मायबोली गणेशो त्सव २०२५

माझी संस्मरणीय भटकंती - मदुरो डॅम

Submitted by आशिका on 4 September, 2025 - 08:08

२०२३ च्या एप्रिल महिन्यात युरोप टूर् केली. त्या वेळी ट्युलिप फुलांचा सीझन संपल्यामुळे जगप्रसिद्ध अशा Keukenhof tulip gardens काही दिवसांपूर्वीच बंद झाल्याचे समजले आणि मन जरा खट्टू झाले. टूरिस्ट कंपनीकडून तेव्हा मदुरोडॅम चा पर्याय देण्यात आला. ट्युलिप्स गार्डन च्या तोडीस तोड असे दुसरे काय ते असणार असा विचार मनात येऊन गेला आणि थातुर मातुर ठिकाणी जाऊन वेळ , ताकद आणि अपुरी राहिलेली झोप या बाबींशी तडजोड करण्यापेक्षा त्या दिवशी हॉटेल रूम वरच मस्त ताणून द्यावी असाही विचार मनात झळकून गेला.

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशो त्सव २०२५