
सन १८५७
स्थळ - ब्रह्मावर्त
लाल कमळ आणि रोटी वस्तीत सगळीकडे फिरवले गेले. हा ‘निरोप’ आणि 'सब लाल हो जाएगा'..ही कुजबूज, हळुहळूगलबला बनत गेली. मीरतमधून बातमी येताच तोही योजनेप्रमाणे सैन्य घेऊन सोजिरांवर चालून गेला. अंगावरचे घाव जणु अलंकाराप्रमाणे मिरवत मातृभूमीपुढे लीन झाला..
सन १९२४, १९४२...क्रांतीची ज्वलंत पावले टाकणारा तो..
सन १९४७..भारतमातेच्या बंधविमोचनामुळे आनंदविभोर झालेला तो.. भारतमातेच्या प्रगतीच्या मार्गावरील पावलांचं अवलोकन आणि अनुकरण करणारा तो..
नंतर वेगवान विसाव्या, एकविसाव्या शतकाशी मेळ जुळवताना मात्र..
‘चहापाणी’ देणारा -घेणाराही तोच.. एक बधीर नागरिक बनलेला तो.. त्याची ही निसरडी वाटचाल पाहणारी ती 'माऊली'कळवळून म्हणाली,
"मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील ! "
.......................................................................
ह्म्म… खरेच अधोगती..
ह्म्म… खरेच अधोगती..
हा प्रवास खुप सुंदर पकडलाय.
वाह! सुंदर! पण तितकीच बोचरी
वाह! सुंदर!
पण तितकीच बोचरी
छान आहे. समजली आणि आवडली.
छान आहे. समजली आणि आवडली.
"बंधविमोचनामुळे आनंदविभोर" हा शब्दप्रयोग आवडला.
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.