शशक - २ - गरुड-भरारी -सामो

Submitted by सामो on 2 September, 2025 - 13:07

कथा सर्वांना परिचित अशी आहे. मी फक्त शशक मध्ये मांडलेली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकर्‍याला एकदा गरुडाचे पिल्लू सापडते. तो कोंबड्यांच्या कळपात सोडतो. गरुड वाढू लागतो, कोंबड्यांसारखाच चालू लागतो, दाणे टिपु लागतो. पण त्याला नेहमी वाटत रहाते - अन्य कोंबड्यांसारखा आपल्याला का नाही कलकलाट करता येत, आपल्याला का नाही दाणे टिपायला आवडत, कसली बेचैनी सतत आपल्याला जाणवते.
एक शहाणी घुबड मादी उडत तिथुन चाललेली असते ती हा कोंबड्यांच्या कळपातला गरुड बघते आणि ती म्हणते - "मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील! अरे गरुड ना तू, कसला या कलकलाटी कोंबड्यांत, खुराड्यात अडकुन पडतोस. ऊठ, घे भरारी. इथे तू शोभत नाहीस.”
.
.
आणि गरुडाला जाणीव होते स्वसामर्थ्याची व संपूर्ण बळानिशी तो गरुड-भरारी घेतो,

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद माबो वाचक.
------------------------------------
माझ्या 'पक्ष्यांवरील इंग्रजी कविता' मधील हे गरुडाचे वर्णन -
God lit the fire in his eyes
And bound swords on his feet,
God fanned the furnace of his heart
To everlasting heat

राजहंस पहिला आठवतो
पण हे गरुडपुरान सुद्धा वाचले आहे.
छान जमली आहे इथे

छान.