत होता. दुर्दैवाने तो शत्रूच्या तावडीत सापडला आणि युद्धकैदी म्हणून बंदिवान असताना, नेदरलँड स्वतंत्र होण्यास काही दिवसच शिल्लक असतांना त्याचा मृत्यू झाला.

आपल्या शहीद पुत्राच्या मदुरोच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात काहीतरी वास्तू असावी अशी त्याच्या आई-वडीलांची इच्छा होती. नेदरलँड मधील अ‍ॅमस्टरडॅम शहराबाहेर आज उभे असलेले 'मदुरोडॅम' नामक 'थीमपार्क' हे त्या मातापित्यांचं साकार झालेलं स्वप्न, त्यांच्या वीर पुत्राची आठवण जतन करणारं !!

हे थीम पार्क म्हणजे नेदरलँड मधील प्रमुख वास्तू, ऐतिहासिक वास्तू आदींचे लहान स्वरूप होय. अगदी 2 ते 3 फूट उंचीच्या या वास्तू हुबेहूब खऱ्या वास्तू वाटाव्यात इतके साम्य यांत आढळते. पवनचक्की, वीजनिर्मिती प्रकल्प, रेल्वे, ट्रॅमचे ट्रॅक्स आणि त्यावर धावणाऱ्या पिटुकल्या रेल्वेगाड्या त्यांची स्टेशन्स, फाटक हे बघण्यात आपण रंगून जातो. अ‍ॅमसअ‍ॅडॅमची ओळख 'कालव्यांचे शहर' अशी आहे आणि ती खरी ठरवण्यात हे मदुरोडॅम कुठेही कमी पडले नाही, तर याच्या भोवताली कृत्रिम कालवे आणि त्यात तरंगणाऱ्या बोटी या पार्कची शोभा वाढवतात.
या सुंदर पार्कमधील चिमुकल्या इमारतींमधून फिरत असतांना आपण गलिव्हरर्स ट्रॅव्हल्स मधील महाकाय व्यक्ती असल्यागत वाटते.

>सोबत काही फोटो अपलोड केले आहेत.
Maduro Dam.jpgMaduro2.jpgMaduro3.jpgMaduro4.jpgMaduro5.jpgMaduro6.jpgMaduro7.jpgMaduro1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह! बरं झालं आशिका तुम्ही गेलात आणि खोलीवरती ताणून दिली नाहीत ते. सुवर्णसंधी गमावली असती. मुलगी खूपदा अ‍ॅम्स्टरडॅमला जाउन आलेली आहे, पुढच्या वेळेस तिला 'मदुरो डॅम' बद्दल कळवेन.

छान!
चित्रं बघून लेगोलॅन्डची आठवण आली.