शशक २ – सवत तिची मायबोली (ऑल ईन वन शशक) – ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2025 - 18:00

"मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!”

मी मोबाईलमध्ये खुपसलेले डोके वर काढून विस्मयचकित नजरेने तिच्याकडे पाहिले.

"सारखे तिच्यासोबत गुलूगुलू बोलणे काय, गालातल्या गालात हसणे काय...
हल्ली दिवसरात्र तेच चालू असते.
इतकेच असेल तर जा तिच्याकडेच राहायला..."

"कोण ती??" मी घाबरलो!

चुकून दुसरे नाव घ्यायचो आणि ते भांडे सुद्धा फुटायचे.

"तीच ती...
तुझी मायबोली!"

अरे देवा...

इतक्या स्पर्धा, इतके उपक्रम..
किती लिहायचे, केवढे वाचायचे..
हे संयोजक जरा अतिच करतात.
अश्याने घर तोडतील आमचे.

मी लगेचच मुलांना म्हणालो,
"चला रे आज ड्रॉइंग करूया.. आणि जेवणाला गोड शिरा खाऊया.." हे ऐकताच बायकोचा चेहरा खुलला!

"हे सारे मायबोलीवरचे उपक्रम आहेत यंदा"
..... असे पुढे मी म्हणताच,

.

.

.

.

.

.

.

1394b1c613384346991cac4bc973d825.gif

– ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता हो Lol
आता कोणी शशक कळली नाही म्हणू नये Proud

Proud माबोकरांच्या वतीने पुढे -
ये उसका स्टाईल होईंगा
ओठोंपे ना दिलमें हां होईंगा Wink

छान, मस्त, आवडली.
आणि ते गाणे पण मस्तच. जोश मधली बाकीची गाणीसुद्धा आवडतात.
बाय द वे, मायबोली कडे राहायला जायचे म्हणजे नक्की कुठे राहायला जायचे? गरज लागली तर माहित असावे म्हणून विचारतोय. Lol

मायबोली कडे राहायला जायचे म्हणजे नक्की कुठे राहायला जायचे?
>>>>>>
ते विचारावे लागेल घरी...
उत्तर मिळेल न मिळेल...
पण त्यानंतर तुम्हा लोकांना माझी खरोखर सोय करावी लागेल Lol

किंवा आईला विचारावे लागेल..
मी खाणेपिणे विसरून क्रिकेट बघू लागलो तर ती सुद्धा म्हणायची.. ते लोकच जेवण देतात का बघ Proud

>>>>>>मी खाणेपिणे विसरून क्रिकेट बघू लागलो तर ती सुद्धा म्हणायची.. ते लोकच जेवण देतात का बघ
हाहाहा

सर्टिफिकेट आवडले संयोजक.
फार सुंदर आहेत.
पिंक इज माय फेवरेट कलर!
याउपर एक सोलकढीची छटा सुद्धा आहे.
पटपट स्क्रोल करणारा थोडावेळ थांबून बघूनच पुढे जाईल असे आहेत.
त्यामुळे स्क्रीन शॉट घेऊन आताच व्हाट्सअप स्टेटस वर लावले आहेत Happy

धन्यवाद Happy